Maharashtra

Nanded

CC/08/356

Ramakant Dattarao Satav - Complainant(s)

Versus

manager,N.D.D.C.Bank Lit - Opp.Party(s)

ADV. P.G.Narwade

03 Mar 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/356
1. Ramakant Dattarao Satav Talni Tq.Hadgaon NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. manager,N.D.D.C.Bank Lit Talni Tq.Hadgaon NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 03 Mar 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.356/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  15/11/2008.
                          प्रकरण निकाल दिनांक 03/03/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील        अध्‍यक्ष.
                     मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                
 
श्री.दत्‍तराव धोंडबाराव सातव                                अर्जदार.
वय वर्षे 52, व्‍यवसाय शेती,
रा.तळणी ता.हदगांव जि. नांदेड.
 
विरुध्‍द.
 
1.   शाखाधिकारी,                                    
नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि,
शाखा तळणी, सध्‍या शाखा निवघा,
ता.हदगांव जि.नांदेड.
2.   मुख्‍य व्‍यवस्‍थापक,
     नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि,
     शिवजी पुतळया जवळ,नांदेड.
3.   एस.डी.चौधरी,
     शाखाधिकारी, नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि,
     शाखा तळणी,रा.निवघा ता.हदगांव जि.नांदेड..            गैरअर्जदार.
4.   श्री.बी.बी.संगनाळे
     माजी रोखपाल, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि.
     रा.मु.पो.आळंदी ता.बिलोली जि. नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.        - अड.एन.के.कल्‍याणकर
गैरअर्जदारा तर्फे      - अड.एस.डी.भोसले.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या)
 
    यातील अर्जदार दतराव सातव यांची थोडक्‍यात अशी आहे की, त्‍यांचे जिल्‍हा मध्‍यवती बँकेकडे खाते क्र.400 हे खाते आहे. गैरअर्जदार क्र. 2 बॅक मुख्‍य कार्यालय आहे, गैरअर्जदार क्र. 3 बँकेचे कर्मचारी आहेत.  त्‍यांच्‍या खात्‍यात दि.05/05/2005 रोजी रु.2000/- ची गरज असल्‍यामूळे ती रक्‍कम काढली. सदर रक्‍कम काढल्‍यानंतर अर्जदाराच्‍या बचत खात्‍यात रु.85,763.56 एवढी रक्‍कम शिल्‍लक होती. दि.09.05.2005 रोजी पून्‍हा अर्जदाराने रु.3,000/- काढले. त्‍यानंतर बचत खात्‍यात रक्‍कम रु.82,763.56 शिल्‍लक राहिले. दि.12.05.2005 पासून ते दि.23.06.2006 पर्यत अर्जदाराने रक्‍कम रु.64,000/- काढले तर रु.9,622/- जमा केले. दि.23.06.2006 रोजी अखेर शिल्‍लक रु.28,387.56 शिल्‍लक होते. बँकेत ब-याच खातेदारांच्‍या रक्‍कमा परस्‍पर उचल केलेल्‍या आहेत म्‍हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 कडे चौकशी केली असता त्‍यांनी अर्जदाराच्‍या खात्‍यामध्‍ये रक्‍कम रु.26,517/- चा फरक आहे असे सांगितले. अर्जदाराने ताबडतोब दि.20.06.2006 रोजी अपहाराबाबत चौकशी करण्‍यासाठी लेखी विनंतीचा अर्ज दिला. परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास काहीही कळविले नाही. गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी बँकेच्‍या व्‍यवहारात गैरव्‍यवहार केल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. अर्जदाराच्‍या खात्‍यावर रु.28,387.56 बाकी असताना फक्‍त रु.1668.56 बाकी असल्‍याचे प्रमाणपञाद्वारे सांगितले. म्‍हणून अर्जदाराने वकिलामार्फत नोटीस देऊन खूला विचारता असता त्‍यांनी नोटीसचे उत्‍तर दिले नाही. अर्जदाराचे बचत खाते क्र.400 मधील रु.26,719/- एवढया रक्‍कमेचा गैरव्‍यवहार केला व सेवा देण्‍यामध्‍ये कसूर केला. म्‍हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व अशी मागणी केली आहे की, गैरव्‍यवहार केलेली रक्‍कम रु.26,719/- तसेच मानसिक ञासापोटी रु.20,000/- दावा खर्चापोटी रु.5,000/- असे एकूण रु.51,719/- गैरअर्जदारांकडून मिळावेत.
 
          गैरअर्जदार क्र.3 यांना मंचाने आर.पी.ऐ.डी. ने नोटीस बजावणी केली पण ते गैरहजर रा‍हिले म्‍हणून प्रकरण त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा करण्‍यात आले.
     गैरअर्जदार क्र. 4 यांना मंचाने नोटीस पाठविली परंतु त्‍यांनी नोटीस घेण्‍यास इन्‍कार केला म्‍हणून प्रकरण त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा करण्‍यात आले.
 
     गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपला लेखी जबाब दिला आणि तक्रार ही खोटी गैरकायदेशिर आहे. त्‍यांनी सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदार यांच्‍या खात्‍यातुन जी रक्‍कम काढण्‍यात आली त्‍याबाबतची पेस्लिपवरची सही तंतोतंत अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याच्‍या सहीशी मिळते आणि त्‍यामुळे त्‍यांनी पेस्लिप स्‍वतः सही करुन दिलेली असल्‍यामुळे रक्‍कम त्‍यांना मिळाली आहे. त्‍यामुळे रक्‍कमेचा अपहार केल्‍याचे आरोप खोटे आहे म्‍हणुन तक्रार खारीज व्‍हावी. गैरअर्जदार क्र.3 व 4 यांचे विरुध्‍द गुन्‍हा नंबर 123/07 कलम 409, 34 भा.द.वि. प्रमाणे दाखल केलेला आहे व तो प्रंलबित आहे त्‍यामूळे गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांच्‍यावर कार्यवाही या न्‍यायमंचात करता येणार नाही असा उजर त्‍यांनी घेतला. सदर तक्रार ही मुदतीत नाही. थोडक्‍यात अर्जदाराची तक्रार ही चुकीची आहे. पेस्लिपवर त्‍यांचीच सही आहे आणि म्‍हणुन तक्रार खारीज करण्‍यात यावी असा उजर घेतला.
     अर्जदार यांनी आपल्‍या तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदपञ दाखल केले आहेत, तक्रार क्र.181/08 या निकालाची प्रत, चौकशी करण्‍या बाबत दिलेला अर्ज , गैरअर्जदार यांनी आपल्‍या जबाबासोबत शपथपत्र दाखल केलेले आहे.
     अर्जदारा तर्फे वकीलांनी आणि गैरअर्जदार यांचे तर्फे वकील श्री.एस.डी.भोसले यांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                          उत्‍तर
1.   अर्जदार हे ग्राहक आहेत काय ?                           होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता
     केली आहे काय ?                                       होय.
3.   काय आदेश ?                              अंतिम आदेशाप्रमाणे
 
                             कारणे
मूददा क्र. 1 ः-
          अर्जदार यांनी अर्जासोबत अर्जदार यांचे बचत पासबूकची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे. तसेच अर्जदार यांचे गैरअर्जदार यांचेकडे असलेले खाते उतारा या अर्जासोबत दाखल केलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व गैरअर्जदार बँकेकडे असलेले त्‍यांचे बचत खाते पासबूक इत्‍यादी गोष्‍टी गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये नाकारलेल्‍या नाहीत. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍या अनुषंगाने त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
मूददा क्र.2 ः-
          सदर प्रकरणात अर्जदाराचे पासबूक दाखल आहे त्‍यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, दि.23.06.2006 रोजी त्‍यांचे बचत खातेत रु.28,387 एवढी रक्‍कम जमा होती. अर्जदार यांचे गैरअर्जदार यांचेकडे असलेल्‍या बचत खात्‍याच्‍या पासबूकानुसार दि.23.6.2006 रोजी अखेर रक्‍कम रु.28,387/- एवढी रक्‍कम जमा असल्‍याचे कागदपञावरुन स्‍पष्‍ट होत आहे व ती अर्जदार यांची रु.26,719.56 ची मागणी न्‍याय व योग्‍य अशीच आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे मागणीप्रमाणे विंनती करुनही अर्जदार यांची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. तसेच अर्जदार यांचे बचत पासबूक नुसार रक्‍कमेमध्‍ये तफावतही दिसून येते आहे. गैरअर्जदार यांचे कार्यालयामध्‍ये त्‍यांचे कर्मचा-यांनी रक्‍कमेचा काही अपहार केलेला असल्‍यास त्‍यासाठी गैरअर्जदार बँक स्‍वतः जबाबदारी टाळू शकत नाही. अर्जदार यांची रक्‍कम गैरअर्जदार यांचे बँकेमध्‍ये जमा असतानाही गैरअर्जदार बँकेने अर्जदारांने मागणी करुनही सदरची रक्‍कम अदा केली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता गैरअर्जदार बँकेने अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे.
          अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपञामध्‍ये अर्जदार यांनी दि.21.6.2006 रोजी  गैरअर्जदार बँकेकडे त्‍यांची जमा असलेली रक्‍कम मिळण्‍यासाठी मागणी केलेली आहे हे स्‍पष्‍ट होत आहे. त्‍यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार बँकेकडून त्‍यांची जमा असलेल्‍या रक्‍कमेवर गैरअर्जदार बँकेकडे रक्‍कम मागणी अर्ज दिल्‍यापासुन म्‍हणजे दि.21.6.2006 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम पदरीपडेपर्यत 9 टक्‍के व्‍याज दराने रक्‍कम वसुल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
 
          बँकेच्‍या कर्मचा-यांनी अपकृत्‍य अन्‍य मार्गाने फसवणुक करुन खातेदारांचे नुकसान केले असले तरी व्हिकॅरीअस लायबीलीटी म्‍हणजे नौकराने केलेल्‍या अपकृत्‍याबद्यल मालकाची जबाबदारी या तत्‍वावर मालकाची जबाबदारी येते. याचा अर्थ संबंधीत खातेदाराला अयोग्‍य सेवा पुरविल्‍याबद्यल बँकेची सुध्‍दा तेवढीच जबाबदारी येते. या संदर्भात युनियन ऑफ इंडिया विरुध्‍द‍ लिलाबेग यातील प्रकरणांत मा.राष्‍ट्रीय आयोगाने दिलेला निकाल जो 2006 (II) सी.पी.आर. 12 या ठिकाणी प्रकाशीत झालेला आहे. यात स्‍पष्‍टपणे निर्वाळा देण्‍यात आलेला आहे की, पोष्‍टाचे कर्मचा-याने त्‍यांच्‍या ग्राहकाचे रक्‍कमेचा अपहार केला त्‍याची जबाबदारी मालक, म्‍हणुन पोष्‍टाची ठरते. ही बाब लक्षात घेता त्‍याप्रमाणे या प्रकरणांत बँकेने सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, अशा स्‍पष्‍ट निर्णयाप्रत येत आहोत.
 
     अर्जदार यांची रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडे जमा असतानाही गैरअर्जदार यांनी कोणतेही कारण नसताना अर्जदार यांची रक्‍कम मागणी करुनही अर्जदार यांना अदा केली नाही. त्‍यामूळे अर्जदार यांना या मंचामध्‍ये सदरची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज दाखल करावा लागला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे त्‍यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून खर्चापोटी व मानसिक ञासापोटी रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे.
     अर्जदाराचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ तसेच दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद यांचा सर्वाचा विचार होता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
     वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                      आदेश
 
     अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येतो.
     आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी अर्जदार यांना
     खालील प्रमाणे रक्‍कम दयावी.
1.                  अर्जदार यांना रक्‍कम रु.26,719/- व  या रक्‍कमेवर दि.21.6.2006
      पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम पदरीपडेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह
      होणारी एकूण रक्‍कम दयावी.
2.   अर्जदारास झालेल्‍या मानसिक ञासापोटी रु.5,000/- दयावेत.
3.   अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.
4.   पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)                      (श्रीमती.सुजाता पाटणकर)       
           अध्यक्ष.                                        सदस्या                                     
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.