Maharashtra

Beed

CC/12/203

Manda Rajendra Kale - Complainant(s)

Versus

Manager,Life Insurance Corporation - Opp.Party(s)

Dabde

05 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/203
 
1. Manda Rajendra Kale
R/o Juna Mondha Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Life Insurance Corporation
Nagar Road Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

निकाल
                      दिनांक- 05.12.2013
                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
            तक्रारदार मंदा राजेंद्र काळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी क्‍लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे व म्‍हणून क्‍लेमची रक्‍कम व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचे पतीने सामनेवाले विमा कंपनीकडून दि.6.1.2009 रोजी विमा पॉलिसी घेतली आहे. सदर विमा पॉलिसीचा नंबर 985337485 असा आहे. विमा पॉलिसीमध्‍ये नॉमिनी म्‍हणून तक्रारदार यांचे नांव नोंदलेले आहे. तक्रारदार यांचे पती दि.10.06.2010 रोजी मयत झाले. तक्रारदार यांनी त्‍यांचे पती मयत झाल्‍यानंतर आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह  सामनेवाले विमा कंपनीकडे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी प्रस्‍ताव सादर केला. सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्‍लेम दि.30.11.2010 रोजी नाकारला. सदरील क्‍लेम तक्रारदारांच्‍या पतीने प्रस्‍ताव अर्जामध्‍ये खोटी व चूकीची माहीती दिली या कारणास्‍तव नाकारला. तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार यांचे पती कोणतीही खोटी माहीती पॉलिसी घेते वेळेस दिलेली नव्‍हती. तक्रारदार यांचे पती कधीही आजारी नव्‍हते.तक्रारदार यांनी विम्‍याची रक्‍कम मिळू नये म्‍हणून बेकायदेशीरपणे सामनेवाले यांचा प्रस्‍ताव नाकारला आहे. तक्रारदार यांचे पती यांनी रु.1,00,000/- विमा पॉलिसी काढली आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांची विनंती की, सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा व वर नमूद केलेल्‍या रक्‍कमेवर 18 टक्‍के व्‍याज मिळावे अशी मागणी केली आहे.
 
            सामनेवाले विमा कंपनी मंचासमोर हजर झाली व त्‍यांनी नि.8 अन्‍वये लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार हे ग्राहक आहेत ही बाब मान्‍य केलेली आहे. तक्रारदार यांचे पतीने तक्रारीत नमूद केलेली पॉ‍लिसी घेतली आहे ही बाबही मान्‍य कली आहे. तक्रारदार हे पॉलिसीमध्‍ये नॉमिनी म्‍हणून समाविष्‍ट आहेत ही बाब मान्‍य केली आहे.
            सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम योग्‍य व रास्‍त कारणासाठी नाकारला आहे. तक्रारदार यांचे पती यांनी त्‍यांचे आरोग्‍याविषयी व सवयीविषयी सामनेवाले यांना चूकीची माहीती दिली व महत्‍वाच्‍या बाबी लपवून ठेवल्‍या असे नमूद केले आहे. सामनेवाले यांचे कथन की,तक्रारदार यांचे पतीने दि.6..11.2009 रोजी प्रस्‍ताव अर्ज (प्रपोजल फॉर्म) भरला.तक्रारदार यांचे पतीने असे जाहीर केले की, त्‍यांनी पाच वर्षात वैद्यकीय सल्‍ला घेतला नाही. तक्रारदार यांचे पती यांनी यकृत, पोट हृदय फुफुसे, मुत्रपिंडे,मेंदु किंवा स्‍थायुसंस्‍था रोगापासून कधीही आजारी  पडले नव्‍हते. तक्रारदार यांचे पती कधीही मद्यपान सेवन करीत नव्‍हते. त्‍यांची प्रकृती चांगली होती. सदरील माहीती पूर्णपणे खोटी खोटी व चूकीची दिली होती. तक्रारदार यांचे पती पॉलिसी घेतल्‍यापासून सहा महिन्‍याचे आंत मयत झाले. तक्रारदार यांचा क्‍लेम मिळाल्‍यानंतर सामनेवाले यांनी वैद्यकीय उपचाराचे कागदपत्र बोलावले. वैद्यकीय कागदपत्रावरुन तक्रारदार यांचे पती हे दारुचे व्‍यसनाधीन (chronic alcoholic)  व त्‍यांना alcoholic liver disease  हा पुर्वीपासून झालेला होता. तक्रारदार यांचे पती हे दि.3.6.2010 ते 10.06.2010 या कालावधीत दवाखान्‍यामध्‍ये उपचार घेत होते. तक्रारदार यांचे पती हे cirrhosis of liver  या रोगाने त्रस्‍थ होते. तक्रारदार यांचे पती दारुचे व्‍यवसनाधीन असल्‍यामुळे त्‍यांना यकृताचा रोग झाला होता. तो रोग मागील 3-4 वर्षापासून होता. त्‍या बाबत तक्रारदार यांचे पतीने उपचारही घेतलेले आहेत. सदरील महत्‍वाची बाब तक्रारदार यांचे पतीने प्रपोजल फॉर्म मध्‍ये नाकारलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांचे पतीने महत्‍वाच्‍या बाबी सामनेवाले यांचे पासून लपवून ठेवल्‍या आहेत व चूकीची माहीती दिली आहे. या रास्‍त कारणासाठी सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारला आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी विनंती केली आहे.
            तक्रारदार यांनी नि.4 सोबत सामनेवाले यांनी क्‍लेम नाकारले बाबत पत्र हजर केले आहे. तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.11 अन्‍वये हजर केले आहे. तसेच त्‍यासोबत तक्रारदार यांचे पती यांनी काढलेल्‍या पॉलिसीची झेरॉक्‍स प्रत हजर केली आहे. सामनेवाले यांनी त्‍यांचे अधिकारी श्री.हेमंत बाबूराव माळी यांचे शपथपत्र नि.9 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी नि.10 अन्‍वये दस्‍ताऐवज हजर केलेले आहेत. तक्रारदार यांचे पतीने घेतलेल्‍या पॉलिसीचा प्रस्‍ताव तक्रारदार यांचे पतीने हेडगेवार हॉस्‍पीटल येथे घेतलेल्‍या उपचाराचे कागदपत्र, सोनोग्रॉफीचा रिपोर्ट, तक्रारदार यांचे पतीचे हॉस्‍पीटलचे डिसचार्ज कार्ड, तक्रारदार यांचे वकील श्री.डबडे यांचा यूक्‍तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांचा यूक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सामनेवाले यांनी सेवेत
      त्रूटी ठेवली आहे हे तक्रारदार यांनी शाबीत केले आहे काय ?            नाही.
2.    काय आदेश   ?                             अंतिम आदेशाप्रमाणे.
                              कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
            तक्रारदार यांचे वकील श्री.डबडे यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती राजेंद्र काळे यांनी दि.6.11.2009 रोजी सामनेवाले यांचेकडून विमा पॉलिसी रककम रु.1,00,000/- ची काढली. तक्रारदार यांचे पती पॉलिसी घेण्‍याचे अगोदर कधीही आजारी नव्‍हते. सदरील बाब सामनेवाले यांनी तपासून घेतली होती. तदनंतरच विमा पॉलिसी काढली होती. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारल्‍याची जी कारणे दिलेली आहेत ती वस्‍तूस्थितीला धरुन नाहीत. तक्रारदार यांचे पती दि.10.6.2010 रोजी मयत झाले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मान्‍य करण्‍यात यावी व विम्‍याची रकक्‍म नुकसान भरपाई व दाव्‍याचा खर्च तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे मिळावा.
            सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचे पतीने प्रपोजल फॉर्म मध्‍ये स्‍वतःचे आजाराविषयी चूकीची माहीती दिली व  सामनेवाले यांना फसवले. तक्रारदार यांचे पती पॉलिसी घेण्‍याचे अगोदर 3-4 वर्षापासून अतिमद्यपान सेवनामुळे यकृताच्‍या रोगाने आजारी होते. ( Known case of Liver disease and Chronic Alcoholic with ascites with PH )  . तक्रारदार यांचे पती हे cronic alcoholic  अतिसेवन मद्यपान करणारे होते. त्‍यामुळे त्‍यांना यकृताचा रोग (liver disease)  झाला व त्‍यामध्‍ये ते दगावले. सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की,  तक्रारदार यांचे पतीचे मृत्‍यूचे कारण Terminal cardiorespiratory arrest secondary to hepatic encephalopathy with alcoholic liver disease with hypoproteinacimina.   हे होय. तक्रारदार यांचे पतीने विमा प्रस्‍ताव फॉर्म मध्‍ये वरील सर्व आजार नसल्‍या बाबत खोटी माहीती भरली आहे व सामनेवाले यांना फसवलेले आहे. सामनेवाले यांनी रास्‍त व योग्‍य कारणासाठी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारलेला आहे. सामनेवाले यांचे वकिलांनी त्‍यांचे यूक्‍तीवादाचे समर्थनार्थ मा.राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई सर्कीट बेंच औरंगाबाद यांनी प्रथम अपिल नंबर 1528/2001 दि.23.6.2007 रोजी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयावर या मंचाचे लक्षत वेधले. सदर अपिलामध्‍ये मा.राज्‍य आयोगाने अपिल मान्‍य करुन जिल्‍हा मंचाने दिलेला निर्णय रदद ककेला आहे. सदरील केसमध्‍ये मयत यांनी पॉलिसी घेतेवेळेस प्रपोजल फॉर्म मध्‍ये हेतू पूरस्‍कर आरोग्‍याविषयी चूकीची माहीती दिली व पॉलिसी घेतली. त्‍यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाहीत असा निर्णय दिलेला आहे.
 
            तक्रारदार यांचे वकिलांने मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी दिलेला सिव्‍हील अपिल नंबर 2776/2002  संतवंत कौर संधू विरुध्‍द न्‍यू इंडिया अश्‍योरन्‍स कंपनी लि. हा न्‍यायनिर्णया या मंचाचे निदर्शनास आणला आहे.
  
            In para no.22 of the Judgement the Hon ble Apex Court has observed that, in the claim form the appellant had stated that, the deceased was suffering from Chronic Renal Failure and Diabetic Nephropathy from 1st June 1990 i.e. within three weeks of taking the policy. Their Lordship further observed that, we have no hesitation in coming to the conclusion that the statement made by the insured in the proposal form as to the state of his health was palpably untrue to his knowledge. There was clear suppression of material facts in regard to the health of the insured and, therefore, the respondent – insurer was fully justified in repudiating the insurane contract. 
 
                        सामनेवाले यांचे वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांनी या मंचाचे लक्ष सोबत दाखल केलेल्‍या वैद्यकीय कागदपत्रावर वेधले व यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचे पतीने दि.6.11.2009 रोजी विमा पॉलिसी काढली ते दि.10.6.2010 रोजी मयत झाले. तक्रारदार यांचे पती मयत होण्‍याचे अगोदर 3-4 वर्षापासून यकृताच्‍या रोगाने (liver disease)  आजारी होते. सदरील आजार हा तक्रारदार यांचे पती अतिमद्यपी (cronic alcoholic)   असल्‍यामुळे झाला. तक्रारदार यांचे पतीने प्रपोजल फॉर्म मध्‍ये सदरील बाब लपवून ठेवली व प्रपोजल फॉर्म मध्‍ये चूकीची माहीती दिली. त्‍या कारणास्‍तव सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम रास्‍त कारणासाठी नाकारला आहे.
 
            तक्रारदार यांचे वकिलांनी केलेला यूक्‍तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यानी दाखल केलेला पूरावा व कागदपत्र यांचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या पुराव्‍याचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या वैद्यकीय कागदपत्राचे अवलोकन केले. तसेच यूक्‍तीवादामध्‍ये नमूद केलेल्‍या बाबी लक्षात घेतल्‍या आहेत. तक्रारदार यांचे पती यांना पॉलिसी घेतेवेळेस सामनेवाले यांचेकडे प्रपोजल फॉर्म भरला होता. सदरील प्रपोजल फॉर्म मध्‍ये परिच्‍छेद क्र.11 मध्‍ये वैयक्‍तीक इतीवृत तक्रारदार यांचे पतीने भरला आहे. तक्रारदार यांचे पतीस मागील पाच वर्षाचे आंत असा कोणताही आजार नाही.  एक आठवडयापेक्षा जास्‍त कालावधी करिता उपचार घेतलेले नाही. तसेच ते कोणत्‍याही रुग्‍णालयामध्‍ये उपचारासाठी दाखल नव्‍हते असेही नमूद केलेले आहे. तसेच त्‍यांना यकृत पोट हृदय फुफुसे, मुत्रपिंडे, मेंदु किंवा स्‍थायुसंस्‍था इत्‍यादीचा आजार कधीही नव्‍हता असे नमूद केलेले आहे. तसेच मयत यांनी ते कधीही मद्यपान सेवन करीत नव्‍हते असे म्‍हटले आहे. तक्रारदार यांचे पतीने प्रपोजल फॉर्म भरते वेळेस त्‍यांना पॉलिसी घेण्‍याचे अगोदर कोणताही आजार नव्‍हता अगर त्‍यांने उपचार घेतले नहीत असे नमूद केलेले आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता मयत राजेंद्र काळे हे अतिमद्यपी होते व त्‍यांना यकृताचा आजार होता (cronic alcoholic with liver disease)  सदरील आजार हा मागील 3-4 वर्षापासून तक्रारदार यांचे पतीला झाला होता व त्‍या बाबत त्‍यांनी वैद्यकीय उपचार घेतले होते. तक्रारदार यांचे पतीचे मृत्‍यूचे कारण  cause of death -- Terminal cardiorespiratory arrest secondary to hepatic encephalopathy with alcoholic liver disease with hypoproteinacimina  असे दिलेले आहे.  यावरुन तक्रारदार यांचे पतीला विमा पॉलिसी घेण्‍याचे अगोदर सूमारे 3-4 वर्षापासून सदरील आजार होता ही बाब सिध्‍द होते. विमा करार हा विमा काढणारा व्‍यक्‍ती व विमा कंपनीच्‍या विश्‍वासावर काढला जातो. ( “Contract is based on the principle of “ uberima fides” i.e. utmost good faith of the parties.” ) तक्रारदार यांचे पतीने प्रपोजल फॉर्ममध्‍ये वैयक्‍तीक इतीवृत या सदरामध्‍ये स्‍वतःचे आजाराविषयी कोणतीही बाब नमूद केलेली नाही. याउलट तक्रारदार यांचे पती यांनी त्‍यांस कोणताही आजार नाही असे स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे. वैद्यकीय कागदपत्रावरुन  तक्रारदार यांचे पती हे cronic alcoholic  अतिमद्यपान करणारे, त्‍यामुळे लिव्‍हर डिसीज   हा महत्‍वाचा रोग झाला होता व त्‍यांनी त्‍या बाबत  उपचारही घेतलेले आहे असे निदर्शनास येते. सदरील बाब  तक्रारदार यांचे पती यांना माहीत असूनही त्‍यांनी प्रपोजल फॉर्म मध्‍ये  नमूद केली नाही. तक्रारदार यांचे पतीने स्‍वतःचे आजाराविषयी माहीती असतानाही ती बाब लपवून ठेवली व विमा पॉलिसी काढली. तक्रारदार यांचे पती पॉलिसी काढल्‍यानंतर सहा महिन्‍याचे कालावधीत मयत झाले. तक्रारदार याचे पती त्‍यांनी विमा पॉलिसी काढण्‍याचे अगोदर पासून झालेल्‍या आजारामूळे मृत्‍यू झाला आहे. सबब, या मंचाचे मत सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन कोणतीही सेवेत त्रूटी ठेवलेली नाही. तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद होण्‍यास पात्र आहे.
 
मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                     आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2.    खर्चाबददल आदेश नाही.
      3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघुलेखक
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.