(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार यांच्याकडून गृहकर्ज व वैद्यकिय विमा पॉलीसी घेतली आहे. पतीच्या निधनानंतर अर्जदाराने विमा रकमेची मागणी केली, पण गैरअर्जदार यांनी ती न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. (2) त.क्र.239/09 अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार यांच्याकडून गृहकर्ज घेतले आहे, ज्याची त्यांनी काही काळ नियमितपणे परतफेड केली आहे. अर्जदाराच्या पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे कर्जाची उर्वरित रक्कम ते भरु शकले नाहीत. अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून गृहकर्ज घेताना गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून वैद्यकिय विमा पॉलीसी घेतली असून, तिचा क्रमांक 4005 ए 0000 536 असा आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी सदरील विमा पॉलीसीची प्रत त्यांना दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पतीच्या निधनानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना याबाबत योग्य त्या कागदपत्रांसह कळविले. गैरअर्जदार क्र.2 यांनी, त्यांना एफ.आय.आर., पंचनामा व पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल करण्याबाबत पत्र दिले. गैरअर्जदार क्र.1 यांना सदरील पॉलीसीची माहिती असताना देखील अर्जदाराच्या विरुध्द दावा दाखल केला व घर रिकामे करण्यासाठी धमकी दिली. गैरअर्जदार क्र.2 यांनी विमा रक्कम दिल्यास त्यांच्याकडे कर्जाची थकबाकी रहात नसल्याचे सांगून गैरअर्जदार क्र.2 यांनी विमा रक्कम देण्याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी कर्जाची रक्कम वसुल करण्यासाठी अन्य कोर्टात दावा दाखल केलेला असल्यामुळे अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. अर्जदाराच्या पतीची विमा पॉलीसी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून घेण्यात आलेली असून, पॉलीसीची कागदपत्रे व इतर बाबीची पूर्तता करण्यास ते बांधील नाहीत. त्यांच्यातर्फे कर्ज वसुलीसाठी दावा दाखल करण्यात आला असून, अर्जदारास कोणतीही धमकी देण्यात आलेली नाही. अर्जदारास गृहकर्ज देताना त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी जागा मॉडगेज करण्यात आली असून, अर्जदाराच्या पतीने कर्जफेड न केल्यामुळे 394413/- रुपये रक्कम वसुल करण्यासाठी दावा दाखल केला असल्याचे म्हटले आहे. अर्जदारास दि.25.03.2009 पर्यंत घराचा ताबा देण्याबाबत कळविले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले असून, ते अपघातात मरण पावले नाहीत. त्यांच्या तर्फे काढण्यात आलेली विमा पॉलीसी, अपघाती निधन झाल्यास विमा रक्कम मिळण्याबाबत असल्याचे म्हटले आहे. अर्जदारास दि.17.03.2008 रोजीच्या पत्राद्वारे पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमार्टम अहवाल इत्यादी कागदपत्रांची मागणी करण्यात आली असून, अर्जदाराने त्याची पूर्तता केलेली नाही. अर्जदाराच्या पतीचे अपघाताने निधन झाले नसून, (3) त.क्र.239/09 हार्ट अटॅकमुळे झाले असल्यामुळे विमा रक्कम देता येत नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराचे पती, यादव सोनवणे यांना गैरअर्जदार क्र.1 यांच्यातर्फे 2,50,000/- रुपयाचे गृहकर्ज दि.15.12.2003 रोजी मंजूर करण्यात आले. या गृहकर्जाची परतफेड 2443/- रुपये प्रतिमहिना या प्रमाणे 14 वर्षात करावयाची होती. अर्जदाराच्या पतीने काही रक्कम भरल्यानंतर दि.13.08.2007 रोजी त्यांचे, औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गैरअर्जदार क्र.1 यांनी कर्जाची परतफेड न झाल्यामुळे Securitisation Reconst ruction of financial Assets Enforcement of security interest Act 2002 मधील कलम 13 (2) प्रमाणे अर्जदाराविरुध्द दावा दाखल केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द दाखल केलेल्या या प्रकरणात मंच हस्तक्षेप करीत नाही. गैरअर्जदार क्र.2 यांच्या जवाबानुसार त्यांनी अर्जदाराच्या पतीची वैद्यकिय विमा पॉलीसी काढल्याचे मान्य केले आहे, पण अर्जदाराच्या पतीचे निधन अपघातात झाले नसून, ते हार्ट अटॅकमुळे झाले असल्याचे म्हटले आहे. डॉ.सचिन बत्तीसे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात व धूत हॉस्पिटलमधील कागदपत्रांचे निरीक्षण केल्यावर त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला असल्याचे स्पष्ट होते. धूत हॉस्पिटल, औरंगाबाद तर्फे देण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण acute cardiac respiratory arrest due to venous sinus thrombosis असे म्हटलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात देखील, अपघाताने निधन झाल्याचे नमूद केलेले नाही. वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |