निकालपत्र तक्रारदाखलदिनांकः- 23.09.2010 तक्रारनोदणीदिनांकः- 24.09.2010 तक्रारनिकालदिनांकः- 14.01.2011 कालावधी 3 महिने 20 दिवस जिल्हाग्राहकतक्रारनिवारणन्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकातबी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाताजोशीB.Sc.LL.B. सौ.अनिताओस्तवालM.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ 1 रुक्मीनबाई भ्र.मुंजाजी सुर्यवंशी अर्जदार वय 45 वर्षे धंदा घरकाम, 2 सोनबा मुंजाजी सुर्यवंशी वय 22 वर्षे धंदा शेती, 3 माणिक मुंजाजी सुर्यवंशी अ.पा.का.सख्खी आई रुक्मीनबाई भ्र.मुंजाजी सुर्यवंशी वरील सर्व रा. कळगांव ता.पूर्णा, जि.परभणी. ( सर्व अर्जदांरातर्फे अड साहेबराव अडकीणे ) विरुध्द 1 मा.व्यवस्थापक गैरअर्जदार कबाल इन्शुरन्स प्रा.लिमीडेट ( स्वतः ) भास्कर अडव्होकेट एच.डी.एफ.सी.होमलोन, बिल्डींग, सिडको ,औरंगाबाद 431003. 2 विभागीय व्यवस्थापक नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड ( अड पालीमकर ) दुसरा माळा स्टर्लींग सिनेमा बिल्डींग, 65 मिर्जाबाग स्ट्रिट फोर्ट, मुंबई 431001. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाताजोशी सदस्या 3) सौ.अनिताओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचीथोडक्याततक्रारअशीकी, अर्जदारमौजे कळगांव ता.पूर्णा जि. परभणीयेथीलरहिवाशी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदा शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा मयत पती मुंजाजी सोनबाजी सुर्यवंशी हा देखील लाभार्थी होता त्याच्या मालकीची कळगांव येथे गट क्रमांक 448 व 453 शेत जमीन आहे तारीख14.03.2007 रोजीअर्जदाराचरपती घरात रात्री झोपला असताना रात्री 1.00 ते 1.30 चे दरम्यान झोपडीस आग लागली त्यामध्ये मंजातहचा जळून मृत्यू झाला. अर्जदारानेत्यानंतरमयतपतीच्या मृत्यूपश्चात तिला शेतकरीअपघातविम्याचीनुकसानभरपाईमिळणेसाठीआवश्यक ती कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठविली त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आणखी काही कागदपत्रांची मागणी केली होती त्याचीही पूर्तता केली मात्र कोणत्याही सबळ कारणाशिवाय दिनांक 18.02.2009 च्या पत्राव्दारे गैरअर्जदार 2 यानी पतीच्या अपघाती निधनाची नुकसान भरपाई क्लेम क्रमांक 260600/47/07/069/0001188 नामंजूर करुन फाईल बंद केली. वरीलप्रमाणे विमा कंपनीने सेवेतील त्रूटी करुन मानसिक त्रास दिला व नुकसान भरपाई मिळण्याच्या लाभापासून वंचीत ठेवले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडून रुपये 100000/- विमा नुकसान भरपाई मिळावी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 3000/- व अर्जाचा खर्च रुपये 2000/- मिळवा अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेआपलेशपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि. 5लगतएकूण17 कागदपत्रे जोडलेलीआहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पोष्टाव्दारे आपले लेखी म्हणणे मंचाकडे पाठविले ते दिनांक 02.11.2010 रोजी प्रकरणात नि. 9 ला समाविष्ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 2 याना मंचाची नोटीस मिळाल्यावर त्यांचेतर्फे अड. पालीमकर यानी वकिलपत्र व लेखी म्हणणे सादर करणेसाठी दिनांक 02.11.2010 रोजी पुरसिस /अर्जदेवून मुदत मागितली ती मंजूर केली मात्र त्यानंतर संधी देवूनही वकिलपत्र व लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे त्यांचेविरुध्द नो. से आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालू ठेवले. गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबात असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत मुंजाजी सुर्यवंशी याच्या विमा क्लेमची कागदपत्रे दिनांक 28.07.2007 रोजी प्राप्त झाल्यावर छाननी करताना त्यामध्ये काही अपूरी कागदपत्रे डेथसर्टीफीकेटची मुळ कॉपी, फेरफार मुळप्रत नसल्याचे दिसले त्याबाबत तहशीदार पूर्णा याना दिनांक 01.08.2007 रोजी पत्र पाठवून पूर्तता करण्याबाबत कळविले होते त्यानंतर दिनांक 11.09.2007 रोजी स्मरणपत्र पाठवूनही पूर्तता न केल्याने विमा कंपनीने सदरचा क्लेम नामंजूर केला. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 याना या प्रकरणातून वगळावे अशी शेवटी विनंती केली आहे. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. अडकीने यानी युक्तिवाद केला निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार 2 यानी अर्जदाराचा विमा क्लेम नाकारण्याच्या बाबतीत सेवा त्रूटी केली आहे काय ? नाही 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा मयत पती मुंजाजी सोनबाजी सुर्यवंशी रा. कळगांव ता. पूर्णा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी शेतकरी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि.5/9 नि. 5/10 वरील गट क्रमांक 448 व गट क्रमांक 453 चे 7/12 उतारे नि. 5/11 वरील गाव नमुना क्रमांक 6 क चा उतारा, नि. 5/12 वरील नमुना नं. 8- अ चा उतारा, नि.5/115 वरील तलाठयाचे प्रमाणपत्र या कागदपत्रातील नोंदीवरुन शाबीत झाले आहे. दिनांक 14.03.2007 रोजी मयत मुंजाजी सुर्यवंशी च्या घराला रात्री एक ते दीड वाजणेचे सुमारास आग लागल्याने झोपडीत त्याचा जळून अपघाती मृत्यू झाला होता. ही वस्तूस्थिती पुराव्यातील ताडकळस पोलीस स्टेशन अपघात मृत्यू र.नं. 6/07 मधील एफ.आय.आर. ( नि.5/2. व नि. 5/4), घटनास्थळ पंचनामा ( नि.5/4) ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे मयताचा दिनांक 15.10.2006 रोजी केलेला पी.एम.रिपोर्ट (नि.4/18) मरणोत्तर पंचनामा ( नि.4/7), पोलीस तपासातील साक्षीदारांचे जबाब ( नि.4/9) ते नि. 4/15) वगैरे नोंदीतून शाबीत झालेले आहे. मयत मुंजाजी सुर्यवंशी हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा मयत लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी ) विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी सर्व कागदपत्रे सादर केलेली होती त्याच्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात नि. 5 लगत दाखल केलेल्या आहेत. परंतू गेरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबात म्हटले प्रमाणे अर्जदाराकडून डेथ सर्टीफीकेट, व फेरफार उता-याच्या मुळप्रती स्मरणपत्रे देवून ही तहशीलदार मार्फत त्याना मिळाल्या नाहीत त्यामुळे विमा कंपनीने फाईल बंद केली असा खुलासा व बचाव घेतलेला आहे त्यामध्ये तथ्य वाटते. कारण वरील दोन्हीही कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 कडे पाठवली होती किंवा हस्तपोहोच दिली होती त्या कागदपत्रांच्या छायाप्रती किंवा अन्य सबळ पुरावा अर्जदाराने मंचापुढे सादर केलेला नाही. त्यामुळे याबाबतीत गैरअर्जदाराकडून सेवेतील त्रूटी झाली असे म्हणता येणार नाही तरी परंतू अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती निधनाची विमा पॉलीसी ची हमीप्रमाणे नुकसान भरपाई रुपये 100000/-- मिळणेस ती पात्र असल्यामुळे वरील कागदपत्रे गैरअर्जदार विमा कंपनीने स्विकारुन अर्जदाराला नुकसान भरपाई दिली पाहीजे सबब मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने रिपोर्टेड केस 2008(2) All M.R. ( Forum ) पान 13 मधील दिलेला निर्णय विचारात घेता आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 2 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथ क्लेमची रक्कम मंजूर करण्याच्या कामी त्याना हवे असलेले डेथ सर्टीफीकेट व फेरफार उतारा अर्जदाराकडून अगर तहशीलदार पूर्णा याना कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत अखेरची 15 फेबृवारी 2011 वाढीव मुदत देवून क्लेम सेटल करावा. 3 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |