Shri. Kailas Vasudev Sawant filed a consumer case on 30 May 2014 against Manager,Mavralls Motor Pvt.Ltd in the Sindhudurg Consumer Court. The case no is cc/14/5 and the judgment uploaded on 09 Nov 2015.
Exh.No.24
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 05/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि. 31/01/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि. 30/05/2014
श्री कैलास वासुदेव सावंत
वय सु.32 वर्षे, व्यवसाय- ठेकेदार
रा.स्टेट बॅंक कॉलनी, कलमठ,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) मॅनेजर,
मार्वलस मोटर प्रा.लि.,
प्लॉट नं.170/176, गोकुळ शिरगाव,
पुणे बेंगलोर एक्सप्रेस हायवे (एन एच - 4)
कोल्हापूर – 416 234
2) मॅनेजर,
फियाट गु्रप ऑटोमोबाइल्स प्रा.लि.बेनीफीस,
तिसरा मजला, माथुरदास मिल कंपाऊंड,
लोअर परेल (पश्चिम), मुंबई – 400 013 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्य
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री विलास परब, भालचंद्र पाटील
विरुद्ध पक्ष क्र.1 तर्फे विधिज्ञ – श्री ए. सी. शहा
विरुद्ध पक्ष क्र.2 तर्फे विधिज्ञ – श्री एस.एस. शेटये
निकालपत्र
(दि. 30/05/2014)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) सदरची तक्रार विरुध्द पक्ष यांचेकडून खरेदी केलेल्या वाहनाबाबत दिलेल्या सदोष सेवा व सेवेतील त्रुटी याबाबत दाखल केलेली आहे.
2) तक्रारीचा थोडक्यात सारांश खालीलप्रमाणे –
तक्रारदारांनी विरुध्द पक्ष नं.1 यांचेकडून लिनिया इमोशन सेडान आर एच डी 1248 डिझेल बीएसएन इंजिन, पाच गिर असलेले वाहन दि. 25/05/2011 रोजी रककम रु. 796750/- ला खरेदी केले होते. वाहनाचा प्रॉडक्ट कोड (F111031B000000268) 8911031BO असा असून सदर गाडीचा चेसीस नंबर MCA11031BO9023115AMZ व इंजिन नंबर 0130370 असा आहे. विरुध्द पक्ष यांनी सदर वाहनाचे टॅक्स इन्व्हॉईस दिले असून त्याचा टॅक्स इन्व्हॉईस नं MAR MOP -1011-01301 असा दि.25/07/2011रोजीचा आहे व दि.25/07/2011 रोजीचे विक्री सर्टिफिकिट नं. MAR MOP-1011-01301-SC असे आहे. सदर विक्री सर्टिफिकेट विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिले आहे.
3) तक्रारदारांनी गाडीचे पहिले सर्व्हिसिंग 1/11/2011 दुसरे 15/04/2012 रोजी व तिसरे 10/5/2012 रोजी केलेले आहे. सदर वाहनाचा वॉरंटी कालावधी हा 24 महिने किंवा 80,000 किमी होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सदर वॉरंटी कालावधीत वाहनाच्या इंजिनमध्ये गंभीर स्वरुपाचे तेळ गळती स्वरुपाचे दोष सुरु झाले. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवालाकडे तक्रार केली परंतु सामनेवालाने सदर दोषाचे निवारण केलेले नाही. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सदर वाहनामध्ये ऑइल कंझम्शन व टर्बो चार्जर असे दोष होते. सदरचा टर्बो चार्जर विनामोबदला बदलण्याची जबाबदारी वि.प.1 यांची होती तथापि वि.प.1 यांनी रु.16333/- इतकी रक्कम वाहनाचे अंतर 52879 इतकी असताना वसुल केली. हे अन्यायकारक आहे. तसेच वाहनाची सर्व्हीस हिस्ट्री ही विरुध्द पक्ष 1 यांचे अधिकृत कर्मचारी यांनी अयोग्य व चुकीच्या पध्दतीने ठेवली. वाहनाचे अंतर हे जाणूनबुजून व मुद्दामहून जास्तीचे दाखवले. अशा चुकीच्या नोंदी ता. 8/4/2013, 4/10/2012, 26/7/2013 या रोजीच्या सर्व्हीस हिस्ट्ररी मध्ये केलेल्या आहेत. प्रत्यक्षात त्यांतील नेांदीनुसार वाहन कधीही त्या अंतरापर्यंत चालवलेले नव्हते. वॉरंटी कालावधीतील दुरुस्ती टाळणेकरीता सदरच्या चुकीच्या नोंदी विरुध्द पक्ष यांनी केलेल्या आहेत. तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांचेकडून इंजिनातील दोषाबाबत वारंवार तक्रारी करुन देखील विरुध्द पक्ष यांनी दुर्लक्ष केले तसेच वॉरंटी कालावधीत टर्बो चार्जरची रक्कम वसुल केली तसेच ऑईल कंझम्पशनाचा दोष दूर करुन दिला नाही. ता.9/10/2013 रोजी तक्रारदाराने सदरचे वाहन विरुध्द पक्ष 1 च्या सर्व्हिस स्टेशनमध्ये दोष निवारणासाठी नेले. विरुध्द पक्षाने सदरचे वाहन स्वतःकडे ठेऊन घेतले त्याचवेळी तक्रारदाराला क्र.4914 ची जॉबशिट दिली त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी सदर वाहनातील दोष निवारण करुन वाहन तक्रारदाराच्या ताब्यात दिले नाही. तक्रारदाराने ईमेल पाठवून वाहन दुरुस्त करुन ताब्यात देण्याची विनंती केली परंतु तक्रारदाराने सदरचे वाहन दुरुस्त करुन दिले नाही म्हणून वि.प. यांनी तक्रारदाराना सदोष सेवा दिली त्यामुळे तक्रारदारांना खाजगी कारचे भाडे प्रतिदिन रु.3000/- प्रमाणे दयावे लागले व आर्थिक अडचणीना सामोरे लागले तक्रारदार हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे चारचाही वाहनाने जावे लागते परंतु तक्रारदाराना सदर वाहनाचा उपयोग करता आला नाही. सबब तक्रारदारानी विरुध्द पक्ष यांनी वाहनातील दोष दुरुस्त करुन दयावा तसेच वाहनातील दोष कायमस्वरुपी दूर करणे अशक्य असल्यास तक्रारदार यांस नवीन वाहन बदलून देणे व नुकसान भरपाईपोटी रु.3,33,000/-, मानसिक ,शारीरिक त्रासापोटी रु,100000/-, तक्रार खर्च रु.10000/- तसेच विरुध्द पक्ष यांनी वॉरंटी काळात वसुल केलेली रक्कम 16333/- परत मिळणेबाबत आदेश होणेसाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
4) विरुध्द पक्ष 1 यांनी हजर होऊन नि.11 कडे म्हणणे दाखल केले आहे. विरुध्द पक्ष 1 यांनी तक्रारीतील सर्व मजकूर परिच्छेदनिहाय नाकारलेला आहे. विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने वाहनाची योग्य काळजी न घेतल्याने वाहनातील दोष उद्भवले असलेबाबत वस्तुस्थिती कोर्टापासून लपवून ठेवली आहे तसेच संपूर्ण कागदपत्रे हजर न करता चुकीची कागदपत्रे हजर करुन वस्तुस्थिती लपवून ठेवलेली आहे. तसेच तक्रारदारांनी कंपनीच्या नियमाप्रमाणे किंवा सर्व्हीस बुकमध्ये दिलेल्या माहितीचा विचार करुन गाडीचा वापर केलेला नाही. सदर वाहनाचे 124 किमी रनिंग झाले असता अॅक्सिडेंट व्हेईकल म्हणून गाडी दुरुस्तीसाठी आणली. त्यावेळी पुढील बंपर, फॉग लॅंप, पुढील फेंडर, हेड लॅंप, हेंजिस, रेडिएटर ग्रील बास्केट, डोअर असेंब्ली उजव्या बाजूचे, व्हील रिंग, व्हिल कव्हर बाहेरील आरसा, दरवाजाचे मोल्डिंग्ज, बॉडी सिलंट सारखे सर्वच कारला धक्का बसल्याने बदलावे लागले. मुळात वॉरंटी पॉलिसीमध्ये अॅक्सिडेंट व्हेईकल्सना कोणतीही वॉरंटी दिली जात नाही ही वॉरंटी पॉलिसीची महत्वाची अट आहे. या अटीचाच तक्रारदार यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे कंपनी पुढील सर्व बाबींना कधीच विचारात घेऊ शकत नाही. पुन्हा त्यानंतर गाडीचे 55012 रनिंग असतांना दि.12/07/2012 रोजी पुन्हा गाडी कंपनीमध्ये आणण्यात आली. तेव्हा विंडशिल्ड ग्लास, मोल्डिंग आणि इतर गोष्टी बदलल्या होत्या. एकदा गाडीचे चेसीस अॅक्सिडेंटने धक्का बसल्यास चेसिसचे अलाईनमेंट आणि चेसिसवर बसलेल्या इंजिनचे कार्यक्षमता पुर्णपणे योग्य क्षमतेने कार्यरत होत नाही. त्यामुळेच कंपनी अॅक्सिडेंट झालेल्या वाहनास वॉरंटी कंटिन्युएशनमध्ये देणे अडचणीचे होते. तक्रारदार यांनी ही वस्तुस्थिती कोर्टासमोर आणलेली नाही. तक्रारदार स्वच्छ हाताने या मंचासमोर आलेले नाहीत तसेच सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही. कारण टॅक्स इंन्व्हॉइर्समधील अट नं.8 नुसार वि.प.कडून खरेदी केलेल्या वाहनाबाबत कोणत्याही बाबीसाठी फक्त कोल्हापूर कोर्टातच दावा दाखल करता येतो. सबब या मंचासमोर सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. सबब सदरची तक्रार नामंजूर करण्यात यावी व नुकसान भरपाई म्हणून रु.10000/- तक्रारदाराकडून देववावेत अशी विनंती केलेली आहे.
5) विरुध्द पक्ष 2 यांनी नि.14 कडे म्हणणे देऊन तक्रारीतील सर्व मजकूर परिच्छेदनिहाय उत्तर देऊन नाकारलेला आहे. विरुध्द पक्ष 2 च्या म्हणण्यानुसार तक्रारीतील सर्व बाबी कोल्हापुर येथे झाल्यामुळे सदरची तक्रार या मंचाच्या अधिकार क्षेत्रात चालण्यास पात्र नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी विक्री केलेल्या गाडीची वॉंरंटीनुसार गाडीची वॉरंटी संपुष्टात येणार होती व गाडीचे रनिंग 124 किमी असतांना गाडीचा अपघात झाला त्यामुळे गाडीची वॉरंटी संपूष्टात आलेली होती तसेच दि.12/7/2012 रोजी पुन्हा अपघात झालेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार चालणेस पात्र नाही. तसेच तक्रारदार हे स्वच्छ हाताने या मंचासमोर आलेले नाही. सबब तक्रारदार यांनी खोटी तक्रार दाखल केल्यामुळे नुकसान भरपाई विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडून रु.10000/- मिळावेत अशी विनंती केलेली आहे
6) तक्रारीचा आशय, दोन्ही बाजूंचा पुरावा, युक्तीवाद यांचे अवलोकन करता या मंचाच्या विचारार्थ खालीलमुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | सदरची तक्रार या मंचास चालवणेचा अधिकार आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
3 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांना वाहन दुरुस्तीबाबत सदोष सेवा दिली आहे का ? किंवा सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
4 | तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
5 | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
7) मुद्दा क्र.1 – सदर कामी विरुध्द पक्ष नं. 1 व 2 यांनी सदरची तक्रार या मंचात चालणेस अधिकार नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. विरुध्द पक्ष नं.2 च्या म्हणण्यानुसार टॅक्स इन्व्हॉईस ता.25/07/2011 त्यावरील अट क्र.8 पाहता “Only the court of KOLHAPUR shall have jurisdiction in any proceedings relating to this contract“ अशी असल्यामुळे या मंचासमोर सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. तसेच विरुध्द पक्ष नं.2 हे मुंबई येथील आहेत. सबब त्याही कारणावरुन सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही. या दोन्ही युक्तीवादांचा विचार करता सद्याच्या कायदयाच्या प्रचलित नियमानुसार (settled law) केवळ टॅक्स इन्व्हॉईसवर ज्युरिसडिक्शनबाबत काहीही नमुद केले असले तरी त्यामुळे कायदयाने येणारे अधिकारक्षेत्र बदलत नाही. सबब या कायदेशीर नियमांचा विचार करता सदरच्या अट क्र.8 नुसार केवळ कोल्हापुर कोर्टाला ज्युरिसडिक्शन आहे हा मुद्दा पटण्यासारखा नाही. तसेच तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे पाहता विरुध्द पक्ष क्र.1 मार्व्हलर्स मोटर्स प्रा.लि. ऑथोराईज्ड पॅसेंजर कार डिलर फॉर कोल्हापूर अॅंड सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट असे नमूद करण्यात आले आहे. सदरचे वाहन तक्रारदाराने सिंधुदुर्ग येथे रजिस्ट्रेशन केलेले आहेृ. सबब या कारणावरुन सदरची तक्रार सिंधुदुर्ग येथील ग्राहक मंचासमोर चालणेस पात्र आहे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब सदरची तक्रार या मंचासमोर चालवणेस ज्युरिसडिक्शन आहे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
8) मुद्दा क्र.2 – तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन विशेषतः टॅक्स इन्व्हॉईस पाहता तक्रारदारांनी लिनिया इमोशन सेडान हे वाहन रु.796750/- या किंमतीस विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून ता.25/7/2011 रोजी खरेदी केल्याचे दिसून यते. सदरचे वाहन विरुध्द पक्ष क्र.2 यांनी उत्पादित केलेले असून विरुद पक्ष क्र.1 हे सदर उत्पादनाचे अधिकृत डिलर आहेत. सबब तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत या निर्णयापत हे मंच येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
9) मुद्दा क्र.3 – तक्रारदारांचे म्हणण्यानुसार वाहन खरेदी केल्यानंतर 3 सर्व्हिसिंग विरुध्द पक्ष यांच्या सर्व्हीस स्टेशनमध्ये विहित मुदतीत केलेली आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सदर वाहनाचा वॉरंटीचा कालावधी हा 24 महिने किंवा 80000 कि.मी. गाडीचे रनिंग यापैकी जे पहिले संपुष्टात येईल तोपर्यंत होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार वॉरंटी कालावधीमध्ये वाहनामध्ये गंभीर स्वरुपाचे तेलगळतीसारखे दोष सुरु झाले म्हणून तक्रारदाराने ता.4/10/2012 रोजी तक्रार केली तथापि सदर तक्रारीचे विरुध्द पक्ष यांनी निराकरण करुन दिलेले नाही. तसेच ता.5/6/2013 ते 25/6/2013 या कालावधीमध्ये इंजिनाचा टर्बो चार्जर बदलून नवीन बसविला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सदरचा चार्जर हा विनामोबदला बसवण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.1 यांची होती. कारण सदरची दुरुस्ती ही वॉरंटी कालावधीमध्ये होती. तथापि सदर वाहनाचे रनिंग 52879 किमी इतके असतांना वॉरंटी कालावधी अस्तित्वात होता. तरीदेखील विरुध्द पक्ष यांनी रु.16333/- म्हणजे 50 टक्के रक्कम टर्बो चार्जरसाठी वसुल केली. ही गोष्ट चुकीची व अन्यायकारक आहे. तक्रारदारांनी या बाबीप्रित्यर्थ बरेचसे कागदपत्र दाखल केलेले आहेत. तसेच सदरची रक्क्म वसुल केलेबाबत पावती नं.695 ता.25/6/2013 दाखल केलेली आहे. सबब विरुध्द पक्ष यांनी सदरची रक्कम तक्रारदाराकडून वसुल केल्याचे सिध्द होत आहे.
10) तथापि सामनेवाला यांचे म्हणण्यानुसार सदरच्या वाहनाचा अपघात हा गाडीचे रनिंग 124 किमी. असतांना झाला त्याबाबतचे इन्व्हॉईस व जॉबकार्ड या कामी हजर केलेले आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सदरचे पैसे वसुल केले त्यावेळी वॉरंटी पिरियड अस्तित्वात होता. याउलट वि.प.च्या म्हणण्यानुसार सदरची वॉरंटी अस्तित्वात नव्हती कारण वॉरंटी व ओनर सर्व्हीस पॉलिसीमधील अटीमधील कलम 7 नुसार सदर वाहनाचा अपघात झालेला आहे तसेच तक्रारदाराने सदरच्या वाहनाचा वापर योग्यरित्या तसेच वॉरंटी कार्डमधील सुचनांनुसार केलेला नाही थोडक्यात तक्रारदाराने वाहन वापरणेबाबत अक्षम्य निष्काळजीपणा व हयगय केलेली आहे. त्यामुळे सदर कलम 7 नंबरच्या अटीनुसार सदर गाडीचा अपघात तसेच तक्रारदाराचा निष्कषाळजीपणा यामुळे सदरची वॉरंटी ही अस्तित्वात राहिली नाही. सबब विरुध्द पक्ष यांनी टर्बो चार्जरची निम्मी किंमतही योग्यरित्या वसुल केलेली आहे. तसेच तक्रारदाराने या वाहनाचा 2 वेळा अपघात झालेबाबतची वस्तुस्थिती या मंचासमोर लपवून ठेवली असल्याने सदरची तक्रार चालणेस पात्र नाही.
11) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष यांनी सदर वाहनाची सर्व्हीस हिस्टरी नमूद करतांना वाहनाच्या रजिस्ट्रेशनबाबतची हिस्टरी तसेच इतर बाबी मुद्दामहून चुकीच्या नमूद केलेल्या आहेत. तसेच ऑईल कंझम्पशनचा प्रॉब्लेम दूर करुन दिला नाही. तसेच सदरचे वाहन दि.9/10/2013 पासून विरुध्द पक्ष 1 यांच्या ताब्यात वाहनातील दोष निवारण करुन मिळणेसाठी दिलेले आहे. त्याबाबतचे जॉब स्लिप क्र.4914 तक्रारदारांना दिलेली आहे. तथापि तक्रारदारांनी वारंवार पत्रव्यवहार करुन देखील विरुध्द पक्ष यांनी सदर वाहनातील दोष दूर करुन दिलेले नाहीत तसेच वाहन देखील ताब्यात दिलेले नाही.
12) तक्रारदाराने दाखल केलेला एकंदरीत पुरावा पाहता तक्रारदार किंवा विरुध्द पक्ष यांनी सदर वाहनाचा अपघात 2 वेळा झालेबाबत कोणताही पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. केवळ सर्व्हीस हिस्ट्रीमध्ये अपघात असे नमूद आहे. म्हणून असे म्हणावे लागेल की, सदरची सर्व्हीस हिस्ट्री ही वि.प.1 यांनी तयार केलेली कागदपत्रे आहेत. जर वाहनाचा खरोखरच अपघात झाला असता तर त्याबाबत पोलीस स्टेशनकडील कागदपत्रे या कामी हजर करणे विरुध्द पक्ष यांना शक्य होते. सबब अशा कोणत्याही कागदपत्रांशिवाय सदरचे वाहन अपघातग्रस्त होणे किंवा तक्रारदाराने सदरचे वाहन निष्काळजीपणे वापरले याबाबी शाबीत होत नाहीत. म्हणून सदरच्या वॉरंटीमधील कलम 7 याचा फायदा विरुध्द पक्ष क्र.1 यांना घेता येणार नाही. सबब सदरच्या वाहनाची वॉरंटी संपुष्टात आली आहे हा विरुध्द पक्ष यांचा युक्तीवाद मान्य करता येणार नाही.
13) एकंदरीत कागदपत्रे व युक्तीवाद यांचा विचार करता हे सिध्द होते की विरुध्द पक्ष क्र.1 यांनी सदर वाहनातील ऑईल कंझम्पशनबाबत तक्रार दूर करुन दिलेली नाही. तसेच सदरचे वाहन 9/10/2013 पासून विरुध्द पक्ष 1 यांच्या ताब्यात आहे. सदरचे वाहन तक्रारदार यांच्या ताब्यात देणेबाबत किंवा त्यातील दोष दूर केलेबाबत विरुध्द पक्ष 1 यांनी तक्रारदाराला काहीही कळविले नाही. केवळ नोटीस उत्तरात सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. विरुध्द पक्ष यांनी वाहनातील ऑईल कंझम्पशनचा दोष दूर करणेबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. सबब विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली अथवा ग्राहक म्हणून दिलेल्या सेवेमध्ये त्रुटी ठेवल्या ही बाब शाबीत होते. तसेच वॉरंटी पिरियड अस्तित्वात असतांना देखील 50% टर्बो चार्जेस वसूल केले ही बाब देखील सिध्द होते. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
14) मुद्दा क्र.4 व 5 – वरील सर्व विवेचनावरुन हे मंच या निर्णयाप्रत येते की, विरुध्द पक्ष यांनी वादविषयक वाहनातील ऑईल कंझम्पशनचा दोष दूर करुन देणे योग्य ठरेल. तसेच वॉरंटी कालावधी अस्त्विात असतांना वसुल केलेली रक्कम रु.16333/- तक्रारदारास परत दयावेत. तक्रारदाराने मागणी केलेली रक्कम रु.3,000/- दर दिवशी याप्रमाणे एकुण 3,33,000/- प्रमाणे नुकसान भरपाई मान्य करता येणार नाही. कारण त्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने हजर केलेला नाही. तथापि तक्रारदाराचे वाहन सामनेवाला यांचेकडे दोष निवारणासाठी पडून राहिल्यामुळे तक्रारदाराना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्याबाबत तक्रारदार हे रक्कम रु.10,000/- तसेच या अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.4 व 5 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
15) सबब आदेश खालीलप्रमाणे –
आदेश
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः30/05/2014
Sd/- Sd/-
(अपर्णा वा. पळसुले) (श्रीमती वफा ज. खान)
अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.