Maharashtra

Ahmednagar

CC/16/61

Kantabai Kantilal Rakecha - Complainant(s)

Versus

Manager,Samata Gramin Bigarsheti Sahakari Patsanstha Ltd. - Opp.Party(s)

Tamboli

22 Jan 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/61
( Date of Filing : 22 Dec 2015 )
 
1. Kantabai Kantilal Rakecha
Near Jain Sthanak,Kolhar Bhagawati,Tal Rahata,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Samata Gramin Bigarsheti Sahakari Patsanstha Ltd.
Kolhar Bkd,Tal Rahata,
Ahmednagar
Maharashtra
2. Bhausaheb Prabhakar Kharde
Kolhar Bhagawati,Tal Rahata,
Ahmednagar
Maharashtra
3. Harshad Sanchalal Abad
Kolhar Bhagawati,Tal Rahata,
Ahmednagar
Maharashtra
4. Ravindra Marutrao Devkar
Kolhar Bhagawati,Tal Rahata,
Aurangabad
Maharashtra
5. Bhausaheb Murlidhar Kharde
Kolhar Bhagawati,Tal Rahata,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Tamboli, Advocate
For the Opp. Party: Lahare/ Sarode, Advocate
Dated : 22 Jan 2019
Final Order / Judgement

 

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.    तक्रारदार नं.1 ते 3 यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये सामनेवाला विरुध्‍द दाखल केली आहे.

2.    तक्रारदार नं.1 ते 3 यांची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, तक्रारदार नं.1 ते 3 राहणार कोल्‍हार भगवती ता.राहाता जि.अहमदनगर येथील कायमचे रहिवासी असून तक्रारदार नं.1 चे पती कांतीलाल हे व्‍यवसाय धंदा व शेती करीत होते. कांतीलाल मयत झाले आहेत. तक्रारदार नं.2 व 3 यांचे वडील किशोर राकेचा यांचा हॉटेल व्‍यवसाय होता. तक्रारदार नं.2 व 3 चे वडील हे दिनांक 19.08.2011 रोजी मयत झाले. तक्रारदारांना उत्‍पन्‍नाचे कोणतेही साधन नाही. तक्रारदारांनी मयत कांतीलाल व मयत किशोर यांच्‍याकडून मिळालेली रक्‍कम सामनेवाला पतसंस्‍थेला मुदत ठेवीमध्‍ये ठेवून त्‍याच्‍या व्‍याजावर उदरनिर्वाह करीत आहे. सामनेवाला नं.1 ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी पतसंस्‍था असून सामनेवाले नं.2 हे त्‍याचे चेअरमन आहेत व सामनेवाले नं.3 हे त्‍यांचे व्‍हाईस चेअरमन आहेत. सामनेवाला नं.4 हे सामनेवाला नं.1 पतसंस्‍थेचे संचालक आहेत. सामनेवाला नं.5 हे सामनेवाला नं.1 संस्‍थेचे मॅनेजर आहेत. सामनेवाला नं.1 चा दैनंदिन कारभार सामनेवाले नं.2 ते 5 हे पाहतात व सामनेवाला नं.1 च्‍या कारभारास सामनेवाले नं.2 ते 5 हे जबाबदार आहेत.

3.  तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 पतसंस्‍थेकडे अल्‍प मुदत ठेव, दामदुप्‍पट ठेव, बचत खाते इत्‍यादी योजनेमध्‍ये पुढीलप्रमाणे रक्‍कम ठेवलेली आहे. सदर रक्‍कम तक्रारदारांच्‍या नावे ठेवलेली आहेत. सदर रकमेवर सामनेवाला नं.1 पतसंस्‍थेने द.सा.द.शे.8 टक्‍के ते 16 टक्‍के प्रमाणे व्‍याज देण्‍याचे कबूल केलेले आहे. तक्रारदाराने सामनेवाला नं.1 पतसंस्‍थेकडे वेगवेगळया योजनेमध्‍ये ठेवलेल्‍या रकमेचा व व्‍याजाचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.   

नांव

अल्‍प मुदत ठेवीची तारीख

मुदत पुर्तीची तारीख

व्‍याज टक्‍के द.सा.द.शे.   

ठेव रक्‍कम रुपये

1.

कांताबाई राकेचा

29/12/11

29/3/13

12.5%

17,024/-

2.

कांताबाई राकेचा

2/02/12

30/4/13

12.5%

26,006/-

3.

कांताबाई राकेचा

27/10/12

27/1/14

13.5%

58,437/-

4.

कांताबाई राकेचा

(सेव्‍हींग्‍ज खाते)

5/12/13

 

8%

85,861/-

5.

प्रशांत राकेचा (दामदुप्‍पट)

22/4/09

22/4/15

16%

80,000/-

6.

दिनेश राकेचा

(दामदुप्‍पट)

22/4/09

22/4/15

16%

80,000/-

 

 

 

 

एकुण रुपये

3,47,328/-

    वरील रक्‍कम देय तारखेस तक्रारदारांनी मागितली असता सामनेवाला नं.1 पतसंस्‍थेने मुदत ठेवीच्‍या पावत्‍या तक्रारदाराकडून घेतल्‍या परंतु सदर रक्‍कम तक्रारदारांना दिली नाही. तक्रारदारांनी अनेकवेळा पतसंस्‍थेमध्‍ये चौकशी केली व रकमेची मागणी केली. पतसंस्‍थेने रक्‍कम लवकरच देण्‍याचे आशवासन दिले. त्‍यानंतर तक्रारदारांनी वेळोवेळी सदर रक्‍कम मिळावी म्‍हणून सामनेवाला पतसंस्‍थेमध्‍ये चकरा मारल्‍या. परंतू सामनेवाला नं.1 ते 5 यांनी सदर रक्‍कमा देण्‍यास नकार दिला. तक्रारदारांनी सामनेवाला नं.1 पतसंस्‍थेला दिनांक 30.05.2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून सदर रकमेची मागणी केली. परंतू सामनेवाला नं.1 पतसंस्‍थेने सदरचे नोटीस मिळूनही त्‍यास उत्‍तर दिले नाही. व रक्‍कमही दिली नाही. मुदत ठेवीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर त्‍याची रक्‍कम देण्‍याची सामनेवालावर कायदेशिर जबाबदारी आहे. सामनेवाला पतसंस्‍था हे ठेवी स्विकारुन त्‍यावर व्‍याज देण्‍याचा व्‍यवसाय करीत आहे. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी व उणीवा ठेवले आहेत. यामुळे तक्रारदारांना फार मोठा मानसिक व शारीरीक त्रास झाला आहे. म्‍हणून तक्रारदारांनी वरील नमुद मुदत ठेवीमध्‍ये गुंतविलेल्‍या रकमा व्‍याजासह मिळणेसाठी सदरील मंचात तक्रार दाखल करुन परिच्‍छेद (7) व (10) प्रमाणे रकमेची मागणी केली.

4.    सामनेवाला नं.1 ते 4 हे वकीलामार्फत प्रकरणात हजर झालेत मात्र त्‍यांनी त्‍यांची लेखी कैफियत दाखल केली नाही. त्‍यामुळे तक्रार त्‍यांचे विरुध्‍द विना कैफियत चालविण्‍याचा आदेश निशाणी 1 वर करण्‍यात आला.

5.    सामनेवाला नं.5 यांनी त्‍यांची लेखी कैफियत दाखल केली व त्‍यात कथन केले की, सदरची तक्रार त्‍यांना मान्‍य नाही. सामनेवाला नं.5 हे सामनेवाला नं.1 चे सेवेतून दिनांक 06.10.2012 रोजी राजीनामा देऊन सर्व कागदपत्राचा कारभार संस्‍थेकडे सुपूर्द केला आहे. त्‍यामुळे त्‍यांचा सदर केसशी काहीही संबंध नाही. समनेवाला नं.5 यांना केसमधून वगळण्‍याची मागणी केली आहे. 

6.    तक्रारदार यांची तक्रार, प्रतिज्ञापत्र व सोबत जोडलेली कागदपत्र, तक्रारदार यांचा लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला नं.5 यांचा जबाब यांचे अवलोकन केले. व प्रस्‍तूत निकालाचे न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित  होतात. व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.

मुद्देः

  उत्‍तर

(1)सामनेवाले यांनी तक्रारदार नं.1 ते 3 यांना सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे काय ?

:होय

(2)तक्रारदार नं.1 ते 3 हे सामनेवाले क्र.1 ते 5 यांच्‍याकडून मुदत ठेवीच्‍या रक्‍कमा आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत काय.?

: होय

 

(3) आदेश काय ?

:अंतिम आदेशाप्रमाणे

कारण मिमांसा

7.    मुद्दा क्र.12’:-  तक्रारदार नं.1 ते 3 यांनी सामनेवाले नं.1 समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या. को-हार बुद्रुक ता.राहाता जि.अहमदनगर या संस्‍थेत खालील नमूद केल्‍याप्रमाणे रकमा गुंतविल्‍या आहेत.

अ.क्र.   

नांव

अल्‍प मुदत ठेवीची तारीख

मुदत पुर्तीची तारीख

व्‍याज टक्‍के द.सा.द.शे.   

ठेव रक्‍कम रुपये

1.

कांताबाई राकेचा

29/12/11

29/3/13

12.5%

17,024/-

2.

कांताबाई राकेचा

2/02/12

30/4/13

12.5%

26,006/-

3.

कांताबाई राकेचा

27/10/12

27/1/14

13.5%

58,437/-

4.

कांताबाई राकेचा

(सेव्‍हींग्‍ज खाते)

5/12/13

 

8%

85,861/-

5.

प्रशांत राकेचा (दामदुप्‍पट)

22/4/09

22/4/15

16%

80,000/-

6.

दिनेश राकेचा

(दामदुप्‍पट)

22/4/09

22/4/15

16%

80,000/-

 

 

 

 

एकुण रुपये

3,47,328/-

     वरील नमुद पावत्‍यावरील रकमा पावतीवरील नमुद व्‍याजदराने दामदुप्‍पट ठेव योजनेत व सेव्‍हींग्‍ज खात्‍यात ठेवले. याप्रमाणे तक्रारदार नं.1 ते 3 यांनी ठेव पावतींचा व सेव्‍हींग्‍ज खात्‍याचा तपशील नि.नं.1 परिच्‍छेद 2 मध्‍ये दिलेला आहे. सदरहु मुदत ठेव पावत्‍या व सेव्‍हींग्‍ज खात्‍याची प्रत नि.नं.6/1 ते 6/13 वर झेरॉक्‍स प्रतित दाखल आहे. याप्रमाणे सामनेवालेने पावतीवर दर्शविल्‍याप्रमाणे व्‍याजही देण्‍याचे बंधन घालून घेतले आहे.                          

8.    तक्रारदार नं.1 ते 3 यांनी सामनेवालेंकडे मुदत ठेवीत रक्‍कम गुंतविली व त्‍यामुळे तक्रारदार नं.1 ते 3 हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सामनेवाले नं.1 ते 4 यांना नोटीस बजावणी झाली व ते वकीलामार्फत प्रकरणात हजर झाले परंतू त्‍यांनी कैफियत दाखल केली नाही. त्‍यानी तक्रारदारांचे म्‍हणणे खोडून काढण्‍याची संधी गमावली.  तसेच सामनेवाला नं.5 यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफियतीमध्‍ये कथन केले की, त्‍यांनी दिनांक 06.10.2012 रोजीच राजीनामा दिला आहे. व कागदपत्रांचा कार्यभार संस्‍थेकडे सोपविला आहे. परंतु याबाबतचा कोणताही ठराव दाखल नाही किंवा इतर कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. त्‍यामुळे त्‍यांचा राजीनामा सदरच्‍या संस्‍थेने स्विकारला व त्‍यांना सेवेतून मुक्‍त केले याबाबतचा पुरावा नाही. केवळ कथन केले आहे. त्‍यामुळे केवळ कथनावरुन सामनेवाला नं.5 ची जबाबदारी संपली असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे सामनेवाला नं.5 ने घेतलेला बचाव कागदोपत्री पुरावा नसल्‍यामुळे ग्राहय धरता येणार नाही.

9.    तक्रारदार श्रीमती कांताबाई कांतीलाल राकेचा व समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्‍था मर्यादित तर्फे श्री.महामुने डी.बी. यांचेमध्‍ये दिनांक 19.06.2018 रोजी रक्‍कम मिळाले बाबतची पावती प्रकरणात निशाणी 35 वर दाखल आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदार हिस रक्‍कम रुपये 50,000/- चेक नं.278314 चा दिनांक 11.06.2018 चा दि अ.नगर डिस्‍ट्रीक्‍ट को.ऑप बँक लि. अहमदनगर या बँकेचा मिळालेबाबत उभयतांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. सदरच्‍या दस्‍ताचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार क्र.1 हिला रक्‍कम रुपये 50,000/- सामनेवालाकडून मिळाले आहेत.

10.   तक्रारदार नं.1 ते 3 यांनी आपल्‍या कथनाचे पुष्‍टयर्थ सबळ कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केला आहे. सामनेवाले नं.1 समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या. को-हार बुद्रुक ता.राहाता जि.अहमदनगर या पतसंस्‍थेकडे मुदत ठेवीच्‍या व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावरील रकमेची व्‍याजासह मागणी करुनही सामनेवालेंनी त्‍याची दखल घेतली नाही व रक्‍कम अद्यापही अदा केली नाही. वास्‍तविक सदर मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपल्‍यावर व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावरील रकमेची तक्रारदाराने मागणी केल्‍यावर सदर रक्‍कम पावतीवर नमुद असलेल्‍या व्‍याजासह तक्रारदार यांना देणे सामनेवाले यांचेवर बंधनकारक व गरजेचे होते. सदर रकमेपैकी तक्रारदार श्रीमती कांताबाई कांतीलाल राकेचा व समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्‍था मर्यादित तर्फे श्री.महामुने डी.बी. यांचेमध्‍ये दिनांक 19.06.2018 रोजी रक्‍कम मिळाले बाबतची पावती प्रकरणात निशाणी 35 वर दाखल आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदार क्र.1 हिस रक्‍कम रुपये 50,000/- चेक नं.278314 चा दिनांक 11.06.2018 चा दि अ.नगर डिस्‍ट्रीक्‍ट को.ऑप बँक लि. अहमदनगर या बँकेचा मिळालेबाबत उभयतांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. सबब उर्वरीत रक्‍कमा न दिल्‍यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले. सबब तक्रारदार हे मुदत ठेवीच्‍या रकमा व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र असून ते मिळण्‍याकामी सामनेवाले यांनी सेवा देण्‍यात निश्चितच त्रुटी केली आहे. तक्रारदार क्र.1 हिस रक्‍कम रु.50,000/- मिळाले आहेत. त्‍यामुळे तक्रारदार क्र.1 ला पावती क्र.950 ची मुदत ठेवीची रक्‍कम प्राप्‍त झालेली आहे. त्‍यामुळे केवळ त्‍या रकमेतील व्‍याज देण्‍यात येते या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

11.   सामनेवाले नं.1 समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या. को-हार बुद्रुक ता.राहाता जि.अहमदनगर ही पतसंस्‍था आहे. सामनेवाले नं.2 चेअरमन आहेत, सामनेवाला नं.3 व्‍हाईस चेअरमन आहेत, सामनेवाला नं.4 हे संचालक आहेत तर सामनेवाला नं.5 हे संस्‍थेचे मॅनेजर आहेत. सबब तक्रारदार नं.1 ते 3 यांना मुदत ठेवीच्‍या रकमा व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍यास सामनेवाले नं.1 ते 5 हे जबाबदार असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब वरील मुदत ठेवीमध्‍ये व सेव्‍हींग्‍ज खात्‍यामध्‍ये दर्शविलेल्‍या रकमा व्‍याजासह होणारी रक्‍कम तक्रारदार नं.1 ते 3 यांना देण्‍याचा आदेश करणे न्‍यायोचित होईल.

12.   तक्रारदार नं.1 ते 3 यांनी मुदत ठेव व सेव्‍हींग्‍ज खात्‍यातील रकमेची मागणी करुनही ती न मिळाल्‍याने त्‍यांना  निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब त्‍यापोटी व या तक्रार अर्जाचे खर्चापोटी काही रक्‍कम तक्रारदार यांना मंजूर करणे न्‍यायसंगत होईल. म्‍हणुन मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

13.        मुद्दा क्र.3:-सबब मुद्दा क्र. ‘1’ व ‘2’ चे अनुषंगाने खालील आदेश पारित करण्‍यात येत आहे.  

:- आदेश -:

1.    तक्रारदार नं.1 ते 3 यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.         

2.    सामनेवाले नं.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्‍या व एकत्रितरित्‍या तक्रारदार नं.1 यांचे नांवे असलेली सेव्‍हींग्‍ज खाते नंबर 10 वरील (नि.नं.6/2) नुसार शिल्‍लक असलेली रक्‍कम जमा असल्‍याच्‍या दिनांकापासून व त्‍यावर नमुद व्‍याज दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.1 हिस अदा करावी.

3.    सामनेवाले नं.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्‍या व एकत्रितरित्‍या तक्रारदार नं.2 यांचे नांवे असलेली दामदुप्‍पट मुदत ठेव पावती क्र.2013(नि.नं.6/8) नुसार ठेव दि.22/04/2009 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रक्‍कम व त्‍या रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास ठेव रक्‍कम व व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.22/04/2009 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.2 ची अ.पा.कर्ती श्रीमती संगिता किशोर राकेचाा यांना हिस अदा करावी.

4.    सामनेवाले नं.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्‍या व एकत्रितरित्‍या तक्रारदार नं.3 यांचे नांवे असलेली दामदुप्‍पट मुदत ठेव पावती क्र.2014(नि.नं.6/9) नुसार ठेव दि.22/04/2009 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रक्‍कम व त्‍या रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास ठेव रक्‍कम व व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.22/04/2009 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.3 ची अ.पा.कर्ती श्रीमती संगिता किशोर राकेचा हिस  अदा करावी.

5.    सामनेवाले नं.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्‍या व एकत्रितरित्‍या तक्रारदार नं.1 यांचे नांवे असलेली अल्‍प मुदतीच्‍या ठेवीची पावती क्रमांक 707 (नि.नं.6/10) नुसार ठेव दि.29/12/2011 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रक्‍कम व त्‍या रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास ठेव रक्‍कम व व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.29/12/2011 पासून द.सा.द.शे.12.5 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.1 हिस अदा करावी.

6.    सामनेवाले नं.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्‍या व एकत्रितरित्‍या तक्रारदार नं.1  यांचे नांवे असलेली अल्‍प मुदतीच्‍या ठेवीची पावती क्रमांक 742 (नि.नं.6/11) नुसार ठेव दि.31/01/2012 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रक्‍कम व त्‍या रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास ठेव रक्‍कम व व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.31/01/2012 पासून द.सा.द.शे.12.5 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.1 हिस अदा करावी.

7.    सामनेवाले नं.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्‍या व एकत्रितरित्‍या तक्रारदार नं.1 यांचे नांवे असलेली अल्‍प मुदतीच्‍या ठेवीची पावती क्रमांक 950 (नि.नं.6/12) नुसार ठेव दि.27/10/2012 रोजी ठेवलेल्‍या रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास ती व्‍याजाची रक्‍कम वजा जाता व त्‍यावर मुदत ठेव दि.27/10/2012 पासून द.सा.द.शे.13.5 टक्‍के प्रमाणे झालेले व्‍याज तक्रारदार क्र.1 हिला अदा करावे.

8.    सामनेवाले नं.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्‍या व एकत्रितरित्‍या तक्रारदार नं.1 ते 3 यांना झालेल्‍या आर्थिक,शारीरीक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्‍कम      रु.10,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दहा हजार मात्र) व या अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) द्यावेत व त्‍यांनी या अर्जाचा खर्च स्‍वतः सोसावा.

9.   वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत दिवसाचे आत करावी.

10.    या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना मोफत देण्‍यात यावी.

11.   या प्रकरणाची “ब” व “क” फाईल तक्रारदारांना परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.