Maharashtra

Beed

CC/11/22

Shamrao Madhavrao Gadale - Complainant(s)

Versus

Manager,Mahatma Phule Sahakari Urban Bank - Opp.Party(s)

13 May 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/22
 
1. Shamrao Madhavrao Gadale
R/o Sahyog Nagar Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Mahatma Phule Sahakari Urban Bank
Opp Bus Stand Patoda
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच बीड यांचे समोर
 
ग्राहक तक्रार क्रमांक 22/2011       तक्रार दाखल तारीख –31/03/2011
                                     निकाल तारीख – 13/05/2011    
-------------------------------------------------------------
शामराव माधवराव गदळे,
वय- 60 वर्षे, धंदा- शेती,
रा. घर नं. 5, मधुरा अपार्टमेंट,
सारडानगरी, सहयोग नगर, बीड.                  ...   तक्रारदार
 
                            विरुध्‍द
मा. व्‍यवस्‍थापक,
महात्‍मा फुले अर्बन सहकारी बँक मर्या. पाटोदा
कार्यालय बस स्‍टॅड पाटोदा समोर,
ता. पाटोदा जि. बीड.                            ... सामनेवाला 
 
              को र म - पी.बी.भट, अध्‍यक्ष
                         सौ. एम. एस. विश्‍वरुपे, सदस्‍या.
 
 
             तक्रारदारातर्फे       :- -अँड. जे. एम. मुरकुटे.     
             सामनेवालेतर्फे       :- अँड. व्‍ही.डी.पंडीत. 
 
                             निकालपत्र
                           (घोषित द्वारा- सौ. एम. एस. विश्‍वरुपे, सदस्‍या)
           
            तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
      तक्रारदाराने सामनेवाले बँकेमध्‍ये तारीख 02/08/2010 रोजी रु. 75,000/- मुदत ठेवीत ठेव म्‍हणून जमा केलेली आहे. त्‍याची पावती क्रं. 21052 व एल एफ नं. 49/27 असा आहे. सदर ठेवीचा कालावधी 3 महिन्‍याचा होता. तो कालावधी तारीख 02/11/2010 रोजी पूर्ण झालेला आहे. सदर ठेवीवर द.सा.द.शे. 10 टक्‍के व्‍याज देण्‍याचे सामनेवालेंनी कबूल केलेले आहे व त्‍याबाबत ठेव पावती सामनेवालेंनी तक्रारदारांना दिलेली आहे.
      मुदत संपल्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवालेकडे रक्‍कमेची मागणी केली असता सामनेवालेंनी रक्‍कम न दिल्‍याने तक्रारदाराने तारीख 27/11/2010 रोजी लेखी स्‍वरुपात अर्ज करुन रक्‍कमेची मागणी केली. त्‍याचे सामनेवालेने कोणतेही उत्‍तर दिलेले नाही.
      तारीख 22/12/2010 रोजी तक्रारदाराने सामनेवालेंना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून रक्‍कम देण्‍याबाबत सुचित केले. तरी सुध्‍दा सामनेवालेंनी रक्‍कम दिली नाही. सामनेवालेंनी तक्रारदारांना दयावयाच्‍या सेवेत कसूर केलेला आहे. त्‍यामुळे मानसिक त्रास व खर्चापोटी तक्रारदाराने सामनेवालेकडून रक्‍कम रु. 10,000/- ची मागणी केलेली आहे.
      विनंती की, तक्रारदारास मुदत ठेवीची रक्‍कम रु. 75,000/- त्‍यावर 10 टक्‍के व्‍याजासह देण्‍याबाबत आदेश व्‍हावा. मानसिक त्रास व इतर खर्चापोटी रु. 10,000/- देण्‍याबाबत आदेश व्‍हावा.
      सामनेवाले न्‍याय मंचात हजर झाले परंतू त्‍यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत खुलासा दाखल केला नाही म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍द खुलाशाशिवाय तक्रार चालविण्‍याचा निर्णय न्‍याय मंचाने तारीख 03/05/2011 रोजी घेतला.
      तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. मुरकुटे यांचा युक्तिवाद ऐकला.
      तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने तारीख 02/08/2010 रोजी 3 महिन्‍यासाठी सामनेवाले बँकेत रक्‍कम रु. 75,000/- मुदतीच्‍या ठेवीत ठेवलेली आहे. त्‍याबाबत बँकेने पावती क्रं. 21053 एल एफ नं. 4927 ची दिलेली आहे. सदर ठेवीची मुदत तारीख 02/11/2010 रोजी पूर्ण झालेली आहे. सदर ठेवीवर बँकेने द.सा.द.शे.
10 टक्‍के व्‍याज देण्‍याचा करार केलेला आहे.
      मुदत संपल्‍यानंतरही सामनेवालेंनी तक्रारदारांना रक्‍कम दिलेली नाही. व्‍याजासह होणारी रक्‍कम दिलेली नाही, त्‍यामुळे तक्रारदारांने तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे तारीख 27/11/2010 रोजी लेखी अर्ज व तारीख 22/12/2010 रोजी नोटीस पाठवलेली आहे. परंतू तक्रारदारांना रक्‍कम मिळालेली नाही, त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार आहे. सदर तक्रारीस सामनेवालेंनी आव्‍हान दिलेले नाही व रक्‍कम का देवू शकलेले नाहीत याबाबत सामनेवालेचा खुलासा दाखल नाही, त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या तक्रारीतील म्‍हणणे ग्राहय धरण्‍यापलीकडे न्‍याय मंचास पर्याय नाही. मुदत संपल्‍यानंतर ठेव पावतीतील व्‍याजाप्रमाणे होणारी रक्‍कम देण्‍याची जबाबदारी सामनेवालेंची असतांना सामनेवालेने तक्रारदारांना रक्‍कम अदा केलेली नाही, ही बाब सेवेत कसूर करणारी आहे. त्‍यामुळे सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट झाल्‍याने सामनेवालेंनी तक्रारदारांना मुदत ठेव रक्‍कम त्‍यावर होणारे व्‍याज ठरलेल्‍या कराराप्रमाणे सामनेवालेंनी तक्रारदारांना देणे उचित होईल, असे न्‍याय मंचाचे मत आहे.
      मुदत ठेव ज्‍या उद्देशाने तक्रारदाराने ठेवलेली आहे तो तक्रारदाराचा उद्देश सफल न झाल्‍याने निश्चितच तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे व त्‍यामुळे मानसिक त्रासाची रक्‍कम रु. 3,000/- व तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम रु. 2,000/- सामनेवालेंनी तक्रारदारांना देणे उचित होईल, असे न्‍याय मंचाचे मत आहे.
      सबब, न्‍याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
                        आ दे श
1.     सामनेवालेंना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारांना मुदत ठेवीची रक्‍कम रु. 75,000/- (अक्षरी रुपये पंच्‍याहत्‍तर हजार फक्‍त) अधिक त्‍यावर 3 महिन्‍याचे द.सा.द.शे. 10 टक्‍के व्‍यजाची होणारी रक्‍कम आदेश मिळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत अदा करावी.
2.    सदर रक्‍कम विहीत मुदतीत अदा न केल्‍यास त्‍यावर तारीख 02/11/2010 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के प्रमाणे व्‍याज देण्‍यास सामनेवाले जबाबदार राहतील.
3.    सामनेवालेंना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्‍कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार) व तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम रु. 2,000/- (आक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) आदेश मिळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत अदा करावेत.
 
 
                          (सौ.एम.एस.विश्‍वरुपे)    ( पी.बी.भट )
                               सदस्‍या,            अध्‍यक्ष,
चुनडे/- स्‍टेनो            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, बीड जि.बीड 
 
 
 
 
 
 
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.