ORDER | ( पारित दिनांक :22/09/2014) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये).) प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम-12 नुसार विरुध्द पक्षा विरुध्द एक्सचेंज ऑफरची रक्कम 25,000/-रुपये, मानसिक, शारीरिक त्रासाकरिता रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च मिळण्याकरिता दाखल केलेली आहे. - तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याला नविन कार खरेदी करायची असल्यामुळे त्याच्या वडिलांच्या नांवाने असलेली जुनी कार श्री. वानकर यांना दि.17.10.2012 रोजी विक्री केली होती व नविन मारोती व्हॅगनार कार खरेदी करण्याकरिता मारोती कंपनीकडे रु.5,000/-जमा करुन बुकींग केली. त्यानंतर त.क.ला ईरॉस हुंडाई कंपनीकडे नविन कार खरेदी केल्यावर एक्सचेंज ऑफर असल्याची माहिती मिळाली व त्यांनी वि.प.क्रं. 1 कडे चौकशी केली असता एक्सचेंज ऑफर सुरु असल्याचे त्यांनी त्याला सांगितले व नविन कार घेण्याचे सुचविले. वि.प.ने तक्ररकर्त्यास आश्वासन दिले की, जुनी कार सहा महिन्यापूर्वी विक्री केली असेल व सदर कार तक्रारकर्त्याच्या वडिलांच्या नावांने असले तरी वि.प.क्रं. 1 कडून नविन कार खरेदी केल्यास रु.25,000/-ची एक्सचेंज ऑफर मिळले.
- तक्रारकर्त्याला सदर ऑफर योग्य वाटल्याने व त्याला त्याचे आर्थिक लाभ होत असल्याने नविन व्हॅगनार मारोती कारची बुकींग रद्द केली व वि.प.क्रं.1 कडून Santro Vaiant Santro GL LPG BS IV , रजिस्ट्रेशन नंबर MH-32 C 8268 ही दि.12.11.2012 ला 61,900/-रुपये देऊन व 3,50,000/-चे स्टेट बँकेचे कर्ज घेऊन खरेदी केले.
- तक्रारकर्त्याने असे कथन केले की, नविन कार खरेदी केल्यानंतर त्यांनी विरुध्द पक्षाकडे एक्सचेंज ऑफरची रक्कम रु.25,000/- मिळण्याकरिता जुने विकलेल्या वाहनाचे आर.सी.बुक, टॅक्स पावती, इंन्श्योरन्स जमा केले व नविन कारचे आर.सी.बुक, टॅक्स पावती, इन्शोरन्स एक महिन्यानंतर जमा केले. एक्सचेंज ऑफरचे रु.25,000/- देण्याबाबत विनंती केली परंतु वि.प.ने सदरील रक्कम सहा महिन्याचे आत मिळेल असे आश्वासन दिले.
- त.क. यांनी वेळोवेळी एक्सचेंज ऑफरची रक्कम रु.25,000/- देण्याबाबत वि.प.ला विनंती केली. परंतु वि.प.यांनी रु.25,000/- त.क.ला दिले नाही. म्हणून दि. 4.6.2013 ला त.क.नी वि.प.क्रं.2 कडे लेखी पत्र देऊन एक्सचेंज ऑफरची रक्कम रु.25,000/-ची मागणी केली. परंतु त.क ने वेळेत दस्ताऐवज दाखल न केल्यामुळे त.क.ला एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळू शकत नाही असे वि.प.क्रं. 2 ने कळविले. त.क.ने वि.प.क्रं. 1 कडे फानेद्वारे संपर्क केला असता वि.प.ने त.क.ला कोणतीही कारवाई करु नका तुम्हाला एक्सचेंज ऑफरची रक्कम रु.25,000/- लवकारात लवकर देतो असे त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केले आहे.
- वि.प.यांनी एक्सचेंज ऑफर रक्कम रु.25,000/- त.क.ला न दिल्यामुळे सेवेत त्रृटी केली आहे. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन एक्सचेंज ऑफर रक्कम रु.25,000/- व शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 15,000/- तक्रार खर्चासह मागणी केली आहे.
- वि.प.क्रं. 1 व 2 हे या प्रकरणात हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 8 वर दाखल केला व कबूल केले की, त.क.ने वि.प.कडून दि. 22.11.2012 रोजी MH-32/C-8268 ही कार खरेदी केली होती. तसेच वि.प. ने हे मान्य केले की, त्यावेळेस नविन कार खरेदीवर Exchange Bonus निर्मिती कंपनीकडून देण्यात येईल अशी स्किम चालू होती. त्याकरिता खरेदी Form No. Annexure 1 : Exchange Bonus च्या शर्ती व अटी पूर्ण करावयाच्या होत्या. त्याप्रमाणे खरेदीदाराने नविन कार खरेदी केल्यापासून 110 दिवसात जुनी कार विकलेली कागदपत्रे संबंधी वितरकाकडे दाखल करणे जरुरीचे होते तरच त्यांना एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळू शकत होता. याची कल्पना वि.प.ने त.क.ला दिली होती व अटी व शर्तीचे फॉर्म सुध्दा दिले होते.
- नविन कार खरेदीच्या वेळेस Sales Invoice सोबत वि.प.नी त.क. ला Exchange Discount Form दिला होता व तो फॉर्म व दस्त 110 दिवसात त्यांच्याकडे देण्यास सांगितले होते. परंतु तक्रारकर्त्याने शर्ती व अटी प्रमाणे लागणारे कागदपत्र नविन कार खरेदी केल्यापासून 110 दिवसात दाखल केले नाही. त्यामुळे सदरील योजनेचा फायदा तक्रारकर्त्याला देता आला नाही व योजना संपुष्टात आली.
- त.क.ने दि. 6.6.2013 रोजी वि.प.क्रं. 2 च्या कायार्लयात पत्र पाठवून एक्सचेंज बोनसची मागणी केली होती परंतु दिलेल्या वेळेत त.क.ने कागदपत्र न दाखल केल्यामुळे त्याला त्याचा फायदा मिळू शकला नाही हे त.क.च्या चुकीमुळे झालेले आहे. यात वि.प.क्रं. 1 व 2 यांनी सेवा पुरविण्यात कसलाही कसूर केलेला नाही. त्यामुळे त.क. मागणी केल्याप्रमाणे एक्सचेंज बोनस मिळण्यास हक्कदार नाही.
- वि.प. 1 व 2 ने असेही कथन केले की, त.क.ने दाखल केलेली तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 प्रमाणे चालू शकत नाही. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. म्हणून ती खारीज होण्या योग्य आहे व तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
- त.क.ने त्याची तक्रार साबित करण्याकरिता स्वतःचे शपथपत्र त्यांच्या वडिलांच्या नावाने असलेली जुनी कारचे आर.सी.बुक, इन्शोरन्स व जुनी कार विकत घेणा-याचे नावांने असलेले आर.सी.बुक, इन्शोरन्स तसेच वि.प.कडून नविन कार खरेदी केलेले कारचे कागदपत्र दाखल केले व या व्यतिरिक्त त.क.ने तक्रार दाखल करण्यापूर्वी त्याचे व वि.प. 1 व 2 चे प्रतिनिधी यांच्याशी मोबाईलवरुन झालेले संभाषणाची लेखी दस्त तयार करुन दाखल केलेले आहे. वि.प.क्रं. 1 व 2 यांनी त्यांच्या बचावासाठी फक्त Annexure 1 : Exchange Discount चा फॉर्म दाखल केलेला आहे.
- त.क.चे प्रतिनिधींचा तोंडी युक्तिवाद ऐकला. वि.प. व त्यांचे वकील युक्तिवादाच्या वेळी गैरहजर असल्यामुळे त्यांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला नाही.
- तक्रारकर्ता व विरुध्द पक्षाचा वाद, प्रतिवाद, तक्रारकर्त्याने केलेला युक्तिवाद पाहता आमच्या समोर खालील मुद्दे उपस्थित होतात. ते मुद्दे व त्यावरील उत्तर पुढील कारणे व मिमांसात नमूद केल्यानुसार खालीलप्रमाणे आहे.
मुद्दे उत्तर मुद्दा क्रं.1 विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने तक्रारकर्त्यास Exchange Discount नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली काय ? व अनुचित व्यापार प्रथेचा होय अवलंब केला काय ? मुद्दा क्रं.2 तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? होय -: कारणे व निष्कर्ष :- - विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 हे ईरॉस हुंडाई कंपनीचे वितरक आहे व वि.प.1 चे कार्यालय वर्धा येथे व वि.प.2 चे कार्यालय नागपूर येथे आहे, हे उभयतांना मान्य आहे. तसेच दि. 22.11.2012 रोजी त.क.ने वि.प. क्रं. 1 व2 कडून नविन कार Santro Vaiant Santro GL LPG BS IV , नोंदणी क्रं. MH-32 C 8268 ही खरेदी केली आहे, हे उभय पक्षांनी मान्य केले आहे. तसेच सदर खरेदीच्या वेळेस निर्मित कंपनीकडून जुनी कार विकली असल्यास Exchange Offer व Discount रु.25,000/- खरेदीदाराला देण्याची योजना लागू केली होती, हे सुध्दा उभय पक्षांना मंजूर आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, वि.प.क्रं. 1 ने त्याला असे आश्वासन दिले की, त.क.नी नविन कार खरेदी केल्यानंतर वि.प.क्रं.1 कडे त्याच्या वडिलांच्या नावावर असलेली जुनी कारचे दस्ताऐवज , आर.सी.बुक, टॅक्स पावती, इन्शोरन्स व ती कार विकण्यासंबंधीचे कागदपत्र व नविन कारचे कागदपत्र वि.प.कडे जमा केल्यास योजनेप्रमाणे एक्सचेंज ऑफरची रक्कम रु.25,000/- देण्यात येईल. वि.प.यांनी सदर एक्सचेंज ऑफरची रक्कम 6 महिन्याच्या आत मिळले असे आश्वासन दिले. परंतु वि.प.यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही व वेळेवर दस्ताऐवज दाखल न केल्यामुळे एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळू शकत नाही असे त.क.ला कळविले.
- वि.प.यांनी आपल्या लेखी जबाबात असे कथन केले की, नविन कार खरेदी केल्यापासून 110 दिवसात त.क.ने जुनी कार विक्री संबंधीचे कागदपत्र वितरकाकडे जमा करावयास पाहिजे होते. परंतु त.क.नी तसे न केल्यामुळे त्यांना Exchange Discount मिळणा-या ऑफरचा फायदा मिळाला नाही व योजना ही संपुष्टात आली. त्यामुळे त.क. हे योजनेचा लाभ मिळण्यास पात्र नाही असे त्याला कळविले. एक्सचेंज ऑफर देण्यास नकार देऊन वि.प. यांनी कोणत्याही शर्ती व अटीचा भंग केलेला नाही किंवा सेवा देण्यात कोणतीही त्रृटी केलेली नाही. उलट त.क. नी योग्य वेळेत कागदपत्र दाखल न केल्यामुळे त्याला योजनेचा फायदा मिळाला नाही.
- त.क.चे शपथपत्र व दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, त.क.च्या वडिलांचे नावाने इंडीका DLS BSLL ही कार होती. नविन कार खरेदी करण्यापूर्वी त.क.च्या वडिलांनी सदरील कार ओमप्रकाश एन. वानकर यांना विकली व त्याप्रमाणे सदरील इंडिका कार ही ओमप्रकाश वानकर यांच्या नावांने ट्रान्स्फर करण्यात आली. त.क.ने आपल्या शपथपत्रात जुनी कार विकल्याचे कागदपत्र , अटी व शर्तीप्रमाणे लागत असलेले सर्व कागदपत्र वि.प. 1 कडे सादर केली व एक्सचेंज बोनसची मागणी केली. जरी त.क.ने कागदपत्र दाखल केल्याची तारीख आपल्या अर्जात व शपथपत्रात नमूद केलेली नसली तरी पण त्याचे व वि.प. 1 च्या प्रतिनिधी मध्ये मोबाईलवर झालेले संभाषणवरुन असे लक्षात येते की, संबंधित कागदपत्र त.क.ने वि.प.च्या प्रतिनिधीकडे दाखल केले होते. वि.प. चे प्रतिनिधी श्री. प्रशांत भागवतकर व त.क.यांच्यात मोबाईलवरुन झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डींग टाईप केलेले आहे. त्याची प्रत नि.क्रं. 13 वर दाखल करण्यात आलेली आहे.
- सदरील संभाषण मंचासमोर दाखल केल्यानंतर वि.प.ने त्या संभाषणा संबंधी कोणताही आक्षेप नोंदविलेला नाही व ते चुकीचे आहे असे दाखविण्यासाठी संबंधीत व्यक्तिचे शपथपत्र दाखल केलेले नाही. किंवा सदरील मोबाईल हॅन्डसेटचे रेकॉर्डींग ऐकण्याची विनंती सुध्दा मंचासमोर केलेली नाही. इतकेच नाही तर वि.प.यांनी आपल्या बचावासाठी स्वतःचे किंवा प्रतिनिधीचे शपथपत्र देखील दाखल केलेले नाही.
- त.क. ने वि.प. च्या लेखी जबाबात केलेल्या तक्रारी संबंधी त्याचा खुलासा नि.क्रं.10 वर दाखल केलेला आहे. त्यात त.क.ने स्पष्टपणे नमूद केले की, वि.प.1 चे व्यवस्थापक/सेल्स एक्सीकेटीव्ह प्रशांत भागवतकर यांना त.क.च्या वडिलांचे नांवे असलेली कार इंडिका MH-19 W 0100 श्री. वानकर यांना दि. 17.10.2012 ला विकली आहे, याची माहिती दिली होती व त्यांनी त्याचे वडिलांचे नावाचे कागदपत्र श्री. भागवतकर यांच्याकडे दिले होते. त्या वेळेस भागवतकर यांनी एक्सचेंज बोनस रु.25,000/- 6 महिन्यानी मिळेल असे आश्वासन त.क.ला दिले होते. वि.प.च्या खुलास्यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प.कडून कार खरेदी करण्यापूर्वी त.क.ने मारोती व्हॅगनार कार खरेदी करण्याकरिता बुकींग केले होते ती त्यांनी रद्द करुन घेतली. त्यामुळे त्यांनी जमा केलेले रु.5,000/-चे नुकसान झाले. प्रशांत भागवतकर व त.क.मध्ये झालेल्या संभाषणावरुन असे निदर्शनास येते की, त.क.ने जुनी कार विकल्याचे कागदपत्र वेळेत वि.प.1 कडे जमा केले होते. वि.प.1 ने ते निर्मित कंपनीकडे पाठविले होते व वि.प. 2 ने तक्रारकर्त्याला नि.क्रं. 3 (8) चे दि. 06.06.2013 चे पत्र देऊन वेळेत कागदपत्र दाखल न केल्यामुळे Exchange Discount ची मागणी रद्दबादल करण्यात आली असे कळविले होते. महत्वाची बाब येथे नमूद करण्यासारखा आहे की, वि.प. 1 चे प्रतिनिधींनी त.क.कडून जेव्हा Exchange Discount साठी कागदपत्र स्विकारली त्यावेळेस त्यांनी त.क.ला वेळेत कागदपत्र दाखल केले नाही अशी कल्पना दिली नाही. जर त.क.ने अटी व शर्तीप्रमाणे वेळेत कागदपत्र दाखल केले नसते तर वि.प.1 चे प्रतिनिधीनीं ते स्विकारली नसते व वि.प.2 कडे Exchange Discount ची रक्कम मिळण्याकरिता पाठविले नसते परंतु तसे झालेले दिसत नाही. या उलट त.क. व वि.प.1 चे प्रतिनिधी मध्ये जे संभाषण झालेले आहे त्यात त्यांनी त.क.ला रक्कम मिळवून देण्याच्या संबंधी आश्वासन दिले होते व त्यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे कळविले.
- जर त.क.ने Exchange Discount साठी लागणारे कागदपत्र वेळेत सादर केले नसते तर वि.प. 1 व 2 हयांनी त्यांना लेखी कळविले असते. परंतु वि.प. 1 व 2 यांनी त.क.ला लेखी अर्ज देई पर्यंत त्याला कळविले नाही. जेव्हा त.क. ने लेखी पत्र वि.प.2 ला पाठविले त्याच वेळेस त्यांनी दि.6.6.2013चे पत्र पाठवून त्याचा दावा रद्द झाल्याचे कळविले.
- वरील सर्व विवेचनावरुन असे दिसून येते की, वि.प. 1 व 2 यांना त.क. यांनी वेळेत कागदपत्राची पूर्तता करुन सुध्दा त.क.ला Exchange Discount ची रक्कम रु.25,000/- दिली नाही . त्यामुळे त.क.ला Exchange Discount योजनेचा फायदा मिळू शकला नाही. वि.प.ने Exchange Discount च्या अटी व शर्ती अॅनेक्सचर 1 मंचासमोर दाखल केले आहे. परंतु त्यावर त.क.ची कुठेही सही नाही व त.क.ला सदरील अटी व शर्तीची माहिती देण्यात आली होती असा कुठलाही पुरावा वि.प.यांनी दाखल केलेला नाही. Annexure 1 चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वडिलांच्या नावांने असलेली जुनी कार विक्री केल्यास मुलाला नविन कार खरेदी करतांना Exchange Discount चा फायदा मिळतो. परंतु सदरील कागदपत्रांची पूर्तता ही नविन कार खरेदी करण्यापूर्वी 30 दिवसात जुनी कार विकावयास पाहिजे व नविन कार खरेदी केल्यानंतर 105 दिवसात त्याचा फायदा घेता येईल.
- वरील सर्व अटी व शर्तीचे पूर्तता करण्याची जबाबदारी वि.प. 1 व 2 यांच्याकडे होती परंतु त्यांनी ती पूर्तता केली नाही व त.क.ला Exchange Discount मिळणार होता तो मिळू शकला नाही . त्यामुळे मंच हया निष्कर्षा प्रत येते की, वि.प. यांनी त.क. यांना दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे त्याला एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाला नाही.त्यामुळे त.क. हा Exchange Discount चे रु.25,000/- वि.प.कडून मिळण्यास पात्र आहे.
- त.क. ने कार निर्मित कंपनीस पक्षकार केलेले नाही परंतु संपूर्ण व्यवहार हा त.क. व वि.प. 1 व 2 यांच्यामध्ये झालेला असल्यामुळे निर्मित कंपनीला पक्षकार बनविले नसल्यामुळे हे प्रकरण चालू शकत नाही हे म्हणणे बरोबर नाही.
- त.क.ने Exchange Bonus मिळण्याकरिता वेळेत वि.प.कडे पाठपुरावा केला. तरी त्याला वेळेत Exchange Bonus मिळू शकला नाही. त्यामुळे त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. याकरिता त.क. हे शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई म्हणून रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच वि.प. यांनी दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे त.क.ला मंचासमोर प्रकरण दाखल करावे लागले. त्यामुळे तक्रारीचा खर्च म्हणून 1,000/-रु. मिळण्यास त.क. पात्र आहे.
म्हणून सर्व मुद्दयाचे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. त्यानुसार मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या एक्सचेंज ऑफरची रक्कम रु.25,000/- आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे. अन्यथा सदर रक्कमेवर आदेश पारित तारखेपासून द.सा.द.शे. 9%दराने व्याजसह रक्कम प्राप्त करण्यास त.क. पात्र राहील. 3 तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून 1000/-रुपये द्यावे. 4 मा. सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 5) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |