Maharashtra

Nanded

CC/08/353

Tukaram Dnyanoba Mundhe - Complainant(s)

Versus

manager,I.C.I.C.Lombard - Opp.Party(s)

ADV.S.N.Welankar

17 Mar 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/353
1. Tukaram Dnyanoba Mundhe R/o.Marglwadi Tq.Gangakhed Dist.ParbhaniNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. manager,I.C.I.C.Lombard NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 17 Mar 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.353/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  07/11/2008.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 17/03/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील.        अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                       मा.श्री.सतीश सामते.           सदस्‍य.
                
 
तुकाराम पि.ज्ञानोबा मुंढे,                                 अर्जदार.
वय वर्षे 31, व्‍यवसाय व्‍यापार,
रा.मारगलवाडी ता.गंगाखेड जि.परभणी.
 
विरुध्‍द.
 
आय.सी.आय.सी.आय.लुमबार्ड,                             गैरअर्जदार.
जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
नांदेड शाखा, निखिल हाईटस,
श्री.संतोष रेणके.
दुसरा माळा,कलामंदीर रोड,बस स्‍टॅण्‍ड जवळ,
नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.        - अड.जी.आर.पिंपरखेडे.
गैरअर्जदारा तर्फे      - अड.अजय व्‍यास.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते,सदस्‍य)
 
     गैरअर्जदार आय.सी.आय.सी.आय. लोम्‍बार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी यांच्‍या सेवेच्‍या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी खालील प्रमाणे आपली तक्रार नोंदविली आहे. अर्जदार यांनी आपल्‍या मालकीचा ट्रक क्र. एम.एच.22 एम.97 त्‍याचे सुरक्षिततेसाठी दि.14/09/2006 ते दि.13/09/1997 या कालावधीसाठी गैरअर्जदार यांचेकडे विमा उतरविला आहे. गैरअर्जदार विमा कंपनी असुन तीचे शाखा कार्यालय नांदेड येथे आहे. दि.23/06/2007 रोजी सदरील ट्रकचे वारंगा येथे समोरुन आलेल्‍या ट्रकला चुकविण्‍यासाठी ट्रक बाजुला घेतल्‍यामुळे ट्रकची पुलाला धडक बसली त्‍यामुळे ट्रक हा पुलाखाली पडला याची फिर्याद आखाडा बाळापुर येथ दिली त्‍यावरुन पोलिसांनी एफ.आय.आर. क्र. 12 / 2007 दि.23/06/2007 रोजी घटनास्‍थळ पंचनामा केला. या अपघातात ट्रकचे रु.3,50,000/- चे नुकसान झाले.  घटनेची माहीती गैरअर्जदारांना कळविल्‍यावर त्‍यांनी सर्व्‍हेअरला पाठऊन दि.29/06/2007 रोजी वाहनाची पाहणी केली यानंतर अर्जदार यांनी ट्रक दुरुस्‍ती करीता अजिजुर रहेमान मोटर गॅरेज नांदेड यांचेकडे नेले व त्‍या वर्कशॉपचे दुरुस्‍ती अंदाजपत्र तयार करुन गैरअर्जदाराकडे दि.21/07/2007 रोजी दाखल केले. संपुर्ण प्रक्रिया श्री.यादवळकर यांचे सर्व्‍हे प्रमाणे केले. ट्रक दुरुस्‍त केल्‍यावर अंतीम सर्व्‍हे करण्‍यात आला. सर्व्‍हेअर रिपोर्टची प्रत अर्जदारास मागणी करुनही मिळाली नाही. सर्व्‍हेअरने असेस केलेले नुकसान रु.1,50,000/- दर्शविण्‍यात आले. अचानकपणे ऑगष्‍ट 2007 मध्‍ये गैरअर्जदाराकडुन एक पत्र मिळाले त्‍यांनी इंजनला झालेले नुकसान आनुषंज्ञनिक वा अनृवर्ती consequential  नुकसानमुळै झाले आणि पॉलीसीच्‍या मुदत व अटी प्रमाणे गैरअर्जदार हा अनुषंगित consequential नुकसान depression नुकसान wear tear मेकॅनिकल किंवा इलेक्‍ट्रॉनिकल ब्रेक डाऊन बंद किंवा तुटल्‍यामुळे इ.मुळे होणा-या नुकसानीस गैरअर्जदार विमा कंपनी जबाबदार राहणार नाही असे नमुद केले आहे. सदरचे नुकसान गैरअर्जदार कंपनी रु.1,01,000/- चा धनादेश अर्जदाराच्‍या नांवाने एका लिफाफामध्‍ये शिवरत्‍न ऑटोमोबाईल्‍स जंगले पेट्रोल पंप गंगाखेड येथे पाठविले व त्‍यामध्‍येच एक लिफाफा अर्जदाराच्‍या नांवाने पाठविला आहे. सदर लिफाफा शिवरत्‍न ऑटोमोबाईल्‍स ने अर्जदारास दिले, दिलेली रक्‍क्‍म अतीशय तुटपुंजी आहे. सर्व्‍हेअरने दाखविलेली नुकसान भरपाई रु.1,75,000/- एवढी होती म्‍हणजेच रु.74,000/- गैरअर्जदाराने अद्यापही दिलेले नाही व त्‍यांनी देण्‍याचे नाकारलेले आहे. अर्जदारास रु.1,01,321/- चा धनादेश दि.24/09/2007 रोजी मिळाले व अर्जदाराने ही रक्‍क्‍म नाराजीने अंडर प्रोटेस्‍ट घेतली. इंजनचे झालेले नुकसान हे अपघातामुळे झालेले आहे. त्‍यामुळे रु.74,000/-, 12 टक्‍के व्‍याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- देण्‍यास गैरअर्जदार जबाबदार आहे.
     गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे वकला मार्फत दाखल केलेले आहे. आपल्‍या जबाबात गैरअर्जदार यांनी ट्रक नंबर एम.एच.22 एम.97 याचा अपघात झाला व फिर्याद नोंदविली व पंचनामा झाला इ. बाबी नाकारले आहे. अर्जदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे सर्व्‍हेअरने दाखविलेल्‍या वाहनाचे नुकसान रु.1,50,000/-झाल्‍याचे दर्शविले आहे, हे देखील खोटे आहे असे म्‍हटले आहे. सर्व्‍हे रिपोर्टची मागणी केली हे त्‍यांना मान्‍य नाही.   गैरअर्जदारांनी हे मान्‍य केले आहे की, दि.03/08/2007 रोजी पत्र पाठवुन रु.75,000/- देण्‍याचे नाकारले आहे त्‍याचे कारण इंजनचे झालेले नुकसान हे consequential  स्‍वरुपाचे असल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व नियमामध्‍ये बसत नाही.  Any Consequentail loss, depreciation, wear and tear, mechanical or electrical breakdown, failures or breakages, since the damage caused to the Engine is of consequential nature, the same not covered under the said policy. गैरअर्जदार यांनी ट्रकचे रेडीयटरचे नुकसान झालेले आहे त्‍यामुळे इंजनचे कुलिंग प्रोसेस बंद झाले हे मान्‍य नाही. विमा कंपनीने रु.1,01,321/- चा धनादेश दि.24/09/2007 रोजी अर्जदाराच्‍या नांवाने पाठविलेला आहे व तो सर्व्‍हेअरच्‍या सर्व्‍हेनुसार दिला आहे व अर्जदाराने स्विकारला आहे. गैरअर्जदारांनी वाहनाची पॉलिसी गुडस कॅरींग व्‍हेहीकल पॉलिसी क्र.3003/1096597/00/000 नियम व अटी खाली दिलेले आहे. सर्व्‍हेअर संतोष रेनके यांनी दि.06/09/2007 रोजी अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे केला व नुकसान भरपाई रु.1,01,321/- दाखविण्‍यात आले ते सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केले आहे. अर्जदाराच्‍या तक्रारीप्रमाणे तो मारगलवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथे राहतात म्‍हणुन अर्जदारास त्‍यांच्‍या राहत्‍या घरी पत्र व डी.डी.पाठविले आहे. अपघात हा परभणी जिल्‍हयात घडलेले आहे त्‍यामुळे या मंचास कार्यक्षेत्र येणार नाही असा मुद्य उचललेला आहे.   गैरअर्जदार यांनी रु.74,000/- नाकारुन सेवेत कुठेही त्रुटी केलेली नाही त्‍यामुळे अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
 
     अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेले कागदपत्र व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                        उत्‍तर.
 
1.   गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रुटी सिध्‍द होते काय ?              नाही.
2.   काय आदेश ?                                             अंतीम आदेशा प्रमाणे.
 
                           कारणे
मुद्या क्र. 1
 
     गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्‍हणण्‍यात अर्जदार यांची तक्रार या न्‍याय मंचाच्‍या कार्यक्षेत्रातत येत नाही, असा प्राथमिक आक्षेप नोंदविला होता. त्‍यावर दि.09/02/2009 रोजी आदेश करण्‍यात आला. त्‍याप्रमाणे तक्रार अर्जातील परिच्‍छेद क्र.1 गैरअर्जदार यांना मान्‍य आहे व गैरअर्जदार कपंनी यांचे कार्यालय नांदेड येथे आहे. गैरअर्जदार कपंनीकडुन जेथे पॉलिसी काढली आहे किंवा शाखा कार्यालय जेथे आहे तेथे अर्जदार तक्रार दाखल करु शकतात. मा.महाराष्‍ट्र राज्‍य आयोग 2005 (3) सी.पी.आर. 2000, भागवत शामराव राऊत विरुध्‍द एम.कुमार बिल्‍डर्स हा केस लॉ प्रमाणेया न्‍यायमंचास कार्यक्षेत्र येते. गैरअर्जदारांनी आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यात एम.एच.22 एम.97 या ट्रकचा अपघात झाला व त्‍याची फिर्याद पोलिस स्‍टेशनला नोंदविण्‍यात आली हे सर्व जरी नाकारले असले तरी नंतर त्‍यांनीच हे कबुल करुन धनादेश दिलेले आहे. अर्जदाराच्‍या मते त्‍यांच्‍या वाहनाचा अपघात दि.23/06/2007 रोजी झाल्‍यावर एफ.आय.आर. क्र. 12/2007 हा आखाडा बाळापुर येथे गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. त्‍याबद्यलचा एफ.आय.आर. या प्रकरणांत दाखल आहे. श्री.संतोष रेनके सर्व्‍हेअर यांनी घटना स्‍थळावर जाऊन अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे केला व त्‍याबद्यल रु.1,75,000/- चे नुकसान दर्शविण्‍यात आले आहे, असा अर्जदारांनी कुठलाच पुरावा दाखल केला नाही या उलट गैरअर्जदारांनी सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. दि.06/09/2007 रोजी सर्व्‍हेअर संतोष रेनके यांनी सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे संपुर्ण तपशिल दिलेले आहे. या ट्रकच्‍या वयाप्रमाणे डिप्रेसेसन कमी केलेले आहे. यात चेसेज ट्रॅपींग,फॅट एक्‍सेस,लीज स्प्रिंग, कॅबिन,लोड बॉडी, केट कव्‍हर याच्‍या समोर व्‍हॅट चार्जेस असे लिहीले आहे. अनुक्रमे रु.7,000/-,रु.800/-, रु.12,000/-, रु.32,500/- रु.18,000/-, रु.8,500/- असे एकुण रु.68,000/- दाखविण्‍यात आले आहे व ते लेबर पेमेंट मध्‍ये घेतलेले आहे म्‍हणजे पार्टसबद्यल रु.50,307.99 यावर डिप्रेसेशन रु.19,045/- कमी करुन रु.9,940.72 सॉलवेज कमी रुन नेट रक्‍कम रु.30,321.48 असे एकुण o/f लेबर रु.4,500/-, एकुण डी.टी. लेबर रु.68,000/-, असे दर्शविण्‍यात आले आहे व रु.1,02,821.48 एक्‍सेस रक्‍म रु.1,500/- कमी करुन रु.1,01,321/- ची जबाबदारी दाखविण्‍यात आली आहे. व तीच रक्‍कम अर्जदारांनी स्विकारली आहे, हे सर्व्‍हे रिपोर्ट या प्रकरणांत दाखल आहे.ही रक्‍कम अंडर प्रोटेस्‍ट स्विकारल्‍याबद्यल पुरावा नाही. दि.24/09/2007 रोजी अर्जदारांना हा धनादेश मिळाला नंतर दि.16/10/2007 रोजी ही रककम मान्‍य नसल्‍याबद्यल पत्र गैरअर्जदारांना पाठविले ते पत्र आर.पी.ए.डी.ची पोच अर्जदारांनी दाखल केली आहे. परंतु अर्जदाराने ज्‍याबद्यल तक्रार केली त्‍या इंजनच्‍या नुकसानीबद्यलचा तपशिल सर्व्‍हे रिपोर्टमधे सर्व्‍हेअरने नमुद केलेले नाही. त्‍याबद्यल गैरअर्जदारांनी एक पत्र पाठविले आहे व पॉलिसीचे नियम दाखल केलेले आहे. यातील नियम क्र.2 प्रमाणे. The company shall not be liable to to make any payment in respect of (a)  Consequential loss, depreciation, wear and tear, mechanical or electrical breakdown, failures or breakages nor for damages caused by overloading or strain of the insured vehicle   nor for loss of or damage to accessories by burglary,housebreaking or theft unless such insured vehicle is stolen at the same time. यासाठी गैरअर्जदार जबाबदार नाही असे म्‍हटले आहे. फक्‍त अपघातात झालेली नुकसान भरपाईबद्यलच गैरअर्जदार जबाबदार आहे असे म्‍हटले आहे, हे जरी खरे असले तरी प्रश्‍न हा उपस्थित होतो की, अर्जदारांनी रु.1,75,000/- ची नुसान त्‍यांना सर्व्‍हेअर रिपोर्ट माहीत नसतांना कशाच्‍या आधारे ठरविले रु.1,75,000/- अधिकचे नुकसान कसे काय मागतात हे रु.75,000/- त्‍यांना मागण्‍याचे असतील तर त्‍यांना एखादया तज्ञ मेकॅनिकल व ऑथोराईज्‍ड कंपनीचे डिलरचे इस्‍टीमेट व त्‍यात रु.75,000/- चे नुकसान  दाखवीणे आवश्‍यक असतांना याप्रमाणे अर्जदारांनी कुठलेही कागदपत्र बिल इस्‍टेमेट किंवा अहवाल दाखल केलेले नाही, या उलट गैरअर्जदारांनी संतोष रेनके सर्व्‍हेअर यांचे शपथपत्र दाखल केलेले असुन सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे दिलेले नुकसान बरोबर आहे असे म्‍हटलेले आहे. आता एकदा अर्जदारांनी धनादेशाद्वारे रक्‍कम स्विकारल्‍यानंतर व तो धनादेश कॅश केल्‍यानंतर परत आधीकची रक्‍कम त्‍यांना मागता येणार नाही.
 
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
 
1.   अर्जदार यांचा अर्ज फेटाळण्‍यात येतो.
2.   दावा खर्च ज्‍यांनी त्‍यांनी आपापला सोसावा.
3.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                सदस्‍या                      सदस्‍य
 
 
गो.प.निलमवार.
लघूलेखक.