जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/111 प्रकरण दाखल दिनांक – 07/05/2009. प्रकरण निकाल दिनांक – 01/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. कीशोर नारायण स्वामी वय, 42 वर्षे, धंदा गुत्तेदारी रा.शिवाजी चौक, सिडको, नविन नांदेड ता.जि.नांदेड. अर्जदार विरुध्द 1. आय.सी.आय.सी.आय बँक लि. तर्फे शाखाधिकारी, रघुविर कॉम्प्लेक्स, दूसरा मजला, अदालत रोड, औरंगाबाद. गैरअर्जदार 2. आय.सी.आय.सी.आय. बँक लि. तारासिह मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.नितीन कागणे गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे - अड.माधव पावडे. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार आयसीआयसीआय बँकेच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, त्यांनी मार्च,2008 साली इंडिका कार घेण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून कर्ज घेऊन इंडिका वाहनाची नोंद महा.-26-नि.-477 अशी नोंद दि.17.03.2008 रोजी करण्यात आली. अर्जदारानी गैरअर्जदार यांच्या मागणी प्रमाणे अकोला जनता कमर्शियल को. ऑप बँक लि. अकोला शाखा नांदेड यांचे 46 चेक दिले होते. दि.14.04.2008 रोजी कारचा अपघात झाला. अर्जदाराने त्यावेळेपर्यत गैरअर्जदाराकडे केवळ सहा हप्ते भरले होते. अपघातानंतर ती कार सानिया मोटार्स औरंगाबाद येथे त्याच अवस्थेत ठेवण्यात आली व इन्शूरन्सचा क्लेम मिळण्यासाठी कारवाई प्रंलबित आहे. कर्ज घेतल्यानंतर 25 दिवसांत गाडी अपघातग्रस्त झाली व त्यात ड्रायव्हरचा मृत्यू झाला व इन्शूरन्सची रक्कम मिळाली नाही. त्यामूळे सप्टेंबर 2008 च्या महिन्यात गैरअर्जदाराने धनादेशाचा गैर वापर करु नये अशी नोटीस दि.05.11.2008 रोजी करण्यात आली व स्टॉप पेमेन्ट करण्यावीषयी विनंती केली. चेक नंबर 6114635 हा बॉऊन्स झाल्यामूळे गैरअर्जदारांनी कारवाईची नोटीस दिली. अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदाराने चेकचा गैर वापर करु नये व अर्जदाराची इंडिका कार महा.-26-नि.-477 ही त्यांनी विकून ती रक्कम खात्यात जमा करावी,मानसिक ञासापोटी रु.10,000/- व खर्च दयावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराची संपूर्ण तक्रार ही खोटी व बिनबूडाची आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार याना इंडिका कार खरेदीसाठी कर्ज दिले होते. त्या कर्जाचे 47 हप्त्यामध्ये परतफेउ करावयाची होती. अर्जदाराने हप्त्याच्या रक्कमेसाठी केवळ 5 मे, 2008 ते 5 ऑक्टोबर 2008 पर्यत केवळ सहा हप्ते भरलेले आहेत. म्हणून ते डिफॉल्टर आहेत. दि.05.11.2008 चा धनादेश डिसऑनर झाला आहे. अर्जदाराने केवळ कर्ज बूडविण्याच्या दृष्टीने ही तक्रार दाखल केली आहे. यात अर्जदाराने कोणतेही कारण दर्शविलेले नाही. गैरअर्जदाराने थकीत रक्कमेच्या मागणीसाठी व धनादेश न वटल्याबददल कायदेशीररित्या मागणी केली होती. अर्जदाराने ही कार घरकामासाठी न वापरता भाडयासाठी वापरली आहे. त्यामूळे त्यात कारचा अपघात झालेला आहे. अर्जदार हा त्यांस स्वतःच जबाबदार आहे. कर्जाची परतफेड होईपर्यत अर्जदारास ही कार विकता येणार नाही. त्यामूळे अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून कागदपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी इंडिका कार नंबर महा.-26-नि-477 यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून कर्ज घेतले होते ते गैरअर्जदार यांना पण मान्य आहे. पण सदर कारचा दि.14.04.2008 रोजी अपघात झाला व ती कार सानिया मोटार्स औरंगाबाद येथे त्याच अवस्थेत ठेवण्यात आली आहे. अर्जदार यांनी या कर्जापोटी फक्त सहाच हप्ते भरले आहेत. अजून 41 हप्ते भरणे शिल्लक आहेत. त्यांचा एक चेक बाऊन्स ही झाला आहे. त्यासाठी गैरअर्जदार यांना सेक्शन 138 खाली कारवाई देखील केलेली आहे. अर्जदार यांनी बँकेस नोटीस पाठवून त्यांचे कारचे अपघात झाल्यामूळे ते रक्कम भरु शकत नाहीत म्हणून पूढचे चेक टाकण्याचे बंद करावेत असे म्हटले आहे.असे जरी असले तरी व अर्जदार यांनी कायदेशीर नोटीस जरी दिली असली तरी जेव्हा अर्जदाराने कर्ज घेतले आहे व कारही वैयक्तीक वापरासाठी आहे तर त्यांनी दिलेले चेक हे वेळेवर वटवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अर्जदाराच्या मते त्यांची कार गैरअर्जदार यांनी ताब्यात घ्यावी व ती विकून आलेली रक्कम त्यांचे खात्यात जमा करावी. अर्जदार यांनी असे सांगण्यापेक्षा स्वतः ती कार विकून त्यांचा सौदा करुन गैरअर्जदाराकडे जाऊन सरळ ती रक्कम त्यांचे खात्यात जमा करु शकले असते. पण असे त्यांनी केले नाही व ही जबाबदारी ते गैरअर्जदार यांचेवर टाकतात. अर्जदाराच्या ऑफरचा स्विकार करणे अथवा न करणे हे सर्वस्वी गैरअर्जदार यांचेवर अवलंबून आहे. याविषयी दोघेही एकञ बसून सूलानामा करण्याविषयी बोलू शकतात. पण अर्जदार हे स्वतः डिफॉल्टर असल्याने त्यांना या मंचात तक्रार दाखल करता येणार नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेक्शन 138 खाली दि.24.02.000 रोजी नोटीस दिली. ती नोटीस या प्रकरणात दाखल केली आहे. अर्जदारांना सदरच्या अपघाताबददल इन्शूरन्स कंपनीकडून क्लेम मिळू शकतो, तो का मिळत नाही यांचा उल्लेख केलेला नाही. अर्जदार यांनी कर्जाची रक्कम भरणे हे बंधनकारक आहे. कारण दिलेले चेक ते थांबवू शकत नाहीत. अर्जदार हे स्वतःच डिफॉल्टर असल्याकारणाने व बँकेची रक्कम न देण्याचे हेतूने त्यांने ही तक्रार दाखल केल्याचे दिसून येते. सबब वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |