(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून नवीन ट्रॅक्टर विकत घेतले असून, त्यात जुन्या ट्रॅक्टरचे पार्टस लावलेले आढळले. अर्जदाराने याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्या कंपनीचे ट्रॅक्टर, त्यांचे स्थानिक विक्रेते गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडून दि.11.07.2008 रोजी विकत घेतले. या ट्रॅक्टरची एकूण किंमत 6,70,000/- रुपये आहे. सदरील ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर आठ दिवसात, वाहनात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे तक्रार केली पण त्याची दखल घेण्यात आली नाही असे अर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदारास, गैरअर्जदार यांनी नवीन ट्रॅक्टरमध्ये जुने पार्टस लावून देण्यात आल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी वाहनाचा रंग खरवडून काढला असता, आतमध्ये वेगळा रंग आढळल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. वाहनाच्या चेसीस व इंजिन सिरीयल नंबर मध्ये तसेच अनेक सुटे भाग हे जुन्या ट्रॅक्टरचे काढून बसविण्यात आल्याचे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. अर्जदाराने आपल्या म्हणण्याप्रित्यर्थ वाहनाचे विविध भागाचे फोटो दाखल करुन ते जुन्या वाहनाचे असल्याचा दावा केला आहे. अर्जदाराने या प्रकरणी गैरअर्जदार क्र.1 व 2 तसेच गैरअर्जदार क्र.3 यांना वकीलामार्फत दि.01.06.2009 रोजी नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, गैरअर्जदार यांना ट्रॅक्टर बदलून देण्याबाबत, तसेच नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊन वकीलपत्र दाखल करण्यात आले. परंतु संधी देऊनही लेखी जवाब दाखल करण्यात आला नाही, म्हणून त्यांच्या विरुध्द ‘नो से’ चा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास ट्रॅक्टर विकल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीत ट्रॅक्टरमध्ये तांत्रिक दोष असल्याचे म्हटले असले तरी, कोणते तांत्रिक दोष आहेत याबाबत (3) त.क्र.490/09 काहीही म्हटलेले नाही. अर्जदाराने वाहन विकत घेतल्यानंतर वाहनाबाबत कोणतीही तक्रार त्यांच्याकडे केलेली नाही. अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडून एस्कॉर्ट कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले. या ट्रॅक्टरची नोंदणी त्यांनी आर.टी.ओ. औरंगाबाद येथे दि.11.07.2008 रोजी केली. त्यांना ट्रॅक्टरसाठी देण्यात आलेल्या वाहनाचा क्रमांक एम.एच.20 ए.वाय.3193 असा असल्याचे दिसून येते. आर.टी.ओ., औरंगाबाद यांच्यातर्फे देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे निरीक्षण केल्यावर सदरील वाहनाचा चेसीस क्रमांक वी 3032180 व इंजिन क्रमांक इ 054470 व वाहनाचा रंग ब्ल्यू व व्हाइट असे नोंदविलेले दिसून येते. गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.17.03.2008 रोजी सदरील वाहनाची डिलेव्हरी अर्जदारास दिलेली असून, त्यात दर्शविण्यात आलेला चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांक हे आर.टी.ओ. ने दिलेल्या नोंदणी पमाणपत्राप्रमाणे आहे. यावरुन गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदारास दि.17.03.2008 रोजी वाहनाची डिलेव्हरी दिलेली असून, दि.11.06.2008 रोजी रक्कम प्राप्त झाल्यानंतर बिल दिले असल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीसोबत त्यांनी खरेदी केलेल्या वाहनाबाबत तक्रार केल्याची कोणतीही कागदपत्रे मंचात दाखल केलेली नाहीत. तसेच दि.01.06.2009 रोजी गैरअर्जदार यांना वकीलामार्फत पाठविण्यात आलेल्या नोटीसची पोच पावती मंचात दाखल केलेली नाही. यावरुन अर्जदाराने वाहन घेतल्यानंतर आठ दिवसाच्या आत वाहनात तांत्रिक दोष असल्याबाबत गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली हे म्हणणे मंच मान्य करीत नाही. अर्जदाराने विकत घेतलेल्या ट्रॅक्टरची नोंदणी आर.टी.ओ., औरंगाबाद येथील कार्यालयात केली आहे. वाहनात जुने सुटे भाग लावून, तसेच चेसीस व इंजिन क्रमांक योग्य पध्दतीने टाकले नसल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. परंतु आर.टी.ओ., औरंगाबाद यांनी वाहन नोंदणी प्रमाणपत्रात वाहन नवीन असल्याची नोंदणी केली आहे. अर्जदाराने आर.टी.ओ., यांना प्रतिवादी न केल्यामुळे याबाबत कोणताही खुलासा होऊ शकत नाही. अर्जदाराने नवीन वाहनात जुने पार्टस टाकल्याबाबत तसेच चेसीस व इंजिन क्रमांक (4) त.क्र.490/09 वेगळया पध्दतीने टाकण्यात आल्याबाबत योग्य तो पुरावा व कागदपत्रे दाखल न केल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |