Maharashtra

Ahmednagar

CC/15/247

Rajani Rafayal Borde - Complainant(s)

Versus

Manager,Ramkrishna Urban Sahakari Credit Society Ltd. - Opp.Party(s)

Jadhav

05 Jan 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/247
( Date of Filing : 17 Jul 2015 )
 
1. Rajani Rafayal Borde
Chobhe Colony,Gandhinagar,Bolhegaon,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Ramkrishna Urban Sahakari Credit Society Ltd.
Ramkrishna Bhavan,Muthha Chambers,Old Vasant Talkies,Maliwada,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Jadhav, Advocate
For the Opp. Party: M.N.MORE, Advocate
Dated : 05 Jan 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदार हिची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     तक्रारदार ही गांधीनगर, बोल्‍हेगाव ता.जि.अहमदनगर येथील कायमची रहिवासी आहे. तक्रारदार हिचे श्री रामकृष्‍ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटी लि.अहमदनगर, रामकृष्‍ण भवन, मुथ्‍था चेंबर्स, जुनी वसंत टॉकीज, माळीवाडा, अहमदनगर येथे 5-6 वर्षापासून खाते आहे. तक्रारदार हिने सामनेवाले संस्‍थेमध्‍ये तारीख 24.04.2013 रोजी सोनेतारण खाते नंबर 30874 पावती नंबर 21232 अन्‍वये सोन्‍याची दागीने पोत 1 नग, चैन 1 नग, टिपसा 2 नग, रींगा 2 नग असे एकूण 6 नग एकूण 19.55 ग्रॅम सोने तारण त्‍यावर रुपये 16,000/- कर्जाऊ घेतले होते व त्‍याची मुदत एक वर्षाची होती. सदरच्‍या मुदतीपुर्वी तक्रारदार ही सदर सोने तारणावर घेतलेले कर्जाची रक्‍कम परतफेड करण्‍यासाठी व सदर संस्‍थेत ठेवलेले तिचे सोने सोडवण्‍यासाठी सामनेवाले संस्‍थेमध्‍ये गेली असता सामनेवाले संस्‍थेने तक्रारदार हिचेकडून नकार दिला व म्‍हणले की, मुदत संपल्‍यानंतर पैसे भरा, त्‍यामुळे तक्रारदार ही पैसे न भरता परत आली.

3.   तदनंतर तक्रारदार ही 3 ते 4 वेळा सदर सामनेवाले संस्‍थेत जाऊन तिने घेतलेल्‍या सोनेतारण कर्जाची रक्‍कम भरण्‍यास गेली असता व सोने परत मागितले असता सामनेवाले संस्‍थेने रक्‍कम स्विकारली नाही व तक्रारदार हिची सोन्‍याची दागीने परत देण्‍यास नकार दिला. तद्नंतर तक्रारदार हिस अशी माहिती मिळाली की, सामनेवाले संस्‍थेने तक्रारदार हिस कोणतीही पुर्व सुचना न देता त्‍यांचे संमती शिवाय, कुठल्‍याही प्रकारची नोटीस न देता तक्रारदार यांनी त्‍यांचे सदर पतसंस्‍थेत ठेवलेले मौल्‍यवान सोन्‍याच्‍या दागीन्‍याचा लिलाव केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार हिस मानसिक धक्‍का बसला. तसेच सदर सामनेवाले संस्‍थेने तक्रारदार हिची घोर फसवणूक केली आहे. सामनेवाले संस्‍थेने तक्रारदार यांच्‍यावर नमुद केलेल्‍या सोन्‍याच्‍या दागीन्‍याची अफरातफर केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हिचे खुप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.

4.   तद्नंतर तक्रारदार हिने सामनेवाला संस्‍थेस दिनांक 13.03.2015 रोजी रक्‍कम स्विकारुन दागीने परत देण्‍याबाबत अॅड.भानुदास होले यांचे मार्फत रजि.पोस्‍टाने नोटीस पाठविली होती. परंतु सामनेवाले पतसंस्‍थेने सदरची नोटीस स्विकारुनही तक्रारदार हिस तिचे दागीने परत केले नाही.

5.   तक्रारदार ही सामनेवाले क्रेडीट सोसायटीची ग्राहक असून सामनेवाले हे त्‍यांचे मालक आहेत. तक्रारदार हिस मालक या नात्‍याने सामनेवाले यांनी सेवा देण्‍यास त्रुटी केलेली आहे. तक्रारदार हिस सामनेवाले यांनी चांगली सेवा दिलेली नाही.

6.   सबब सामनेवाले यांनी तक्रारदार हिस दुषीत सेवा देऊन तक्रारदार यांची फसवणुक व अडवणूक केलेली असून तक्रारदार हिस अतिशय शारीरीक व मानसिक त्रास झालेला असून तक्रारदार हिचे आर्थिक नुकसान झालेले आहे. सबब सदरील सामनेवाले यांच्‍याकडून तक्रारदार हिस रक्‍कम रुपये तिने सदर सामनेवाले क्रेडीट सोसायटीमध्‍ये ठेवलेले मौल्‍यवान सोन्‍याची दागीने पोत 1 नग, चैन 1 नग, टिपसा 2 नग, रींगा 2 नग असे एकूण 6 नग एकुण 19.500 ग्रॅम वजनाचे सोने अथवा आजच्‍या बाजार भावाप्रमाणे होणारी किंमत रक्‍कम रुपये 56,000/- सामनेवाले यांच्‍याकडून वसुल होऊन मिळावे. तसेच तक्रारदार हिस दिलेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 15,000/- सामनेवाले यांचेकडून तक्रारदार यांना वसूल होऊन मिळणेकरीता तक्रारदार हिचा अर्ज आहे.

7.   तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, अर्जात सविस्‍तर नमुद केलेल्‍या कारणास्‍तव अर्जदार हिस सामनेवाले यांचेकडून अर्जदार हिने सदर सामनेवाले क्रेडीट सोसायटीमध्‍ये ठेवलेले मौल्‍यवान सोन्‍याची दागीने पोत 1 नग, चैन 1 नग, टिपसा 2 नग, रींगा 2 नग असे एकूण 6 नग एकुण 19.500 ग्रॅम वजनाचे सोने अथवा आजच्‍या बाजार भावाप्रमाणे होणारी किंमत रक्‍कम रुपये 56,000/- सामनेवाले यांच्‍याकडून देण्‍याबाबतचे आदेश व्‍हावा. तसेच सामनेवाला यांनी अर्जदार हिस दुषीत सेवा देऊन अर्जदार हिस शारीरीक व मानसिक व आर्थिक त्रास देऊन नुकसान केली म्‍हणून त्‍यांची नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 15,000/- अर्जदार हिस सामनेवाले यांचेकडून देण्‍यात यावेत. या अर्जाचा संपुर्ण खर्च अर्जदारास सामनेवाले यांचेकडून देण्‍यात यावा.

8.   तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशाणी 2 ला अॅफिडेव्‍हीट त्‍यासोबत श्री रामकृष्‍ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटीची सोने तारण केलेली पावती नं.39232 ची झेरॉक्‍स प्रत, अॅड.बी.एल.होले यांची नोटीसची झेरॉक्‍स प्रत इत्‍यादी कागदपत्रे जोडलेली आहेत.

9.   तक्रारदार हिची तक्रार स्विकृत करण्‍यात येऊन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाला हे हजर होऊन निशाणी 13 ला तक्रारदार हिचे अर्जास कैफियत दाखल केली. सदर कैफियतीत सामनेवाला यांनी कथन केले आहे की, सामनेवाले संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960 अन्‍वये स्‍थापन झालेली सहकारी संस्‍था आहे. सदरील संस्‍थेचा कारभार सहाकारी कायद्यानुसार तसेच संस्‍थेचे पोटनियमानुसार चालतो. सामनेवाले संस्‍थेमार्फत ठेवी गोळा करुन तीचे सभासदांना तसेच नाममात्र सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. तसेच सामनेवाले संस्‍थेमार्फत सोने तारण ठेऊन त्‍यावर देखील कर्ज पुरवठा केला जातो. सदरील अर्जदार यांनी सामनेवाले संस्‍थेत येऊन तारीख 23.04.2013 रोजी सोने तारण ठेऊन कर्जाऊ रक्‍कम मिळावी म्‍हणुन मागणी केलेली होती. त्‍याप्रमाणे अर्जदार यांचे सोने दागीने पोत नग 1, चैन नग 1, टिपसा नग 2, रिंगा नग 2 असे एकुण नग 6 वजन 19.5 ग्रॅम दागीने तारण ठेऊन सामनेवाले संस्‍थेकडून रक्‍कम रुपये 16,000/- चे कर्ज घेतलेले आहे. सदरील कर्जाऊ रकमेसाठी अर्जदार यांनी योग्‍य ते कागदपत्र सामनेवाले संस्‍थेस करुन दिलेले आहेत. त्‍याप्रमाणे सदरील सोने तारण कर्जाऊ रक्‍कम मंजुर करुन अर्जदार यांना देण्‍यात आलेले आहे. त्‍याप्रमाणे सोने तारणाची पावती नंबर 31232 अशी अर्जदार यांना देण्‍यात आलेली आहे. अर्जदार यांचे सोने तारण खाते नंबर 30874 असे आहे.

10.  सदर कर्जाचा कालावधी दिनांक 23.04.2013 ते 23.04.2014 असा होता. सदरील कर्जाची फेड त्‍यावरील होणारे व्‍याजासहीत अर्जदार यांनी एक वर्षात दरमहाचे दरमहा असणारे हप्‍त्‍याप्रमाणे सामनेवाले संस्‍थेत जमा करावयाची होती. त्‍याप्रमाणे सोने तारण पावतीवर तसे स्‍पष्‍टरित्‍या नमुद केलेले आहे. दरमहाचे दरमहा रक्‍कम जमा न केल्‍यास व थकबाकी झाल्‍यास मुदतीनंतर सदरील दागिन्‍याचा लिलाव करुन रक्‍कम वसुल करण्‍याबाबत अधिकार कर्ज प्रकरणाचे वेळीच अर्जदार यांनी योग्य ती कागदपत्र करुन दिलेली आहेत. तसेच सोने तारण करारनाम्‍यात कर्ज विषयक नियमावलीचा उल्‍लेख असून त्‍यामध्‍ये अनु.क्रमांक 8 ला कर्जाची मुदत 12 महिने राहिल त्‍या मुदतीत मुद्दल व व्‍याजासहीत संपुर्ण कर्ज फेडणे आवश्‍यक राहिल या प्रमाणे 12 महिन्‍यांच्‍या मुदतीत कर्ज खाते बंद न केल्‍यास तारण मालाची लिलावात विक्री करुन कर्ज रक्‍कम वसुल केली जाईल. त्‍याबाबत कर्जदारास कोणतीही तक्रार करता येणार नाही व त्‍याची कोणतीही जबाबदारी संस्‍थेवर राहणार नाही. सदर लिलावात विक्री करुन आलेल्या रकमेतून कर्जाच्‍या रकमेच्‍या संपुर्ण परतफेड न झाल्‍यास राहिलेली रक्‍कम देण्‍याची जबाबदारी कर्ज घेणा-यावर राहिल. व संस्‍थेस त्‍यांच्‍याकडून सदर रक्‍कम पुढील व्‍याजासह वसुल करता येईल असे स्‍पष्‍टपणे नमुद आहे. तसेच सोने तारण कर्जविषयक नियमावलीच्‍या कर्जदाराचे डिक्‍लेरेशनवर सोने तारण कर्ज विषयक मी वाचले असून मला वाचुन दाखविण्‍यात आले असून ते मला समजले आहे ते माझेवर बंधनकारक राहिल म्‍हणून कर्जदाराची/ अर्जदाराची सही आहे असे असतांना अर्जदार यांनी सोने तारण कर्जाऊ रक्‍कम घेतल्‍यानंतर त्‍याची नियमीत व मुदतीत फेड केली नाही. वास्‍तविक पाहता अर्जदार यांनी मुदतीमध्‍ये येऊन सदर कर्ज प्रकरणाचा पुर्ण भरणा करुन सदरचे कर्ज प्रकरण बंद करणे आवश्‍यक होते त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी ही अर्जदाराची होती व आहे.

11.  मात्र अर्जदार यांनी वेळेत कर्जाची फेड मुदतीत न केल्‍याने सदरचे कर्ज प्रकरण थकबाकीमध्‍ये गेले होते, त्‍यामुळे सामनेवाले संस्‍थेमार्फत अर्जदार यांना प्राथमिक नोटीस तारीख 29.08.2014 रोजी पाठविण्‍यात आलेली आहे. सदरील नोटीस मिळुनही अर्जदार यांनी कर्जाची रक्‍कम जमा केली नाही. तद्नंतर सामनेवाले यांनी पुन्‍हा अर्जदार हीस तारीख 30.09.2014 रोजी नोटीस क्रमांक 2 स्‍मरणपत्र दिलेले आहे. त्‍यानंतर पुन्‍हा तारीख 31.10.2014 रोजी अंतीम नोटीस पाठवुन सदरील अर्जदार यांनी सोने तारण कर्जाची रक्‍कम भरुन सदरचे खाते बंद करण्‍याबाबत अर्जदार यांना रजिस्‍टर पोस्‍टाने कळविण्‍यात आलेले आहे. अर्जदार हीस सर्व नोटीसा तीने कर्ज प्रकरणात दिलेल्‍या पत्‍त्‍यावरच पाठविण्‍यात आलेल्‍या असून नोटीसा पाठवुनही अर्जदार यांनी रक्‍कम अदा केलेली नाही. सबब सामनेवाले यांनी नियमाप्रमाणे सदरील सोने तारण दागिन्‍याचा लिलावासाठी दैनिक समाचार या वृत्‍तपत्राचे तारीख 02.12.2014 रोजीचे अंकात जाहीर नोटीस प्रसिध्‍द करुन त्‍यात अ.क्र.नंबर 119 ला अर्जदार यांचे नाव नमुद करुन दागिन्‍याचा जाहीर लिलाव तारीख 10.12.2014 रोजी ठेवल्‍याचे प्रसिध्‍द केलेले आहे. त्‍यानंतर देखील अर्जदार यांनी कोणतीही रक्‍कम जमा केली नाही व सोने तारण दागिने सोडवून घेतलेले नाही.

12.  सबब सामनेवाले यांनी कायदेशिररित्‍या सदरील दागिन्‍याचा लिलाव तारीख 10.12.2014 रोजी करुन त्‍यातुन एकुण रक्‍कम रुपये 22,450/- हे लिलावासाठी सामनेवाले यांना मिळालेले आहेत. त्‍यापैकी अर्जदार यांचे कर्जखाती तारीख 10.12.2014 अखेर असणारी बाकी रक्‍कम रुपये 21,083/- अर्जदार यांचे कर्जखाती जमा करुन उर्वरीत रक्‍कम रुपये 1367/- अर्जदार यांचे सेव्‍हींग्‍ज खात्‍यात जमा केलेले आहे. अशा प्रकारे सामनेवाले यांनी केलेली कार्यवाही ही कायदेशिर अशी आहे. अर्जदार हीनेच वेळेत सोने तारण कर्जाची फेड न करता कर्जाची बाकी थकविलेली होती. नियमानुसार सामनेवाले यांनी कारवाई करुन दागिन्‍याचा लिलाव करुन रक्‍कम वसुल केलेली आहे. सबब त्‍याबाबत अर्जदार हीस अशा प्रकारे अर्ज दाखल करण्‍याचा कोणताही अधिकार नाही. इतकेच नव्‍हे तर अर्जदार हीने सामनेवाले यांना तारीख 13.03.2015 रोजी अॅड.बी.एन.होले यांचे मार्फत पाठविलेली कोणतीही नोटीस मिळालेली नाही. सामनेवाले यांनी अर्जदार हीस कोणतीही दुषित सेवा दिलेली नाही व देण्‍याचे कारणही नाही. अर्जदार हिनेच कर्ज प्रकरणातील मंजुर अटी व शर्तीनुसार कर्जाची परतफेड न केल्‍याने अर्जदार हीचे विरुध्‍द कायदेशिर कारवाई करुन तीचे सोने तारण ठेवलेले दागिने विकुन रक्‍कम सामनेवाले यांनी वसुल केलेली आहे असे असतानाही अर्जदार यांनी सर्व वस्‍तुस्थिती लपवुन सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. सबब अर्जदार यांचा अर्ज हा विनाकारण असल्‍याने तो खर्चासहीत रद्द करण्‍यात यावा. विनाकारण खोटी व बनावट कथने करुन सदरचा अर्ज दाखल करुन सामनेवाले यांना खर्चात टाकले. म्‍हणुन सामनेवाले यांना अर्जदार यांच्‍याकडून स्‍पेशल कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट रुपये 10,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.

13.  सामनेवाला यांनी निशाणी 16 ला प्राथमिक नोटीस दिनांक 29.08.2014, स्‍मरणपत्र दिनांक 30.9.2014, अंतिम नोटीस दिनांक 31.10.2014, सोन्‍याच्‍या दागिन्‍यांचा लिलाव जाहीर नोटीस दिनांक 2.12.2014, सोनेतारण कर्जविषयक नियमावली इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. 

14.  तक्रारकर्ती हिने निशाणी 12 ला लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवादात असे कथन केले आहे की, तक्रारदार हिने सामनेवाला संस्‍थेने कोणतीही पुर्व सुचना न देता त्‍यांचे संमतीशिवाय कुठल्‍याही प्रकारची नोटीस न देता तक्रारदार यांना सामनेवाला पतसंस्‍थेत भरलेली मौल्‍यवान सोन्‍याची दागिन्‍याचा लिलाव केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीस मानसिक धक्‍का बसला. तसेच संस्‍थेने तक्रारकर्तीची घोर फसवणूक केलेली आहे. व सोने दागिन्‍याची अफरातफर केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हिचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्रारकर्तीने सामेनवाला संस्‍थेस दिनांक 13.03.2015 रोजी तिचे बँकेत असलेली रक्‍कम स्विकारुन दागिने परत देण्‍याबाबत अॅड.भानुदास होले यांचे मार्फत रजि.पोस्‍टाने नोटीस पाठविली आहे. परंतू सामनेवालाने सदरची नोटीस स्विकारुनही तक्रारदार हिचे दागिने परत केलेले नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांना सेवा देण्‍यात त्रुटी केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस दुषीत सेवा देऊन तक्रारदार हिची फसवणूक व अडवणूक केलेली असून तक्रारदार यांना अतिशय शारीरीक व मानसिक त्रास झालेला असून तक्रारदार हिची आर्थिक नुकसान झालेले आहे. सबब सदरील सामनेवाले यांच्‍याकडून तक्रारदार हिस रक्‍कम रुपये तिने सदर सामनेवाले क्रेडीट सोसायटीमध्‍ये ठेवलेले मौल्‍यवान सोन्‍याची दागीने पोत 1 नग, चैन 1 नग, टिपसा 2 नग, रींगा 2 नग असे एकूण 6 नग एकुण 19.500 ग्रॅम वजनाचे सोने अथवा आजच्‍या बाजार भावाप्रमाणे होणारी किंमत रक्‍कम रुपये 56,000/- सामनेवाले यांच्‍याकडून वसुल होऊन मिळावे. तसेच तक्रारदार हिस दिलेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 15,000/- सामनेवाले यांचेकडून तक्रारदार यांना वसूल होऊन मिळणेकरीता तक्रारदार हिचा अर्ज आहे.

15.  सामनेवाले यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये अर्जदार यांचे सेव्‍हींग्‍ज खात्‍यात उर्वरीत रक्‍कम रुपये 1367/- जमा केले आहे. असे कथन केले आहे. परंतु सामनेवाले यांचे कथनाप्रमाणे तक्रारदार हिचे सदर बँकेत सेव्‍हींग्‍ज खाते नाही. जर बँकेने स्‍वतः तक्रारदार हिचे परस्‍पर खाते उघडले असेल तर त्‍याची माहिती बँकेने तक्रारदार हिस कधीही दिली नाही. सदर व्‍यवहार हा खोटा व लबाडीचा आहे. तक्रारदार हि दिलेल्‍या पत्‍त्‍यावर आजही कायम स्‍वरुपी राहतात. तक्रारदार हिने तिचा पत्‍ता कधीही बदललेला नाही. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार हिस कोणत्‍याही प्रकारे कायदेशरी नोटीस पाठविली नाही व तक्रारदार हिस नोटीस न पाठविता तिचे दागीण्‍याचा बेकायदेशीर लिलाव केलेला आहे.

16.  सदर प्रकरणी सामनेवाले यांनी दिलेल्‍या कैफियतीमधील संपुर्ण मजकुर तसेच दाखल केलेली कागदपत्रे खोटी व लबाडीची असून तक्रारदार हिस मान्‍य व कबुल नाहीत. सदर प्रकरणी तक्रारदार हिने दाखल केलेल्‍या कागदपत्रातील मजकुर खरा व बरोबर असून त्‍यास निशाणी नंबर देण्‍यात येऊन पुराव्‍याचे कामी वाचण्‍यात यावे.

17.  अर्जदार हिने अर्जात सविस्‍तर नमुद केलेल्‍या कारणास्‍तव तक्रारदार हिस सामनेवाले यांचेकडून तक्रारदार हिने सदर सामनेवाले क्रेडीट सोसायटीमध्‍ये ठेवलेले मौल्‍यवान सोन्‍याची दागीने पोत 1 नग, चैन 1 नग, टिपसा 2 नग, रींगा 2 नग असे एकूण 6 नग एकुण 19.500 ग्रॅम वजनाचे सोने अथवा आजच्‍या बाजार भावाप्रमाणे होणारी किंमत रक्‍कम रुपये 56,000/- सामनेवाले यांच्‍याकडून वसुल होऊन मिळण्‍याचा आदेश व्‍हावा. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस दुषीत सेवा देऊन तक्रारदार हिस शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 15,000/- सामनेवाले यांचेकडून तक्रारदार हिस सामनेवाला यांचेकडून देण्‍यात यावेत.

18.  तसेच निशाणी 18 ला अर्जदार व सामनेवाला यांचेतर्फे सदरील प्रकरण दाखल करतेवेळी मे.कोर्टाचे सदस्‍य यांचे सहया नजर चुकीने राहून गेल्‍या आहेत. तरी सदरचा अर्ज चालविण्‍यास अर्जदार व सामनेवाला यांची काहीही हरकत नाही अशी पुरशिस निशाणी 18 ला तक्रारदार व त्‍यांचे वकील तसेच सामनेवाला यांचे वकीलांनी दिलेली आहे.

19.  निशाणी 20 ला सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे सोने तारण कर्ज प्रकरणाची झेरॉक्‍स प्रत जोडलेली आहे.

20.  तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, त्‍यांनी दाखल केलेला युक्‍तीवाद व दाखल कागदपत्रे पाहता, तसेच सामनेवाला यांचे वतीने दाखल केलेली कैफियत, शपथपत्र व उभय पक्षकारांचे विद्वान वकीलांनी दाखल केलेला युक्‍तीवाद लक्षात घेतला व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

सामनेवाला यांनी तक्रारकर्तीस द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे काय.?                    

 

... नाही.

2.

तक्रारकर्ती अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे काय. ?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

21.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार व कागदपत्रे तसेच निशाणी 17 ला दिलेला लेखी युक्‍तीवादामध्‍ये असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ती हिने सामनेवाला संस्‍थेमध्‍ये दिनांक 23.04.2013 रोजी सोने तारण खाते नं.30874 पावती नं.21232 अन्‍वये  दागीने पोत 1 नग, चैन 1 नग, टिपसा 2 नग, रींगा 2 नग असे एकूण 6 नग एकुण 19.500 ग्रॅम वजनाचे सोने तारण ठेवून त्‍यावर रुपये 16,000/- कर्जाऊ घेतले. त्‍याची मुदत 1 वर्ष दिलेली आहे. मुदतीपुर्वी तक्रारकर्तीने सोने तारणावर घेतलेले कर्जाची रक्‍कम परतफेड घेण्‍यासाठी व सदर संस्‍थेने ठेवलेले सोने सोडवण्‍यासाठी 3 – 4 वेळा सामनेवाला संस्‍थेमध्‍ये गेले असता संस्‍थेने नकार दिला व मुदत संपल्‍यानंतर पैसे भरा असे म्‍हंटल्‍यामुळे ती परत आली. त्‍यानंतर तक्रारकर्तीस अशी माहिती मिळाली की, सामनेवाला संस्‍था तक्रारकर्तीस कोणतीही पुर्व सुचना न देता त्‍यांचे संमतीशिवाय कुठल्‍याही प्रकारची नोटीस न देता सदर पतसंस्‍थेमधील मौल्‍यवान सोने दागिनेचा लिलाव केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीस मानसिक धक्‍का बसला. तसेच तिची घोर फसवणूक सामनेवालाने केली आहे. तक्रारकर्ती हिचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. दिनांक 13.03.2015 रोजी कर्ज रक्‍कम स्विकारुन दागिने परत देण्‍याबाबत तक्रारकर्ती हिने अॅड.भानुदास सोले यांचेमार्फत रजि.पोस्‍टाने नोटीस पाठविली आहे. परंतु सामनेवालाने नोटीस स्विकारुनही दागिने परत केले नाही. वरील सर्व दागिन्‍याची बाजार भावाप्रमाणे रक्‍कम रु.56,000/- रुपये सामनेवालाकडून वसुल होऊन मिळावे. तसेच शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/- तक्रारदार हिस सामनेवालाकडून देण्‍यात यावा. तसेच तक्रारदार हिने त्‍यांचे लेखी युक्‍तीवादात असे कथन केलेले आहे की, सामनेवालाने तक्रारदार हिचे सेव्‍हींग्‍ज खात्‍यात 1367/- रुपये जमा केले आहेत हे सामनेवालाचे कैफियतीतील कथन तक्रारदार हिने नाकारला असून तक्रारकर्ताचे बँकेचे सेव्‍हींग्‍ज खाते बँकेत नाही असे म्‍हंटले आहे. सामनेवालाने तक्रारदार हिचे परस्‍पर बँकेत खाते उघडले असल्‍याची माहिती  सामनेवालाने तक्रारदार हिस कधीही पैसे दिलेली नाही. सदर व्‍यवहार खोटा व लबाडीचा असून तक्रारदार हे दिलेला पत्‍त्‍यावर कायम स्‍वरुपी राहते. तक्रारदार हिने तिचा पत्‍ता कधीही बदललेला नाही. तसेच तक्रारदार हिस कोणत्‍याही प्रकारे कायदेशिर नोटीस प्राप्‍त नाही असे नमुद केले आहे.

22.  सामनेवाला यांनी दाखल केलेले निशाणी 16 सोबत प्राथमिक नोटीस, स्‍मरणपत्र, अंतिम नोटीस, सोन्‍याच्‍या दागिन्‍याचा लिलाव जाहिर नोटीस, सोने तारण अर्ज विषयक नियमावली या कागदपत्राचे अवलोकन केले असता. तसेच तक्रारदार हिने सामनेवाला यास सोने दागिने यांचे तारणावर कर्ज मिळण्‍यासाठी अर्ज तसेच तारण कर्ज प्रकरण याची झेरॉक्‍स प्रतीचे अवलोकन केले. त्‍या पैकी निशाणी 20 ला सामनेवालाने दाखल केलेल्‍या सोने तारण कर्ज प्रकरणाचे झेरॉक्‍स प्रतिचे अवलोकन केले.  कर्ज मिळण्‍याचे अर्जावर तक्रारदार हिची सही सर्व कागदपत्रावर असून सोने तारण कर्जाविषयीची नियमावली त्‍याच प्रमाणे 100 रुपयाचे स्‍टँम्‍प पेपरची झेरॉक्‍स प्रतीचे अवलोकन केले. त्‍यात तक्रारदार हिने कर्ज घेतले असून सोबत जोडलेले कर्ज रोख्‍यातील सर्व अटी व शर्तीचे वाचून त्‍यामधील अटी मान्‍य व कबूल आहेत असे नमुद असून व त्‍यापोटी सोने जिनसाच्‍या तारणावर तक्रारदार हिने कर्ज घेतलेले आहे असे दिसून येते.  सदर स्‍टँम्‍प पेपरवर दिनांक 15.04.2013 ही तारीख नमुद असून त्‍यात हस्‍ते सामनेवालाचे नाव नमुद आहे. सामनेवाला यांनी नियमानुसारच कारवाई केलेली असल्‍याचे सर्व कागदपत्राचे अवलोकन केले असता दिसून येते. सामनेवाला यांनी दिलेले कर्ज सोने तारण कर्ज प्रकरणातील सर्व अटी व शर्ती मान्‍य असल्‍याबाबत मान्‍य केले आहे. कर्जाची मुदत 12 महिने वेळोवेळी त्‍या मुदतीत मुद्दल व व्‍याजासहची संपुर्ण कर्जाची परतफेड करणे आवश्‍यक आहे. त्‍याप्रमाणे 12 महिन्‍याचे मुदतीचे कर्ज घेता बंद न केल्‍यास तारण मालाची विभागवार विक्री करुन कर्ज रक्‍कम वसुल करुन घेतले जाईल. त्‍यावर कर्जदारास कोणतीही तक्रार करता येणार नाही व त्‍याची कोणतीही जबाबदारी संस्‍थेवर राहणार नाही तसेच सोने तारण कर्ज विषयक नियमावली अट क्र.8 वर नमुद आहे व त्‍याखाली कर्जदार म्‍हणून तक्रारदार हिची सही आहे.  एक वर्षाची मुदत संपुन गेल्‍यावर तक्रारदार हिने दिनांक 13.03.2015 रोजी सामनेवाला यास कर्ज रक्‍कम भरुन घेऊन दाखला परत देण्‍याबाबत रजि.नोटीस पाठविल्‍याचे दिसून येते. या सर्व बाबीवरुन असे दिसून येते की, सामनेवाला यांनी उभयपक्षात झालेल्‍या कागदपत्रावरुन सामनेवालाने कार्यवाही केलेला आहे ती योग्य आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारहिचे प्रति कोणत्‍याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. या सर्व बाबीवरुन असे निष्‍पन्‍न होते की, सामनेवाला यांनी तक्रारदारप्रति कोणतीही त्रुटी दर्शविलेली नाही. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

23.       मुद्दा क्र.2 – सामनेवाला यांनी नियमाप्रमाणे कारवाई केलेली आहे असे सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्रावरुन दिसून येते. सामनेवालाने यांनी तक्रारदारप्रति कोणत्‍याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार ही अनुतोष मिळण्‍यास पात्र ठरत नाही.  सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

24.  मुद्दा क्र.3 -मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्तीची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारकर्तीस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.