::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/02/2018 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, तक्रारकर्त्याने सदर तक्रार, विरुध्द पक्षाने दिलेले बियाणे उगवले नाही म्हणून त्याबद्दलची नुकसान भरपाई मिळण्याकरिता मंचात दाखल केले होते.
प्राथमिक युक्तिवादाच्या वेळेस तक्रारकर्ते यांना मंचाने तालुका कृषी अधिकारी यांचा अहवाल, दाखल करा, असे तोंडी आदेश दिले होते. परंतु त्यानंतर तक्रारकर्ता सतत गैरहजर असून, त्यांनी प्रकरणात कोणतीही कार्यवाही केली नाही व मंचात हजर झाले नाही. यावरुन तक्रारकर्ते यांना प्रकरणात स्वारस्य नाही, असे मंचाचे मत आहे. म्हणून सदर तक्रार डिसमीस इन डिफॉल्ट करण्यात येते. सबब पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
अशास्थितीत, सदर प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार, डिसमीस इन डिफॉल्ट करण्यात येते.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri