Maharashtra

Ahmednagar

CC/16/7

Rajesh Eknath Mukhekar - Complainant(s)

Versus

Manager,Law Protectors, IPR Services Pvt.Ltd. - Opp.Party(s)

Patole

23 Jan 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/7
( Date of Filing : 10 Dec 2015 )
 
1. Rajesh Eknath Mukhekar
C-103,Sucheta Nagar,Kedgaon,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Law Protectors, IPR Services Pvt.Ltd.
20/10/1,Opp.Ganesh Bidkar Office,Near Shree Electricles,4th Floor,Somwar Peth,Pune-411 011
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Patole, Advocate
For the Opp. Party: vaidya, Advocate
Dated : 23 Jan 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

     तक्रारदार हे मौजे केडगांव, अहमदनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे श्री.गणेश मेडीकल या नावाने औषधाचे दुकानाचा व्‍यवसाय करतात. तक्रारदार हे नवीन व्‍यवसाय सुरु करायचा म्‍हणुन हेल्‍थ क्‍लोअर या नावाने ट्रेड मार्कचे रजिस्‍ट्रेशन करुन त्‍या नावाने पाणी निर्जंतुक करण्‍याचे केमिकल तयार करण्‍याचा प्‍लान्‍ट तयार करण्‍यासाठी सामनेवालाकडे चौकशी केली. सामनेवाला हे इंडियन अॅन्‍ड इंटरनॅशनल ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट, डिझाईन अॅन्‍ड कंपनीचे रजिस्‍ट्रेशन संदर्भात काम करणारी व सर्व्‍हीस देणारी कंपनी आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने दि ऑफिस ऑफ रजिस्‍ट्री अॅट मुंबई यांचेकडे रजिस्‍ट्रेशन करावयाचे होते. म्‍हणून चौकशी करुन गव्‍हर्नमेंट रजिस्‍ट्रेशनचे चार्जेस संपुर्ण रक्‍कम रुपये 15,500/- चा 2010 मध्‍ये सामनेवाला यांना चेक दिला. व रजिस्‍ट्रेशन करुन घेतले. तेव्‍हा पासून तक्रारदार यांचेमध्‍ये सेवा देणार व ग्राहक असे नाते निर्माण झाले. तक्रारदाराचे सदर अर्जास 2060864 असा रजिस्‍ट्रेशन नंबर व तक्रारदार यांना हेल्‍थक्‍लोरचे प्रोप्रायटर करीता कोड नं.1223529 असा देण्‍यात आला. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक 5.12.2010 मध्‍ये हेल्‍थक्‍लोर ट्रेडमार्कचे रजिस्‍ट्रेशन करीता अॅप्‍लीकेशन दाखल केल्‍याबाबत व त्‍याचे प्रोव्‍हीजनल रजिस्‍ट्रेशनबाबत अर्जाव्‍दारे कळविले. मात्र सामनेवाला यांचेकडून तक्रारदाराला सर्टीफिकेशन प्राप्‍त झाले नाही. केवळ रजिस्‍ट्रेशनची प्रोसेस चालू आहे एवढे कळविण्‍यात आले. तक्रारदाराने रजिस्‍टेशनबाबत संपुर्ण फी सामनेवाला यांना दिली. मात्र सामनेवाला यांनी तक्रारदाराला सेवा दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी पुढे दिनांक 06.02.2012 रोजी द रजिस्‍ट्रार ऑफ ट्रेडमार्कस मुंबई यांचेकडे लेखी तक्रार केली. त्‍यानुसार त्‍यांनी आवश्‍यक कागदपत्रे पुरविण्‍यासंबधी कळविले. दिनांक 12.09.2014 रोजी तक्रारदार यांनी सदरची कागदपत्रे सामनेवालाकडे पुर्तता केली. तरीही सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिनांक 06.07.2015 रोजी मेल व्‍दारे पुन्‍हः हेल्‍थक्‍लोरचे रजिस्‍ट्रेशनबाबत कागदपत्राची मागणी केली. त्‍यामुळे पुन्‍हः तक्रारदाराने संपुर्ण कागदपत्राची पुर्तता केली. मात्र सामनेवाला यांनी रजिस्‍ट्रेशन करुन दिलेले नाही. त्‍यामुळे दिनांक 26.10.2015 रोजी वकीलामार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठविली. मात्र त्‍यासही सामनेवाला यांनी उत्‍तर दिलेले नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करुन परच्छिेद क्र.7 प्रमाणे मागणी केली केली आहे.      

3.   सामनेवाला यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.11 प्रमाणे दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे कथन केले की, प्राथमिक मुद्दा उपस्थित केला आहे. त्‍यांचे कथनाप्रमाणे सदरची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार तक्रारदार हा सामनेवालाचा ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. तसेच या मंचाला सदरचे तक्रारीबाबत निर्णय घेण्‍याचे अधिकारक्षेत्र नाही व ग्राहक संरक्षण कायदयाचे सेक्‍शन 11 चा बाध येतो. त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी मंचाला विनंती केली आहे.

4.   तक्रारदार यांनी सामनेवालाने घेतलेल्‍या प्राथमिक मुद्दयावर त्‍यांचा खुलासा निशाणी 13 प्रमाणे दाखल केला आहे व त्‍यामध्‍ये त्‍यांनी कथन केले व सामनेवाला यांनी कलम 3 मधील कथन की व्‍यावसायिक कारणासाठी तक्रारदार हे हेल्‍थक्‍लोअर या नावाने सामनेवालाकडून फक्‍त रजिस्‍ट्रेशन करणार होते ही बाब चुकीची आहे. व तक्रारदाराने संपुर्ण खर्च सामनेवाला यांना दिलेला आहे.  परंतु सामनेवालाचे निष्‍काळजीपणामुळे तक्रारदाराला लायसन प्राप्‍त झाले नाही. समानेवालाने संपुर्ण कथन हे अर्थहिन आहे. सदरची तक्रार या मंचात चालू शकत नाही. घेतलेला आक्षेप हा खोटा आहे. तक्रारदाराची तक्रार ही मंजुर करण्‍यात यावी असे कथन केले आहे.

5.   तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र तसेचे त्‍यांचे वकील श्री.पाटोळे यांनी केलेला युक्‍तीवाद व सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्र, शपथपत्र यावरुन व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय.?                                                         

 

... होय.

2.

सदरची तक्रार ही या मंचाचे अधिकारक्षेत्रात मोडते काय.?                                                         

 

... होय.

3.

सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय.?                                                         

 

... नाही.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1 ः-    तक्रारदार यांनी हेल्‍थ क्‍लोअर या नावाने ट्रेड मार्कचे रजिस्‍ट्रेशन करण्‍यासाठी सामनेवाला यांचेकडे ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये रक्‍कम रुपये 15,500/- भरलेले आहेत. ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदाराने प्रकरणात पेमेंट केल्‍याचे स्‍टेटमेंट दाखल केलेले आहे. त्‍यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे 15,500/- रुपये भरलेले आहेत. सामनेवाला ही ग्राहकांना सेवा देणारी कंपनी आहे ही बाब सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये नाकारलेली नाही. व तक्रारदाराकडून सामनेवाला यांनी रक्‍कम स्विकारलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हा सामनेवालाचा ग्राहक या संज्ञेत मोडतो. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2   तक्रारदार यांनी सदरची तक्रार ही अहमदनगर न्‍याय मंचात दाखल केली आहे व सामनेवाला हे पुणे येथील रहिवासी आहेत. मात्र तक्रारीस कारण अहमदनगर जिल्‍हयाचे अधिकारक्षेत्रात घडल्‍यामुळे या न्‍याय मंचाला अधिकारक्षेत्र आहे या निष्‍कर्षाबाबत अधिकारक्षेत्र आहे किंवा नाही दर्शविण्‍यासाठी सामनेवाला यांना 15,500/- रुपये दिल्‍याचे दस्तवेज प्रकरणात दाखल केले आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी घेतलेला बचाव ग्राहय घरता येत नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.3    तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे हेल्‍थक्‍लोर या नावाने  ट्रेडमार्कचे रजिस्‍ट्रेशन करुन घेण्‍याकरीता रक्‍कम रुपये 15,500/- सन 2010 मध्‍ये चेक व्‍दारे सामनेवाला यांना दिले. त्‍यानुसार सामनेवाला यांनी तक्रारदाराला 2060864 असा रजिस्‍ट्रेशन नंबर हेल्‍थक्‍लोर प्रोप्रायटर करीता कोड नं.1223529 असा दिलेला होता ही बाब तक्रारदाराने स्‍वतः तक्रारीमध्‍ये नमुद केली आहे. तसेच प्रोसेस चालू असल्‍याचे कथन केले आहे. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराला सेवा पुरविली आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. त्‍या ट्रेडमार्कचे रजिस्‍ट्रेशन सर्टीफिकेट तक्रारदारास प्राप्‍त झाली नाही. म्‍हणून तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. मात्र सदरचे ट्रेडमार्कचे सर्टीफिकेट तयार करुन देणे हे या सामनेवाला यांच्‍या हातात नाही. काही अडचणीमुळे सर्टीफिकेट मिळाले नसेल तर त्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण तक्रारदार व सामनेवाला दोघांनी देणे गरजेचे होते. मात्र तसे केले नाही. त्‍यामुळे सर्टीफिकेट का तयार झाले नाही याबाबत काहीही मंचापुढे आले नाही. व सामनेवाला यांनी तक्रारदाराला प्रोसेस करुन दिलेली आहे. त्‍यामुळे सामनेवालाने सेवा दिली नाही असे म्‍हणता येणार नाही. उलट प्रोसेस करुन पुढील प्रोसेस चालू असल्‍याचे तक्रारदाराने तक्रारीत कथन केले आहे. जी प्रोसेस सामनेवाला यांनी करायची ती केलेली आहे. वरीष्‍ठ कार्यालयातुन पुढील बाबींची पुर्तता का झाली नाही यासाठी सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना फी दिली व त्‍यानुसार सामनेवाला यांनी सेवा दिली आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केलेली नाही. सबब मुद्दा क्र.3 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

9.   मुद्दा क्र.4   मुद्दा क्र.1 ते 3  चे विवेचनावरुन मुद्दा क्र.4 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ  दे  श -

1)   तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2)   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3)   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क दयावी.

4)   या प्रकरणाची  “ ब ” व “ क ” फाईल तक्रारकर्तास परत दयावी.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.