जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 299/2008. प्रकरण दाखल तारीख - 02/09/2008 प्रकरण निकाल तारीख - 12/11/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य नरेश गिरधारी निहालानी वय, 31 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार रा.47, सिंधी कॉलनी, भगतसिंग रोड नांदेड. विरुध्द. 1. डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर (डि.एम.आर.) दक्षीण मध्य रेल्वे, सांगवी नांदेड 2. स्टेशन प्रबंधक, गैरअर्जदार दक्षीण मध्य रेल्वे, रेल्वे स्टेशन अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार दक्षीण मध्य रेल्वे यांनी अतिरिक्त प्रवास भाडे व दंड घेतत्या बददल तक्रारदाराने आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे औरंगाबाद ते नांदेड दि.16.8.2008 रोजी प्रवास करण्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेसचे पीएनआर-851-3547570 या क्रंमाकाचे तिकिट घेतले होते व ते शेवटपर्यत वेंटीगच होत. औरंगाबाद स्टेशनवर वेळ 23.45 वाजता मनमाड –मदूराई एक्सपे्रस गाडी आली व नंदीग्राम एक्सप्रेस 30 मिनिटे उशिराने येणार होती. अर्जदाराने गाडी नंबर 6734 A/c थ्री टायरच्या निरीक्षक यांना विचारले असता त्यांनी जागा शिल्लक आहे म्हणून सांगितल्यावर गाडी मध्ये प्रवेश केला. नंतर अर्जदार जवळ नंदीग्राम एक्सप्रेसचे तिकिट पाहून हे तिकिट या गाडीला चालत नाही व तुम्हाला नवीन अतिरिक्त तिकिट क्र.380505 रहफ.689/- व दंड रु.250/- आकारला. अर्जदाराने दि.18.8.2008 रोजी प्रबंधक रेल्वे नांदेड यांचेकडे अर्ज देऊन त्यांना नंदीग्रामचे रु.365/- तिकीटाचे ऐवजी रु.689/- वापस मिळण्यासाठी तिकिट डिपॉझीट केले. ती रक्कम वापस मिळावी, तसेच झालेलया मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/-मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे हजर होऊन त्यांनी एकञित व संयूक्तीकरित्या जवाब वकिलामार्फत दाखल केला. अर्जदाराचे तक्रार अर्जातील म्हणणे त्यांना मान्य आहे. नंदीग्राम एक्सप्रेसचे दि.16.8.2008 रोजीचे रिझर्वेशन आहे व ते वेंटीगचे होते परंतु ती ट्रेन प्रत्यक्ष 30 मिनिटेच उशिरा धावत होती त्यात गाडीत न चढता अर्जदार यांनी विनापरवानगी ट्रेन नंबर 6734 मनमाड मदूराई ही स्टेशनकडे आली असता त्यामध्ये बसले. त्यादिवशीच नांदेड डिव्हीजनचे भरारी पथक यांनी तपासणी केली असता तक्रारदार हा ट्रेन नंबर 1401 वेंटींग लिस्ट चा तिकीट वर ट्रेन नंबर 6734 मध्ये प्रवास करीत होते असे आढळून आले. त्यामूळे मूख्य तिकिट निरिक्षक यांनी तक्रारकत्या्रला कलम 55 व 138 प्रमाणे बिगर तिकिट प्रवास करीत असल्याचे दोषी धरुन त्यांला पावती क्र. 380505 दि.16.8.2008 रोजी रु.689/- वसुल केले. ज्यामध्ये रु.439/- प्रवास भाडे औरगाबाद ते नांदेड व रु.250/- दंड म्हणून स्विकारले व त्यांला बर्थ क्र.बी.12 अलॉट केले व त्यावर तक्रारदाराने प्रवास केला. गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे तिकिट रिझर्वेशन व रिफंड रूल्स प्रमाणे एक्सेस फेअर तिकीट ज्यावर प्रवाशानी प्रवास केला आहे व दंडीत झाला आहे व त्यांचे तिकिट डिपॉझीट रिसीप्ट देता येत नाही व ट्रेन क्र.1401 नंदीग्राम एक्सप्रेस चे तिकीट डिपॉझीट रिसीप्ट अर्जदाराला दिली आहे व त्यार तिकिटाच्या रिफंडीची प्रक्रिया रिफंड रुल्स प्रमाणे चालू आहे असे सांगितले. असे करुन गैरअर्जदाराने अर्जदाराची कोणत्याही प्रकारे अडवणूक केली नाही व अनूचित प्रकार केलेला नाही. म्हणून सदर तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची फसवणूक केली काय किंवा अनूचीत व्यापार पध्दतीचा अवंलब केला काय हे अर्जदार सिध्द करतात का ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी पीएनआर-851-3547570 गाडी नंबर 1401 दि.16.8.2008 रोजीचे औरंगाबाद नांदेड चे A/c थ्री टायर सत्य प्रत दाखल केली आहे. या तिकिटावर टीटी ने फाऊडंइन ट्रेन नंबर 6734 of 16.8.2008 hence charged Twt vide EFT असे उल्लेख केलला आहे व दूसरी जी गाडी नंबर 6734 मनमाड मदूराई यासाठी रशिदी द्वारे अर्जदाराकडून किरायासाठी रु.439/- व दंड म्हणून रु.250/- असे एकूण रु.689/- वसूल केलेली पावती दाखल केली आहे. त्यांचा पावती नंबर 680505 असा आहे वेटींग लिस्ट ट्रेन नंबर 1401 असा उल्लेख केलेला आहे. वरील दोन्ही तिकिट पाहिले असता व रेल्वेच्या नियमाप्रमाणे हे अतीशय स्वच्छ व स्पष्ट आहे कि एका गाडीचे तिकीट दूस-या गाडीला चालत नाही किंवा ते ट्रान्सफरेबल चालत नाही किंवा दूसरे इसमास त्या तिकिटावर प्रवास करता येत नाही. नंदीग्राम चे तिकीट असताना व ती गाडी 30 मिनिटे उशिराने धावत असताना अर्जदार यांनी काही कारण नसताना प्रतिक्षा न करता व पूर्व परवानगी न घेता गाडी नबर 6734 मध्ये प्रवेश केला. नांदेड येथील भरारी पथकाने तपासणी केली असता त्यांचे कडे दूसरे तिकिट आढळून आले. यांचा सरळ सरळ अर्थ त्यांनी विनातिकीट अर्थ लावला व डब्ल्यूटी लावून त्यांनी कलम 55, 138 प्रमाणे प्रवासाचे भांडे व त्यावर दंड लावला आहे व तो कायदेशीर आहे. यासाठी गैरअर्जदारांनी रेल्वेचे नियम दाखल केलेले आहेत. यात सेक्शन 55 प्रमाणे, 55. Prohibition against traveling without pass or ticket (1) No person shall enter or remain in any carriage on a railway for the purpose of traveling therein as a passenger unless he has with him a proper pass or ticket or obtained permission of a railway servant authorized in this behalf for such travel. व सेक्शन 138 प्रमाणे 138. Levy of excess charges and fare for traveling without proper pass or ticket of beyond authorized distance. (1) If any passenger---- (a) being in or having alighted from a train, fails or refuses to present for examination or to deliver up his pass or ticket immediately on a demand being made therefore under section 54 or (b) travels in a train in contravention of the provisions of section 55, हे नियम बघीतले असता हे स्पष्ट झालेले होते की गैरअर्जदाराने केलेला कृतीत कोणतीही फसवणूक केलेली नाही त्यांनी नियमाप्रमाणे पावती द्वारे दंड वसूल केलेला आहे. अर्जदार यांची मागणी यामूळे चूक ठरते. व अर्जदार हे सूशिक्षीत असल्याकारणाने त्यांने घाईगर्दीत अशा प्रकारे नियमभंग केला आहे व याउलट त्यांनी नियमाने वागला हे सांगून तक्रार दाखल केली हे चूकीचे आहे. यात अर्जदार यांच्याकडे गाडी नंबर 1401 चे A/c थ्री टायरचे वेटींग लिस्टचे तिकिट होते हे तिकिट त्यांना औरंगाबाद स्टेशनवर किंवा आल्या बरोबर नांदेड स्टेशनला रिफंडसाठी जमा करुन रिफंड मागता आले असते तसे त्यांने केलेले नाही पण हे तिकिट त्यांने दि.18.8.2008 रोजी नांदेड स्टेशन यांच्याकडे रिफंड साठी जमा केलेले आहे. तिकीट रिफंड मागण्यासाठी जे नियम आहेत त्याप्रमाणे किती तासात, किती अंतरसाठी व केव्हा तिकीटे जमा केली याप्रमाणे त्यांना रिफंड मिळेल व गैरअर्जदाराने देखील आपल्या लेखी म्हणण्यात ती कारवाई चालू आहे असे म्हटले आहे व गैरअर्जदार यांनी त्या तिकीटाचे रिफंड बाबत रुल दाखल केलेले आहे ते खालील प्रमाणे, Untravelled After actual For a distance 50% of the fare paid (subject Reserved departure of to Minimum cancellation Tickets of the train charages specified above Upto 3 Hrs Upto 200 kms Upto 6 Hrs. Upto 500kms Upto 12 Hrs. Upto 500 Kms After actual For a distance Departure of Of the train Untravelled Upto 3 Hrs Upto 200 kms Rs.20/- Wait Listed Upto 6 Hrs. Upto 500Kms RAC Tickets Upto 12 Hrs. Upto 500Kms यात वेंटीग तिकिटाबददल उल्लेख नाही. रिफंड रुल्स प्रमाणे नकीच मिळेल किंवा त्यावीषयी योग्य कारवाई झाली नाही तर माञ अर्जदार यांना दाद मागता येईल. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. पीएनआर नंबर 851-3547570 दि.16.8.2008 औरंगाबाद-नांदेड A/c थ्री टायर क्रमांक 365 वेंटीग लिस्ट या तिकिटाची रक्कम, रिफंड रुल्स प्रमाणे वापस करण्यात यावी. 3. दावा खर्च व मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |