जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 106/2012 तक्रार दाखल तारीख – 14/05/2012
तक्रार निकाल तारीख– 21/02/2013
वैभव पि माणिकराव नहार
वय 33 वर्षे धंदा व्यापार
रा.वडवणी, ता.वडवणी जि.बीड ... अर्जदार
विरुध्द
1. मुख्य शाखाधिकारी (आर.सी.पी.सी)
स्टेट बँक ऑफ इंडिया
मार्फत आर.टी. खापरे ... गैरअर्जदार
रा.मुख्य शाखा, जालना रोड,बीड ता.जि.बीड
2. शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा वडवणी मार्फत ए.एम.तांबट
रा.वडवणी ता.वडवणी जि.बीड
3. महा व्यवस्थापक,
जिल्हा उद्योग केंद्र, बशीरगंज,बीड ता.जि.बीड
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अड.टी.ए.शेख,
गैरअर्जदारा तर्फे - कोणीही हजर नाही.
---------------------------------------------------------------------------------------
नि.1 वरील आदेश
दिनांक- 21.02.2013
(द्वारा- श्रीमती निलिमा संत, अध्यक्ष )
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार हा व्यवसायाने सुवर्णकार असून सुशिक्षीत बेरोजगार आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आहेत व गैरअर्जदार क्र.3 हे बिड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आहेत.
असे की, अर्जदाराने पंतप्रधान रोजगार निर्मीती योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु.24,72,000/- (अक्षरी रुपये चोविस लाख बहात्तर हजार) ची मागणी केली. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी आकसबुध्दीने तक्रारदाराचा प्रस्ताव नामंजूर केला. म्हणून तक्रारदाराची गैरअर्जदार क्र.1 ते 3 विरुध्द तक्रार आहे.
कोणासही कर्ज मंजूर करणे अथवा नामंजूर करणे ही संबंधीत वित्त संस्थेची अंतर्गत बाब असून हे त्यांच्या अखत्यारीतील अधिकार (Discritionary Powers) आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयातील ग्राहक या संज्ञेत येत नाही. जिल्हा उद्योग केंद्राने त्यांची लाभार्थी म्हणून निवड केली असली तरी तो त्यांचा ग्राहक होत नाही असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब, सदरची तक्रार ही या न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्राअंतर्गत येत नाही असे मंचाचे मत आहे.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार प्राथमिक अवस्थेत फेटाळून लावण्यात येत आहे.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड