Maharashtra

Beed

CC/14/207

Shri Deorao Bhujangrao Phuke - Complainant(s)

Versus

MANAGER,SABLOK CARS DEALERS - Opp.Party(s)

Adv A.T.shaikh

03 Dec 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/207
 
1. Shri Deorao Bhujangrao Phuke
R/o Shivneri Niwas,Parali (V) Beed Road Sirsala, Ta Parali (V)
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. MANAGER,SABLOK CARS DEALERS
Mahindra Scarpio,xylo,Vento,Servey NO 57/B-2 Nagar Manmad Road MIDC Ahmednagar,
Ahmednagar
Maharashtra
2. Shriram Automobiles,
Shivaji Chowk Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                     निकाल

                       दिनांक- 02.12.2014

                  (द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्‍यक्ष  )

           तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले क्र.1  यांनी सदोष वाहन विक्री करुन तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे म्‍हणून  नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

             सदरील तक्रार या मंचापूढे चालविण्‍यास पात्र आहे किंवा काय  यावर यूक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार यांचे वकील श्री.शेख यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडून  महिंद्रा अँन्‍ड महिंद्रा स्‍कॉपिओ वाहन विकत घेतले. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांचे एजंट आहेत. सदरील वाहन तक्रारदार यांनी ताब्‍यात घेतली. सदरील वाहनामध्‍ये उत्‍पादकीय दोष आढळून आला. वेळोवेळी दूरुस्‍त करुनही वाहनात बिघाड झालेला आहे.सदरील तक्रार दाखल करण्‍यास कारण  या मंचाचे अधिकार क्षेत्रात घडले आहे. सबब, या मंचास तक्रार चालविण्‍याचा अधिकार आहे.

            निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात

            मुददे                                                  उत्‍तर

1.     या मंचास सदरील तक्रार चालविण्‍याचा अधिकार आहे काय                   नाही

2.    काय आदेश                                           अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 ः-

 

            तक्रारदार यांनी तक्रारीत केलेल्‍या बाबी या मंचाने लक्षात घेतल्‍या तसेच तक्रारदार यांनी सोबत दाखल केलेले दस्‍त यांचे अवलोकन केले. कलम 11 (2) ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत जिल्‍हा मंचाचे अधिकारक्षेत्र ठरवून दिलेले आहे. तक्रार ही ज्‍या जिल्‍हा मंचाच्‍या अधिकार क्षेत्रामध्‍ये विरुध्‍द पार्टी किंवा एका पेक्षा जास्‍त विरुध्‍द पाटी असल्‍यास ती तक्रार दाखल करते वेळेस जिल्‍हा मंचाच्‍या स्‍थळ सिमेत राहत असेल, व्‍यवसाय करीत असतील किंवा त्‍यांची शाखा असेल त्‍या मंचात तक्रार दाखल करावयास पाहिजे.

            तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या दस्‍ताचे अवलोकन केले असता सामनेवाले क्र.1 सबलोक कार्स अहमदनगर या महिंद्रा अँन्‍ड महिंद्रा स्‍कॉपिओ चे अधिकृत डिलर यांचेकडून वाहन खरेदी केलेले आहे. तशा बाबत सेल प्रमाणपत्रामध्‍ये नमूद केलेल्‍या आहेत. सदरील वाहनाचे डिलेव्‍हरी पावती यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडून अहमदनगर येथून वाहनाचा ताबा घेतलेला आहे. तसेच सदरील वाहन रत्‍नप्रभा मोटार्स चिकलठाणा औरंगाबाद येथे अधिकृत डिलर कडून दूरुस्‍त करुन घेतलेले आहे. सामनेवाले क्र.1 यांची शाखा या मंचाचे अधिकार क्षेत्रात कार्यरत आहे काय हे पाहणे गरजेचे आहे.तक्रारदार यांनी प्रथम सकृतदर्शनी ही बाब निदर्शनास आणून दिल्‍यास या मंचाला तक्रार चालविण्‍याचा अधिकार आहे असा निष्‍कर्ष काढता येईल. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांचे एजंट आहेत किंवा सामनेवाले क्र.1 चे शाखा आहे. सामनेवाले क्र.1 करिता सेवा देणारे अधिकृत सर्व्‍हीस सेंटर आहेत. हे दर्शविण्‍यासाठी कोणताही दस्‍त हजर केलेला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांना दिलेला एक कॅश मेमो दाखल केला आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहन श्रीराम अॅटोमोबाईल्‍स बीड यांचेकडून दूरुस्‍त  केल्‍या बाबत त्‍यामध्‍ये उल्‍लेख आहे. श्रीराम अँटोमोबाईल्‍स बीड हे सामनेवाले क्र.1 यांचे मान्‍यता प्राप्‍त शाखा आहे व ते सामनेवाले क्र.1 करिता व्‍यवसाय करतात ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. सदरील बिलाची पाहणी केली असता त्‍यावरही ते सामनेवाले क्र.1 करिता काम करतात  किंवा सामनेवाले क्र.1 चे शाखा आहे  असे कूठेही उल्‍लेख आढळून आला नाही.  तक्रारदार यांनी जी नोटीस पाठवली ती फक्‍त सामनेवाले क्र.1 यांना पाठविली आहे व त्‍यांचे उत्‍तर सामनेवाले क्र.1 यांनी दिलेले आहे. सामनेवाले क्र.2 यांना तक्रारदार यांनी नोटीस पाठविली  आहे या बाबत दस्‍त हजर केला नाही. तक्रारदार यांनी एक पोस्‍टाची पोहच पावती हजर केली आहे. त्‍यावर सामनेवाले क्र.2 यांचा पत्‍ता लिहीलेला आहे. परंतु नोटीसचे अवलोकन केले असता नोटीस फक्‍त सामनेवाले क्र.1 यांना पाठविल्‍याचे निदर्शनास येते. सदरील नोटीस उत्‍तर हे फक्‍त सामनेवाले क्र.1 करिताच दिल्‍याचे आढळून येते. सदरील पोस्‍टाची पोहच पावती जरी या मंचासमोर हजर केली असली तरी सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांचे करिता सेवा पूरवतात व ते त्‍यांचे अधिकृत शाख आहे हे प्रथमदर्शनी निदर्शनास येत नाही. तसेच तक्रारदार यांनी कलम 11 (2)(ब) मध्‍ये नमूद केल्‍यानुसार  तक्रार दाखल करणेकामी या मंचाची परवानगी मिळण्‍यासाठी अर्जही दाखल केलेला नाही. कारण सामनेवाले क्र.1 हे या मंचाचे अधिकार क्षेत्रात राहत नाहीत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडून वादातील वाहन विकत घेतलेले नाही. ज्‍या अधिकृत डिलरकडून वाहन विकत घेतले आहे ते अहमदनगर कार्यक्षेत्रात राहतात. सामनेवाले हे या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रामध्‍ये राहत नसल्‍यामुळे तक्रारदार यांनी या मंचासमोर तक्रार दाखल करण्‍यास कारण घडले नाही. तक्रारदार हे सदरील तक्रार अहमदनगर जिल्‍हा मंचामध्‍ये दाखल करु शकतात. सबब, या मंचाचे मत की, सदरील तक्रार चालविण्‍याचा अधिकार या मंचास नाही.

 

            मुददा क्र.1  चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

 

                         आदेश

            1)  तक्रारदारांची  तक्रार या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्‍यामुळे बंद करण्‍यात

                येत आहे.

2)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

                20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

                करावेत.

 

 

 

 

   श्री.रविंद्र राठोडकर,         श्रीमती मजुंषा चितलांगे            श्री.विनायक लोंढे       

         सदस्‍य                     सदस्‍या                    अध्‍यक्ष

                     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.