जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 69/2011 तक्रार दाखल तारीख- 02/05/2011
प्रमोद पि. उत्तमराव डोंगरे,
वय – सज्ञान , 29 वर्ष, धंदा –
रा.महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी,
धानोरा रोड, बीड ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी,
ओरियन्टल इंश्युरन्स कंपनी,,
शाखा – जालना रोड,बीड ता.जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – ए.पी.गंडले,
सामनेवालेतर्फे – वकील – ए.पी.कुलकर्णी,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे बीड येथील रहिवाशी असुन स्वत:चे वापरासाठी एक वाहन खरेदी केले होते त्याचा क्रमांक एमएच-23 ई-8238 हा असुन त्यावर तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे वाहनाचा विमा उतरविला होता. त्याचा क्रमांक 161991/31/2010/867 दि.14.12.2009 ते 13.12.2010 या कालावधी करीता घेतला होता. त्याची रक्कम हप्ता सामनेवाले यांचेकडे जमा केला होता. तक्रारदार हा दि.27.3.2010 रोजी नेकनूर कडून बीडकडे येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे सदर वाहन झाडावर आदळले याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशन, नेकनूर यांचेकडे गुन्हा क्र.4/10 नुसार नोंदविण्यात आला आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवाले यांना सदर घटनेची माहिती दिली त्यानुसार सामनेवाले यांनी घटनेचा स्पॉट पंचनामा करुन वाहन दुरुस्तीस नेण्याची परवानगी दिली. त्यानुसार तक्रारदाराने न्यू कोटक अँटोमोबाईल्स, संतोषी डिझल, अजित मोटर्स, संजय मोटर्स, बीड यांच्याकडून दुरुस्त केले.
तक्रारदाराने दि.15.7.2010 रोजी आरटीओ बीड यांचेकडून वाहन तपासून घेवून ते सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र घेतले व त्यानंतर तक्रारदाराने सदर खर्चाच्या पावतीसह सामनेवाले यांचेकडे नुसकान भरपाईचा प्रस्ताव दाखल केला, त्यात तक्रारदाराने रु.2,50,705/-बीले सामनेवाले यांना देवू केले. या बीलापोटी सामनेवाले यांनी तक्रारदारास दि.8.11.2010 रोजी रक्कम रु.1,68,800/- चा धनादेश देवू केला. सदर धनादेश तक्रारदाराने नाराजीने स्विकारला आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदार दाखल बीलाच्या रक्कमेतुन मिळालेला धनादेशाची रक्कम वजा जाता राहिलेली फरकाची रक्कम रु.81,905/- वाहन दुरुस्ती कालावधीतील नुकसान भरपाईची रक्कम रु.20,000/- व मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी रु.10,000/- असे एकुण रु.1,11,905/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे म्हणण्याचे पुष्ठयार्थ एकुण 21 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणणे दि.16.7.2011 रोजी दाखल केले असुन त्यात त्यांनी तक्रारदाराने घेतलेला विमा हा मान्य असुन अपघात ही मान्य आहे. तक्रारदाराने रु.2,50,705/- रक्कमेची नुकसान भरपाई बाबतची बीले दाखल केले हे ही त्यांना मान्य आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारास दि.8.11.2010 रोजी रु.1,68,168/- रक्कमेचा विमा प्रस्तावातील नुकसान भरपाईची रक्कम अदा केली. परंतु पत्रावर फुल अँण्ड फायनल सॅटीस्फॅक्शन व चेक मिळाल्यानंतर तक्रार नाही असे लिहून दिले आहे, असे म्हंटले आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदाराचे वाहनाचे सर्व्हेक्षण केले असुन सर्व्हेअर श्री.अरुण कुलकर्णी यांचा सर्व्हे रिपार्ट व फायनल बील चेक रिपोर्ट दाखल केले आहे. त्यानुसार आम्ही तक्रारदारास देवू केलेला क्लेम हा संपूर्ण व तक्रारदाराचे समाधान करणारा असताना तक्रारदाराना द्यावयाचे सेवेत कोणतीही कसूरी केली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी, अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार व सोबतची कागदपत्रे तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबतची कागदपत्रे आणि दोघांचा तोंडी युक्तीवाद याचे बारकाईने आवलोकन केले असता,
सामनेवाले यांनी तक्रारदारास देवू केलेली रक्कम व तक्रारदाराने केलेली मागणी रक्कम रु.81,905/- ही कशा प्रकारे सामनेवाले यांचेकडून येणे लागते याबाबतचा योग्य पुरावा भारतीय पुरावा कायदयानुसार सिध्द होवू शकेल असा पुरावा आणलेला नाही. म्हणजेच सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत कसूरी केली नाही, हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले व तक्रारदार यांनी आपआपला खर्च सोसावा.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड