जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/172 प्रकरण दाखल तारीख - 19/06/2010 प्रकरण निकाल तारीख – 23/12/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. शेख यूसूफ पि. कासीम साब वय 52 वर्षे, धंदा व्यापार व शेती अर्जदार रा. गडगा ता.नायगांव जि. नांदेड विरुध्द. दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी मर्यादित मार्फत शाखाधिकारी गैरअर्जदार शाखा कार्यालय लाहोटी कॉम्प्लेक्स, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.मु.अ.कादरी गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर. निकालपञ
(द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) 1. गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे.
थोडक्यात अर्जदाराची तक्रार अशी की,अर्जदार हा जिप क्र.एम.एच.-26/ई-1972 चा मालक आहे. अर्जदाराची जीप दि.19.10.2009 रोजी जगत्याळ येथे प्रवास करीत असताना अंदाजे 6.15 वाजता ट्रक क्र.एपी-15/डब्ल्यू 1666 ने धडक दिल्यामूळे जीपचे नूकसान झाले. अर्जदाराने त्यांचे वैयक्तीक वापराकरिता जीपचा गैरेअर्जदार यांचेकडे हप्ता प्रिमियम भरुन रु.1,75,000/- चा विमा काढला होता. सदर विम्याचा कालावधी दि.11.08.2009 ते 10.08.2010 असा होता. अपघाता संबंधी पोलिस स्टेशन जगत्याळ येथे गून्हा क्र.293/2009 नोंदविला होता.घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. गैरअर्जदाराकडे नूकसानी बददल पूरावा देऊन विमा रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला. गैरअर्जदाराने सर्व्हेअर मार्फत जिपची पाहणी केली परंतु गैरअर्जदाराने दि.4.5.2010 रोजी अर्जदाराचा अर्ज काही कारण नसताना फेटाळला. अर्जदाराने कधीच जीप किरायाने दिली नाही व जास्त प्रवासी सूध्दा कधी बसविले नाही. अर्जदाराने विमा कराराचा भंग केला नाही. अर्जदार हा शेतकरी असून जीप अपघाताच्या तारखेपासून दूरुस्तीसाठी अनेक दिवसापासून पडून असल्यामूळे आर्थिक नूकसान होत आहे. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, जिपचे नूकसानी बददल रु.4,30,000/- 12 टक्के वयाजासह व खर्चासह मिळावेत.
2. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदारांना तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराच्या ज्या जिपला पॉलिसी दिलेली आहे ती जिप वैयक्तीक वापरासाठी दिलेली आहे. तसेच सदरील वाहनाची आसन क्षमता 9+1 =10 अशी आहे व अपघाताचे वेळी वाहनामध्ये जवळपास 12 प्रवासी प्रवास करीत होते. त्यामूळे अर्जदाराने पॉलिसीच्या अटीचा भंग केलेला आहे. सर्व्हेअरने सर्व्हे केला त्यामध्ये जिपमध्ये प्रवास करणारे प्रवासी शाम प्रल्हादराव ईनामदार यांनी बयान दिले की, सदरील वाहन हे किरायाने घेतले होते ?. म्हणून पॉलिसीचा भंग झालेला आहे त्यामूळे तक्रार खारीज करावी.लॉस असेसर यादवडकर यांनी फायनल लायबलिटी रु.1,34,000/- ची दिलेली आहे. हे त्यांना मान्य नाही की, अर्जदाराचे रु.4,30,000/- चे नूकसान झाले म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे खालील मूददे उपस्थित होतात.
मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? अंशतः 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 - 4. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे आपल्या वाहनाचा विमा पॉलिसी दि.11/08/2009 ते दि.10/08/2010 या कालावधीसाठी रितसर प्रिमीअम भरुन रु.1,75,000/- एवढया नुकसानी करीता काढलेली होती. पॉलिसीचा क्र.160900/31/09/01/9010027 असा आहे. सदरची पॉलिसी अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेली आहे व ती पॉलिसी गैरअर्जदारांना मान्य आहे, पॉलिसीबद्यल उभय पक्षामध्ये कुठेही वाद नसल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे मान्य करण्यात येत आहे. मूददा क्र.2 – 5. अर्जदाराने ही जीप वैयक्तिक वापरासाठी घेतलेली होती व ते त्याचे कायदेशिर मालक होते दि.19/10/2009 रोजी जगत्याल येथे प्रवास करीत असतांना अंदाजे 6.15 च्या सुमारास सदरचे वाहन निजामाबाद ते जगत्याल रोडवर एक ट्रक ज्याचा क्र.एपी 15/डब्ल्यु/ 1666 असा होता त्या ट्रकने अर्जदाराच्या जीपला टक्कर दिल्यामुळे अर्जदाराचे जीपचे नुकसान झाले व याबद्यल अर्जदाराने पोलिस स्टेशनला कळवले होते व ट्रक ड्रायव्हर विरुध्द गुन्हा दाखल केलेला होता ज्याचा क्र. 293/2009 असा होता त्याबद्यल कागदोपत्री पुरावा अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले आहे. अर्जदाराने सदरील घटनेची माहीती गैरअर्जदारांना दिली व गैरअर्जदारांनी दि.04/05/2010 रोजी अर्जदारास त्यांचा नुकसान भरपाईचा अर्ज फेटाळल्यासंबंधी पत्र पाठविले ज्यामध्ये असे कारण दाखविले की, जीपमधील लोक हे अर्जदाराच्या मित्राचे कुटूंबातील व्यक्ति होते व ते देव दर्शनासाठी म्हणुन जात होते. अर्जदाराने ठरलेल्या अटींच्या आधीन न राहून कराराचा भंग केलेला आहे. त्यामुळे अर्जदाराच्या विमा दाव्याचा अर्ज फेटाळुन लावला. गैरअर्जदार यांनी जेंव्हा अर्जदाराच्या तक्रारीनुसार सर्व्हेअर नियुक्त केला तेंव्हा सर्व्हेअर यांनी असा रिपोर्ट दिलेला आहे की, वाहनाची क्षमता 10 लोकांची असतांना त्यामध्ये 12 लोक प्रवास करीत होते व हा मुलभूत अटीचा भंग अर्जदाराने केलेला आहे. गाडीला नुकसानीचा अहवाल तयार करतांना लॉस असेसर श्री यादवाडकर यांनी रु.1,34,000/- गाडीचे नुकसान झाले अशा प्रकारचा रिपोर्ट दिलेला आहे. गैरअर्जदार यांनी विविध लोकांचे शपथपत्र, जबाब हे दाखल केलेले आहे व त्यांनी एका गोष्टीबद्यल कुठेही विचार केलेला दिसत नाही तो म्हणजे अर्जदाराच्या गाडीला अपघात हा ट्रकने दिलेल्या धडकेमुळे झालेला आहे. अर्जदाराच्या गाडीचा ड्रायव्हर स्वतःहून अर्जदाराच्या गाडीच्या ड्रायव्हरकडुन कोणतीही चुक झालेली नाही किंवा त्यामुळे अपघात झालेला नाही, आसन क्षमता 10 असतांना 12 लोक प्रवास करीत होते हे म्हणणे या ठिकाणी योग्य होत नाही. ट्रक ड्रायव्हरने दिलेली धडक त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेले कागदपत्र अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले आहे. विमा उतरविण्या मागचा ग्राहकाचा हेतू हा गैरअर्जदार यांनी ओळखणे आवश्यक होते त्या ठिकाणी तांत्रीक मुद्यावर ग्राहकाचा नुकसान भरपाईचा दावा फेटाळणे म्हणजे फक्त जबाबदारीतुन पळ काढणे एवढाच त्याचा अर्थ होतो. झालेला अपघातामध्ये ग्राहकाच्या गाडीचा ड्रायव्हरची कुठलीही चुक नव्हती. अचानक ट्रक गाडीवर येऊन आदळली व अर्जदाराच्या गाडीचे नुकसान झालेले आहे व कुठलीही पॉलिसी काढतांना त्या मागचा हाच हेतू असतो की, जर यदाकदाचीत गाडीस नुकसान झाले किंवा अपघात झाला तर त्याची भरपाई मिळावी या ठिकाणी अपघात घटनेमध्ये अर्जदाराची कुठलीही चुक नसल्यामुळे गैरअर्जदार यांनी लॉस असेसरने काढलेली रक्कमनुसार अर्जदारास रु.1,34,000/- एक महिन्याच्या आंत द्यावी तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रु.10,000/- द्यावेत व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- द्यावेत. वर दर्शविलेली एकुण रक्कम रु.1,46,000/- एक महिन्याच्या आंत द्यावी असे न केल्यास पुर्ण रक्कम फिटेपर्यंत 9 टक्के व्याज द्यावे लागेल, या निर्णयापर्यंत हे मंच आलेले आहे. 6. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश. 1. अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येत आहे. 2. अर्जदारास गैरअर्जदार यांनी रु.1,34,000/- एक महिन्याच्या आंत द्यावी तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रु.10,000/- द्यावेत व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- द्यावेत. वर दर्शविलेली एकुण रक्कम रु.1,46,000/- एक महिन्याच्या आंत द्यावी असे न केल्यास पुर्ण रक्कम फिटेपर्यंत त्यावर 9 टक्के व्याज द्यावे लागेल. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |