निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 30/01/2013 तक्रार निकाल दिनांकः- 04/03/2014
कालावधी 01वर्ष. 01महिने.02दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मे साधना जनरल स्टोअर्स, अर्जदार
तर्फे प्रो.प्रा.दिवाकर पिता माधवराव कानडखेडकर, अॅड.एम.बी.दशरथे.
वय 50 वर्षे. धंदा.व्यापार,
रा. गांधी पार्क,परभणी.
विरुध्द
व्यवस्थापक, गैरअर्जदार.
आय.सी.आय.सी.आय.बँक, अॅड.अजय व्यास.
शाखा गांधी पार्क,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदार बँकेने अर्जदाराच्या खात्यातून बेकायदेशिरपणे Transaction Charges आकारुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो परभणी येथील रहिवाशी असून तो व्यापार करतो व तो गैरअर्जदार बँकेचा ग्राहक आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 21/01/2009 रोजी शुन्य रक्कमेवर खाते उघडले आहे. ज्या खात्याचा क्रमांक 646805050331 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार बँकेने अर्जदाराच्या खात्यातून बेकायदेशिरपणे 9,553 रुपये 76 पैसे खालील प्रमाणे वजा केले आहेत.
1 05/04/2011 110.31
2 18/05/2011 275.75
3 20/05/2011 027.58
4 24/05/2011 249.44
5 27/05/2011 590.11
6 03/06/2011 40.00
7 06/06/2011 368.00
8 09/06/2011 501.87
9 22/09/2011 568.05
10 22/09/2011 110.30
11 23/09/2011 27.58
12 26/09/2011 468.78
13 26/09/2011 110.30
14 07/10/2011 386.00
15 09/11/2011 623.95
16 12/12/2011 612.17
17 29/12/2011 716.95
18 01/02/2012 468.78
19 17/02/2012 634.23
20 25/02/2012 386.00
21 07/03/2012 799.68
22 23/04/2012 702.25
23 17/05/2012 758.43
---------------------------
एकूण 9553.76
---------------------------
अर्जदाराचे म्हणणे की,गैरअर्जदाराने सदरच्या रक्कमा कपात करतेवेळी लेखी अथवा तोंडी सुचना दिली नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराच्या सदरच्या बेकायदेशिर कृत्यास कंटाळून खाते बंद करणे बाबत अर्जदाराने गैरअर्जदारास अनेकवेळा विनंती केली व बँकेस अर्जदाराने 9553.76 कोणत्या आधारे कपात केली, अशी विचारणा केली असता, दर वेळेस उडवाउडवीचे उत्तरे दिली.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने वकिला मार्फत दिनांक 06/11//2011 रोजी वकिला मार्फत सदर बेकायदेशिर कृत्या बाबत गैरअर्जदारास लेखी नोटीस पाठविली व त्यास देखील गैरअर्जदाराने उत्तर दिले नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 28/12/2012 रोजी तो गैरअर्जदार बँकेकडे गेला व सदर रक्कम परत करण्याबाबत विनंती केली असता बँकेने सदर रक्कम देण्यास स्पष्टपणे इन्कार केला. म्हणून सदरची तक्रार मंचासमोर दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश करावा की, त्याने अर्जदाराचे खाते क्रमांक 646805050331 अन्वये Transaction Charges म्हणून लावलेले रक्कम रु. 9553.76 अर्जदारास परत द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 2,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 3 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये दिनांक 06/11/2012 ची नोटीस, दिनांक 06/11/2012 ची पोष्टाची पावती, 18/06/2012 रोजीचा खाते उतारा कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे
गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली.
गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब दाखल केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. गैरअर्जदाराने मान्य आहे की, अर्जदाराने त्यांचेकडे दिनांक 21/01/2009 रोजी खाते काढले होते व त्यांना हे देखील मान्य आहे की, अर्जदाराच्या खात्यातून 9553.76 रुपये Transaction Charges म्हणून Debit केलेले आहेत. व सदरची रक्कम Transaction Charges म्हणून Debit केलेले आहे Bank Regulation प्रमाणे व कायद्या प्रमाणे केलेले आहेत तसेच अर्जदार हा आमच्या बँकेकडे सदर रक्कमेच्या चौकशी करण्याकरीता कधीही आला नव्हता वा अर्जदाराने वकिला मार्फत आम्हास दिनांक 06/11/2011 ची नोटीस पाठविली नव्हती.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार हा साधना जनरल स्टोअर्सचा प्रोप्रायटर आहे व तो व्यापार करतो व व्यापाराच्या उद्देशाने अर्जदाराने आमच्याकडे Current Account काढले होते. व सदरचा अर्जदाराचा उद्देश व्यापार कारणासाठी असले कारणाने सदरची तक्रार मंचासमोर चालू शकत नाही व ती खारीज होणे योग्य आहे.
बँकेचे म्हणणे की, अर्जदाराने सदरचे खाते काढते वेळी Terms and Conditions of Current Account च्या कागदपत्रावर सही केली आहे व सदर नियम व अटी मान्य केले आहेत.
बँकेचे म्हणणे की, अर्जदाराने R.C.A. Classic MAB 25 – K च्या नियम व अटीचे पालन केले नाही व Monthly Average Balance म्हणून 25,000/- च्या अटीचे पालन केले नाही. त्यामुळे बँकेने 9563.78 रु. Transaction Charges लावले आहेत तो योग्यच आहे.
गैरअर्जदार बँकेचे म्हणणे की, अर्जदार व बँकेमध्ये कोणताही वाद निर्माण झाल्यास नियमा प्रमाणे मुंबई येथेच तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. म्हणून सदरची तक्रार मंचासमोर चालूच शकत नाही व सदरचा वाद चालवण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयासच आहे. म्हणून सदरची तक्रार खारीज करणे योग्य आहे व बँकेने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 12 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
बँकेने पुराव्याबाबत नि.क्रमांक 14 वर 3 कागदपत्रांच्या प्रती दाखल केले आहेत, ज्यामध्ये 19/12/2008 चे रोमींग करंट अकांउंट, Letter of Sole proprietorship, Terms and conditions of account च्या प्रती दाखल केली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराची सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत
मंचास चालवण्यासाठी योग्य आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने आपल्या तक्रारी मध्ये स्वतः मान्य केले आहे की, तो साधना जनरल स्टोअर्सचा प्रोप्रायटर म्हणून व्यापार करतो व त्याने गैरअर्जदार बँकेकडे Current Account क्रमांक 646805050331 व्दारे खाते काढले होते, व सदरची बाब ही नि.क्रमांक 14/1 वर दाखल केलेल्या Roaming Current Account च्या अर्जाच्या प्रतीवरुन सिध्द होते. अर्जदाराचे सदरचे खाते हे साधना जनरल स्टोअर्सच्या नावाने व्यापारासाठी उघडले असल्याचे स्पष्टपणे नि.14/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.
म्हणजेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दुकानाच्या नावाने उघडलेले करंट खाते हे व्यापारी कारणासाठी व्यवहारासाठी उघडलेले असल्यामुळे व्यापारी कारणाखालील व्यवहारा संबंधीची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (डी) मधील तरतुदी नुसार येत नाही व अर्जदार बँकेचा ग्राहक होवु शकत नाही, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मंचात चालवण्याचा मंचाचा अधिकार क्षेत्रात येत नाही व चालवणेस पात्र नाही.
याबाबत मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली याने रिपोर्टेड केस 2011 (2) CPR No. 376 (NC) मध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे की, Bank Account maintained by a commercial organization for a commercial purpose fall out side purview of consumer protection Act. तसेच मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली याने 2013(2) CPR 01 NC Revision Petition No. 257/2012 सुभाष विरुध्द
मालेगाव मर्चंट बँक प्रकरणात स्पष्टपणे म्हंटले आहे की, Business Bank Account does not come under purview of consumer protection Act 1986.
सदर प्रकरणाचा निकाल प्रस्तुत प्रकरणास लागु पडतो. अर्जदार हा बँकेचा ग्राहक म्हणून सदरची तक्रार मंचासमोर वरील कारणामुळे दाखल करु शकत नाही व मंचास प्रस्तुत तक्रार चालवण्याचा अधिकार नाही, असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.