(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 29.09.2011) 1. अर्जदाराने सदर दरखास्त, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अन्वये दाखल करुन, गैरअर्जदार विरुध्द कलम 27 अन्वये कारवाई करुन जास्तीत-जास्त शिक्षा करण्यात यावी, अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदार/फिर्यादीची दरखास्त नोंदणी करुन, गैरअर्जदारांविरुध्द समन्स काढण्यात आले. दरखास्त न्यायमंचात न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार/फिर्यादी व त्याचे वकील यांनी, गैरअर्जदाराने दि.4.1.2010 रोजी मुळ प्रकरण क्र.118/09 मध्ये पारीत केलेल्या आदेशानुसार रुपये 3034/- जमा केली आहे, त्यामुळे अर्जदार ही दरखास्त पुढे चालवू इच्छित नाही, या आशयाची पुरसीस नि.17 नुसार दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार यांचे मधील वाद मिटलेला आहे. गैरअर्जदार यांनी, तक्रार क्र.118/09 च्या आदेशाची पुर्तता केली आहे, त्यामुळे दरखास्त परत घेण्याबाबत पुरसीस दाखल केले. 3. अर्जदार/फिर्यादीस पुरसीस निशाणी क्र.17 मधील मजकुराबाबत विचारणा केली असता, बरोबर असल्याचे मान्य केले. सबब, दरखास्त पुढे चालवू इच्छित नसल्याने, अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे खारीज. (By way of withdrawal )
| | [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |