जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/193. प्रकरण दाखल तारीख - 08/09/2009 प्रकरण निकाल तारीख – 28/12/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मारोती किशन मेखाले वय, 44 वर्षे, धंदा शिक्षण आणि राहूल मारोती व सचिन पि. मारोती मेखाले अर्जदार अज्ञान पालन कर्ते अर्जदार, मारोती किशन मेखाले रा.वाघी ता. जि.नांदेड विरुध्द. 1. शाखाधिकारी, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा नाळेश्वर ता. जि. नांदेड गैरअर्जदार. 2. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा आनंद नगर नांदेड, मार्फत शाखा व्यवस्थापक. अर्जदारा तर्फे वकील - अड. ए.एन. चौहाण. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे वाघी ता.जि.नांदेड येथील रहीवासी असून त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी गैरअर्जदार क्र.1 बँकेकडे रक्कम रु.20,000/- दि..21.11.2000 रोजी बचत ठेवीमध्ये पावती क्र.118716 द्वारे जमा केले होते, मूदतीनंतर म्हणजे दि.21.02.2005 रोजी रु.40,140/- मिळणार होते, तसेच गैरअर्जदार क्र.1 बँकेकडे रक्कम रु.25,000/- दि..21.11.2000 रोजी बचत ठेवीमध्ये पावती क्र.118717 द्वारे जमा केले होते, मूदतीनंतर म्हणजे दि.21.02.2005 रोजी रु.50,175/- मिळणार होते, तसेच यांच गैरअर्जदार क्र.2 बँकेच्या शाखेत रक्कम रु.25,000/- दि..11.07.2002 रोजी बचत ठेवीमध्ये पावती क्र.135061 द्वारे जमा केले होते, मूदतीनंतर म्हणजे दि.11.01.2009 रोजी रु.50,163/- मिळणार होते, त्यामूळे अर्जदार यांनी सदरील ठेवी मूलांच्या शिक्षणाकरिता व कूटूंबातील व स्वतःच्या भविष्यातील आजारपणातील उपचाराकरिता गैरअर्जदार बँकेकडे रक्कमेची मागणी केली असता त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला.त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराच्या वरील गरजासाठी त्यांना वरील ठेव व्याजासह मिळावी तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.25000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले आहे. त्यांना हे मान्य केले आहे की, अर्जदाराचे रु.1,40,928/- जमा आहेत. पैसे परत देत नाहीत व व्याजही देत नाहीत हे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने दि.20.10.2005 रोजी 35 अ कलम लाऊन आर्थिक निर्बध घातले आहेत. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज व त्यांसोबत डॉक्टराचे प्रमाणपञ व उपचारासाठीची सर्व कागदपञे दाखल करुन प्रस्ताव दिल्यास तो प्रस्ताव मंजूरीसाठी आर.बी.आय. कडे पाठविण्यास बँक तयार आहे. मंजूर होऊन आलेली रक्कम बँक अर्जदारास देण्यास तयार आहे. रक्कम न देऊन बँकेने कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच अर्जदारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः– अर्जदार यांनी ठेव पावती नंबर 118716,118717 व पावती नंबर 135061 ठेवीमध्ये रु.70,000/- गुंतविले होते तसेच मूदतीनंतर वरील तिनही ठेवीवर एकूण रक्कम रु.1,40,928/- गैरअर्जदार यांचेकडून मिळणार होते हे कागदपञ पाहिले असता सिध्द होते. पण अर्जदार यांना रक्कमेची आवश्यकता पडली असेल ही बाब सूध्दा नाकारता येणार नाही. परंतु गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने कलम (35 ए) हे कलम लावून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध लादले असल्यामूळे गैरअर्जदार आर.बी.आय. च्या परवानगीशिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी होत नाही. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर अर्जदार हे हार्डशिपच्या ग्राऊंडवर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज, शिक्षणाबाबतचे कागदपञ व इतर कागदपञ दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव बँकेकडे सादर करावा व तो प्रस्ताव बँकेने ताबडतोब आर.बी.आय.कडे पाठवून देणे बाबत कारवाई करणे आवश्यक आहे व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम अर्जदार यांना देणे हे गैरअर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य कागदपञासह रक्कमेबाबतचा प्रस्ताव आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यात गैरअर्जदार बँकेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय. कडे सादर करावा व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |