Complaint Case No. CC/13/57 |
| | 1. Ashok S/o,Sambhajirao Dalpe, | R/o,Saket,Ulhas Nager,Malegaon Road,Troada road,Taroda (Kh) Nanded. | Nanded | Mahrashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Manager,HDFC Bank,Ltd. & Others, | Kannawar Building,Kalamandir Road,Nanded. | Nanded | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
ORDER | अर्जदारा तर्फे वकील - श्री.अ.व्ही.चौधरी, गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - श्री.समीर पाटील गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - श्री.अविनाश जी.कदम निकालपत्र (घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य) 1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः- 2. अर्जदार अशोक संभाजीराव दालपे हा छत्रपती संभाजी महाविद्यालय,माहूर या संस्थेचा सचिव आहे. अर्जदाराने सदर संस्थेचे गैरअर्जदार बँकेकडे चालु खाते काढलेले आहे,त्याचा खाते क्रमांक 10162000000720 असा आहे. सदर खात्यावर अर्जदाराला क्रेडीट कार्ड देखील दिलेले आहे,ज्याचा क्रमांक 4346 67860 0149 7154 असा आहे. अर्जदारास सन 2011 पासून गैरअर्जदार वारंवार फोन करुन विमा काढणेसाठी तगादा लावत आहे. अर्जदाराची संमतीने पॉलिसीसाठी स्वाक्षरी केलेली नसतांना देखील गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे अपरोक्ष त्याचे संमतीविना पॉलिसी काढलेली आहे. सदर पॉलिसीची रक्कम मे,2011 मध्ये 1000/- रुपये, जुन,2011 मध्ये 800/- रुपये, तसेच ऑगस्ट,2011 मध्ये 900 रु., ऑक्टोबर,2011 मध्ये 1000/- रु. व जानेवारी,2012 मध्ये 1000/- रु. अर्जदाराकडून वसुल केले. तसेच जानेवारी,2012 मध्ये रक्कम रु.4758/- ची पॉलिसी अर्जदाराचे नावावर अचानक चालु केली. तसेच वरील पॉलिसीची आऊटस्टँडींग बॅलन्स रक्कम रु.32,508.73 थकीत दाखविले. परंतु सदरची रक्कम अर्जदारास मान्य नसल्याने अर्जदाराने सदर रक्कम भरणेसाठी नकार दिला. फेब्रुवारी,2012 मध्ये रक्कम रु.34,750.73 एवढी रक्कम अर्जदाराचे नावे आऊटस्टँडींग दाखविण्यात आली. मार्च,2012 मध्ये अर्जदाराने तिरुपती येथे रक्कम रु.15,107/- चे सोने खरेदी केले त्यावेळी सदर क्रेडीट कार्डचा वापर केला. परंतु अर्जदाराने तेवढया रक्कमेची ताबडतोड भरणा केली. अर्जदाराने दिनांक 02.02.2012 रोजी गैरअर्जदारामार्फत चालू केलेल्या सर्व पॉलिसी रद्य करण्यात याव्या अशी विनंती केली. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कुठल्याही पॉलिसीचा क्रमांक दिलेला नाही. अथवा कुठलीही पॉलिसी पाठविण्यात आलेली नाही. फक्त कागदावर बाकी दाखविणे व कपात करुन घेणे या व्यतिरिक्त कुठलाही व्यवहार गैरअर्जदार दाखवित नाही. मार्च,2012 मध्ये गैरअर्जदाराने अर्जदाराकडे रक्कम रु.20,741.26 थकीत दाखविले. तसेच एप्रील,2012 मध्ये रक्कम रु.22,756.17 ,मे,2012 मध्ये रक्कम रु.24,463.83,जुन,2012 मध्ये 30,857.49 एवढी रक्कम अर्जदाराकडे थकीत दाखविले. गैरअर्जदाराने हे सर्व अर्जदाराच्या कुठल्याही संमतीशिवाय केलेल्या व्यवहाराबद्दल दाखविले. अर्जदाराने कशावरही स्वाक्षरी केलेली नसतांना सदर व्यवहार कशावर होत आहे हे अर्जदारास समजेनासे झाले व त्यास प्रचंड मनःस्ताप होऊ लागला. दिनांक 28.08.2012 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास रक्कम रु.4758/- ची पॉलिसी रद्य केल्याचे पत्र पाठविले व अर्जदाराचे खात्यातून रक्कम रु.4758/- वजा करुन रक्कम रु.27,883.51 थकीत दाखविले व लगेचच सप्टेंबर,2012 मध्ये रक्कम रु.29,712.35 एवढी थकीत रक्कम दाखवून त्यावर 2.45 टक्के इतके व्याज लाऊन एप्रील,2013 मध्ये त्याचे खात्यावर रक्कम रु.36,130.08 एवढे आऊटस्टँडींग दाखविले. त्यानंतर दिनांक 29.04.2013 रोजी अर्जदाराच्या खात्यावरील रक्कम रु.35,266.6 एवढी रक्कम अर्जदाराच्या खात्यावर होल्ड केली. त्यानंतर दिनांक 14.05.2013 रोजी रक्कम रु.35,933.33 अर्जदाराच्या खात्यातून डेबीट केली. त्यामुळे अर्जदाराच्या खात्यातून अचानक वरील रक्कम कमी झाल्यामुळे अर्जदारास त्याच्या विद्यार्थ्यांची एमएससीआयटी ची फी भरणे कठीण झाले व त्यास प्रचंड मानसिक धक्का बसला. गैरअर्जदार यांनी असे करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व अर्जदारास चुकीची निष्काळजीपणाची वागणुक व सेवा दिलेले आहे. त्यामुळे अर्जदारास प्रचंड मनःस्ताप झाला आहे. म्हणून अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी त्यांचे चालु बँक खाते क्रमांक 10162000000720 वरील दिनांक 14.05.2013 रोजी चुकीच्या पध्दतीने बेकायदेशीररीत्या कपात केलेली रक्कम रु.35,933.36 व्याजासहीत अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच अर्जदाराची दिशाभूल करुन सक्तीने भरणा करुन घेतलेली रक्कम रु.4700/- व्याजासहीत अर्जदारास परत करण्याचा आदेश गैरअर्जदारास द्यावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे. 3. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढीलप्रमाणेः- 4. गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देणेस अजिबात जबाबदार नाहीत. अर्जदाराची तक्रार खोटी व बनावट आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. अर्जदाराचा तक्रारीतील परिच्छेद क्र. 1 मधील कथन गैरअर्जदारास मान्य आहे. परिच्छेद क्र. 3 मधील कथन गैरअर्जदारास अजिबात मान्य नाही. अर्जदाराने मे,2011 मध्ये 1000/- रु.पॉलिसी बद्दल भरल्याचे मान्य केलेले आहे. तसेच त्यांनी मार्च,2011 मध्ये 1120/- रु.प्रिमियम भरलेला आहे. यावरुन प्रिमियम भरणेबद्दल अर्जदाराचा वाद नव्हता हे दिसून येते. अर्जदाराकडून रक्कम रु.32,508/- हे Card uses amount, interest, policy premium and late payment इत्यादी बद्दल आऊटस्टँडींग होते. हे सदर स्टेटमेंट ऑफ अकाऊंटवर स्पष्ट आहे. अर्जदाराच्या तक्रारीतील परिच्छेद क्र. 5 मधील कथन हे गैरअर्जदारास मान्य नाही. कारण अर्जदाराने दिनांक 06.10.2011 रोजी रक्कम रु.15,107/- क्रेडीट कार्ड वापरुन काढले होते व ती रक्कम दिनांक 07.02.2013 रोजी भरली. त्यामुळे अर्जदारास लेट पेमेंट लागले. तसेच दिनांक 22.11.2011 रोजी अर्जदाराने क्रेडीट कार्डवर रक्कम रु.5499/- चा व्यवहार केलेला होता. अर्जदाराच्या तक्रारीतील परिच्छेद क्र. 6 व 7 मधील कथन गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदाराच्या विनंती प्रमाणे अर्जदाराची पॉलिसी ही रद्य करण्यात आली होती. गैरअर्जदार बँकेस अर्जदाराकडून येणे असलेल्या रक्कम घेणेचा अधिकार (right of lien) गैरअर्जदार बँकेस आहे. त्याप्रमाणे येणे असलेली रक्कम बँकेने घेलेली आहे. अर्जदारास मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- व दावा खर्चाबद्दल रक्कम रु.5,000/- मागणेचा कुठलाही अधिकार नाही. गैरअर्जदार यांनी मंचास अशी विनंती केलेली आहे की, अर्जदाराची तक्रार त्यांचेविरुध्द खर्चासह फेटाळण्यात यावी. गैरअर्जदार क्र. 3 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढीलप्रमाणेः- 5. अर्जदाराची तक्रार पाहिली असता अर्जदाराचे गा-हाणे गैरअर्जदार क्र. 1 विरुध्द आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 3 याचेमध्ये ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा सामंजस्य करार झालेला आहे. ग्राहकांच्या संमतीनुसार गैरअर्जदार क्र. 1 हे त्यांचे खातेदारास विम्याची सेवा गैरअर्जदार क्र. 3 याचेमार्फत पुरवितात. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास पॉलिसी दिलेली होती. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 3 यांना असे कळाले की, अर्जदारास सदरची पॉलिसी रद्य करावयाची आहे. दुरध्वनीवरुन अर्जदाराची संमती घेतल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराची सदर पॉलिसी रद्य केली व अर्जदारास रक्कम रु.4758/- परत केली , ते त्याच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली. यावरुन हे स्पष्ट आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. गैरअर्जदाराने मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराची तक्रार त्यांचेविरुध्द रक्कम रु.10,000/- चे खर्चासह फेटाळण्यात यावी. 6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात. 7. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिनांक 02.02.2012 रोजी पत्र पाठवून त्याला त्याच्या संमतीशिवाय दिलेल्या पॉलिसीज रद्य करणेसाठी विनंती केलेली आहे. तसेच dining plus Mumbai चे रु.5499.00 हे रद्य करणेसाठी विनंती केलेली आहे. हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर पत्राच्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराची संमती घेऊनच सदर पॉलिसीज काढल्या होत्या याबाबत ऑडीओ सीडी मंचात सादर केली. अर्जदाराने सदर सीडी मान्य करुन गैरअर्जदार क्र. 3 यांना संमती दिली होती हे मान्य केले. अर्जदाराने दिनांक 02.02.2012 रोजी पॉलिसीज रद्य करणेसाठी एच.डी.एफ.सी इर्गो जनरल इशुरन्स कंपनी लिमिटेड, गैरअर्जदार क्र. 3 यांना पत्र पाठविलेले आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर पॉलिसीच्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची पॉलिसी क्रमांक 50555419 ही दिनांक 07.01.2012 पासून रद्य करुन रक्कम रु.4758/- परत केल्याचे पत्र दिले. अर्जदार यांनी सदर पत्राची झेरॉक्स प्रत मंचात दाखल केलेली आहे. सदर रिफंड केलेली रक्कम रु.4758/- ही गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या क्रेडीट कार्ड खात्यावर दिनांक 23.07.2012 रोजी जमा केली हे गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर स्टेटमेंट ऑफ अकाऊंटच्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट होते अर्जदाराचे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये विनाकारण बेकायदेशीर रक्कम नांवे टाकले आहेत. तसेच क्रेडीट कार्ड खात्यात येणे असलेले रक्कम रु.35,933/- हे अर्जदाराच्या चालु खात्यातून वळते केले. हे अर्जदाराचे सदरचे म्हणणे योग्य वाटत नाही. कारण गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या Terms and Condition मधील कलम 6 हे Right of Lien आहे व त्याप्रमाणे गैरअर्जदारास अर्जदाराच्या त्यांचेकडे असलेल्या कोणत्याही खात्यातून बँकेला येणे असलेली रक्कम वसुल करता येते. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणणे मध्ये असे कथन केले आहे की, त्यांनी अर्जदाराच्या संमतीनेच पॉलिसी घेतली होती. नंतर अर्जदाराच्या विनंतीनुसार पॉलिसी रद्य केली व अर्जदारास रक्कम परत केली. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराची पॉलिसी क्रमांक 50555419 साठी अर्जदार यांचेकडून दिनांक 07.01.2011 रोजी रक्कम रु.4758/- दिनांक 31.10.2011 रोजी रक्कम रु.8789/- दिनांक 27.12.2011 रोजी रक्कम रु.4758/- एवढी रक्कम घेतलेली आहे. परंतु सदर पॉलिसी रद्य केल्यानंतर दिनांक 23.07.2012 रोजी फक्त रक्कम रु.4758/- परत केलेले आहे. यावरुन गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास रक्कम रु.4758/- व रक्कम रु.8789/- असे एकूण रक्कम रु.13,547/- परत केलेली नाहीत. सदर रक्कम अर्जदार परत मिळणेसाठी पात्र आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या काढलेल्या पॉलिसीचे प्रमाणपत्र अर्जदारास दिलेले नाही. तसेच मंचासमोर देखील सदर पॉलिसीचे प्रमाणपत्र दाखल केलेले नाही, असे करुन गैरअर्जदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(r) प्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास दिलेला आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे. आ दे श 1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास रक्कम रु.13,547/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावेत. 3. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2500/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात. 5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे. | |