नि.नं. 68
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या - सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1416/2008
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – 18/12/2008
तक्रार दाखल तारीखः – 30/12/2008
निकाल तारीखः - 16/06/2012
----------------------------------------------
1. श्री शिवाजीराव रामचंद्र पाटील
वय वर्ष – 68, व्यवसाय– निवृत्त
2. सौ चंद्रकला शिवाजीराव पाटील
वय वर्ष – 65, व्यवसाय – घरकाम
3. श्री हेमंत शिवाजीराव पाटील
वय वर्ष – 40, व्यवसाय – खाजगी नोकरी
4. श्री नंदकिशोर शिवाजीराव पाटील
वय वर्ष – 38, व्यवसाय – व्यापार
5. श्री दुष्यंत शिवाजीराव पाटील
वय वर्ष – 35, व्यवसाय – शेती
सर्व रा.यशवंत नगर, सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजर / सेक्रेटरी
दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
शाखा विश्रामबाग, सांगली
2. श्री नामदेवराव गणपतराव मोहिते (चेअरमन)
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय - समाजकार्य
रा. गणेश कृपा बंगला, हरीपूर रोड, सांगली
3. श्री भूपाल किसन आळवेकर (व्हा.चेअरमन)
वय वर्षे – सज्ञान,
रा. हरीपूर, ता.मिरज जि. सांगली
4. श्री गणपतराव शामराव पाचुंदे,(संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
रा. पत्रकार नगर कोल्हापूर रोड, सांगली
5. श्री अशोकराव दशरथ मोहिते,(संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
रा. हरिपूर, वॉर्ड नं.4, ता.मिरज जि. सांगली
6. श्री संभाजी तुकाराम पाटील (संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
रा. किसान चौक, सांगलीवाडी, ता.मिरज जि. सांगली
7. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी (संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
रा. हरिपूर, वॉर्ड नं.2, ता.मिरज जि. सांगली
8. श्री सलीम आब्बास पन्हाळकर,(संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
रा. पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली,
9. श्री राजकुमार सदोराम चुघ (संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
रा. लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, मिरज
10. श्री विजय गंगाराम पाटील (संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
रा.मुजावर प्लॉट, एस.टी.स्टँडजवळ, सांगली
11. श्री आण्णासो दुडाप्पा कोरे,(संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
रा.गणेश कॉलनी, एस.टी.स्टॅंडजवळ, सांगली
12. श्री शशिकांत पिराजी पोळ (संचालक)
वय वर्षे – सज्ञान,
प्रशिक चौक, गांवभाग, सांगली
13. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील (संचालीका)
वय वर्षे – सज्ञान,
रा.एस.टी.कामगार भवनजवळ, भोसले प्लॉट सांगली,
14. श्रीमती वंदना बाबासो लावधनकर (संचालीका)
वय वर्षे – सज्ञान,
रा.हरिपूर, वॉर्ड नं.2 ता.मिरज जि. सांगली
15. सौ सुवर्णा गजानन काकडे (संचालीका)
वय वर्षे – सज्ञान,
रा.हरिपूर, वॉर्ड नं.2 ता.मिरज जि. सांगली
16. सौ शशिकला अरुण पोळ (संचालीका)
वय वर्षे – सज्ञान,
रा.प्रशिक चौक, गांवभाग, सांगली
17. सौ आक्काताई विजय पाटील (संचालीका)
वय वर्षे – सज्ञान,
रा.मुजावर प्लॉट, एस.टी.स्टँडजवळ, सांगली .....जाबदार
तक्रारदारतर्फे : अॅड श्री एम.एच.ग्रामोपाध्ये
जाबदार क्र.1 ते 11 व 13 ते 17: एकतर्फा
जाबदार क्र.12 तर्फे : अॅड श्री एस.के. केळकर
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
1. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी व बचत खाते अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था सांगली, शाखा विश्रामबाग (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्या होत्या. यातील सर्व ठेवींच्या मुदती पूर्ण झाल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.5 अन्वये एकूण 54 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
2. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. 1 ते 11 व 13 ते 17 यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर करण्यात आला.
3. जाबदार क्र.12 यांचेवर मंचाच्या नोटीशीची बजावणी झाल्यानंतर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांनी त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले. त्यांच्या म्हणण्यामध्ये त्यांनी तक्रारदारांचा तक्रारअर्ज व त्यातील कथने अमान्य केली आहेत. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2006 मध्ये त्यांनी पतसंस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे व तो राजीनामा मंजूर झाल्याचे त्यांच्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. या जाबदारांनी पुढे असेही कथन केले आहे की, त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर ते संस्थेचे संचालक नाहीत हे दर्शविणारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांनी दि.1/3/2008 रोजी व त्यानंतर दि.4/7/009 रोजी संचालक मंडळाची यादी दिलेली आहे, ती यादी जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यासोबत दाखल केलेली आहे. आणि याच्या आधारे सदरहू जाबदारांना तक्रारदारांच्या ठेवीतील रकमांसाठी जबाबदार धरता येणार नाही. सदरहू जाबदारांनी पुढे असेही म्हणणे मांडले आहे की, ही बाब तक्रारदारांना माहित होती आणि तरीदेखील त्यांनी जाबदारांना त्रास द्यायचा म्हणून त्यांना प्रस्तुत प्रकरणी जाबदार म्हणून सामील केलेले आहे, आणि म्हणून सदरहू जाबदार हे तक्रारदारांचे कोणतेही देणे लागत नाहीत असे ठरवून मिळावे, तसेच त्यांना विनाकारण जाबदार म्हणून सामील केल्याने जो शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला त्याकरिता म्हणून नुकसान भरपाई पोटी म्हणून एकूण रक्कम रु.10,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
4. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुद्दा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. 5223/09 सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक 22 डिसेंबर 2010 रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम 88 अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. 2 ते 17 यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
मॅनेजर व सेक्रेटरी हे पतसंस्थेचे कर्मचारी असल्याकारणाने त्यांचेविरुध्द कोणतेही आदेश करण्यात आलेले नाहीत.
त्याचप्रमाणे जाबदार क्र.12 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत दाखल केलेल्या उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दिलेल्या संचालक मंडळाच्या यादीचे अवलोकन करता त्यामध्ये जाबदार क्र.12 यांचे नावापुढे राजीनामा दिल्याची नोंद केल्याचे दिसून येते. यावरुन जाबदार क्र.12 यांना विनाकारण प्रस्तुत प्रकरणी सामील करण्यात आल्याचे यामध्ये मंचास दिसून येते. आणि त्यामुळे जाबदार क्र.12 यांना तक्रारअर्जाच्या खर्चास सामोरे जावे लागले ही बाब लक्षात घेवून तक्रारदारांनी जाबदार क्र.12 यांना रक्कम रु.1,000/- अदा करावेत असा आदेश करणे योग्य व न्याय्य ठरेल असे मंचास वाटते.
5. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी मुदत ठेव पावती क्र. 46946 मधील रकमेची मागणी केलेली आहे. परंतु सदरहू ठेवपावती अथवा त्याची सत्यप्रत त्यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल न केल्याने या ठेवीतील रकमेबाबत कोणतेही आदेश करण्यात येत नाहीत. मात्र या ठेवीतील रकमेबाबत भविष्यात दाद मागण्याची मुभा तक्रारदारांना राहील.
6. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी त्यांना ठेवपावत्यांतील रकमांवर काहीही व्याज मिळाले नाही असे दि.6/6/2012 रोजीच्या व्याजनिवेदनामध्ये नमूद केलेले आहे. परंतु तक्रारदारांनी ठेवपावत्यांच्या ज्या सत्यप्रती प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या आहेत, त्या सत्यप्रतींच्या मागील भागाचे अवलोकन करता तक्रारदारांना काही कालावधीपर्यंतचे व्याज प्राप्त झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. सबब ही नोंद ग्राहय धरुन ठेवपावत्यांतील रकमा व्याज मिळाल्याच्या दुस-या दिवशीपासून पावतीवर नमूद व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. तर बचत खात्यातील शेवटच्या तारखेस शिल्लक असलेल्या रकमा त्या शेवटच्या तारखेपासून 10 टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत.
7. तक्रारअर्जातील टायटलवरुन सर्व तक्रारदार हे एकाच कुटुंबातील असल्याचे दिसून येते. सबब ठेवींतील रकमा त्यांना मंजूर करण्यात येतात.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
1. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. 45947, 45948, 45949, 45950, 45951, 45952, 45953, 45955, 45956, 45957, 45958, 45959, 45960, 45961, 45964, 45963, 45962, 45965, 45966, 45967, 45968, 45969, 45970, 45971, 45972, 45973, 45974, 45975, 45976 मधील प्रत्येकी रक्कम रु.19,500/- (अक्षरी रुपये एकोणीस हजार पाचशे फक्त) दि.30/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
2. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.45956 मधील रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दि.30/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
3. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.45415, 46416 मधील प्रत्येकी रक्कम रु.14,000/- (अक्षरी रुपये चौदा हजार फक्त) दि.30/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
4. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.45417 मधील रक्कम रु.19,385/- (अक्षरी रुपये एकोणीस हजार तिनशे पंच्याऐंशी फक्त) दि.30/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
5. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.45413 मधील रक्कम रु.15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) दि.30/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
6. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. 34260, 34262, 34263, मधील प्रत्येकी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दि.12/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
7. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.45945 मधील रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) दि.30/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
8. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.19033, 19034, 19035, 19036, 19037 मधील प्रत्येकी रक्कम रु.20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्त) दि.18/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
9. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.44728, 44729, 44730, 44731, 44732, 44733, 44734, मधील प्रत्येकी रक्कम रु.20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्त) दि.26/8/2006 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
10. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.26955, 26958, 26959 मधील प्रत्येकी रक्कम रु.16,000/- (अक्षरी रुपये सोळा हजार फक्त) दि.27/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
11. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.45956 मधील रक्कम रु.16,000/- (अक्षरी रुपये सोळा हजार फक्त) दि.30/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
12. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.31925 मधील रक्कम रु.16,000/- (अक्षरी रुपये सोळा हजार फक्त) दि.29/8/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
13. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र.750 मधील रक्कम रु.73,000/- (अक्षरी रुपये त्र्याहत्तर हजार फक्त) दि.19/3/2010 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
14. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र.845 मधील रक्कम रु.76,640/- (अक्षरी रुपये शहात्तर सहाशे चाळीस फक्त) दि.11/9/2008 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
15. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
16. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.31/07/2012 पर्यंत अदा न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
17. यातील तक्रारदारांनी जाबदार क्र.12 यांना रक्कम रु.1,000/- दि. 31/07/2012 पर्यंत अदा न केल्यास जाबदार क्र.12 त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांक: 16/06/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.