निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/03/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 04/04/2013
कालावधी 01 वर्ष 30 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
शे.उस्मान पि.शे.ईस्माईल.कुरेशी. अर्जदार
वय 40 वर्षे. धंदा.व्यापार. अड.एन.व्हि.कोकड.
रा.भगवती नगर,गंगाखेड ता.जि.परभणी.
विरुध्द
व्यवस्थापक,महिंद्रा फायनान्स, गैरअर्जदार.
वसमत रोड,परभणी. अड.आर.बी.चव्हाण.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवे बद्दल व तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराकडून अवास्तव पैशाची मागणी न करता करारा प्रमाणे पैसे घ्यावेत म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे, अर्जदार हा गंगाखेड येथील रहिवासी असून तसेच तो शेती व्यवसाय करतो व त्याला जोडधंदा म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडून एक ट्रक खरेदी केला, ज्याचा क्रमांक MH-22-AA-2586 असा आहे.अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, सदरचा ट्रक गैरअर्जदाराकडून विकत घेतला असल्यामुळे तो ग्राहक आहे. व गैरअर्जदार हा दुकानाचा मालक आहे सदरचा ट्रक अर्जदाराने नोव्हेंबर 2011 मध्ये गैरअर्जदाराकडून खरेदी केला ज्याची किंमत 15,40,000/- होती व अर्जदाराने गैरअर्जदारास मासिक हप्त्यापोटीही 43,000/- पर्यंत 36 हप्ते व 41000/- पर्यंत 12 हप्त्यामध्ये देण्याचा चार वर्षाचा करार झाला होता.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नियमित हप्ते भरले तक्रार दाखल करते वेळी अर्जदाराने रु.1,05,000/- भरले,परंतु काही आर्थिक अडचणीमुळे अर्जदारास दोन हप्ते भरण्यास विलंब झाला म्हणून गैरअर्जदार सतत गाडी जप्त करतो अशा धमक्या देत होते त्यामुळे अर्जदाराचे मानसिक संतुलन बिघडले आहे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, हप्ता भरण्याची तारीख महिन्याच्या प्रत्येक 25 तारखेला आहे,परंतु आर्थिक परिस्थिती ठिक नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारास मुदत मागितली,परंतु गैरअर्जदाराने ऐकले नाही, म्हणून सदरची तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार कोणत्याही क्षणी गाडी जप्त करु शकतो व त्याने गाडी जप्त केलीतर अर्जदाराचे कधीही न भरुन येणारे नुकसान होणार आहे. तसेच अर्जदार 01 मार्च 2012 रोजी गैरअर्जदाराकडे हप्ता भरण्यास तयार आहे असे सांगितले, परंतु त्यावेळी गैरअर्जदाराने असे सांगितले उर्वरित दोन हप्ते व पुढील दोन हप्ते जमा करा अन्यथा आम्ही गाडी जप्त करु.असे सांगितले म्हणून सदरची तक्रार दाखल केलेली आहे,व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मान्य करुन गैरअर्जदारास आदेश द्यावेत अर्जदाराकडून अवास्तव पैशाची मागणी करु नये असा आदेश मंचास मागितला आहे.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने शपथपत्र दाखल केले आहे. व तसेच नि.क्रमांक 8 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 8/2 वर सर्टिफिकेट ऑफ फिटनेस MH-22-AA-2586 तसेच 8/3 वर सदरचे ट्रकचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, 8/4 वर गुड्स कॅरिज परमिट 8/5 वर गाडी रिसिप्ट (14/12/2011) ची दाखल केलेली आहे.तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्या होत्या व नि.क्रमांक 13 वर गैरअर्जदाराने वकिला मार्फत आपला जबाब दाखल केला आहे.त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही संपूर्ण खोटी व कायद्याच्या विरुध्द असल्या कारणाने खारीज होणे योग्य आहे त्याचे असे म्हणणे आहे की, अर्जदार व गैरअर्जदार यांच्या मध्ये सदरचे ट्रक व्यवहारावेळी करार झाला होता आणि त्या करारा प्रमाणे विद्यमान ग्राहक मंचास सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार नाही, Arbitration Clause No.26 प्रमाणे कोणताही वाद उदभवल्यास सदरचे प्रकरण Arbitration कडे दाखल करावे आणि सदरची Arbitration मुंबई येथे आहे त्यामुळे विद्यमान ग्राहक मंचास सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार नाही व तसेच गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, करारनाम्याच्या नियम 27 प्रमाणे अर्जदार व गैरअर्जदार यांनी हे मान्य केले होते की, सदरील व्यवहारा बद्दल कोणताही वाद उदभवल्यास मुंबई येथे चालवावयाचे व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की अर्जदाराने गैरअर्जदाराकडून लोन घेतेवेळी कायदेशिर कर्ज करारनामा नं.1729685 चा दिनांक 29/09/2011 अन्वये अर्जदाराने सदरचे ट्रक गैरअर्जदाराकडून फायनान्सवर खरेदी केले सदरच्या कर्जाची परतफेड 44 हप्त्यामध्ये करावयाची ठरली होती व हप्ता हे रु.43,175/- दरमहा निश्चित करण्यात आला होता गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने करारा प्रमाणे हप्त्याची परतफेड केलेली नाही व अर्जदाराने कायद्याचे उल्लंघन केलेले आहे तसेच गैरअर्जदाराने सदरची तक्रार खारीज करावी व अर्जदाराच्या हक्का मध्ये नि.क्रमांक 3 वर अंतरिम आदेश रद्दबातल करण्यात यावे.असे म्हंटले आहे.गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 14 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.व तसेच नि.क्रमांक 15 वर 10 कागदपत्रांच्या छायाप्रती सह सत्यप्रत दाखल केलेले आहे.प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला.दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराकडून अवास्तव पैशाची मागणी
करुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून नोव्हेंबर 2011 मध्ये 15,40,000/- रुपयास ट्रक क्रमांक MH-22-AA-2586 खरेदी केला ही अडमिटेड फॅक्ट आहे.अर्जदाराने तक्रार अर्जासोबत सदरच्या ट्रकचे फिटनेस सर्टिफिकेटची छायाप्रत, सदरच्या ट्रकचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची छायाप्रत, तसेच सदरच्या ट्रकचे गुड्स परमिटचे छायाप्रत व तसेच गैरअर्जदाराकडून सदरचे ट्रक खरेदी करते वेळी ( महिंद्रा फायनान्स ) दिनांक 14/12/2011 रोजी 50,000/- रुपये रक्कम भरल्याची पावती दाखल केली आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचा अर्जदार हा ग्राहक आहे हे सिध्द झाले आहे. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 15 वरील अर्जदार व गैरअर्जदार यांच्या मध्ये सदरचे ट्रक खरेदी व्यवहारा वेळी झालेला करारनामा दाखल केलेला आहे.त्यावरुन असे सिध्द होते की, अर्जदाराने सदरचे ट्रक 14,4,0000/- रुपयास खरेदी केले व मासिक हप्ता रु. 43,175/- (25/10/2011 ते 25/03/2014) हे 30 महिन्या करीता व रु. 41,566/- ( 25/04/2014 ते 25/05/2015) हे 14 महिन्याकरीता द्यावयाचे करारनाम्याव्दारे अर्जदाराने कबुल केले होते. हे सिध्द होते, सदरचा करार अर्जदाराने गैरअर्जदाराकडून फायनान्सवर दिनांक 29/09/2011 रोजी Vide Loan Agreement No.1729685 अन्वये झाला, परंतु अर्जदाराने गैरअर्जदाराकडे हप्त्यापोटी केवळ 1,05,000/- भरले हे प्रथमदर्शनी सिध्द होते, व त्यानंतर अर्जदाराने मंचासमोर नि.क्रमांक 3 वर Status-quo जैसे थे परिस्थिचा हुकूम दिनांक 07/03/2012 रोजी मिळविला व त्या दिवसा पासून ते आजपर्यंत अर्जदाराने कराराचे हप्त्यापोटी कराराच्या नियमा प्रमाणे गैरअर्जदाराकडे एकही हप्ता भरलेला नाही,असे मंचास दिसून येते.अर्जदाराने गैरअर्जदारा सोबत झालेल्या करारा प्रमारणे सदरचे ट्रक खरेदी करते वेळी घेतलेल्या कर्जापोटी गैरअर्जदाराची रक्कम ठरलेल्या हप्त्या प्रमाणे परत करणे आवश्यक आहे, त्यामुळे गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही हे सिध्द होते, तसेच गैरअर्जदाराने करारा प्रमाणे हप्त्या व्यतिरिक्त पैशाची अर्जदारास कोठेही मागणी केल्याचे रेकॉर्डवर दिसून येत नाही. व तसेच अर्जदाराने त्याची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ आहे हे रकॉर्डवरुन दिसून येते,सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे.
2 अर्जदार व गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च आपआपला सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
सदस्य अध्यक्ष