जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 289/2008. प्रकरण दाखल तारीख - 22/08/2008 प्रकरण निकाल तारीख - 11/12/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य 1. लक्ष्मीबाई भ्र. नारायण कांबळे वय, 43 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा. बावलगांव ता. मूखेड जि. नांदेड. 2. सविता नारायण कांबळे वय,18 वर्षे 3. उध्दव नारायण कांबळे वय,15 वर्षे 4. जयश्री नारायण कांबळे वय,16 वर्षे अर्जदार क्र.2,3 व 4 यांचा पालनकर्ता अर्जदार क्र.1. सर्व राहणार बावलगांव पो.शेळगांव (गौरी) ता.मूखेड जि. नांदेड विरुध्द. 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, मूखेड ता.मूखेड जि. नांदेड. 2. आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., झेनेथ हॉऊस, केशवराव खाडे मार्ग महालक्ष्मी, मुंबई -400 034. गैरअर्जदार 3. व्यवस्थापक,आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शूरन्स कंपनी लि.,शाखा कार्यालय अक्सीस बँकच्यावर कलामंदीर जवळ, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.रघूवीर कूलकर्णी गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड.अ.जी.व्यास निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम अदा न करुन सेवेत ञूटी केलेली आहे म्हणून अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रु.1,00,000/- व्याजासह, मानसिक व शारीरिक ञासापोटी रक्कम रु.50,000/-व दावा खर्च म्हणून रु,5000/- मिळावेत म्हणून तक्रार अर्ज दाखल केला आहे. अर्जदार क्र.1 मयत नारायण कांबळे यांची पत्नी आहे व अर्जदार क्र.2 ते 4 हे त्यांचे मूले आहेत. मयत नारायण कांबळे यांचा मृत्यू रस्ता अपघातात दि.22.12.2005 रोजी झाला होता. शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना अंतर्गत शासनाने विमा पॉलिसी दि.10.4.2005 ते दि.9.4.2006 या कालावधीसाठी घेतली होती. घटना घडल्यानंतर अर्जदार क्र.1 यांनी दि.29.4.2005 रोजीच्या परिपञकानुसार तहसिलदार मूखेड यांचे कार्यालयात दि.17.1.2006 रोजी या योजनेचे अंतर्गत दावा अर्ज दाखल कला व गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविला. विम्याची रक्कम न मिळाल्यामूळे गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस देण्यात आली. शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्कम रु.1,00,000/-, तसेच मानसिक ञासाबददल रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु,5,000/- मिळावेत अशी अर्जदाराची मागणी आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. याप्रमाणे घटना घडल्यानंतर मयताची पत्नी लक्ष्मीबाई नारायण कांबळे हिने तहसिलदार, मूखेड यांचेकडे दि.17.1.2006 रोजी क्लेम व त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपञ दाखल केलेली आहेत.प्राप्त विम्यामधील सर्व कागदपञ आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शूरन्स कंपनी लि. मुंबई यांचेकडे मंजूरीसाठी या कार्यालयाकडून दि.23.1.2006 रोजी पाठविण्यात आली. मयत नारायण कांबळे हे मौजे बावलगांव ता.मूखेड येथे 0.61 आर जमिनीचे मालक आहेत व ते शेतकरी आहेत. योजनेप्रमाणे विम्याचा लाभ मिळण्यास ते पाञ आहेत असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. याप्रमाणे दि.22.12.2005 रोजी मयत नारायण कांबळे यांचा मृत्यू झाला हे त्यांना मान्य नाही. तहसिलदार मूखेड यांचेकडे सदरचा विम्याचा अर्ज पाठविला हे सूध्दा त्यांना मान्य नाही. अर्जदारास विमा रक्कम दिलेली नाही हे सूध्दा त्यांना मान्य नाही. या विमा अंतर्गत नूकसान भरपाईची रक्कम अदा करण्या बाबत वाद निर्माण झाल्यास त्याबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य पूणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नीर्णय घेईल असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाचे खंडपीठ यांनी असा नीर्णय दिला की, एक वीशीष्ठ अधिकारक्षेञ नेमले आहे तेथेच तक्रार दाखल करावी. सदरील नीर्णय हा मंचासमोर दाखल केलेलो आहे. या मंचास अधिकारक्षेञ नाही. शासनाच्या योजनेप्रमाणे घटना घडल्यास सात दिवसांचे आंत अर्जदाराने किंवा त्यांचे कूटूंबाने सर्व कागदपञ तलाठयाकडे दयावयास पाहिजे व त्यानंतर सर्व कागदपञाची छाननी करुन तहसीलदाराने विमा कंपनीकडे एक आठवडयाच्या आंत पाठविण्याचे आहे. अर्जदारांचा क्लेम फॉर्म त्यांने दि.17.1.2006 रोजी तहसीलदार मूखेड यांचेकडे दाखल केला. यात पॉलिसीच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. अर्जदाराचा कसल्याही प्रकारचा क्लेम फॉर्म गैरअर्जदार यांचेकडे आलेला नाही. त्यामूळे अर्जदाराचा क्लेम त्यांनी अद्यापही फेटाळला नाही.त्यामूळे त्यांचेकडून ञूटीची सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. म्हणून त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदाराने पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअज्रदार क्र. 1,2 व 3 यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे क्लेम फॉर्म व त्यासोबत दि.22.12.2005 रोजी तहसिलदार यांना लिहीलेले सूचना अर्ज तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोलिसांनी केलेला पंचनामा, पी. एम. रिपोर्ट दाखल केलेले आहे. मरणोत्तर प्रमाणञ, घटनास्थळ पंचनामा, तसेच तलाठयाचे 7/12, होल्डींग, वारसा प्रमाणपञ, व मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहेत. नारायण शिंदे हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत समाविष्ट असून त्यांचा अपघातामूळे त्यांचे वारसास मिळणारी रक्कम रु.1,00,000/- यासाठी ते पाञ आहेत. अर्जदार हे शेतकरी असल्याबददल गाव नमूना सात दाखल केलेला आहे त्यानुसार ते 0.61 आर क्षेञाचे मालक आहे म्हणजे ते ग्राहक आहेत हे सिध्द होते. पोलिस पंचनाम्यावरुन सूध्दा त्यांचा मृत्यू अपघाताने झाला आहे असे म्हटले आहे. उपजिल्हा रुग्णालय मूखेड यांनी जो पोस्ट मार्टेम रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये सूध्दा The probable cause of death is death due to Hypovolurnic shock. असे लिहीलेले आहे. त्यावरुन त्यांचा मृत्यू हा अपघातानेच झालेला आहे सिध्द होते. वारसाचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे त्यावरुन वरील सर्व अर्जदार हे वारस आहेत हे सिध्द होते. तसेच मयत नारायण पिराजी कांबळे यांचे मृत्यू दाखला प्रमाणपञ दाखल केलेले आहे. यावरुन मयताचा मृत्यू हा दि.22.12.2005 रोजी झाला हे सिध्द होते. तसेच संजय कोंडीबा गबाळे यांची या अपघाताबददल पोलिसांनी घेतलेला जवाब दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मयत नारायण हे अटो क्र. एम.एच.-26-एच-1487 मधून जात असताना अटो पलटी होऊन त्यांचे दोन्ही पायास व छातीस मार लागला, तसेच अटो त्यांचे अंगावर पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. म्हणजेच मयत नारायण यांचा मृत्यू हा अपघाताने झाला हे सिध्द होते. महाराष्ट्र शासनाने शेतक-याच्या हितासाठी गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडून शेतकरी वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी प्रिमियमची पूर्ण रक्कम भरुन घेतलेली आहे व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी लाभार्थी आहेत. नारायण कांबळे यांच्या नांवाने शेती असल्याबददलचा 7/12 व होल्डींग अर्जदाराने दाखल केलेले आहेत व इतरही कागदपञ आहेत. त्यामूळे तो लाभार्थी आहे यावीषयी वाद नाही. शेतकरी विमा योजना सन 2007-08 हे परिपञक या प्रकरणात दाखल आहे. शेतक-याकडून एक महिन्याचे आंत प्रस्ताव प्राप्त झाला पाहिजे असे जरी असले तरी वारसाने एवढया कमी वेळेत प्रस्ताव देणे हे शक्य नसते. आधीच ते दूखात असतात व यानंतर सर्व कागदपञ जमा करुन अशा प्रकारचा प्रस्ताव देण्यास वेळ लागणे शक्य आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांना जबाबदारी टाळता येत नाही व अशा प्रकारचा नियम हा बंधनकारक नाही. त्यात 2008 (2) ALL MR (JOURNAL) 13 Consumer Dispute Redressal State Commission Mumbai, ICICI Lombard General Insurance Com. Ltd. Vs. Smt. Sindhubhai Khanderao Khairnar या प्रकरणात मूदतीचा मूददा येत नाही. मा. उच्च न्यायालय यांनी (2000) I Supreme Court Cases 98 Regional Provident Fund Commissioner Vs Shivkumar Joshi यात केलेल्या आदेशाप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा 1986 सेक्शन 2 (1)(ड) (ii) Consumer---Includes also the beneficiary for whose benefit the services are hired of availed of. म्हणजे तो लाभार्थी आहे. यातही मयत विमेदार हा लाभार्थी आहे. हे सर्व असताना मयत विमेदार नारायण यांचा वारस त्यांची पत्नी व मूले विमेदाराची रक्कम मिळण्याचे हक्कदार आहेत यात काही संशय नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.25.08.2008 पासून त्यावर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदार यांना दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.4,000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |