Maharashtra

Akola

CC/15/82

Mohd.Ali Usufali Kapasi - Complainant(s)

Versus

Manager,Magma Fincop Ltd. - Opp.Party(s)

Pravin Tayade

11 Sep 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/82
 
1. Mohd.Ali Usufali Kapasi
R/o.Subhash Chowk,Hanuman Basti, Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Magma Fincop Ltd.
Vaishnavi Complex,Gorakshan Rd.Akola
Akola
Maharashtra
2. Manager,Magma Fincop Ltd.
Plot No.81,Hil Rd.Ram nagar,Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Manager,Magma Fincop Ltd.
Magma House,24 park Rd.Colkata
Colkata
West Bangaal
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

तक्रारकर्त्‍यातर्फे वकील  :-  ॲड.  प्रविण तायडे    

विरुध्‍दपक्षातर्फे वकील  :- ॲड. आर.आर. पाली  

::: आ दे श प त्र  :: 

मा. सदस्‍या, श्रीमती भारती केतकर यांनी निकाल कथन केला :-

     ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्‍वये तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-

    तक्रारकर्ता हा वरील ठिकाणचा रहिवाशी असून तक्रारकर्त्‍याने आपल्‍या चरितार्थासाठी चार चाकी टाटा सुमो ग्रँडी कार विकत घेणेकरिता विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांचेकडून वित्‍त पुरवठा जून 2012 मध्‍ये ₹ 6,50,000/- घेतला.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ही गरजु व्‍यक्‍तींना वित्‍त पुरवठा करणारी कंपनी असून विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 व 3 हे विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ची वरिष्‍ठ शाखा आहेत.

    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कडून चार चाकी टाटा सुमो ग्रॅन्‍डी कार घेणेकरिता वित्‍तपुरवठा घेतला, त्‍या टाटा सुमो गाडीचा क्रमांक एमएच-30एएफ-52 असा होता.  ठरलेल्‍या ई.एम.आय. प्रमाणे वेळावेळी ₹ 2,00,000/- रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या खात्‍यात जमा केली.  तदनंतर तक्रारकर्त्‍याच्‍या वैयक्तिक अडचणीमुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ला पत्र देवून सदरची टाटा सुमो गाडी दिनांक 15-09-2013 रोजी विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या अधिका-यास सुपूर्द केली.  गाडी सुपूर्द करतेवेळी गाडीची स्थिती ही चांगली होती.  त्‍यानंतर दिनांक 20-09-2013 ला विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या उपस्थितीत सरकारी किंमतीवर श्रीकांत पिंपळे यांचेमार्फत मुल्‍यांकन काढले असता ते ₹ 7,25,000/- असे होते.  त्‍यासंबंधीचा रिपोर्टसुध्‍दा श्रीकांत पिंपळे यांनी दिलेला आहे.

    सदरची टाटा सुमो गाडी विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांना तक्रारकर्त्‍याने परत केल्‍यानंतर सुध्‍दा विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक 23-10-2013 रोजी ₹ 72,000/- मिळणेबाबतची खोटया आशयाची नोटीस पाठविली.  वास्‍तविक पाहता तक्रारकर्त्‍याकडे विरुध्‍दपक्षाचे कुठलेही येणे बाकी नाही.   त्‍याचप्रमाणे दिनांक 22-11-2014 रोजी विरुध्‍दपक्ष यांनी मिळून तक्रारकर्त्‍याला लवाद नियुक्‍तीबाबतची नोटीस पाठविली.  अशा खोटया आशयाच्‍या इतर Notices सुध्‍दा विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला पाठविल्‍या.  सदर संपूर्ण Notices ला तक्रारकर्त्‍याने आपले वकिलामार्फत वेळोवेळी उत्‍तर सुध्‍दा दिले.  परंतु, सदर उत्‍तराची विरुध्‍दपक्ष यांनी कुठलीही दखल न घेता तक्रारकर्त्‍याला अशा प्रकारच्‍या खोटया आशयाच्‍या Notices पाठवून नेहमी मानसिक त्रास दिला आहे.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाची देणे असलेली संपूर्ण रक्‍कम ही त्‍याने भरलेली ₹ 2,00,000/- व त्‍याच्‍या गाडीची असलेली किंमत ₹ 7,25,000/- या एकूण ₹ 9,25,000/- मधून घेता येऊ शकते.  परंतु, तसे न करता विरुध्‍दपक्ष यांनी वैयक्तिक हेतू साधण्‍याचे दृष्‍टीने तक्रारकर्त्‍याला ₹ 72,000/- मिळणेबाबत नोटीस पाठवून मानसिक व आर्थिक स्‍वरुपाचा त्रास दिलेला आहे.  वास्‍तविक पाहता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कडून ₹ 6,50,000/- वित्‍त पुरवठा घेतला व तक्रारकर्त्‍याने भरलेली रक्‍कम ₹ 2,00,000/- व त्‍याच्‍या गाडीची असलेली किंमत ₹ 7,25,000/- या एकूण ₹ 9,25,000/- रकमेमधून वित्‍त पुरवठयाची रक्‍कम ₹ 6,25,000/- वजा करुन ₹ 2,75,000/- तक्रारकर्त्‍याला परत करावयास पाहिजे होते.  तसे विरुध्‍दपक्ष यांनी न करता तक्रारकर्त्‍यालाच ₹ 72,000/- ची गैरकायदेशीर मागणी केली.  विरुध्‍दपक्ष ही खाजगी कंपनी असून विदयमान रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे दिशा निर्देशांचे कुठलेही पालन करीत नाही आणि आपल्‍या मनमानी धोरणानुसार कार्यवाही करुन आपल्‍या ग्राहकांना त्रस्‍त करतात.

       तक्रारकर्ते हे अकोल्‍यातच वास्‍तव्‍य करणारे असून सुरक्षा म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रमांक  1 यांनी धनादेश घेतले आहेत ते सुध्‍दा लेखी नोटीसद्वारे तक्रारकर्ते यांनी परत मागितले आहेत.  त्‍याबाबत सुध्‍दा कुठलेही उत्‍तर विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ते यांना दिलेले नाही.  दिनांक 14-11-2013 रोजी ॲड. तायडे यांचेमार्फत तक्रारकर्ते यांनी विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांना लेखी नोटीस पाठवून धनादेश परत मिळावे म्‍हणून मागणी केली आहे. 

       तक्रारकर्ते यांनी गाडीचे सर्व अस्‍सल दस्‍तऐवज, रजिस्‍टर्ड सर्टिफिकेट हे सुध्‍दा रजिस्‍टर पोस्‍टाने विरुध्‍दपक्ष यांना पाठविले आहे.   तक्रारकर्ते यांचेकडे कुठलीही रक्‍कम व कर्ज प्रकरणाबाबत विरुध्‍दपक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांची बाकी राहिलेली नाही. 

      विरुध्‍दपक्ष यांनी सदरची टाटा सुमो गाडी विक्री केल्‍याची माहिती दिली व सदरची गाडी ₹ 2,82,000/- ला विक्री केल्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला कळविले.  पण गाडीची बाजारभाव किंमत ही ₹ 7,25,000/- होती या घटनेबाबत सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने आपले वकिलामार्फत नोटीस पाठवून विरुध्‍दपक्ष यांना कळविले होते त्‍याची सुध्‍दा विरुध्‍दपक्ष यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही.

      तक्रारकर्ते यांची तक्रार ग्राहक या नात्‍याने अत्‍यंत योग्‍य आहे व त्‍यांची पिळवणूक विरुध्‍दपक्ष यांचेकडून होऊ नये व झालेल्‍या मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली केस नैसर्गिक न्‍याय तत्‍वानुसार योग्‍य आहे.  म्‍हणून तक्रार मंजूर करण्‍यात यावी, ही विनंती.

    सबब, तक्रारकर्त्‍याची प्रार्थना की, 1) तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करावी व तक्रारकर्त्‍याला त्‍याचे वाहन टाटा सुमो डीकोर नोंदणी क्रमांक :  एम.एच.-30/एएफ-0052 ही चार चाकी गाडीच्‍या किंमतीमधील उर्वरित रक्‍कम ₹ 2,75,000/- तक्रारकर्ते यांना विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांचेकडून मिळण्‍यासाठी आदेश पारित करण्‍यात यावा.  2) तक्रारकर्ते यांना विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांचेकडून झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासामुळे नुकसान भरपाई रक्‍कम ₹ 4,00,000/- मिळण्‍याचा आदेश पारित करण्‍यात यावा.  3) विरुध्‍दपक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांना टाटा सुमो गाडी बियरींग क्रमांक डीकोर मॉडेल 2010 नोंदणी क्रमांक एम.एच.-30-एएफ-52 या वाहनाबाबत खोटया आशयाच्‍या Notices पाठवून मानसिक त्रास देवू नये, करिता कायमचा मनाई हुकूम विरुध्‍दपक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांचेविरुध्‍द पारित करण्‍यात यावा.   

      सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्‍यासोबत एकंदर 06 दस्‍तऐवज पुरावा म्‍हणून दाखल केलेले आहेत.

विरुध्‍दपक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांचा संयुक्‍त लेखी जवाब :-

     सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांनी संयुक्‍त लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्‍हणणे फेटाळले व अधिकच्‍या कथनात असे नमूद केले आहे की, तकारकर्त्‍याने त्‍याच्‍या चरितार्थासाठी टाटा सुमो ग्रॅन्‍डी हे वाहन विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याकडून ₹ 6,50,000/- चे कर्ज घेऊन विकत घेतले होते.  सदरहू गाडी विकत घेतेवेळीस तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष यांच्‍यासोबत रितसर लेखी करारनामा करुन दिला व त्‍यातील सर्व अटी व शर्ती मान्‍य केल्‍यानंतरच त्‍यावर सहया केल्‍या.  करारनाम्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याने कबूल केले होते की, सदरहू कर्जातील किस्‍तीचा तक्रारकर्ता दर महिन्‍याला मुदतीच्‍या आंत भरणा करेल.  तसेच दोन्‍ही पक्षामध्‍ये कुठल्‍याही प्रकारचा वाद उदभवल्‍यास सदरहू वाद हा आपसी समझोत्‍याने मिटविण्‍याकरिता दोन्‍ही पक्ष हे लवाद न्‍यायालयामध्‍ये मिटवतील.  तक्रारकर्त्‍याने सदरहू करारनाम्‍यातील कुठल्‍याही शर्ती व अटींचे पालन केले नाही व मुदतीच्‍या आंत गाडीच्‍या किस्‍तींचा भरणा वेळेवर केला नाही,  त्‍यामुळे कंपनीने तक्रारकर्त्‍याची गाडी रितसरपणे स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेऊन विक्री केली.  श्रीकांत पिंपळे यांनी दिलेल्‍या मुल्‍यांकन अहवालानुसार गाडीचे मुल्‍यांकन जरी ₹ 7,25,000/- एवढे दर्शविले असले तरी प्रत्‍यक्षात सदरहू गाडी हर्रास केल्‍यानंतर गाडीला ₹ 2,81,000/- एवढीच किंमत प्राप्‍त झालेली आहे व ती विरुध्‍दपक्षाने विकली व सदरची गाडी विकण्‍याआधी Foreclosure Notice सुध्‍दा दिनांक 19-09-2013 पाठविली व ती त्‍यांना दिनांक 23-09-2013 ला मिळाली होती. 

        तक्रारकर्ता व विरुध्‍दपक्ष यांच्‍यामध्‍ये गाडी क्रमांक एमएच-30/एएफ-52 विकत घेण्‍याकरिता विरुध्‍दपक्ष यांनी कर्ज पुरवठा केला होता व कर्ज पुरवठा करतेवेळी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यासोबत हायरपरचेस ॲग्रीमेंट केले होते.  ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 2 (1) (ड) तसेच कलम 2 (1) (ओ) या व्‍याख्‍येअंतर्गत वित्‍त पुरवठा कंपनी व तक्रारकर्ता यांच्‍यामध्‍ये ग्राहक व विक्रेता असे नाते नसून ते ग्राहक या संज्ञेमध्‍ये मोडत नाहीत.  दोन्‍ही पक्षामध्‍ये खात्‍यासंबंधी जर वाद असेल तो कलम 2 (1) (जी) ग्राहक संरक्षण कायदयानुसार ग्राहक या संज्ञेत मोडत नाही.  तक्रारकर्ता यांच्‍यावर आजपर्यंत रु.           ची थकबाकी असून ती थकबाकी विरुध्‍दपक्ष यांस तक्रारकर्त्‍याकडून दयावयाची आहे.  सदरहू थकबाकीची वसुली विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून करु नये याकरिता सदरचे खोटे प्रकरण तक्रारकर्ते यांनी विरुध्‍दपक्ष यांच्‍याविरुध्‍द दाखल केले आहे.  तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या तक्रारीमध्‍ये सदरहू चार चाकी गाडी जी त्‍याच्‍या चरितार्थासाठी घेतलेली आहे असे स्‍वत: सांगितलेले आहे व त्‍यामुळे सदरहू तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयाअंतर्गत चालू शकत नाही. म्‍हणून तक्रारकर्ते यांनी दाखल केलेली तक्रार खर्चासहित खारीज करण्‍यात यावी.   

    का र णे  व  नि ष्‍क र्ष

       सदर प्रकरणात विरुध्‍दपक्षाने जवाब देण्‍यास विलंब केल्‍याने विरुध्‍दपक्षाचा जवाब, दंड रक्‍कम आकारुन ती रक्‍कम तक्रारकर्त्‍याला देण्‍याच्‍या अटींवर स्विकारला गेला.  परंतु, विरुध्‍दपक्षाने युक्‍तीवादाच्‍या टप्‍प्‍यापर्यंत दंडाची रक्‍कम भरली नसल्‍याने विरुध्‍दपक्षाचा जवाब स्विकारु नये व तक्रारकर्त्‍याचे तक्रारीलाच लेखी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा  अशी पुर्सीस तक्रारकर्त्‍याने दिनांक 03-08-2015 रोजी दिली.  परंतु, त्‍यानंतर दिनांक 31-08-2015 रोजी तक्रारकर्त्‍याने दंडाची रक्‍कम स्विकारल्‍याने प्रकरणात विरुध्‍दपक्षाचा लेखी जवाब विचारात घेतला गेला.   विरुध्‍दपक्षाला संधी देऊनही विरुध्‍दपक्षाने तोंडी युक्‍तीवाद केला नाही किंवा लेखी युक्‍तीवाद दाखल केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार व तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍त तसेच विरुध्‍दपक्षाचा जवाब व विरुध्‍दपक्षाने दाखल केलेले दस्‍त यांच्‍या आधारेच सदर प्रकरणात आदेश पारित करण्‍यात आला.

     सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडून कर्ज स्‍वरुपात ₹ 6,50,000/- घेतले होते व ती कर्ज रक्‍कम विहीत मुदतीत सव्‍याज फेडण्‍याचा करार विरुध्‍दपक्षाच्‍या अटी शर्तींसह विरुध्‍दपक्षाशी केला होता.  यावरुन विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 हे वित्‍त पुरवठादार व तक्रारकर्ता हे विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांचे ग्राहक ठरतात.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी जरी त्‍यांच्‍या जवाबात तक्रारकर्ता यांचे ग्राहक असल्‍याचे नाकारले तरी ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत येत असल्‍याने तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांचा ग्राहक असल्‍याचे ग्राहय धरण्‍यात येत आहे.

      सदर तक्रारीनुसार मुख्‍य वादाचा मुद्दा असा की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कडून जून 2012 मध्‍ये ₹ 6,50,000/- कर्जाऊ घेतले व त्‍या रकमेत चार चाकी टाटा सुमो ग्रॅन्‍डी कार घेतली.  सदर कर्जाच्‍या परतफेडीच्‍या मासिक हप्‍त्‍यापोटी वेळोवेळी ₹ 2,00,000/- विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या खात्‍यात जमा केले.  परंतु, नंतर वैयक्तिक अडचणींमुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ला लेखी पत्र देऊन सदर वाहन दिनांक 15-09-2013 रोजी विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या अधिका-यास सुपूर्द केले.  त्‍यानंतर दिनांक 20-09-2013 रोजी विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या अधिका-याच्‍या उपस्थितीत सरकारी मुल्‍यांकन कर्ता श्री. श्रीकांत पिंपळे यांचेमार्फत मुल्‍यांकन काढले असता सदर वाहनाचे मुल्‍यांकन ₹ 7,25,000/- इतके निघाले होते असे असतांनाही विरुध्‍दपक्षाने सदर वाहन केवळ ₹ 2,82,000/- रुपयात विकल्‍याचे तक्रारकर्त्‍याला कळवले.  तक्रारकर्त्‍याने मासिक हप्‍त्‍यापोटी ₹ 2,00,000/- व ₹ 7,25,000/- इतके मुल्‍यांकन निघालेले वाहन विरुध्‍दपक्षाला ₹ 6,50,000/- च्‍या कर्जापोटी दिलेले असतांनाही विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍यांच्‍याकडे अजुन ₹ 72,000/- बाकी असल्‍याचे दिनांक 23-10-2013 रोजी नोटीसद्वारे कळवले व दिनांक 22-11-2014 ला लवादाच्‍या नियुक्‍तीबाबत कळवले.  ₹ 6,50,000/- च्‍या बदल्‍यात तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला ₹ 9,25,000/- इतकी परतफेड केली असतांनाही व तक्रारकर्त्‍याने मागणी करुनही तक्रारकर्त्‍याने सुरक्षा म्‍हणून जमा केलेले कोरे धनादेश विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ने परत केलेले नाही व ₹ 72,000/- ची मागणी करुन तकारकर्त्‍याला त्रास देत असल्‍याने तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.   

       यावर विरुध्‍दपक्षाने त्‍याच्‍या जवाबात सदर वाहन ₹ 2,82,000/- ला विकल्‍या गेल्‍याचे मान्‍य केले आहे व तक्रारकर्त्‍याकडे अजून रक्‍कम बाकी असल्‍याचे म्‍हटले आहे.   

      विरुध्‍दपक्षाच्‍या जवाबाचे व उभयपक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता विरुध्‍दपक्षाला अजून ₹ 72,000/- कसे देणे लागतो याचा खुलासा मंचाला झालेला नाही तसेच विरुध्‍दपक्षाने युक्‍तीवाद ही केलेला नसल्‍याने युक्‍तीवादातूनही सदर रकमेचा खुलासा मंचाला झालेला नाही.  विरुध्‍दपक्षाच्‍या जवाबातील पृष्‍ठ क्रमांक 6 व परिच्‍छेद क्रमांक 12 यात सुध्‍दा  तक्रारकर्त्‍यावर आजपर्यत रुपये       ची थकबाकी असून ती थकबाकी विरुध्‍दपक्ष यांस तक्रारकर्त्‍याकडून दयावयाची आहे. असे नमूद केलेले दिसून येते.   रुपये यांचे पुढील जागा रिक्‍त ठेवण्‍यात आलेली दिसून येते.   तसेच तक्रारकर्त्‍याने जमा केलेली रक्‍कम व तक्रारकर्त्‍याचे वाहन विकून आलेली रक्‍कम वजा जाता तक्रारकर्त्‍याकडे ₹ 72,000/- कसे बाकी राहतात, याचा कुठलाच हिशोब विरुध्‍दपक्षाने मंचासमोर दाखल केलेला नाही.  त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या तक्रारीत उल्‍लेख केलेली व विरुध्‍दपक्षाने त्‍याच्‍या जवाबात दुजोरा दिलेली दिनांक 22-11-2014 ची लवादाच्‍या नियुक्‍तीची नोटीस व दिनांक 23-10-2013 ची ₹ 72,000/- ची थकबाकी तक्रारकर्त्‍याकडे असल्‍याचे कळवणारी नोटीस उभयपक्षांनी दाखल केलेली नसल्‍याने तक्रारकर्त्‍याकडून विरुध्‍दपक्षाला ₹ 72,000/- घेणे बाकी आहे, याला पुष्‍टी मिळत नाही. 

       विरुध्‍दपक्षाने त्‍याच्‍या जवाबाबरोबर जोडलेल्‍या दस्‍तांपैकी दस्‍त क्रमांक 5, 6, 7, 8, 9 यावरुन तक्रारकर्त्‍याचे वाहन श्री. सतीश सुभाष वाटखेडे यांना हर्रासीद्वारे ₹ 2,81,000/- रुपयात विकण्‍यात आल्‍याचे दिसून येते.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या प्रार्थनेतील उर्वरित रक्‍कम परत मिळण्‍याची मागणी मंचाला मान्‍य करता येणार नाही.  परंतु, तक्रारकर्त्‍याकडे ₹ 72,000/- ची थकबाकी आहे हे सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी सिध्‍द् न केल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या प्रार्थनेतील दुस-या क्रमांकाची मागणी सदर मंच मान्‍य करत आहे. तसेच सदर प्रकरणाच्‍या खर्चापोटी ₹ 2,000/- व शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी ₹ 3,000/- विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेश सदर मंच देत आहे.  सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे.

अं ति म   आ दे श

1)  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

 

2)  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍याकडे कुठलीही थकबाकी असल्‍याचे सिध्‍द् न केल्‍याने त्‍यांनी टाटा सुमो ग्रॅन्‍ड डिकोर, मॉडेल 2010, नोंदणी क्रमांक एमएच-30/एएफ-52 या वाहनाबाबत कुठल्‍याही Notices भविष्‍यात कधीही तक्रारकर्त्‍याला पाठवू नये.    

 

3 विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला  शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्‍कम 3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त ) व प्रकरणाच्‍या खर्चापोटी रक्‍कम 2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त ) दयावे.  

 

4 विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ते 3  यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आंत करावे.  

 

5 उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी. 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.