जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/157 प्रकरण दाखल तारीख - 20/05/2010 प्रकरण निकाल तारीख – 21/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. श्रीमती राधाबाई भ्र. सुर्यकांत लोंढे वय सज्ञान वर्षे, धंदा शेती व घरकाम अर्जदार रा.सोनमांजरी पो.धानोरा ता. लोहा,जि. नांदेड विरुध्द. 1. शाखा अधिकारी दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा कार्यालय,संतकृपा मार्केट,गुरागोविंदसिंघजी रोड नांदेड गैरअर्जदार 2. शाखा अधिकारी दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. कार्यालय ओरिएन्टल हाऊस पोस्ट बा.नं.7037 ऐ 25/27, आसफअली रोड, नई दिल्ली 110 002. अर्जदारा तर्फे वकील - अड.ऐ.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.शा.वि.राहेरकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की,अर्जदार ही मयत पदमाकर पि. सुर्यकांत लोंढे याची संख्खी आई आहे. दि.12.8.2007 रोजी सुभाष नगर येथे तो शनिशिंगनापूरला जाण्यासाठी त्यांचे वडील व साथीदारासोबत जाण्यासाठी अटो क्र.एम.एच.-26-सी-9668 मध्ये नीघाला असता पालमकडून येणारा टेम्पो क्र.एम.एच.-12/डिजी-2004 हा भरवेगात हयगईने व निष्काळजीपणे चालवून समोरुन धडक दिली त्यामूळे मयतास जबर मार लागला व तो मरण पावला. घटनेची माहीती पोलिस स्टेशन पालम येथे नोंद झाली आहे. गून्हा नंबर 63/2007 अंतर्गत दाखल झाला आहे. अर्जदार यांनी काही दिवसानंतर शासनाच्या परिपञकानुसार विद्यार्थ्यास विद्यार्थी सुरक्षा लाभ योजना अंतर्गत अपघाती मृत्यूबददल विमा मिळतो या बाबत चालू लागली. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्याकडे रितसार क्लेम फॉर्मसह रु.30,000/- चा विद्यार्थी विमा रक्कम मिळण्याकरिता अर्ज केला. अर्जदार यांनी वेळ मर्यादत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे योजनेचा लाभ मिळण्याची मागणी केली आहे. आजतागायत सदरील क्लेम हा गैरअर्जदार यांचेकडे प्रलंबीत आहे. अर्जदार हिचा जखमी मूलगा पदमाकर हा सोनमांजरी येथील जि.प.प्राथमिक शाळा सोनमांजरी येथे इयत्ता पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता. मागणी देण्यास विलंब ही बाब ञूटीच्या सेवेमध्ये येते. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, विमा रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक ञासापोटी रु,25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचा अर्ज हा अपरिपक्व आहे कारण गैरअर्जदाराने अर्जदाराचा अर्ज हा नाकारलेला नाही अथवा मान्य ही केलेला नाही. गैरअर्जदारास आवश्यक ती कागदपञे अर्जदाराने दिलेले नाहीत ते कागदपञ दयावेत व त्यावर कंपनी नीर्णय घेईल व तो नीर्णय मान्य नसेल तर अर्जदाराने मंचात तक्रार करावी असे म्हटले आहे. मयत मूलाच्या शाळेच्या हजेरी पटाची प्रत व बोनाफाईड सादर करण्या सांगितले होते, अर्जदाराने दाखल केलेल्या डॉक्टरच्या प्रमाणपञावर डॉक्टरांची सही व शिक्का नाही. ही कागदपञ दाखल करण्यास दि.21.10.2008 रोजी पञाद्वारे कळविले होते. परंतु सदरील कागदपञाची पूर्तता अर्जदाराने केलेली नाही.अर्जदाराने विमा पॉलिसीच्या नियमाप्रमाणे विमा धारकाचा मृत्यू अपघातानेच झाला आहे हे पोलिस फिर्याद घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट वगैरे कागदपञ कंपनीस देऊन सिध्द केले पाहिजे. अर्जदाराचे जे म्हणणे आहे रु.30,000/- आणि इतर लाभास अर्जदार पाञ आहे हे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदाराची तक्रार खर्चासहीत खारीज करणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदार क्र.1 यांनी राजीव गांधी सूरक्षा लाभार्थी योजना पॉलिसी विद्यार्थ्याच्या सूरक्षेसाठी त्या शाळेस दिलेली आहे. अर्जदाराचा मूलगा पदमाकर हा सोनमांजरी जि.प्र.शाळेत पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता. या शाळेत विमा सूरक्षा योजना होती. अर्जदाराचा मूलगा पदमाकर हा दि.12.8.2007 रोजी शनिशिंगणापूरला अटो नंबर क्र.एम.एच.-26-सी-9668 जातेवेळेस पालम कडून येणा-या दूस-या टेम्पो क्र.एम.एच.-12/डिजी-2004 अटोला धडक दिली. त्यांस जबरदस्त मार लागला. गैरअर्जदाराचे विमा सूरक्षा असल्यामूळे त्यांनी रितसर क्लेम फॉर्म भरुन रु.30,000/- नूकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम फॉर्म भरुन दिला. परंतु गैरअर्जदार यांनी त्यांना नूकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. यात अर्जदार यांनी जागोजागी खाडाखोड केलेली आहे. तक्रार अर्जाची परिच्छेद क्र.2 मध्ये मयत पदमाकर ला जखमी आहे असे लिहीले आहे, परिच्छेदाच्या शेवटी धडक दिल्यामूळे त्यात ते मरण पावला असे म्हटले आहे. पून्हा परिच्छेद क्र.3 मृत्यू हा शब्द काढून तेथे जखमी हा शब्द लिहीला आहे. परिच्छेद क्र.5 मध्ये अपघाती मृत्यू बददल रु.30,000/- मागितले आहेत. परिच्छेद क्र.7 मध्ये अर्जदार यांचा जखमी मूलगा असे म्हटले आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी खाडाखोड व चूकीची माहीती लिहीलेली आहे. प्रार्थनेमध्ये रु.50,000/- 18 टक्के व्याजासह मागितलेले आहेत. तक्रार अर्ज पूर्णतः खाडाखोड केलेला आहे. अर्जदारास तिचा मूलगा जखमी झाला का मृत्यू पावला हे काय म्हणायचे ते समजत नाही. फिर्याद क्राईम डिटेंल्स तसेच पंचनामा हा दि.12.8.2007 चा आहे. यानंतर मरणोत्तर पंचनामा हा देखील दि.12.8.2007 चा आहे. यात अपघातात जखमी होऊन मृत्यू असे म्हटले आहे. वरील सर्व रिपोर्ट व पी.एम.रिपोर्ट यामध्ये नांव सूर्यकांत व्ही.एल. असे म्हटले आहे. मरणोत्तर पंचनाम्यामध्ये श्रीराम वामनराव लोंढे अशा नांवाचा उल्लेख आहे. म्हणजे अर्जदार हा क्लेम हा पदमाकरचा मागतात , अपघातासंबंधी दाखल केलेले पूरावे हे दूस-या व तिस-या व्यक्तीचेच आहेत. एकंदर अर्जदार व त्यांचे वकिलांने प्रचंड गोंधळ घातलेला आहे. गैरअर्जदार कंपनीने दि.1.10.2008 रोजीला जे पञ लिहीले आहे ते पञ विश्वाभंर लोंढे सुर्यकांत लोंढे जखमी दाव्याबददल असे म्हणून फाईल बंद करण्यात आलेली आहे असे म्हटले आहे. त्यात त्यांनी अपघातासंबंधीचे कागदपञ, मेडीकल बिलस दाखल केले नाही असे म्हटले आहे. अजूनही या प्रकरणात अशी कागदपञ दाखल केलेले नाहीत. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या परिच्छेद क्र.3 मध्हये तक्रादाराचा अर्ज हा अपरिपक्व आहे व अजूनही गैरअर्जदार कंपनीने क्लेम नाकारलेला नाही किंवा मान्यही केलेला नाही. त्यामूळे अर्जदारास निर्देश दयावेत की त्यांनी गैरअर्जदारास आवश्यक कागदपञ दयावेत यावर कंपनी आधी नीर्णय घेईल व त्यावर अर्जदार नाराज असेल तर ते मंचात जाऊ शकतात. पूढे गैरअर्जदार यांनी अपघातामध्ये झालेला मूत्यू असा शब्द वापरलेला आहे परंतु वस्तूतः पदमाकर यांचा मृत्यू झालेला नाही व पदमाकर हा जखमी झालेला आहे म्हणून या अनुषंगाने आधी काही आदेश न करता विद्यार्थ्याचे नूकसान होऊ नये ही बाब लक्षात घेऊन व त्यांला देखील योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून झालेल्या सर्व चूका दूर्लक्षित करुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांनी परत एकदा नवीन क्लेम प्रपोजल व्यवस्थीतपणे व योग्य त्या आवश्यक त्या कागदपञासह भरुन गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दयावा, व यावर या निकालापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी काय तो आपला निर्णय घ्यावा, या निर्णयानंतर तक्रारदारास विमा कंपनीचा निर्णय मान्य नसेल तर ते परत नवीन तक्रार या न्यायमंचात दाखल करण्याचा त्यांचा हक्क सूरक्षीत ठेवण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. 3. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |