जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/189 प्रकरण दाखल तारीख - 08/09/2009 प्रकरण निकाल तारीख – 30/12/2009 समक्ष – मा.श्री. सतीश सामते, - अध्यक्ष (प्र) मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या विनोद पि.दत्ता राठोड, वय 30 वर्षे धंदा व्यवसाय, अर्जदार. रा.पापलवाडी ता.माहुर जि.नांदेड. विरुध्द. शाखा अधिकारी, नॅशनल इन्शयोरेन्स क.लि. गैरअर्जदार. विभागीय कार्यालय, नगिना घाट रोड,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.चौधरी अ.व्ही.. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एम.बी.टेळकीकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदार यांची तक्रारी थोडक्यात अशी की, अर्जदार यांचे मालकी व ताब्यातील एक वाहन टाटा टर्बो 1109 ट्रक होते ज्याचा रजि क्र.एमएच – 26/एच- 5210 असुन त्याच्या आकस्मात अपघात संरक्षणसाठी अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे रितसर सदरच्या ट्रकचा विमा उतरवला होता. ज्या पॉलिसी क्र.272000/31/07/630000/2482 असा असुन अर्जदाराने रितसर विमा पॉलिसी रक्कम भरुन पॉलिसी धारण केली व या पॉलिसीच्या अटी व नियमाप्रमाणे अर्जदारास त्याच्या वाहनास काही अपघाती नुकसान झाल्यास त्या नुकसानीचा मोबदला या पॉलिसीमधुन अर्जदारास गैरअर्जदार यांचेकडुन मिळेल असे विमा कंपनीकडुन हमी देण्यात आली. अचानकपणे दि.29/05/2008 रोजी महामार्ग क्र. 3 वरील केळझार शिवारातील सामाजिक वनिकरणातील शेताजवळ वर्धा ते नागपुर रोडवर ट्रक क्र. एमएच-बी- 4400 या वाहनाचे व ट्रक क्र. एमएच-26/एच-5210 या वाहनाची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला व अपघातामध्ये ट्रकचे रु.50,000/- चे नुकसान झाले. त्याबद्यल पोलिस स्टेशन सेलू जि.वर्धा येथे गुन्हा क्र.89/2008 यामधुन तक्रार नोंदविण्यात आली. सदरील घटनेबाबत गैरअर्जदार यांच्या विमा संरक्षणाचा विचार करुन गैरअर्जदार यांचेकडे झालेल्या अपघाताची व नुकसानीच दखल घेवुन गैरअर्जदार यांचेकडे झालेले नुकसान मिळावे या करीता रितसर अर्ज केला व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडुन क्लेम नं.27/2008 फाईल व क्र.36/2008 दाखल केला व नुकसानीची रक्कम मागणी केली परंतु गैरअर्जदार यांनी प्रतिसाद दिला नाही व गैरअर्जदार यांचेकडुन अर्जदारास एक पत्र मिळाले ज्यामध्ये अर्जदार यांच्या वाहनाचा झालेल्या अपघाती नुकसानीबद्यल गैरअर्जदार क्लेम रक्कम देवुन शकत नाही कारण अर्जदार यांच्या वाहन चालकाकडे अधिकृत वाहन परवाना नसल्या बाबतचा उल्लेख सदरील पत्रात त्यांनी केला त्याप्रमाणे अर्जदार यांच्या वाहन चालकाकडे एमएमवही-नॉन ट्रान्सपोर्ट अशा प्रकारचा वाहन परवाना असुन हेव्ही ट्रान्सपोर्ट वेईकल बाबत परवना नसल्यामुळे आपला क्लेम विचारात घेतल्या जाणार. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे प्रत्यक्ष जावुन सर्व कागदपत्रानीशी त्यांचे पत्राचा खुलासा दिला. पंरतु गैरअर्जदार यांनी कुठलेच म्हणणे ऐकुन घेतले नाही व त्यानंतर 2009 साली गैरअर्जदाराकडुन आपला क्लेम नामंजुर करण्यात येत आहे अशा आशयाचे एक पत्र मिळाले ज्यामुळे अर्जदाराच्या झालेल्या नुकसानीची दखल गैरअर्जदाने न घेतल्यामुळे व अशा प्रकारची चुकीची सेवा व निष्काळजीपणाची वागणुक दिल्यामुळे अर्जदारास प्रचंड मानसिक त्रास व शारीरिक त्रास झाला व अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली की, वाहन क्र. एमएच-26/एच- 5210 या वाहनावरील पॉलिसीप्रमाणे असलेली विमा संरक्षण रक्कम रु.64,155/- 18 टक्के व्याजासहीत अर्जदारास देण्याचे आदेश व्हावे व मानसिक त्रासापोटी रु.40,000/- व दावा खर्चाबद्यल रु.5,000/- देण्याचे आदेश व्हावेत. गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली, त्यांनी आपले म्हणणे खालीलप्रमाणे दाखल केले. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराचा दावा खोटा निराधार असुन तो फेटाळण्यात यावा. अर्जदाराची तक्रार विमा पॉलिसीच्या करारातील तरतुदी,शर्ती तथा अटींच्या विरुध्द आणि विसंगत आहे व नैसर्गिक न्यायाला धरुन नाही. वाहन एमएच-26/एच-5210 च्या मालकी व विमा पॉलिसी क्र.272000/31/07/6300002482 व अर्जदाराच्या व्यवसायासंबंधी काहीही आक्षेप नाही. अर्जदाराचे हे म्हणणे खरे नाही की, अर्जदाराचा ड्रायव्हर शेख हबीब पि.शेख मैनाद्यीन यांच्याकडे रितसर वाहन चालवण्याचा परवाना उपलब्ध होता तो अपघाताच्या वेळी अर्जदाराच्या मालकीचे ट्रक क्र.एमएच- 26/एच-5210 चालवत होता व हे म्हणणे खरे नाही की, कथीत अपघात अर्जदाराच्या ट्रकेचे रु.50,000/- चे नुकसान झालेले आहे. अर्जदाराने नुकसान भरपाई मागणीसाठी अर्ज केला हे म्हणणे खरे आहे. संपुर्ण कागदपत्राची बारकाईने तपासणी केली असता, असे आढळुन आले की, संबधित ट्रक चालकाकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता. सदरील वाहन परवाना LMV (Non Transport) असुन अर्जदाराचा ड्रायव्हर H.G.V. ( Heavy Goods vehicle) चालवत होता. त्यामुळे विमा पॉलिसीच्या शर्ती व तरतुदी तथा अटींचा भंग होत असल्यामुळे अर्जदाराचा क्लेम विचारात घेतला जाणार नाही असे पत्र पाठवले व सात दिवसात खुलासा मागीतला परंतु अर्जदाराचा कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. अर्जदाराचा दावा विमा पॉलिसीच्या तरतुदी, शर्ती व अटीत बसत नसल्यामुळे तो नामंजुर केला. अर्जदाराने दाखल केलेले पोलिस पेपर्स बारकाईने पाहणी केली असता, असे दिसुन येते की, सदरील ट्रकमध्ये तुरीचे पोते भरलेले होते. परंतु अर्जदाराने सदरील बाबा दाव्यात नमुद केलेली नाही. अर्जदाराने क्षमतेपेक्षा जास्त माल सदरील ट्रकमध्ये भरला होता. अशाप्रकारे अर्जदाराने (Goods Carriage Permit) च्या शर्ती व अटींचा भंग केलेला आहे. म्हणुन अर्जदाराचा दावा फेटाळण्यात यावा. अर्जदाराचे वाहन टाटा टर्बो ट्रक एमएच-26/एच-5210 जे जड माल वाहतुक वाहन (Heavy Goods Vehicle) आहे. सदरील वाहन चालवण्यासाठी अर्जदाराच्या ड्रायव्हरकडे H.G.V. (Transport) असा शेरा असलेले आर.टी.ओ.कडुन मिळालेले वैध वाहन परवाना असेण आवश्यक आहे. परंतु अर्जदाराचा ड्रायव्हर शेख हबीब शेख मैनाद्यीन यांचेकडे L.M.V. (Non Transport) परवाना होता. कथीत अपघाताच्या वेळी तो अर्जदाराचा वरील टाटा टर्बो ट्रक चालवत होता जे की, त्याला सदरील ट्रक चालवण्यासाठी वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता. अशा प्रकारे अर्जदाराने मोटार वाहन कायदाच्या तरतुदी व विमा पॉलिसीच्या शर्ती, तरतुदी व अटींचास भंग केलेला आहे. म्हणुन अर्जदाराचा दावा खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचा लेखी जबाब, शपथपत्र दोन्ही पक्षकार यांचा युक्तीवाद याचा विचार होता, खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक होतात काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली काय? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी त्यांचे वाहनाचा विमा गैरअर्जदार यांचेकडे उतरवलेला होता, याबाबतचे विमा पॉलिसी अर्जदार व गैरअर्जदार यांनी या अर्जदाराच्या कामी दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये सदरची बाब नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र,विमा पॉलिसी याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 अर्जदार यांच्या वाहनाचा दि.29/05/2008 रोजी वाहनांचा समोरा समोर धडक होऊन अपघात झालेला आहे. त्यामुळे वाहनाचे झालेले नुकसान विमा पॉलिसी असल्यामुळे गैरअर्जदार यांचेकडुन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम हा अपघाताच्या समयी अर्जदार यांचे वाहन चालविणा-या ड्रायव्हरकडे प्रस्तुतचे वाहन चालविण्यासाठी वैध परवाना नव्हता तर अर्जदार यांच्या ड्रायव्हरकडे LMV (NonTransport) असा परवाना होता. त्यामुळे अर्जदार यांनी विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे अर्जदार यांचा विमा क्लेम नामंजुर केलेला आहे. गैरअर्जदार यांनी लेखी युक्तीवादासोबत (1) 2008 ACJ page No 627, SC, न्यु इंडिया एशुरन्स कंपनी लि विरुध्द प्रभुलाल. (2) 2009 II CPR 16, पंजाब राज्य आयोग,युनायटे इंडिया इंशुरन्स कंपनी लि, विरुध्द दलविंदर सिंघ, (3) 2009 III CPR page no.13, राष्ट्रीय आयोग, ओरएंटल इन्शुरन्स कंपनी लि, विरुध्द अशोक वर्गीस. या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र या अर्जाचे कामी दाखल केलेले आहेत. Consumer Protection Act, 1986--- Section 21 (b)---- Comprehensive Insurance policy--- Vehicle comprehensively issued met with accident--- Repudiation of claim on ground that complainant violated terms and conditions of policy by allowing driver to drive vehicle who had no valid and effective driving license to drive Medium Goods Vehicle on the date of accident---- A person holding driving license to ply Light Motor vehicle cannot ply transport vehicle unless there is specific endorsement to that effect as required under Section 3 of Motor Vehicle Act read with Rule 16 of Rules and Forum No.6--- Driving license of driver in the instant case not entitled him to drive Medium Goods Vehicle and there was no endorsement to that effect on his license which was only for Light Motor Vehicle--- Not only there had been breach of policy condition vis-vis light motor vehicle license held by driver inasmuch as the vehicle driven was medium goods vehicle, there was also breach of Section 3 of Motor Vehicle Act--- Insurance company held not liable to pay any compensation--- Complaint dismissed--- Revision petition allowed. (paras 15,16) Result : Revision petition allowed. या निकालपत्रांप्रमाणे अर्जदार यांचे वाहनाचा अपघात झाला त्या वेळेला अर्जदाराचे वाहन चालविणारा ड्रायव्हरकडे वैध परवाना नव्हता त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा क्लेम योग्य अशा कारणासाठी नाकारलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचा लेखी जबाब, शपथपत्र दोन्ही पक्षकार यांच्या वकीलांचा युक्तीवाद आणि वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र याचा विचार होता, खालील प्रमाणे खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) सदस्या अध्यक्ष (प्र) गो.प.निलमवार.लघूलेखक. |