जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 366/2008. प्रकरण दाखल दिनांक – 24/11/2008. प्रकरण निकाल दिनांक – 20/05/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. विलास गोपीनाथ कोल्हेकर वय,35 वर्षे, धंदा शेती, अर्जदार रा.ढोल उमरी, ता. उमरी जि.नांदेड. विरुध्द 1. श्री.ए.के.सिंग, वय, सज्ञान धंदा नौकरी,सर्व्हीस मॅनेजर, प्रिमिअर कंपनी लि. रजिस्ट्रर्ड ऑफिस आणि वर्क्स, मुंबई-पूणे रोड, चिंचवड पुणे.411 019. गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, बाफना ऑटोमोटीव्हज, गट नंबर 235, पिंपळगांव (महादेव) नांदेड अकोला रोड, नांदेड. 3. व्यवस्थापक, सूदंरम फायनांन्स कंपनी लि.ऑफिस बाफना रोड, नांदेड. 4. प्रिमिअर कंपनी लि. तर्फे कार्यकारी संचालक,नोंदणीकृत कार्यालय आणि वर्क्स मुंबइ-पूणे रोड,चिंचवड पुणे -411 019 अर्जदारा तर्फे. - अड.गिरीश कूलकर्णी. गैरअर्जदार क्र.1 व 4 तर्फे - अड.अमोल रोहीला. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.3 तर्फे - अड.जी.एस. खाणगूंडे निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी आपल्या शेती व्यवसायासाठी रोड स्टार 2500 ही प्रिमियम कंपनीचे छोटे वाहन गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून दि.22.10.2007 रोजी खरेदी केले. त्यासाठी त्यांनी गेरअर्जदार क्र.3 यांचेकडून कर्ज घेतले व त्यापोटी त्यांनी प्रति महा रु.9000/- प्रमाणे सहा हप्ते भरलेले आहेत. रोड स्टार या वाहनाचे गैरअर्जदार क्र.4 हे उत्पादक आहेत व गेरअर्जदार क्र.1 हे सर्व्हीस सेंटर आहे. अर्जदाराचे वाहनामधील संपूर्ण दोष काढण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.2 यांची असताना व त्यातील दोष त्यांना दाखविल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे अधिकृत तंञकास बोलावून दूरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले परंतु कोणत्याही प्रकारची दूरुस्ती करण्यात आली नाही. यासाठी व्यवस्थीत दूरुस्ती न झाल्याने चेसीस ला तडे गेले आहेत. अपघाताचे भितीने अर्जदाराने वाहन चालवीणे बंद केले आहे. दि.29.9.2008 रोजी दूरध्वनी वरुन गैरअर्जदार क्र.1 यांचे मॅकेनिक वाहन दूरुस्तीसाठी घेऊन या असा निरोप दिल्याने वाहन टोचन करुन गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दिले. वाहनातील दोष उत्पादनातील दोष असून वॉरंटीचा काळ अद्यापही आहे. तेव्हा त्यांना नवीन वाहन बदलून देण्याचे किंवा पूर्ण दोष दूर करण्याचे आश्वासन दिले. परंतु पूढे काही झाले नाही. यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांचे वाहनावर असलेल्या भाग रक्कमेपोटी वाहन जप्त करण्याचे कळविले व गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदाराचे वाहन त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता गैरअर्जदार क्र.2 यांचे ताब्यातून अनाधिकृतरित्या जप्त केले व फसवणूक केली. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्यांचे रोड स्टार 2500 हे वाहन वापस घेऊन नवीन वाहन देण्याचा आदेश करावा किंवा वाहन दूरुस्त करुन देण्याचा गैरअर्जदार क्र.1,2 व 4 यांना आदेश व्हावा. दूरुस्तीसाठी लागलेला खर्च रु.25,000/-, वाहनाची किंमत रु.3,65,000/- व त्यावर 18 टक्के व्याज मिळावेत अशी विनंती केली आहे. गेरअर्जदार क्र.3 यांनी अनाधिकृत वाहन जप्त केंले म्हणून दरमहा रु.15,000/- जप्त केलेल्या दिनांकापासून नूकसान भरपाई म्हणून देणे तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु,5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 हे सर्व्हीस मॅनेजर असून वैयक्तीक नांवाने त्यांचे विरुध्द केस दाखल केली आहे. म्हणून ही तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. जी काही जबाबदारी येईल ती कंपनीवर येईल. अर्जदाराची तक्रार ही काल्पनिक असून त्यांनी सिध्द करण्यासाठी रेकार्ड किंवा पूरावे दिलले नाहीत. त्यामूळे ही तक्रार खोटी आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून कधी वाहन विकत घेतले व त्याबददल किती रक्कम दिली यांची माहीती नाही. तसेच अर्जदाराच्या वाहनात तांञिक दोष निर्माण झाला या बददलची माहीती नाही. अर्जदाराचे वाहन दूरुस्त करण्यासाठी गैरअर्जदार क्र.2 यांनी किती रक्कम घेतली व ती दूरुस्त झाली किंवा नाही याबददलची त्यांना माहीती नाही. त्यामूळे वाहन बदलून देण्यावीषयी त्यांना माहीती नाही. वाहनाची डिलेव्हरी देताना त्यांचे पीडीआय करुन व वाहन चांगले स्थितीत असल्याबददल व स्विकारल्या बदललची सही अर्जदाराची आहे. याशिवाय वाहन वॉरंटीत असेल तर वॉरंटीमध्ये बँटरी, टायर, लू ऑईल, हे नसतात. अर्जदार यांनी वॉरंटी कालावधी कधी संपतो यांचा उल्लेख केलेला नाही. त्यामूळे अर्जदाराची तक्रार खोटी ठरविण्यात येऊन खर्चासह ती फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस पाठविण्यात आली, नोटीस तामील होऊनही ते हजर झाले नाही म्हणून प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा करुन पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराने दाखल केलेला दावा चूकीचा असून गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे विरुध्दच्या तक्रारीबददल त्यांचा 1चवकाहीही संबंध नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.3 यांचे हप्ते थकीत असल्याबददलची माहीती स्वतः दिली आहे तथा सांगितली आहे. अर्जदाराने स्वतः त्यांचे वाहन खराब असून त्यांचे वाहन खराब व नादूरुस्त असल्यामूळे मी थकीत हप्ते भरु शकत नाही तूम्ही ठेऊन घ्या असे पञ दि.28.11.2008 रोजी पञ गाडीसह दिलेले आहे व त्यासोबत दि.30.09.2008 रोजी सरेंडर लेटर वर सही करुन दिली आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे ऐकमेंकाशी काही संबंध नाही. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे वाहन देण्याघेण्या संबंधीचा कोणताही व्यवहार स्पष्ट होत नाही. गैरअर्जदार क्र.3 यांचे हप्ते व्याज व दंड व्याज न देण्याचे उददेशाने न्यायालयाची दीशाभूल करुन तक्रार दाखल केली आहे. त्यामूळे त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.4 हे वकिलामार्फत हजर झाले पण त्यांनी आपले म्हणणे न देता काही फोटोग्राफस दाखल केले व असे म्हटले की, वाहनाचे मॉडीफिकेशन करण्यात आलेले आहे हे रेकार्डवर घेण्यात यावे परंतु त्यांने सविस्तर असे आपले म्हणणे दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र. 1,3 यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होतो काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी त्यांची तक्रार एकञित व मिसळ करुन व वेगवेगळे गैरअर्जदाराच्या विरुध्द दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून प्रिमियर रोड स्टार 2500 एसऐ मॉडेल दि.22.10.2007 रोजी विकत घेतल्याबददल त्यांचे दि.15.7.2008 चे इन्व्हाईस दाखल केलेले आहे. त्यांची आर.टी.ओ. कडे नोंदणी करण्यात आली असून एम.एच.-26-एच-3061 हा नंबर दिल्या बददलचे आर.सी. बूक दाखल करण्यात आलेले आहे. यावर गैरअर्जदार क्र.3 यांचे एचपी चढवलेले आहे. अर्जदाराने वाहन सूरुवातीस बीघडले होते व ते गैरअर्जदार क्र.2 यांनी दूरुस्त करुन दिले याबददलची बिले दाखल केलेली आहे. यात बिल नंबर 1757,1470, 1291 हे बिले पाहिली असता यात ऑईल फिलींग बददलची नोंद आहे. ही सर्व्हीसिंगची बिले आहेत. बिल नंबर 1603 मध्ये मागील चाकाचे बेरिंग बदलल्याचे म्हटले आहे. दि.29.12.2007 रोजीचे बिल वेल्डींग केल्याचा उल्लेख आहे. हे सर्व प्रकार पाहिले असता अर्जदाराच्या वाहनात कूठला मोठा दोष होता असे वाटत नाही व अर्जदारांनी आपल्या तक्रार अर्जात जी काही तक्रार केलेली आहे त्यावीषयचे पूरावे अधिकृत विक्रेता किंवा बाहेरीत गॅरेजेस यांचेकडून उपलब्ध नाहीत. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे वाहन दाखवील्यानंतर गाडी दूरुस्त केल्याबददलचे जॉब कार्ड हे ही या प्रकरणात दाखल आहे. किरकोळ कामे केल्याचे बिले असल्यामूळे चालू स्थितीतील वाहनाचे मेंटेन्स हे राहणारच आहे. त्यामूळे त्यात काही उत्पादकीय दोष असेल असे वाटत नाही. त्यावर गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द नांदेड येथील व्यवस्थापकाचा काही संबंध नाही. वैयक्तीक नांवाने तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारची वैयक्तीक नांवाची तक्रार अर्जदार यांना दाखल करता येणार नाही. कंपनीस किंवा फार तर पदनामाने कंपनीच्या विरुध्द तक्रार दाखल केल्या जाऊ शकते. गैरअर्जदार क्र.4 यांनी आपले म्हणणे जरी दिले नसले तरी काही फोटोग्राफस दाखल केलेले आहेत व असा आक्षेप घेतला आहे की, रोड स्टार 2500 या वाहनाचे मॉडीफिकेशन करुन त्यांची बॉडी उंच करण्यात आलेली आहे. यावरुन असे दिसून येते की, या वाहनाचे वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त मालाची नेआण करतात व असे प्रकार असेल तर चेसीसला तडे जाऊ शकतात. परंतु हा प्रकार झाल्याचे जॉब कार्डवर नोंद नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1,2, व 4 यांचे विरुध्दची तक्रार मूळातच दीशाहिन वाटते व गेरअर्जदार क्र.2 यांनी वेळोवेळी अर्जदाराचे वाहन Attend केल्याचे पूरावे आहेत व त्यांनी वाहन दूरुस्त करण्यास नकार दिला असा कोणताही पूरावा उपलबध नाही. याशिवाय अर्जदाराने त्यांचे वाहनावर रु.25,000/- खर्च केला याबददलचेही पूरावे ते दाखल करु शकले नाहीत. त्यामूळे हा ही मूददा काल्पनिक वाटतो. गैरअर्जदार क्र.1,2 व यांचे विरुध्द सेवेतील ञूटी झाली हे सिध्द झालेले नाही. गैरअर्जदार क्र.3 ही फायनान्स कंपनी आहे व त्यांनी त्यांना कर्ज दिलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी वाहन विकत घेण्यासाठी अर्जदार यांना कर्ज पूरविले आहे व त्यांचकडे नियमितपणे हप्ते जमा झाले पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. एकंदर प्रकार पाहता अर्जदारांनी त्यांचे हप्ते वेळेवर भरल्याचे दिसून येत नाही. शिवाय गैरअर्जदार क्र.3 यांनी आपले म्हणण्यात अर्जदाराची तक्रार खोडून काढतात त्यांनी त्यांचे वाहन जप्त केले नसून अर्जदाराच्या विनंतीवरुन म्हणजे दि.28.11.2008 रोजीच्या पञानुसार ते पूढील हप्ते भरु शकत नाहीत म्हणून स्वतःच्या मर्जीने वाहन त्यांचे ताब्यात दिलेले आहे व दि.30.09.2008 रोजी वाहन सरेंडर केल्या बददल पञही दिलेले आहे. हे दोन्हीही पञ गैरअर्जदार क्र.3 यांनी दाखल केलेले आहे. त्यामूळे अर्जदार यांची तक्रार ही खोटीठरते व अर्जदारांनी स्वतः मर्जीने आर्थिक अडचणीमूळे हा प्रकार केला असून यापूढील हप्ते मागू नयेत यासाठी ही तक्रार दाखल केली असे म्हणणे चूकीचे ठरणार नाही. हप्ते नियमित नसल्यामूळे एक कागदपञ दाखल केलेले आहे. मा.राज्य आयोग, मध्य प्रदेश सी.पी.जे. 2000(1) पान नंबर 54 एच.एम.टी. लि. व इतर विरुध्द श्रीमती जूबेदा बी यात उत्पादनात दोष असल्याबददल तज्ञाचा ईव्हीडंन्स नाही या कारणास्तव तक्रार खारीज केली आहे. प्रस्तूत प्रकरणात देखील उत्पादनात दोष असल्याबददल तज्ञाचा ईव्हीडंन्स उपलब्ध नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |