जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –17/2011 तक्रार दाखल तारीख –05/04/2011
डॉ.सुधीर पि.रामचंद्र हिरवे
वय 35 वर्षे धंदा वैद्यकीय व्यवसाय .तक्रारदार
रा.बीड,ता.जि.बीड
विरुध्द
ओरिएंन्टल इन्शुरन्स कंपनी
द्वारा शाखा व्यवस्थापक, ..सामनेवाला
मथुरा कॉम्प्लेक्स, हॉटेल शांताई समोर,
जालना रोड,बीड ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.पी.एम.आपेगांवकर
सामनेवाले तर्फे :- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
( श्री.अजय भोसरेकर, सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा बीड येथील रहिवासी असून तक्रारदाराचे दिशा डायग्नोस्टिक या नांवाने वैद्यकीय तपासणी केंद्र आहे. त्यामध्ये सोनोग्राफी,पॅथॉलॉजी, डिजीटल एक्स-रे या व इतर अनुषंगिक सुविधा गेले सहा वर्षापासून तक्रारदार बीड शहरात पुरवित आहे. तक्रारदार यांनी सी-आर सिस्टम-अँग्फा ड्रायस्टार प्रिंटर 5301 हे मशीन सप्टेंबर 2006 मध्ये अँगफा हेल्थ केअर इंडिया प्रा.लि. ठाणे यांचेकडून खरेदी केले. यांस आवश्यक असणारी एसी रुम व ती डस्ट फ्री तयार करुन त्यात सदर मशीन तक्रारदाराने स्थापित केली.
तक्रारदाराने सदर मशीनचा विमा सामनेवाला यांचेकडे उतरविला होता. सदर विम्याचा हप्ता सामनेवाला यांचेकडे तक्रारदार गेले चार वर्ष विना तक्रार भरीत आहेत. दि.09.10.2010 रोजी मशीनचे प्रिंटर मध्ये बिघाड झाला. त्यात कॅमेराने घेतलेले छायाचित्र स्पष्ट येईनात व रेषा येऊ लागल्या त्यामुळे रुग्णाचे व्याधी संबंधी निश्चित निदान करणे तक्रारदारास अशक्य होऊ लागले. त्यामुळे तक्रारदाराने दि..11.10.2010 रोजी सामनेवाला यांनी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व एका लेखी पत्रा द्वारे सदर बिघाड निदर्शनास आणून दिला. तक्रारदाराने अँगफा हेल्थ केअर इंडिया प्रा.लि. ठाणे यांचेकडे सदर मशीनच्या दूरुस्ती संदर्भात चौकशी केली असता तो भाग खराब झाला आहे. त्याऐवजी तुम्हास दूसरे नवीन भाग लावावा लागेल असे सांगितले.
सामनेवाले यांचे सर्व्हेअर दि.15.10.2010 रोजी क्लिनिक मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन मशीनची पाहणी केली व सदर मशीन दूरुस्त होत नाही यासंबंधी अँगफा हेल्थ केअर इंडिया प्रा.लि. ठाणे या कंपनीकडे सर्व्हेअर श्री.शिवकुमार दूधानी यांनी चौकशी केली. त्या वेळेस त्यांना कंपनीकडून सदर पार्ट दूरुस्त होत नाही.त्यामुळे तो बदलावा लागतो असे सांगितले.
तक्रारदाराने सर्व कागदपत्रे भरुन सामनेवाला यांचेकडे क्लेम फॉर्मची मागणी केली व त्यात त्यांनी सदर मशीन नवीन घेतलेली किंमत रु.2,70,000/- यांची मागणी केली आहे.त्यानुसार सामनेवाला यांनी दि.24.12.2010 रोजी तक्रारदाराच्या मशीनचा भाग हा रेग्यूलर वियर अँण्ड टियर झालेला आहे.त्यामुळे पॉलिसीच्या कलम मध्ये उल्लेख केल्यानुसार तक्रारदाराचा क्लेम अमान्य करुन क्लोज करण्यात आल्या बददलचे पत्र तक्रारदारास सामनेवाला यांनी देऊ केले.
तक्रारदाराने सदर तक्रार या जिल्हा मंचात करुन नवीन बसवलेल्या भागाची किंमत रु.2,70,000/-, मानसिक व आर्थिक त्रासाबददल रु.50,000/-, व खर्चापोटी रु.5,000/- असे एकूण रु.3,25,000/- ची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या म्हणण्याचे पूष्टयर्थ एकूण 18 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला यांनी मंचाची नोटीस प्राप्त होऊन त्यांनी दि.11.04.2011 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांनी उतरवलेली पॉलिसी मान्य आहे. सामनेवाला यांनी पॉलिसीच्या अटीनुसार Section and equipment च्या Special Esclusion of section 1 यानुसार BCD चा आधार घेऊन सदर मशीन ही वियर अँण्ड टियर अशी असल्यामुळे सदर तक्रारदाराचा विमा हा नाकारुन आम्ही कोणतीही सेवेत त्रूटी केली नाही असे म्हटले आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे म्हणण्याचे पूष्टयर्थ एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
शिवकुमार दुधानी यांनी अँगफा हेल्थ केअर इंडिया प्रा.लि. ठाणे यांनी दिलेले पत्रानुसार सदर मशीन ही वियर अँण्ड टियर या कंडीशन मध्ये असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात तक्रारदाराने सामनेवाला यांचा हा महत्वाचा मूददा खोडून काढण्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञाचा अहवाल व पुरावा अथवा शपथपत्र या जिल्हा मंचा समोर सादर केले नाही. यावरुन सामनेवाला यांनी दाखल केलेले म्हणणे व तक्रारदाराचा क्लेम नाकारल्याचे कारण आणि पॉलिसीमध्ये क्लेम 1 मध्ये असलेली तरतुद यांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदारास देऊ करावयाचे सेवेत त्रूटी केली आहे हे तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत.
सबब, हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात येत आहे.
1.
2. खर्चाबददल कोणताही आदेश नाही.
2.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड