जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.357/2008. प्रकरण दाखल दिनांक – 15/11/2008. प्रकरण निकाल दिनांक – 03/03/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील. अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. श्री.रमाकांत दत्तराव सातव, अर्जदार. वय वर्षे 26, व्यवसाय शेती, रा.तळणी ता.हदगांव जि. नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, शाखा तळणी, सध्या शाखा निवघा, ता.हदगांव जि.नांदेड. 2. मुख्य व्यवस्थापक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, शिवजी पुतळय जवळ,नांदेड. 3. एस.डी.चौधरी, गैरअर्जदार. शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, शाखा तळणी,रा.निवघा ता.हदगांव जि.नांदेड. 4. श्री.बी.बी.संगनाळे, माजी रोखपाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तळणी, रा.मु.पो.आळंदी ता.बिलोली जि.नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.एन.के.कल्याणकर. गैरअर्जदारा तर्फे - अड.एस.डी.भोसले. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार रमाकांत दत्तराव सातव यांची थोडक्यात अशी आहे की, त्यांचे जिल्हा मध्यवती बँकेकडे खाते क्र.4105 हे खाते आहे. गैरअर्जदार क्र. 2 बॅक मुख्य कार्यालय आहे, गैरअर्जदार क्र. 3 व 4 बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या खात्यात रु.86,192ण्20 जमा होती. अर्जदार यांनी दि.09/05/2005 रोजी रु.3,000/- काढुन घेतले, पुन्हा अर्जदार यांनी दि.12/05/2005 रोजी रु.5,000/-काढले. त्यानंतर त्यांचे खात्यात शिल्लक रु.81,192.20 एवढी होती. त्यानंतर अर्जदार यांनी दि.13/05/05 रोजी रु.5,000/- व दि.14/05/2005 रोजी रु.5,000/- व दि.20/06/2005 रोजी रु.5,000/- व दि.21/06/2005 रोजी रु.4,000/- व दि.22/06/2005 रोजी रु.5,000/- व दि.27/06/2005 रोजी रु.15,000/- व दि.30/06/2005 रोजी रु.10,000/- व दि.20/09/2005 रोजी रु.200/- व दि.08/10/2005 रोजी रु.15,000/- व दि.23/06/2005 रोजी रु.10,000/- अशी रक्कम काढली आणि दि.04/06/2005 रोजी रु.15,781/- व दि.22/09/2005 रोजी रु.883/- आणि दि.28/03/2006 रोजी रु.256/- अशी रक्कम जमा केली. नंतर व्यवसहार सुरळीत चालु होता. त्यानंतर अर्जदाराच्या खात्यात एकुण रक्कम रु.23,912.20 एवढी रक्कम जमा होती. परंतु गैरअर्जदार यांनी बँक अर्थिक डबघाईस आल्यामुळे रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी बँके चौकशी केली असता, त्यांचे खातेवर रु.23,912.20 ऐवजी रु.7,587.20 एवढी रक्कम जमा असल्याचे सांगण्यात आले.लेखा परिक्षकाकडुन शाखेचे परिक्षण केले असता, गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी सदर शाखेच्या व्यवहारात गैरव्यवहार केल्याचे नमुद केले व पोलिस स्टेशन हदगांव येथे गुन्हा दाखल केला. गैरअर्जदाराने खाते उता-यावर दि.21/05/2005 ची स्लिप रु.31,500/- ची नावे टाकली नाही अशी नोंद केली. सदरील रक्कम अर्जदाराने उचलली नसलयामुळे खाते उता-यावर नोंद घेण्याचे कारण नाही. अर्जदाराच्या खाते पुस्तीकेत कोणत्याही प्रकारची खाडाखोड नाही व घेतलेल्या नोंदी या गैरअर्जदारास मान्य आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे रु.31,500/- रक्कमेचा गैरव्यवहार करुन विश्वासघात केला व सेवा देण्यात कसुर केला तसेच गैरअर्जदार क्र. 3 व 4 हे बँकेचे कर्मचारी असुन सदर कृत्यास जबाबदार आहेत. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, गैरव्यवहार केलेली रक्कम रु.31,500/- व्याजासह मिळावे व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व दावा खर्चाबद्यल रु.5,000/- देण्यात यावे. गैरअर्जदार क्र.3 यांना मंचाने आर.पी. ऐ.डी. ने नोटीस बजावणी केली पण ते गैरहजर राहिले म्हणून प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा करण्यात आले. गैरअर्जदार क्र.4 यांना मंचाने नोटीस पाठविली परंतु त्यांनी नोटीस घेण्यास इन्कार केला म्हणून प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा करण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपला लेखी जबाब दिला आणि तक्रार ही खोटी गैरकायदेशिर आहे. त्यांनी सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदार यांच्या खात्यातुन जी रक्क्म काढण्यात आली त्याबाबतची पेस्लिपवरची सही तंतोतंत अर्जदाराच्या म्हणण्याच्या सहीशी मिळते आणि त्यामुळे त्यांनी पेस्लिप स्वतः सही करुन दिलेली असल्यामुळे रक्कम त्यांना मिळाली आहे. त्यामुळे रक्कमेचा अपहार केल्याचे आरोप खोटे आहे म्हणुन तक्रार खारीज व्हावी. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांचे विरुध्द गुन्हा नंबर 123/07 कलम 409, 34 भा.द.वि. प्रमाणे दाखल केलेला आहे व तो प्रंलबित आहे, त्यामूळे गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांच्यावर कार्यवाही या न्यायमंचात करता येणार नाही असा उजर त्यांनी घेतला. सदर तक्रार ही मुदतीत नाही. थोडक्यात अर्जदाराची तक्रार ही चुकीची आहे. पेस्लिपवर त्यांचीचसही आहे आणि म्हणुन तक्रार खारीज करण्यात यावी असा उजर घेतला. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जासोबत शपथपत्र, खात्याचा उतारा, खाते पुस्तीकेचा उतारा , गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत शपथपत्र,दाखल केलेले आहे. अर्जदारा तर्फे वकीलांनी आणि गैरअर्जदार यांचे तर्फे वकील श्री.एस.डी.भोसले यांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1ः- अर्जदार यांनी अर्जासोबत अर्जदार यांचे बचत पासबूकची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. तसेच अर्जदार यांचे गैरअर्जदार यांचेकडे असलेले खाते उतारा या अर्जासोबत दाखल केलेला आहे. अज्रदार यांचा अर्ज, शपथपञ व गैरअर्जदार बँकेकडे असलेले त्यांचे बचत खाते पासबूक इत्यादी गोष्टी गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये नाकारलेल्या नाहीत. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्या अनुषंगाने त्यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- सदर प्रकरणात अर्जदाराचे पासबूक दाखल आहे त्यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, दि.12.6.2004 रोजी त्यांचे बचत खात्यात रक्कम रु.86,192/- जमा असताना रु.70,000/- काढले होते. व शेवटची जमा रु.23,912.20 एवढी शिल्लक असल्याची पासबूकामध्ये नोंद आहे व येणे बाकी रु.7587/- असे एकूण रक्कम रु.31,500/- बँकेकडून येणे आहे. त्यामूळे अर्जदार यांची मागणी न्याय व योग्य अशीच आहे. तसेच बचत खाते उता-यावरुन देखील अर्जदाराच्या बचत खात्यात रु.23,912.20 एवढी रक्कम शिल्लक होती हे दिसून येते व येणे बाकी रु.7587/- असे एकूण रक्कम रु.31,500/- बँकेकडून येणे आहे. गैरअर्जदार यांचे कार्यालयामध्ये त्यांचे कर्मचा-यांनी रक्क्मेचा काही अपहार केलेला असल्यास त्यासाठी गैरअर्जदार बँक स्वतः जबाबदारी टाळू शकत नाही. अर्जदार यांची रक्कम गैरअर्जदार यांचे बँकेमध्ये जमा असतानाही गैरअर्जदार बँकेने अर्जदाराने मागणी करुनही सदरची रक्कम अदा केली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ, व त्यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता गैरअर्जदार बँकेने अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडे त्यांची जमा असलेली रक्कम मिळण्यासाठी मागणी केलेली आहे हे स्पष्ट होत आहे. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार बँकेकडून त्यांची जमा असलेल्या रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्हणजे दि. 15.11.2008 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याज दराने रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. बँकेच्या कर्मचा-यांनी अपकृत्य अन्य मार्गाने फसवणुक करुन खातेदरांचे नुकसान केले असले तरी व्हिकॅरीअस लायबीलीटी म्हणजे नौकराने केलेल्या अपकृत्याबद्यल मालकाची जबाबदारी या तत्वावर मालकाची जबाबदारी येते. याचा अर्थ संबंधीत खातेदाराला अयोग्य सेवा पुरविल्याबद्यल बँकेची सुध्दा तेवढीच जबाबदारी येते. या संदर्भात युनियन ऑफ इंडिया विरुध्द लिलाबेग यातील प्रकरणांत मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेला निकाल जो 2006 (II) सी.पी.आर. 12 या ठिकाणी प्रकाशीत झालेला आहे. यात स्पष्टपणे निर्वाळा देण्यात आलेला आहे की, पोष्टाचे कर्मचा-याने त्यांच्या ग्राहकाचे रक्कमेचा अपहार केला त्याची जबाबदारी मालक, म्हणुन पोष्टाची ठरते. ही बाब लक्षात घेता त्याप्रमाणे या प्रकरणांत बँकेने सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, अशा स्पष्ट निर्णयाप्रत येत आहोत. अर्जदार यांची रक्कम गैरअर्जदार यांचेकडे जमा असतानाही गैरअर्जदार यांनी कोणतेही कारण नसताना अर्जदार यांची रक्कम मागणी करुनही अर्जदार यांना अदा केली नाही.त्यामूळे अर्जदार यांना या मंचामध्ये सदरची रक्कम मिळण्यासाठी अर्ज करावा लागला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून खर्चापोटी व मानसिक ञासापोटी रक्कम मिळण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदाराचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद आणि गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ तसेच दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद यांचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कम दयावी. 1. अर्जदार यांना रक्कम रु.31,500/- व या रक्कमेवर दि.15.11.2008 पासून ते प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह होणारी एकूण रक्कम दयावी. 2. अर्जदारास झालेल्या मानसिक ञासापोटी रु.5,000/- दयावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत. 4. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) अध्यक्ष. सदस्या गो.प.निलमवार, लघुलेखक. |