जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/163 प्रकरण दाखल तारीख - 10/06/2010 प्रकरण निकाल तारीख – 12/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. मुरलीधर नागोराव कदम वय 33 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार रा.तुप्पा ता.जि. नांदेड विरुध्द. दि न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी लि. मार्फत शाखाधिकारी, गैरअर्जदार लाहोटी कॉम्पलेक्स, वजिराबाद, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड गैरअर्जदार तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार शेतकरी असून त्यांचा गाडी भाडयाने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे इंडिका एम.एच-26-एन-636 विकत घेतली आहे. गैरअर्जदार विमा कंपनीकडून सदर गाडीचा विमा उतरविलेला आहे. विमा कालावधी दि.28.7.2009 ते 27.7.2010 असा आहे.अर्जदाराने गाडी महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळाच्या भोकर कार्यालयाला माहेवारी भाडयाने दिली होती. दि.29.7.2009 रोजी अधिका-यांच्या सांगण्यावरुन नांदेड बायपास वरुन कामठा खु. कडे जात असताना गाडीवरील ड्रायव्हर नामे रमेश बळीराम शेळके हा गाडी घेऊन भोकरकडे जात असताना मौ.कामठा खु. शिवाराजवळ माल वाहतुक ट्रक क्र.एम.एच.-26-एच-7751 या ट्रक सोबत अपघात झाला व अपघातामध्ये अर्जदाराच्या गाडीचे नूकसान झाले. अर्जदाराने गैरअर्जदार यांना घटनेबाबत सूचना दिली.दि.31.7.2009 रोजी गाडी दूरुस्तीसाठी टोचन करुन बाफना मोटार्स यांचेकडे नेण्यात आली. टोचनसाठी रु.1500/- खर्च आला.गैरअर्जदार कंपनीच्या सर्व्हेअर व लॉस असेसर यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही गैरअर्जदार यांनी नूकसान भरपाई दिली नाही. गैरअर्जदाराचे दि.26.2.2010 रोजीची पञ अर्जदाराला दि.9.3.2010 रोजी प्राप्त झाले त्यांचे उत्तर अर्जदाराने दिले आहे. आपण शंकर शशीकांतश्रीकांत वाघमारे यांचे मूळ किंवा झेरॉक्स लायसन्सची प्रत देण्याची विनंती केली मी आपल्याकडे दि.10.08.2009 रोजी क्लेम फॉर्म दाखल केला आहे, त्यातील परिच्छेद क्र.3 मध्हये दुर्घटना के समय ड्रायव्हर या परिशिष्ट मध्ये अपघाताच्या दिवशी ड्रायव्हर हे शेळके रमेश बळीराम हे होते व ते मागील दोन वर्षापासून आमच्याकडे काम करीत आहेत असे स्पष्ट नमूद केलेले आहे. ड्रायव्हर रमेश शेळके यांच्या लायसन्सची प्रत आपल्या कार्यालयात क्लेम सोबत दिलेली आहे. मी पोलिस स्टेशन अर्धापूर यांना चार्जशिटीची प्रत देण्याबाबत विनंती केली असता त्यांनी सदर अपघात हा ए.डी म्हणून नोंद करण्यात आल्याने चार्जशिट पाठविण्याची आमच्याकडे तरतूद नाही असे पोलिसांनी कळविले आहे. अर्जदाराने सदर गाडीची बाफना मोंटार्स कडून दूरुस्ती करुन घेतली आहे. दि.25.8.2009 रोजी रु.25,000/-, दि.11.9.2009 रोजी रु.25,000/- दि.14.10.2009 रोजी रु.1,18,309/- जमा केले आहेत व गाडीची डिलेव्हरी घेतली आहे. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराची तक्रार मंजूर करुन रु.1,68,309/- दि.28.7.2009 रोजी पासून 12 टक्के व्याजासह मिळावेत, मानसिक ञासापोटी रु.25000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांना जी पॉलिसी दिलेली आहे ती नियम व अटी यांना बांधलेली आहे. ड्रायव्हर यांचेकडे वाहन चालविताना वाहन चालविण्याचा परवाना असला पाहिजे. अर्जदाराने कंपनीला दि.9.7.2009 रोजी कळविले ( Intimation ) आणि त्या इन्टीमेंशन मध्ये ड्रायव्हरचे नांव शंकर शशीकांत वाघमारे असे दाखविले आहे. त्यानंतर कंपनीने वाहनांचा सर्व्हे करण्यासाठी श्री.मोहीयोद्यीन यांची नियूक्ती केली, त्यांना सूध्दा अपघाताचे वेळी ड्रायव्हर म्हणून शंकर वाघमारे असे सांगितले गेले. गैरअर्जदाराने सदरील व्यक्तीचे ड्रायव्हींग लायसन्स O.D.Claim Process करणे कामी मागितले असता अर्जदाराने लायसन्स दिले नाही. अर्जदाराने कंपनीकडे जो क्लेम फॉर्म भरुन दिला त्यामध्ये सूध्दा अपघाताचे वेळी वाहन हे रमेश बळीराम शेळके हे चालवित होते असे दिलेले आहे, यावरुन प्रथमतः कंपनीकडे दिलेल्या माहीती प्रमाणे अपघातग्रस्त वाहन हे शंकर शशीकांत वाघमारे हा ड्रायव्हर म्हणून चालवित होता परंतु त्यांचेकडे लायसन्स नसल्यामूळे अर्जदाराने लायसन्स असलेल्या व्यक्तीचे नांव म्हणजे रमेश शेळके यांचे नांवे टाकले, जे अयोग्य आहे व ते एक प्रकारची फसवणूक आहे. अर्जदार हा स्वच्छ हाताने समोर आलेला नाही. कंपनीने गोविंद उत्तरवार यांची सर्व्हेअर म्हणून नियूक्ती केली त्यांनी पाहणीचा अहवाल दि.20.09.2009 रोजी दिला त्याुनसार अर्जदाराच्या वाहनाच्या नूकसानीपोटी गैरअर्जदार यांचेवर नेट लायबिलीटी ही रु.91,238/- एवढी ठेवली आहे. अर्जदारास टोचन करण्यासाठी रु.1500/- खर्च आलेला नाही.वरील सर्व बाबीचा विचार करुन अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांची इंडिका कार एम.एच-26-एन-636 हे वाहन टक्सी परमिटरवर असल्यामूळे त्यांने ते महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळ भोकर यांना भाडयाने दिले होते. दि.29.7.2009 रोजी वाहनाचा समोरुन येणा-या ट्रकने धडक मारल्यामूळे कामठा येथे अपघात झाला. वाहनाचे आर सी बूक पॉलिसी नंबर 160900/31/09/01/00004978 दाखल आहे. अपघात झाल्याबददल एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा दाखल आहे. वरील कोणत्याही बाबी बददल वाद नाही. परंतु अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे दूर्घटना झाली तेव्हा रमेश बळीराम शेळके हे वाहन चालवित होते. या बददल एफ.आय.आर., व घटनास्थळ पंचनामा यांत उल्लेख आलेला आहे. दूर्घटना ही दि.29.7.2009 रोजीची आहे. अपघाताची वेळ सांगितलेली नाही. पोलिसांची पूर्ण कारवाई ही त्यांच तारखेस झालेली आहे. अर्जदार यांनी त्यांच दिवशी म्हणजे 9 तारखेला गैरअर्जदार यांना त्यांचे वाहनाचा अपघात झाल्याबददलची सूचना दिली आहे. त्या लेखी सूचनेवर अर्जदार यांनी स्वःताह सही केलेली असून यात अपघातग्रस्त वाहन हे शंकर शशीकांत वाघमारे हे चालवित होते असे लिहण्यात आलेले आहे.तसेच अपघाताची वेळ 11.00 वाजता राञी अशी लिहली आहे. हा सूचना फॉर्म अर्जदाराचा क्लेम नाकारण्यास कारणीभूत झालेला आहे. नंतर जे क्लेम फॉर्म दाखल करुन देण्यात आले या क्लेम फॉर्म वर वाहन हे रमेश बळीराम शेळके हे चालवित होते अस उल्लेख आलेला आहे.हा क्लेम फॉर्म वर्ष 2008/09 ला म्हणजे फार नंतर देण्यात आला. अर्जदार यांचेकडे अनेक वाहाने असेल व त्यावर अनेक ड्रायव्हर असतील तर अशा वेळेस कोणत्या गाडीवर कूठला ड्रायव्हर आहे हे त्यांचे कदाचित लक्षात राहीले नसेल व त्यांनी सूचना देताना जर चूकीचे नांव दिले असेल तर ज्या आधारे गैरअर्जदार यांनी क्लेम नाकारला आहे ते कारण तक्रार करीत असताना लपवून ठेवावयास नको होते. तक्रार करताना अर्जदार यांनी इन्टीमेंशन नोट लपवून ठेवली व नेमके कशामूळे क्लेम नाकारला हे न सांगता गैरअर्जदारावर आरोप ठेऊन तक्रार केली. यांचा अर्थ अर्जदार हे स्वच्छ हाताने मंचासमोर आलेले नाहीत. त्यांनी खरे कारण काय ते लपवून ठेवले.अर्जदार स्वतःच्या सहीने गैरअर्जदार यांचे कार्यालयास त्यांच दिवशी इन्टीमेंशन देत असतील व त्यात शंकर वाघमारे यांचे नांव लिहीले असेल व जे लिहीले ते खरे लिहून टाकले म्हणून ही सत्यता त्यांना लपवावी लागेल व जेव्हा अर्जदार यांचे लक्षात आले की,आपण शंकर वाघमारे नांवाच्या ड्रायव्हरचा उल्लेख केलेला आहे.त्यांचेकडे ड्रायव्हींग लायसन्स नाही, म्हणून त्यांने ताबडतोब चूकीची दूरुस्ती करुन पोलिसात जी वर्दी दिली (एफ.आय.आर., व घटनास्थळ पंचनामा) यात ड्रायव्हरचे नांव बदलून त्यात रमेश बळीराम शेळके हे वाहन चालवित होते असे एकंदर मॅनेज केल्याचे दिसते. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.26.2.2010 रोजी दोन पञ लिहीले अर्जदार यांना इन्टीमेंशन मध्ये उल्लेख केलेल्या ड्रायव्हरचे म्हणजे शंकर वाघमारे यांचे ड्रायव्हींग लायसन्स मागितले आहेत व अर्जदार ते देऊ शकले नाहीत, वाद एवढाच आहे. अर्जदार आजही शंकर वाघमारे यांचे लायसन्स देऊ शकत असतील तर ते वाहनाच्या नूकसानीचा क्लेम मिळण्यास हक्कदार राहतील. प्रकरण चालू असताना देखील त्यांनी सत्यता लपवून ठेवली, जेथे वाघमारे यांचे नांव आले ते काल्पनिक तर मूळीच नसले पाहिजे म्हणजे या नांवाचा इसम आहे व त्यांचेकडे ड्रायव्हींग लायसन्स नाही. म्हणून ही सर्व लपवालपवी चालू आहे. पोलिसांत जी सूचना केली त्यानंतर बराच वेळाने पोलिस आले हे नंतर सर्व मॅनेज केल्याचे यावरुन स्पष्ट होते. गैरअर्जदाराने क्लेम नाकारल्यावर अर्जदाराने दि.10.03.2010 रोजी विमा कंपनीस एक पञ लिहीले त्यात रमेश बळीराम शेळके ड्रायव्हर होते असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एंकदर या प्रकरणात इन्टीमेंशन लेटर हे सर्वात महत्वाचा पूरावा आहे व हा पूरावा लपवून अर्जदाराने तक्रार दाखल केली. यात हे नांव चूकीने कसे आले यांचे स्पष्टीकरण ते देऊ शकलेले नाहीत. उलट त्यांनी लपवालपवी चा प्रयत्न केला. इन्टीमेंशन लेटर वर अर्जदार यांची स्वतःची सही असल्यामूळे हाच महत्वाचा पूरावा मानून आम्ही असे ठरवित आहोत की, गैरअर्जदाराने जो क्लेम नामंजूर केला, केलेली ती कारवाई ही योग्य आहे. आता गैरअर्जदार यांनी त्यांची नैतिक जबाबदारी स्विकारुन सर्व्हेअरला पाठविले, त्यांनी वाहनाची पाहणी करुन रु.91,238/- वाहनाचे नूकसाने झाल्याचा अहवाल दिला. परंतु त्यांनी यांचा शोध घेतल्यानंतर नियमाप्रमाणे वाहन चालकाकडे व्हॅलिंड लायसन्स आवश्यक आहे व ते शंकर वाघमारे यांचेकडे नाही. म्हणून आता बाकीच्या या सर्व गोष्टी बददल जास्त ऊहापोह करण्याची गरज नाही.यात गैरअर्जदार यांनी पॉलिसी नियम दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांनी दिलेली सूचना त्यावर असणारी सही ही अर्जदाराचीच आहे परंतु दि.29.7.2009 रोजीला दूर्घटना झाली त्याच दिवशी गैरअर्जदार यांना सूचना देण्यात आली हे गैरअर्जदार जरी म्हणत असले तरी हे इन्टीमेंशन लेटर पाहिल्यानंतर यामध्ये दूर्घटना दि.29.7.2009 रोजी व समय 11,00 वाजता राञी असे लिहीण्यात आल्यामूळे त्यांच तारखेला राञी 11 वाजता लेखी इन्टीमेंशन देण्यासाठी गैरअर्जदार यांचे कार्यालय उघडे होते काय ? हा प्रश्न निर्माण होतो किंवा गैरअर्जदार यांनी त्यावर सर्व्हेअर म्हणून मोहीयोद्यीन यांचे नांव लिहीलेले ओ. त्यांना सर्व्हे करायला दिला, असे असेल तरी चूकीचे इन्टीमेंशन लिहून तारीख चूक लिहून अर्जदाराने सही केली असे दिसते. कारण ज्या दिवशीचे त्या दिवशी सूचना देणे शक्य नसते कारण सर्व प्रथम पोलिस कारवाई अभीप्रेत असते. इन्टीमेंशन हे 2-3 दिवसानंतर दिल्या जाऊ शकते व घटनास्थळ पंचनामा पाहिला असता 10 वाजता सूरु करुन 10.30वाजता संपविला असे म्हटले आहे. दूर्घटना ही 11 वाजता घडली तर पंचनामा 10 वाजता कसा काय झाला ? असे अनेक प्रश्न निर्माण होतो हे सर्वच संशयास्पद आहेत. एकंदर सर्व पूरावे हे अर्जदार यांचे विरोधात जातात व अर्जदाराने बराच गोष्टी लपवून ब-याच गोष्टी मॅनेज केल्या हे दिसून येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 1. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 2. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |