जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/139 प्रकरण दाखल तारीख - 03/05/2010 प्रकरण निकाल तारीख – 11/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य अमिंदसिंघ पि.चंचलसिंघ मान, रा.तुप्पा ता.जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द. द ओरीएन्टल इन्शुरन्स कं..लि. तर्फे विभागीय व्यवस्थापक, गैरअर्जदार संतकृपा मार्केट, जी.जी.रोड,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.आर.अग्रवाल. गैरअर्जदार तर्फे वकील - अड. पी.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते, सदस्य) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. अर्जदार हा ट्रक क्र.एम.एच.26/एच-7477 चा मालक आहे. सदर ट्रक हे वर्ष 2006 मध्ये उत्पादीत आहे. अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडुन दि.23/11/2007 ते दि.22/11/2008 या कालावधीकरीता गैरअर्जदार विमा कंपनीकडुन सदर ट्रकचा विमा रु.27,142/- प्रिमीअम भरुन उतरविला होता. सदर विमा पॉलिसीमध्ये ट्रकची किंमत रु.10,80,000/- इतकी दाखविण्यात आली होती. सदर विमा पॉलिसीचा क्र.182001/31/2008/3523 असा आहे. अर्जदाराने सदरहू ट्रक मे.सुंदरम फायनान्स लि, यांच्याकडुन कर्ज रु.13,84,900/- इतके घेवुन खरेदी केली होता. दि.31/07/2008 रोजी सदर सदर ट्रक हा वर्धा येथून नागपुरला जात असतांना सदर ट्रकला बोरी जिल्हा नागपुर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत अपघात झाला. सदर अपघात हा इतका जबरदस्त होता की, अपघातात ट्रकचा क्लीनर जागीच मरण पावला व ट्रक ड्रायव्हर गंभीररित्या जखमी झाला होता. पोलिस स्टेशन बोरी यांनी गुन्हा क्र.155 दाखल केला. अपघाताच्या वेळेस सदर ट्रक हा ट्रक ड्रायव्हर नामे ज्ञानेशवर असाजी जाधव हा चालवित होता व त्याच्याकडे तत्सम वाहन चालविण्याचा परवाना होता. पोलीस स्टेशन बोरी यांनी एफआयआर, घटनास्थळ पंचनामा तयार केला. सदर अपघातात ट्रक क्र. एमएच 26/एच-7477 हा पुर्णतः खराब झाला. सदर अपघाताची माहीती गैरअर्जदार विमा कंपनीला दिली. विमा कंपनीने श्री. आनंद अलकटवार पुण यांची सर्व्हेअर म्हणुन नियुक्ती केली त्यांनी विमा कंपनीकडे सर्व्हे रिपोर्ट सादर केला व रु.9,22,547/- इतके नुकसान झाल्याचा अभीप्राय दिला. श्री.आनंद अलकटवार यांनी दिलेला सर्व्हे रिपोर्ट हेतुपुरस्सररित्या अर्जदारास दाखविला नाही. अर्जदाराने सदर ट्रक हा नांदेड येथील गॅरेज चालकांकडे दुरुस्तीसाठी दाखविला असता, गॅरेज चालकांनी सदर ट्रक हा पुर्णतः नादुरुस्त झाला असून दुरुस्त करण्या योग्य राहिलेला नाही. श्री.आंनद अलकटवार सर्व्हेअर यांना सदर ट्रकचे पुर्नअवलोकन करण्याबाबत सांगीतले सदर रिसर्व्हे रिपोर्ट मध्ये सदर ट्रकचे रिपेअर बेसीसवर रु.1,98,115/- व कॅशलॉक बेसीसवर रु.1,25,000/- नुकसान झाल्याचा चुकीचा अभीप्राय दिला. अर्जदारास अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मे. सुंदरम फायनान्स यांच्याकडुन घेतलेल्या कर्जाद्वारे खरेदी केला होता, त्यामुळे अर्जदारास सदरहू ट्रकचा हप्ता भरणे कठीण जात होते व नुकसान भरपाईची रक्कम न देता गैरअर्जदार अर्जदाराची पिळवणुक करीत आहे. मे.सुंदरम फायनान्स लि, यांनी गैरअर्जदारास दि.09/11/2009, दि.29/12/2009 व दि.05/12/2009 रोजी सुचना पत्रे पाठवुन अपघातग्रस्त ट्रकचे हप्ते भरण्याबाबत ताकीद देण्यात आली. सदर ट्रकच्या अपघातामुळे व त्यानंतर मे.सुंदरम फायनान्स यांच्याकडुन मिळालेल्या सुचनापत्रामुळे गोंधळलेल्या अवस्थेत होता व त्याचा गैरफायदा गैरअर्जदार विमा कंपनी घेत होती. गैरअर्जदार विमा कंपनीच्या अधिका-यांनी गैरअर्जदारास सदरहू ट्रकचे रिपेअर बेसीसवर किंवा कॅशलॉस बेसीसवरती पैसे स्विकारल्यास अपघातग्रस्त ट्रकची विमा रक्कम अर्जदारास त्वरीत मिळेल अशा स्वरुपाची आमीष दाखविले. गैरअर्जदाराच्या 17 महिण्यापासुन चालु असलेल्या छळाला कंटाळून अर्जदाराने अखेरीस त्यांचे वकीला मार्फत दि.02/12/2009 रोजी नोटीस पाठविली. दि.08/02/2010 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने सदर नोटीसचे वकीला मार्फत उत्तर पाठविले व त्यात त्यांनी अपघात ग्रस्त ट्रकचे रिपेअर बेसीसवर रु.1,98,115/- व कॅश लॉस बसेसीवर रु.1,25,000/- नुकसान झाल्याचे कळविले तसेच सदर उत्तरात अर्जदाराने सदर ट्रकच्या अपघाता बाबत नुकसान भरपाईची रक्कम रु.1,75,000/- मान्य आहे. गैरअर्जदार विमाकंपनीकडुन वेळोवेळी घेतलेल्या अर्ज व सहयांचा गैरअर्जदार विमा कंपनीने गैरवापर केले आहे. गैरअर्जदाराचे कृत्य हे सेवेतील त्रुटी या संज्ञेत मोडते म्हणुन त्यांची मागणी आहे की, नुकसान भरपाई रु.9,22,547/- 18 टक्के व्याजाने मिळावे व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व दावा खर्च म्हणुन रु.10,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत, असे म्हटले आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे सादर केले. त्यांचे म्हणणे असे की, सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही म्हणुन खारीज करण्यात यावी. अर्जदार हा ट्रक क्र. एम.एच.26-एच-7477 चा मालक आहे ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे. अर्जदाराने अपघाताची सुचना गैरअर्जदारास दिली त्यावरुन गैरअर्जदाराने विनीत महाजन यांना स्पॉट सर्व्हे करण्यात सांगतले व त्यांनी आपला अहवाल दि.02/08/2008 रोजी दिला. ट्रक टाटा कंपनीच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरवर इस्टीमेट करण्यासाठी हलविण्यास सांगीतले परंतु अर्जदाराने अधिकृत सर्व्हीस सेंटरवर न जाता खाजगी रिपेअरींग सेंटरवर इस्टीमेट तयार केले. गैरअर्जदाराने श्री.आनंद अलकटवार यांना सर्व्हेअर म्हणुन नियुक्त केले त्यांनी इस्टीमेट प्रमाणे वाहनाची तपासणी केली व वाहनाचे रु.2,97,773.84 एवढया रुपयाचे नुकसान झाल्याचा दि.21/09/2008 रोजी कळविले. श्री. अलकटवार सर्व्हेअर यांनी रु.9,22,547/- चे नुकसान झाल्याचे कळविले हे अर्जदाराचे म्हणणे चुक आहे. सव्हेअरने दिलेला रीपोर्ट अर्जदारास मान्य नव्हता कारण त्यांनी पार्टसची किंमत जास्त लावली होती व त्यातुन व्हॅट टॅक्सची रक्कम कमी केलेली नव्हती. म्हणुन गैरअर्जदाराने सर्व्हेअरला त्या बाबींचा विचार करुन पुन्हा सर्व्हे रिपोर्ट देण्याची विंनंती केी. दि.28/02/2009 रोजी आपला सर्व्हे रिपोर्ट दिला व त्या सर्व्हे रिपोर्टप्रमाणे सर्व्हेअरने सदरच्या गाडीचे रु.1,25,000/- कॅश लॉस बेसीस किंवा रु.1,98,115/- रिपेअर बेसीसने नुकसान भरपाईचा रिपोर्ट दिला. रु.1,73,620/- ला अर्जदार क्लेम सेटल करण्यास संमतीपत्र लिहून दिले. आता मंचासमोर रु.9,22,547/- ची मागणी केली आहे. सर्व्हेरअने रिपोर्टमध्ये ज्या बाबीं पहावयास पाहीजे होते ते पाहीले नाही हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार कंपनी अर्जदारास रिपेअरींग बेसीसवर रु.1,98,115/- देणे लागते व कॅश लॉस बेसिसवर रु.1,25,000/- देणे लागते अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन रु.9,22,547/- चे नुकसान भरपाई मागणी चुकीची आहे. म्हणुन अर्जदाराचा दावा खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदारचा ट्र क्र.एम.एच.26/एच-7477 याचा विमा गैरअर्जदार यांचेकडे उतरविला होता. सदर ट्रकचा दि.31/07/2008 रोजी बोरी जि.नागपुर रोडवर अपघात झाला त्यात क्लीनर जागीच मरण पावला, पोलिस स्टेशन बोरी येथे गुन्हा क्र.155/08 अन्वये नोंद घेण्यात आली. सदरील ट्रकचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर अंसाजी जाधव चालवत होता. यात ट्रकचा अपघात कसा झाला या विषयी अर्जदाराने काही लिहीलेले नाही व ट्रकचे अतोनात नुकसान झाले असे म्हटले आहे ट्रकचे आर.सी.बुक, परवाना, फिटनेस इ. कागदपत्र दाखल केले़ असून ते सर्व व्यवस्थीत आहेत. ज्ञानेश्वर जाधव यांचा ड्रायव्हींग लायसन्स दाखल केलेले असून ते दि.26/02/2009 पर्यंत वैध आहे. यात अर्जदाराचा ट्रक कोल्हापुरकडे जात असतांना रस्त्यामध्ये टीपर नादुरुस्त होऊन उभी होती व समोरुन येणा-या एक बसचा हेडलाइटमुळे ट्रक ड्रायव्हरला दिसले नाही त्यामुळे टीपरला धडक मारली त्यात सदरील ट्रकचे कॅबीन पुर्णतः तुटली. सर्व कागदपत्र हे 2005 चे आहेत ट्रकचे पुर्ण नुकसान झाल्या कारणाने अर्जदाराने ट्रकचे टोटल लॉस रु.9,22,547/- ची मागणी केलेली आहे. यात असाही आक्षेप घेतलेला आहे की, गैरअर्जदाराने पाठवलेला सर्व्हेअर श्री.अलकटवार यांचा सर्व्हे रिपोर्ट हेतुपुरस्सररित्या अर्जदारास दाखविला नाही. यात गैरअर्जदाराने असा आक्षेप घेतला आहे की, श्री विनीत महाजन यांनी स्पॉट सर्व्हे करुन दि.02/08/2008 ला आपला अहवाल दिला व जागेवरुन ट्रक हलवुन टाटा कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटरचे इस्टीमेट करण्यास सांगीतले, अर्जदाराने खाजगी रिपेअरींग सेंटरवर जाऊन इस्टीमेट तयार केले. श्री. अलकटवार यांनी वाहनाची तपासणी करुन इस्टीमेट रु.2,97,773.84 एवढे नुकसान झाल्याचा दि.21/09/2008 रोजी कळवीले आहे. त्यामुळे श्री.अलकटवार यांनी रु.9,22,547/- ट्रकचे टोटल लॉस झाले ते चुक आहे असे म्हटले आहे. गैरअर्जदाराने प्राथमीक सर्व्हे झाल्यानंतर डिटेल सर्व्हे करण्यास सांगीतले आहे सर्व प्रथम केलेला रिपोर्टमध्ये पार्टसची किंमत जास्त होते व्हॅटची रक्कम कमीकेली नव्हतीसर्व्हेअरने या रिपोर्टप्रमाणे रु.1,25,000/- कॅश लॉस बेसेसवर व रु.1,98,115/- रिपेअरींग बेसेसवर नुकसान भरपाईसाठी रिपोर्ट दिला यासाठी अर्जदाराने रु.1,74,620/- ला सेटलमेंट करण्यास तयार आहे. म्हणुन दि.04/12/2008 रोजी संमतीपत्र लिहून दिले. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज हा वस्तुस्थितीस सोडुन आहे. यात विनीत महाजन यांचा दि.02/08/2008 चा सर्व्हे रीपोर्ट पाहीले असता, अर्जदाराचा ट्रक कोल्हापुरकडे जात असतांना रस्त्यामध्ये उभी टाकलेली टीपर नादुरुस्त होऊन उभी होती व समोरुन येणा-या एक बसचा हेडलाइटमुळे ट्रक ड्रायव्हरला दिसले नाही त्यामुळे टीपरला धडक मारली त्यात सदरील ट्रकचे कॅबीन पुर्णतः तुटली. यात कॅबीन, लोड बॉडी, चेचीस फ्रेम, रेडीएटर इंटरकुलर, इंजिन, फ्रंट एक्सल, स्टेरिंग, गीअर बॉक्स, स्टेअरींग लिंकेजेस, स्प्रींगज, बॅटरी, व्हिल डिस्क, एअर पाईप लाईन ब्रेक डॅमेज ठरविलेले आहे. यात अर्जदाराने विनीत महाजन यांचा सर्व्हे रिपोर्ट असतांना दुस-या सर्व्हेअरला नेमले यानंतर अलकटवार यांनी सर्व्हे केले यात अर्जदाराने दिलेले इस्टीमेट तपासुन त्यांनी गाडीची तपासणी केली त्यांनी सर्व्हे रिपोर्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे त्यातील लिस्टप्रमाणे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यात त्यांनी जे असेसमेंट दाखविले आहे त्यात सर्व्हेअरने ब-याच गोष्टी अनुत्तरीत ठेवले आहेत यात कॅबीनचे नुकसान रु.70,000/- आणी रु.1,500/- ग्लासेसचे असेसमेंट केले आहे, याला केप्ट ओपन ठरविलेले आहे, लोड बॉडी यावर इस्टीमेटचा रेट व सर्व्हेअरने दिलेले रेट यात तफावत आहेत. सर्व्हेअरने रेट कमी दाखवितांना यासोबत प्राईस लिस्ट जोडले नाही. त्यामुळे कमी केलेले रेट बरोबर आहे का? या विषयी संशय आहे व डॅमेज इस्टीमेट रु.9,22,547/- चे दाखविलेले आहे. याप्रमाणे सर्व्हेअरने ते मंजुर केलेले आहे त्याप्रमाणे नेट जबाबदारी ही रु.2,97,773.84 ची दाखविली आहे. यात सर्व्हेअरची फिस रु.11,684.71 दाखविले आहे. याप्रमाणे दि.05/03/2009 रोजी अर्जदाराने पत्र लिहून त्या पत्राप्रमाणे रिपेअर बेसेसवर रु.1,98,115/- व कॅश बेसेसवर रु.1,25,000/- अशी ऑफर दिलेली आहे. यात एकंदरीत विनीत महाजन यांनी सर्व्हे रिपोर्ट अपुर्ण दाखल केलेले आहेत्या रिपोर्टमध्ये जास्त किंमत लावलेला आहे त्यात व्हॅट टॅक्स लावलेला आहे. म्हणुन त्यानी असे म्हटले असले तरी या विषयी अर्जदारांनी ते जास्त असल्याकरीता प्राईस लिस्ट जोडलेली नाही. अर्जदाराने रु.1,75,000/- संमतीपत्र दिलेले आहे हे संमतीपत्र अर्जदार म्हणतात त्यांनी दिले परंतु त्यांना मान्य नाही आणी समजा अर्जदाराने असे संमतीपत्र दिलेच असले तरी गैरअर्जदाराने ते स्विकारुन त्याप्रमाणे त्यांनी रक्कम दिली नाही व वाद कायम राहीलेला आहे. आजपर्यंत वाद कायम असले तर त्या संमतीपत्रास गैरअर्जदाराने न स्विकारल्याबद्यल आता महत्व देता येणार नाही. 1) IV (2009) सी.पी.जे. 46 सुप्रिम कोर्ट, न्यु. इंडिया अशुरन्स कं.लि. विरुध्द प्रदीप कुमार, याच्यामध्ये क्लेम सेटल करण्यासाठी सर्व्हेअरचा रिपोर्ट हा अंतीम असू शकत नाही. यात सेटलेमेंट होऊ शकातो. अशा प्रकारच्या प्रकरणांत दोन सर्व्हेअरने सर्व्हे केलेला आहे व फायनल जरी केले नसेल दुसरे कॉंपीडेंट सर्व्हेअरचा रिपोर्ट आवश्यक होता व सुरुवातीचा सर्व्हे रिपोर्ट गैरअर्जदारांनी लपविला आहे. 2) IV (2009) CPJ (SC) ओरीएन्टल इंशुरन्स कंपन लि, विरुध्द ओझमा शिपींग कंपनी आणी इतर. सदरील केसलॉ याला लागु होणार नाही.यात जहाज पुर्ण पाण्यात बुडाले आहे. प्रस्तुत प्रकरणांत वाहन आहे. फक्त डॅमेज पाहणे आहे. 3) I (2009) CPJ 140 (NC) न्यु.इंडिया अशुरन्स कं.लि. विरुध्द भगतसिंघ, यात सर्व्हेअरचा रिपोर्ट मान्य नाही, सहा महिन्यानंतर रिपेअरसाठी परवानगी नाही. टोटल व्हॅल्युवर 20 टक्के डिप्रेशेसन, या प्रकरणांत टोटल लॉस कुठेही आलेले नाही किंवा सिध्द नाही. 4) IV (2009) CPJ 203 (NC) ओरीएंटल इंशुरन्स कं..लि. विरुध्द मेहर चांद, यात अधिकृत विक्रेता जास्तीचे इस्टीमेट व पुरावा (प्राईस लिस्ट) दिली पाहीजे, असे म्हटले आहे. 5) 2006 (4) All MR (Journal) 22,मे. बजाज अलांयझ जनरल इंशुरन्स कं.लि. विरुध्द श्री.नामदेव रामचंद्र कडु पाटील, सदरील केस लॉ या प्रकरणांशी निगडीत नाही. एकंदरीत दोन सर्व्हेअर व पहील्या सर्व्हेअरचा रिपोर्ट लपवुन संशयता निमार्ण झाली आहे. म्हणुन अर्जदाराचे नुकसान झाले आहे व बाकी कुठल्याही गोष्टीचा गैरअर्जदारांना आक्षेप नाही फक्त नुकसानीचा आकडा ठरवायचा आहे. समोरुन ट्रकची धडक दिल्यावर पुढील भागच डॅमेज होईल, मागील भाग डॅमेज होणार नाही. त्यामुळे ट्रक पुर्ण डॅमेज होण्याची शक्यता नाही. यात गैरअर्जदारांनी आपल्या लेखी म्हणण्यात परिच्छे क्र. 11 मध्ये म्हटल्याप्रमाणे रु.2,97,773,84 चे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. याला रांऊड केल्यानंतर रु.2,98,000/- अधीक व सर्व्हेअरचे फीस रु.11,750/- इतकी रक्कम अर्जदाराचे ट्रक क्र.एम.एच.26/एच - 7477 चे नुकसानीबद्यल रिपेअर बेसेसवर अर्जदारांना मिळाले पाहीजे. सर्व्हे रिपोर्ट पेज नं.7 प्रमाणे रु.3,09,750/- यावर प्रकरण दाखल केलेली तारीख दि.03/05/2010 पासुन 9 टक्के व्याजाने पुर्ण मिळेपर्यंत व्याजासह व मानसिक त्रासाबद्यल रु.25,000/- व दावा खर्च रु.2,000/- मिळण्यास अर्जदार पात्र आहेत, या निर्णयापर्यंत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.3,09,750/- द्यावे. सदरील रक्कमेवर प्रकरण दाखल तारखेपासुन दि.03/05/2010 पासुन 9 टक्के व्याजाने पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावे. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.25,000/- व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |