(घोषित दिनांक 13/01/2011 द्वारा – श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले फुलगोबी एफ-1 385 हे बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 17/10/2008 रोजी खरेदी केले. सदर बियाणाची त्याचे वडिलानी ठोक्याने घेतलेल्या जमिनीत रोपे तयार करण्यासाठी दिनांक 19/10/2008 रोजी पेरणी केली व त्यानंतर सदरील रोपाची पुर्नलागवड दिनांक 18/11/2008 रोजी केली. पिकास गैरअर्जदारांचे सांगण्यानुसार किटक नाशकांची फवारणी केली व पाणी दिले त्यामुळे पीकाची वाढ झाली. गैरअर्जदारांच्या सदोष व भेसळयुक्त बियाणामुळे गोबीच्या पुर्नलागवड रोपास गोबीची गुंडी आली नाही आणि झाडाची पूर्ण वाढ झाली परंतू वाढ झाल्यानुसार त्यांना गोबीचे गठ्ठे लागले नाही त्यामुळे त्याचे 100 टक्के नुकसान झाले. तक्रारदाराने पिकाचे नुकसानीबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती फुलंब्री यांचेकडे दिनांक 16/1/2009 रोजी तक्रार केली. त्यानुसार संबंधित अधिका-यांनी गोबीच्या पीकाची दिनांक 17/1/2009 रोजी पंचासमक्ष पाहणी केली आणि कृषी विकास अधिकारी औरंगाबाद यांनी जिल्हास्तरीय चौकशी समितीचा अहवाल तयार केला. सदर पीकावर त्याने एकूण रु 41,500/- एवढा खर्च केला परंतु सदोष व भेसळयुक्त बियाणामुळे योग्य त-हेने गोबीची गुंडी झाडास लागली नाही त्यामुळे त्याचे फार मोठे नुकसान झाले. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून बियाणाचा खर्च, आर्थिक व मानसिक त्रास व झालेले नुकसान असे एकूण रु 1,00,000/- 12 टक्के व्याजासह मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी एकत्रित लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराने गोबीचे बियाणे खरेदी केल्याचे मान्य केले आहे. गैरअर्जदारांचे म्हणण्यानुसार तक्रारदाराने पीकाला योग्य खते दिली व वेळोवेळी औषध फवारणी केली याचा पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराने दिनांक 16/122009 रोजी कृषि अधिकारी फुलंब्री यांचेकडे तक्रार दाखल केली व त्यांनी लगेच दिनांक 17/1/2009 रोजी पाहणी पंचनामा केला. सदर पंचनामा गैरअर्जदारांच्या अनुपस्थितीत केला त्यामुळे गैरअर्जदारांना मान्य नाही. बियाणाचे पुर्नलागवडीनंतर 65 ते 70 दिवसानंतर पहिल्यांदा पीक काढण्यात येते व गट्टयाचे वजन एक ते दीड किलो असते. तक्रारदाराने पुर्नलागवडीनंतर 60 दिवसाने तक्रार केली व लगेच दुस-या दिवशी पंचनामा करण्यात आला. तकारदाराला सरासरी 500 ग्रॅम प्रति गोबी गट्टयाप्रमाणे प्रतयेकी 40 किलोचे पोते प्रमाणे 31 पोते म्हणजे 1240 किलो एवढे उत्पन्न झाले आहे. कृषी अधिका-यांनी गेरअर्जदारांकडील बियाणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी न पठवता अहवाल दिलेला आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार कंपनीला बदनाम करुन पैसे वुल करण्यासाठी पीक येण्या अगोदरच चुकीची तक्रार केलेली आहे. तक्रारदाराने आपल्याच नातेवाईकांच्या संमतीने एकमेकास साक्ष राहून गैरअर्जदारांविरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार दंडासहीत फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराने लेखी युक्तिवाद दाखल केला. गैरअर्जदारांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 गोल्डन सीड्स यांनी उत्पादीत केलेले गोबी बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 महावीर बीज भांडार यांचेकडून दिनांक 13/11/2008 रोजी खरेदी केले याबाबत वाद नाही. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार त्याने सदर बियाणाची रोपे तयार करुन दिनांक 14/12/2008 रोजी रोपाची पुर्नलागवड केली. परंतू या पुर्नलागवड रोपास गोबीची गुंडी आली नाही व त्याचे नुकसान झाले म्हणून त्याने गट विकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांचेकडे तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी पीकाची पाहणी केली व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी अहवाल तयार केला. सदर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, कृषी विकास अधिका-याने स्वत: पीकाची पाहणी केलेली नसून जिल्हा स्तरीय समितीने केलेला पंचनामा व तक्रारदाराने सांगितल्यानुसार अभिप्राय नोंदविलेला आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या दिनांक 17/1/2009 रोजीच्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता सदर पंचनाम्यावर जिल्हास्तरीय समितीतील तज्ञ व्यक्तींच्या सहया दिसून येत नाही त्यामुळे पंचनाम्याचे वेळेस तज्ञ व्यक्ति हजर होते असे म्हणता येणार नाही. सदर पंचनामा शासनाचे परिपत्रकाप्रमाणे जिल्हा स्तरीय चौकशी समितीच्या तज्ञ व्यक्तींनी केलेला नसल्यामुळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी दिलेल्या अभिप्रायाला कांहीही अर्थ नाही. तसेच बियाणे सदोष असल्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा अभिप्राय पुराव्याशिवाय गृहीत धरता येत नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या झालेल्या नुकसानीस गैरअर्जदारांना जबाबदार धरता येणार नाही. गैरअर्जदारांनी तक्रारदारास सदोष व भेसळयुक्त गोबीच्या बियाणाची विक्री केली त्यामुळे त्याचे नुकसान झाले ही बाब सिध्द करण्यास तक्रारदार असमर्थ ठरला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार फेटाळण्यात येते. 2. दोन्ही पक्षांनी आपापला खर्च सोसावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |