Maharashtra

Nanded

CC/10/160

Nayamtbi Rohimoddin Majewar - Complainant(s)

Versus

Manager,ICICI lombard - Opp.Party(s)

ADV.B.V.Bhure

26 Nov 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/160
1. Nayamtbi Rohimoddin Majewar R/o.Shiradone Tq.Kandhar Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager,ICICI lombard MumbaiNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 26 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/160
                          प्रकरण दाखल तारीख - 07/06/2010
                          प्रकरण निकाल तारीख 26/11/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.      
 
न्‍यामतबी भ्र.रहिमोद्यीन मंजेवार (शेख)
वय 60 वर्षे, धंदा घरकाम                                अर्जदार
रा. शिराढोण ता.कंधार जि. नांदेड
     विरुध्‍द.
1.                 सिग्‍नेटरी ऑफिसर
1.आय.सी.आय.सी.आय. लोंम्‍बार्ड जनरल
इन्‍शुरन्‍स कंपनी लि. झेन्‍थ हाऊस,
केशवराव खाडे मार्ग, महालक्ष्‍मी मुंबई 400 034.        गैरअर्जदार
2.   शाखा व्‍यवस्‍थापक,
     आय.सी.आय.सी.आय. लोंम्‍बार्ड जनरल
     इन्‍शुरन्‍स कंपनी लि.अक्‍सीस बँकेच्‍या वर,
     कलामंदिर, नांदेड
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.बी. व्‍ही. भुरे
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे         -   अड.अजय व्‍यास.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्‍यक्ष )
             अर्जदार न्‍यामतबी मयत रहिमोद्यीन मियॉसाब मंजेवार यांची पत्‍नी आहे. मयत रहिमोद्यीन हे शेतीचा व्‍यवसाय करुन त्‍यांचे कूटूंबीयाचे व त्‍यांचे पालनपोषन करीत होते. त्‍यांचे नांवे शेत गट नंबर 32 मध्‍ये 1 क्षेञफळ 3 आर आणि स्थित मौजे शिराढोण येथे आहे. महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यास व त्‍यांचे कूटूंबियास सामाजिक न्‍याय देण्‍याच्‍या हेतूने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्‍यामध्‍ये मयत रहिमोद्यीन यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 व 2 मार्फत उतरविण्‍यात आला आहे. सदर विम्‍याचा कालावधी दि.10.04.2005 ते 09.04.2006 असा होता. अर्जदाराचे पती दि.22.09.2005 रोजी रानडुकराने चावा घेऊन हल्‍ला केल्‍यामुळे मौजे शिराढोण येथे मृत्‍यू पावले. अर्जदाराने
 
 
पोलिस पाटील शिराढोण व ग्राम विकास अधिकारी शिराढोण यांचे मृत्‍यू अहवाल दाखल केले आहेत व  शेतकरी अपघात विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्‍हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने 7/12 उतारा, नमुना नंबर 8 चा उतारा इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. तसेच अर्जदाराने शेवटी दि.24.2.2010 रोजी वकिलामाफर्त नोटीस पाठविली परंतु नोटीस मिळूनही त्‍यांनी आजपर्यत नूकसान भरपाई दिली नाही. म्‍हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, शेतकरी अपघात विम्‍याची रक्‍कम म्‍हणून रु.1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.  ज्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र.1  यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे अर्जदार ही मयत रहिमोद्यीन यांची पत्‍नी होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत रहिमोद्यीन हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही. तसेच अर्जदार यांनी सदर तक्रार ही तलाठी यांचेकडे दाखल करणे आवश्‍यक होते. अर्जदार यांनी पाठविलेली नोटीस त्‍यांना मिळालेली नाही. त्‍यांनी कोणतीही सेवे मध्‍ये ञूटी केलेली नाही. तसेच अर्जदार यांनी तक्रार ही कालमर्यादे नंतर दाखल केलेली आहे.  गैरअर्जदाराने आक्षेप घेतला आहे की, अर्जदाराचे पती हे रानडूकराने चावा घेतल्‍यामुळे मरण पावले हे सिध्‍द करावे लागेल, तसेच त्‍यांनी एफ.आय.आर., तसेच पी.एम. रिपोर्ट दाखल केलेला नाही. त्‍यामुळे अर्जदाराचे पती हे नक्‍की रानडूकराने चावा घेतल्‍यामूळे मरण पावले हे सिध्‍द होत नाही. त्‍यामूळे अर्जदाराचा अर्ज ते मान्‍य करु शकत नाही. तसेच त्‍यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्‍हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह अमान्‍य करण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार क्र.1  यांनी शपथपञ दाखल केलेले आहे.
 
              गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द नो से चा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
 
              अर्जदार व गैरअर्जदार क्र.1  यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात.
 
 
 
              मूददे                                      उत्‍तर
1.   अर्जदार ग्राहक आहेत काय ?                             होय.
2.   गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्‍कम देण्‍यास
     बांधील आहेत काय ?                                होय.
3.   काय आदेश      ?                           अंतिम आदेशाप्रमाणे
 
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्‍यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सात दाखल केलेले आहे. तसेच गाव नमुना नंबर आठ अ दाखल केलेले आहे. तसेच मयत रहीमोद्यीन यांचे शीधापञ तहसीलदार कंधार यांनी दाखल केलेले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी त्‍यांचे जवाबामध्‍ये अर्जदार हे त्‍यांचे ग्राहक नाहीत असे कूठेही म्‍हटलेले नाही. अर्जदार ही मयत रहिमोद्यीन यांची पत्‍नी आहे हे सिध्‍द होत असल्‍यामूळे मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार ही मयत रहिमोद्यीन यांचे नांवावर शेती असल्‍याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्‍यामध्‍ये मयत रहिमोद्यीन यांचे नांवावर शेत जमीन असल्‍याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत रहिमोद्यीन हे दि.22.09.2005 रोजी रानडूकराने चावा घेऊन हल्‍ला केल्‍यामूळे मरण पावले हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्‍ये मृत्‍यूबदल पूरावा दाखल केला नाही म्‍हणून अमान्‍य केला आहे. गैरअर्जदार यांनी जवाबामध्‍ये जो आक्षेप घेतला आहे की, अर्जदार यांनी एफ.आय.आर व पी.एम. रिपोर्ट दाखल केलेला नाही त्‍यामुळे अर्जदाराचा मृत्‍यू हा रानडूकराने चावा घेतल्‍यामूळे झालेला नाही, यासाठी अर्जदार यांनी पोलिस पाटलाचा मृत्‍यू अहवाल व ग्राम विकास अधिकारी यांचे मृत्‍यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे. त्‍यामूळे गैरअर्जदाराचा तो आक्षेप कागदपञामूळे निकाली नीघतो.  तसेच अर्जदाराने शासनाने जी.आर (सर्क्‍यूलर) दाखल केलेले आहे त्‍यात म्‍हटल्‍याप्रमाणे तांञिक मूददावर दावा फेटाळता येणार नाही असे स्‍पष्‍ट म्‍हटलेले आहे. तसेच त्‍या परिपञकामूळे पूरावा दाखल करण्‍याची गरज नाही तसेच तक्रारीमध्‍ये माहीती अहवाल व पोलिस पाटील यांचा अहवाल जर दाखल केला तर त्‍यांना पॉलिसीची रक्‍कम देण्‍यासाठी गैरअर्जदार बांधील असतील असे म्‍हटले आहे.  सर्क्‍यूलर मधील पुराव्‍यासाठी सादर करावयाची
 
 
 
कागदपञे मध्‍ये कॉलम क्र. 9 जनावरांच्‍या चावण्‍यामुळे यात स्‍पष्‍ट पणे म्‍हटलेले आहे की, पोलिस पाटलाचा अहवाल व माहीती अहवाल असेल तर विमा दावा मंजूर करता येतो, असे न करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे सिध्‍द होते.
              तसेच अर्जदार यांनी एक सायटेशन
IV (2008) CPJ 312 RAJASTHAN STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, JAIPUR,, ICICI Lombard General Insurance Co. Ltd & anr.    Vs.    Raju Kachhawa      यामध्‍ये
          Non-furnishing of FIR and post mortem report would not mean that no accident took place -- No crime/offence took place, no necessity of lodging FIR and post mortem report – Repudiation of claim unjustified – Insurer liable under policy. 
 
सन 2005-06 मध्‍ये औरंगाबाद महसूल वीभागात  येणा-या सर्व शेतक-यासाठी व्‍यक्‍तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्‍यांचा विमा हप्‍ता महाराष्‍ट्र शासनाने भरला आहे. यामध्‍ये रहिमोद्यीन यांचा सहभाग असल्‍यामूळे व अर्जदार ही त्‍यांची पत्‍नी असल्‍यामूळे ती प्रत्‍यक्षरित्‍या जरी नाही तरी अप्रत्‍यक्षरित्‍या अर्जदार ही ग्राहक आहे. त्‍यामूळे अर्जदार ही विमा रक्‍कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्‍यू दाखला प्रमाणपञ, 7/12, निवडणूक ओळखपञ,  इत्‍यादी कागदपञासह गैरअर्जदार यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्‍याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेला दावा हा मूदतीत दाखल केलेला आहे पण त्‍यावर गैरअर्जदार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही म्‍हणून तक्रार मूदतीत आहे. तसेच घटना ही दि.22.09.2005 रोजी घडलेली आहे व पॉलिसीचा कालावधी हा दि.10.04.2005 ते 09.04.2006 हा आहे म्‍हणून घटना ही पॉलिसी कालावधीमध्‍ये घडलेली आहे.  वरील सर्व कागदपञ सिध्‍द झाल्‍याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्‍कम रु.1,00,000/- एक महिन्‍याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु,2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
 
 
 
                         आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्‍कम दयावी.
3.                                         मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
4.                                         वरील सर्व रक्‍कम एक महिन्‍याचे आंत न दिल्‍यास, एक महिन्‍यानंतर संपूर्ण रक्‍कमेवर 9 टक्‍के व्‍याज पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना दयावे लागेल.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                         श्रीमती सुवर्णा देशमूख          
   अध्‍यक्ष                                                             सदस्‍या
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT