जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.14/2009. प्रकरण दाखल दिनांक – 15/01/2009. प्रकरण निकाल दिनांक –26/03/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. सरस्वतीबाई संभाजी पाटील वय वर्षे 60, व्यवसाय घरकाम, रा. अंबेकर नगर, नांदेड जि. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. व्यवस्थापक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शिवाजी पूतळयाजवळ, नांदेड. 2. शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा कोठा ता. कंधार जि. नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.शिवराज पाटील. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.डी.एस.कदम. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या ञूटीच्या सेवे बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी आपले वयोवृध्द काळात भविष्यातील गरजा भागविण्यासाठी गैरअर्जदाराकडे दि.03.06.2002 रोजी रु.11,000/- मूदत ठेवीमध्ये ठेवले होते. सदर एफ.डी.आर. चा नंबर 157280 असा होता. ज्यांची मूदत दि.03.12.2008 रोजी संपली. मूंदतीअंती मिळणारी रक्कम रु.22,264/- ची त्यांनी गैरअर्जदाराकडे मागणी केली. मागणी करुनही त्यांनी ती रक्कम दिली नाही. म्हणून रु.22,264/- व मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत म्हणून तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची रक्कम रु.22,264/- एफ.डी.आर नंबर 157280 हे गैरअर्जदारांना मान्य आहे. दि.20.10.2005 रोजी गैरअर्जदार बँकेवर कलम 35 ए कलम लागू झाले असून आर.बी.आय. ने त्यांचे आर्थिक व्यवहारावर निर्बध घातलेले आहेत. म्हणून आर.बी.आय.च्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना ही रक्कम देता येणार नाही. असे करुन त्यांनी सेवेत ञूटी केलेली नाही. म्हणून नूकसान भरपाई देय नाही. त्यामूळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द नाही. करतात काय ? 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांना एफ.डी.आर. नंबर 157280 द्वारे त्यांना मिळणारी रक्कम रु.22,264/- ही गैरअर्जदार यांना मान्य आहे. परंतु आर.बी.आय. ने लावलेले कलम 35 ए नुसार त्यांचे आर्थिक व्यवहारावर निर्बध घातलेले आहेत. त्यामूळे गैरअर्जदार फक्त रु.1,000/- देऊ शकतात. अर्जदारास रक्कम पाहिजे असल्यास ते हार्डशिप ग्राऊंडवरील प्रपोजल आर.बी.आय. कडे पाठविल्यास, त्यांनी मंजूर केलेली रक्कम ते देऊ शकतात. सद्य परिस्थितीत आर.बी.आय. च्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना कोणतीही रक्कम अर्जदारांना देता येत नाही, असे करुन सेवेत ञूटी झालेली नाही. म्हणून मानसिक ञास देय नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांचेकडून हार्डशिप ग्राऊंडवरील प्रपोजल भरुन घ्यावे व आवश्यक त्या कागदपञासह शिफारस करुन आर.बी.आय.कडे मंजूरीसाठी पाठवावे, आर.बी.आय.ने मंजूर केलेली रक्कम गैरअर्जदार यांनी ताबडतोब अर्जदारास दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाहीत. 4. दाव्याचा खर्च ज्यांचा त्यांने आपआपला सोसावा. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |