जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/113 प्रकरण दाखल तारीख - 08/04/2010 प्रकरण निकाल तारीख – 12/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. 1. श्रीमती द्वारकाबाई भ्र. सुनित निवळे वय 30 वर्षे, धंदा घरकाम 2. कु.आरती पि. सुनिल निवळे वय 05 वर्ष, व्यवसाय निरंक 3. कु.शांभवी पि. सुनिल निवळे अर्जदार वय 01 वर्षे, व्यवसाय निरंक,अर्जदार क्र.2 व 3 अज्ञान अज्ञानपालकर्ती आई अर्जदा क्र.1 4. सौ. प्रयागबाई भ्र. श्रीपतराव निवळे वय 55 वर्षे, व्यवसाय घरकाम सर्व रा.घर क्र.849,सुंदर नगर, हनुमान गड, नांदेड विरुध्द. दि ओरीएंटल इंश्योरंन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार संतकृपा मार्केट, जी.जी.रोड. वजिराबाद, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एन.कूलकर्णी, गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.व्ही. राहेरकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार क्र.1 ही सुनिल श्रीपतराव निवळे यांची पत्नी आहे, अर्जदार क्र.2 व 3 हे तिचे मूले आहेत, अर्जदार क्र.4 ही सुनिल निवळे यांची आई आहे. सर्व अर्जदार हे मयत सुनिल श्रीपतराव निवळे यांचे कायदेशीर वारस आहेत. दि.14.1.2008 रोजी टाटा कंपनीची इंडीगो एल एक्स मॉडेलची कार खरेदी केली. सदर वाहनाचा नोंदणी क्र.एम.एच.-12/सीके-4535 असा आहे. दि.14.11.2008 रोजी विम्याचा करार झाला. करार करतेवेळी गैरअर्जदार कंपनीने वाहनाची किंमत रु.2,25,000/- ठरवली होती. सदर विम्याची मूदत दि.14.11.2008 ते 13.11.2009 अशी होती. पॉलिसी क्र.182001/31/2008/4084 असा आहे. गैरअर्जदार कंपनीने वाहनाच्या विम्यासोबतच वाहन मालकाच्या वैयक्तीक विम्याची रु.200/- घेऊन वाहन मालकास होणा-या भविष्यात अंदेशित नुकसानीची भरपाई देण्याची हमी घेतली होती. मयत सुनिल निवळे हे दि.2.7.2009 रोजी त्यांचे मिञ प्रवीण चव्हाण, अमोल चव्हाण, संतोष कदम व ज्ञानेश्वर निवळे यांच्या सोबत श्रीक्षेञ बासार येथे दर्शन घेण्यासाठी त्यांचे वाहन क्र. एम.एच.-12/सीके-4535 जात असताना दूपारी 11.30 वाजता भोकर म्हैसा रोडवर राहटी गावचे शिवारात पोहचले असता, समोरुन वेगात असलेल्या वाहनाचे समोर अचानक रोही नांवाचा जंगली प्राणी जंगलातून रोडवर आला. अचानक आलेल्या सदर प्राण्यामूळे वाहन चालक वाहन थांबवू शकला नाही. वाहनाचा जबरदस्त धक्का सदर प्राण्यास बसल्यामूळे वाहन चालकाचे वाहनावरील ताबा सुटला, त्यामूळे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर तिव्र वेगात आदळले. त्यामूळे वाहनाचा समोरील भाग क्षतिग्रस्त होऊन पाठीमागील बाजूस पूर्णपणे दाबला गेला. त्यामूळे वाहनाच्या काचा सुनिल यांचे डोके जोरात आदळल्याने त्यांचे डोक्यास गंभीर जखम होऊन समोरचा भाग फाटला गेला व मेदूंचा अर्धा भाग नीघून बाहेर पडला. त्यामूळे सूनिल जागेवरच मरण पावला. वाहनातील इसमांनी बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र भोकर येथे घेऊन आले तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी सूनिल यांस मृत घोषीत केले. घटनेची माहीती पोलिस स्टेशन भोकर यांना दिली त्यांनी गून्हा क्र.99/2009 नोंदवून अपघातचा घटनास्थळ पंचनामा केला तसेच सूनिल यांचा इन्क्वेस्ट पंचनामा करुन मृतदेह शव विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भोकर येथे पाठविला. डॉक्टरांनी शव विच्छेदन करुन अपघातामूळे झालेल्या डोक्याच्या जखमेमूळे मृत्यू झाला असल्याचे प्रमाणीत करुन शव विच्छेदन अहवाल दि.2.7.2009 रोजी निर्गमित केला. अर्जदार क्र.1 ही त्यांची पत्नी व वारस या नात्याने गैरअर्जदार कंपनीकडे सूनिल मृत्यू पोटी विमा रक्कम व मोबदला मिळण्यासाठी दि.19.1.2010 रोजी अर्ज सादर केला व अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपञे जोडली. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे दि.15.2.2010 रोजी क्लेमची मागणी करुनही त्यांनी क्लेम दिला नाही. गैरअर्जदार यांनी दि.15.2.2010 रोजी क्लेम मंजूर करण्यास इन्कार केला. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की,अर्जदारास गैरअर्जदाराकडून रु.4,00,000/- वैयक्तीक विमा व त्यांस आलेला अपघाती मृत्यू पोटी मिळावेत, तसेच दि.2.7.2009 पासून रक्कमवर 18 टक्के व्याज मिळावे. मानसिक शारीरिक ञासापोटी रु.50,000/-व दावा खर्च म्हणून रु,10,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. अर्जदाराचा अर्ज हा अपरिपक्व आहे, कारण अर्जदाराचा दावा गैरअर्जदार यांनी आजपर्यत फेटाळलेला नाही. वाहनास दिलेली पॉलिसी ही नियम अटी व अपवाद यांना बांधील होती. गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्यांच्या वाहन एम.एच.-12/सीके-4535 ला दिलेल्या पॉलिसीमध्ये owner cum Driver चा Premium घेतलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस गाडी मालक स्वतः व्हीलवर बसलेला असेल आणि त्यावेळेस अपघात झाला तर कंपनी रु.2,00,000/- देण्यास जबाबदार राहते. परंतु त्यांच वेळेस Owner cum Driver कडे वाहन वाहन चालविण्याचा योग्य परवाना असणे आवश्यक आहे. घटनेच्या वेळेस मयत मालक हे गाडीमध्ये बसलेले होते आणि विमाकृत वाहन हे अमोल उत्तमराव चव्हाण नांवाचा व्यक्ती चालवित होता. त्यामूळे मयत सुनिल हा Owner cum Driver या व्याख्येत बसत नाही. त्यामूळे गैरअर्जदार हे कोणतीही रक्कम देणे लागत नाहीत. As per GR 36 of the Motor Tariff, the provision is as under Risk Caused - PA to owner PA to owner Driver C.S.I. - Rs.2,00,000/- Prev. - Rs.100/- त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासहीत खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. अर्जदार किती रक्कम मिळण्यास पाञ आहे ? आदेशाप्रमाणे. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार क्र.1 हया मयत सूनिल यांची पत्नी असून अर्जदार क्र.2 व 3 हे त्यांच मूले आहेत व अर्जदार क्र.4 ही मयत सूनिल यांची आई आहे. म्हणजे सर्व अर्जदार सह कायदेशीर वारस आहेत. दि.2.7.2009 रोजी अर्जदार यांची टाटा इंडीगो एम.एच.-12/सीके-4535 आंध्र प्रदेशातील बासर येथे दर्शनासाठी जात असताना सकाळी 11.30 वाजण्याच्या समोर भोकर म्हैसा रोडवर राहटी गावचे शिवारात पोहचले असता त्यांचे वेगात असलेल्या वाहनाचे समोर अचानक रोही नांवाचा जंगली प्राणी जंगलातून रोडवर आला त्यांस बसलेल्या धडकेमूळे वाहन बाजूला असलेल्या झाडावर आदळले व मोठा अपघात झाला. या वेळेस वाहनात चालकाच्या शेजारी डाव्या बाजूस समोर मयत सूनिल हा बसलेला होता व वाहन हा अमोल चव्हाण हा चालवित होता. सोबत संतोष कदम व ज्ञानेश्वर निवळे असे आणखी दोघेजण होते. अपघात मोठा असल्याकारणने सूनिल यांचे डोके जोरात आदळून डोक्यास गंभीर जखम होऊन समोरचा भाग फाटला गेला व मेंदूचा अर्धा भाग नीघून बाहेर पडला व मयत सुनिल हा जागेवरच गतप्राण झाला. घटनास्थळाचा पंचनामा केला पोलिसांनी गून्हा नंबर 99/2009 द्वारे नोंदविण्यात आला. मृतदेहाचे शव विच्छेदन प्राथमिक आरोग्य केद्र भोकर येथे केले आहे. यात अर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार कंपनी कडे विमा घेतला असल्याकारणाने दि.19.1.2010 रोजी क्लेम मागितला. त्यांनी क्लेम दिलाच नाही व दि.15.2.2010 रोजीला क्लेम देण्यास इन्कार केला. अर्जदाराच्या तक्रारनुसार गैरअर्जदाराकडून सूनिलचा वैयक्तीक विमा रु.4,00,000/- चा होता. ही रक्कम त्यांना मिळालीच पाहिजे व गैरअर्जदार यांनी यावर आक्षेप घेतला की वाहन क्र. एम.एच.-12/सीके-4535 यांस दिलेली पॉलिसी ही Owner cum Driver ची होती परंतु त्यावेळेस अपघात झाला त्याचवेळेस मयत सुनिल हा (मालक ) वाहन चालवित नव्हता. वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा योग्य तो परवाना नव्हता. घटनेच्या वेळेस मयत हे फक्त गाडीत बसलले होते व वाहन हे अमोल चव्हाण हे चालवित होते. म्हणून मयत सूनिल Owner cum Driver या व्याख्येत बसत नाही म्हणून क्लेम नामंजूर केला होता. अशा अपघाताचे वेळेस Driver cum Owner ला कंपनी फक्त रु.2,00,000/- देण्यासाठी जबाबदार आहे. या सबबीवर रक्कम देऊ शकत नाही असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी स्वतः GR.36 Personal Accident (PA) cover under Motor policy (not applicable to vehicles covered under secti8oln E,F and G of Tariff for Commercial Vehicles ) A. Compulsory Personal Accident Cover for Owner-Driver Cover is provided to the owner Driver whilst driving the vehicle including mounting into/dismounting from or traveling in the insured vehicle as & co-driver. NB. This provision deals with Personal Accident cover and only the registered owner in person is entitled to the compulsory cover where he/she holds an effective driving license. प्रस्तूत प्रकरण पाहिले असता यात पोलिस पंचनामा, जवाब, यावरुन हे सिध्द झालेले आहे की, मयत सुनित यांचे वाहन क्र. एम.एच.-12/सीके-4535 या वाहनाचे ते मालक आहेत, पोलिसाच्या नियमाप्रमाणे अपघाताच्या वेळेस मयत सुनिल हा वाहन चालवित जरी नसला तरी चालकाच्या बाजूस समोरच्या शिटवर बसलेला होता. पॉलिसीच्या वर नमूद केल्याप्रमाणे अपघात व त्यांचे नियम अटी प्रमाणे ते को ड्रायव्हर होते. त्यामूळे वाहन अमोल हा जरी चालवित असला तरी गैरअर्जदाराने जबाबदारी स्विकारल्याप्रमाणे को ड्रायव्हर असला तर क्लेम देता येतो. मूददा क्र.2 ः- अर्जदाराने रु.4,00,000/- जरी मागितले असले तरी पॉलिसी नियमाप्रमाणे ते फक्त रु.2,00,000/- मिळण्यास पाञ आहेत. म्हणून गैरअर्जदार रु.2,00,000/- देण्यास जबाबदार आहेत. अर्जदाराचा मृत्यू कसा झाला हे जवाबात आले असून जो मरणोत्तर पंचनामा केलेला आहे याप्रमाणे अपघातात डोक्यास मार लागून कवटी फूटून मरण पावला व आरोग्य केंद्राच्या शव विच्छेदन अहवालाप्रमाणे Cause of death is due to “ Cardio-respiratory failure ” which is due to “ shock ” which is due to “Head injury”असे स्पष्ट म्हटले आहे. अर्जदाराने मयत सुनिल याचे मूळ लायसन्स या प्रकरणात दाखल केलेले असून त्यांला एलएमव्ही कार चालविण्याचा परवाना दि.2.11.1995 ते 1.11.2015 पर्यत देण्यात आलेले आहे. वर दि.1.1.1998 अशी खाडाखोड ही करण्यात आलेली आहे, नंतर जेव्हा गैरअर्जदार यांनी आरटीओ कडून एमडीएल घेतलेले असून त्यात दि.9.9.2010 रोजी प्रमाणीत केल्याप्रमणे हे लायसन्स दि.1.11.2015 पर्यत व्हॅलिड होते. हेच एमडीएल ग्राहय धरण्यात येते. अजून एक एमडीएल ज्यात आरटीओ ने दि.16.6.2010 ला प्रमाणपञ दिले त्यात 2.11.1995 ते 1.11.1998 पर्यत कालावधी दाखवलेला आहे. नंतर इंन्ट्री ही वाढविण्यात आली असून ती 2015 करण्यात आलेली आहे. ही चूक दूरुस्त दि.9.8.2010 रोजीच्या प्रमाणपञात आलेली आहे. त्यामूळे दि.16.6.2010 रोजीचे आरटीओ ने दिलेले एमडीएल हे चूकीने दिलेले आहे असे म्हणावे लागेल. अपघाताचे वेळेस वाहन चालवित असलेला अमोल चव्हाण यांचे ड्रायव्हींग लायसन्स बददल गैरअर्जदार यांचा आक्षेप नाही. वरील सर्व बाबीवरुन अर्जदाराचा क्लेम हा पॉलिसी नियमात बसतो म्हणून गैरअर्जदार हे जीआर 36 याप्रमाणे Risk caused - PA to owner PA to owner Driver या प्रमाणे रु.2,00,000/- देण्यास जबाबदार राहतील. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रु.2,00,000/- व त्यावर दि.15.2.2010 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |