Maharashtra

Jalna

CC/90/2012

Adv.Avinash Vishawbharrao Darade - Complainant(s)

Versus

Manager,Devaashva Automotive - Opp.Party(s)

Adv.V.L.Rajale

03 Dec 2013

ORDER

 
CC NO. 90 Of 2012
 
1. Adv.Avinash Vishawbharrao Darade
R/O: Dahiphal Bhogane,Tq-Partur
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Devaashva Automotive
1434-Honda 2 Wheer Showroom,Aurangabad Road-Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

(घोषित दि. 03.12.2013 व्‍दारा श्रीमती नीलिमा संत,अध्‍यक्ष)

 

तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 कलम 12 अंतर्गत केलेला आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार ता.परतूर जि.जालना येथील रहीवाशी आहे. गैरअर्जदार हा अटो मोटीव्‍ह कंपनीचा व्‍यवस्‍थापक आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून दुचाकी वाहन (होंडा-शाइन) खरेदी केले. त्‍याचा क्रमांक एम.एच.21 – ए.एफ. 8183 असा आहे. सदर गाडीचे इलेक्‍ट्रॉनिक साहित्‍य वगळता दोन्‍ही टायरसह वॉरंटी दिलेली होती.
प्रस्‍तुत गाडीचे पाठीमागचे टायर ज्‍याचा क्रमांक एम.आर.एफ एम.ए.के.ई (42814180112) असा आहे, दिनांक 04.08.2012 च्‍या 20 ते 25 दिवस आगोदरपासून डाव्‍या बाजूने घासले जात आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे गाडी दाखवली असता टायर दुय्यम दर्जाचे असल्‍यामुळे घासले जात आहे असे सांगितले व टायर बदलून मागितले असता टायर कंपनीकडून बदलून घ्‍या असे सांगितले व पांडुरंग टायर या कंपनीसाठी पत्र देवून पाठवले. त्‍यांनी गैरअर्जदार यांचा आमचा काही संबंध नाही व आम्‍ही टायर बदलून देणार नाही असे सांगितले.
टायर तक्रारदारास होंडा कंपनीने एम.आर.एफ कंपनीकडून विकत घेवून दिलेले होते व ते वॉरंटी कालावधीत होते. परंतु गैरअर्जदार ते बदलून देण्‍यास टाळाटाळ करत आहेत. ही गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत केलेली त्रुटी आहे व त्‍यामुळे तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे म्‍हणून तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारी अंतर्गत ते टायर बदलून मिळावे व आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी प्रार्थना करतात. आपल्‍या तक्रारी सोबत त्‍यांनी गैरअर्जदार यांना पाठवलेली नोटीस, गाडी खरेदीचे बिल, गैरअर्जदार यांनी एम.आर.एफ टायर्सला दिलेले पत्र इत्‍यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्‍यांच्‍या जबाबानुसार गाडीच्‍या दोनही टायरची वॉरंटी गैरअर्जदार यांनी घेतली होती व टायर बदलून देण्‍याची जबाबदारी सर्वस्‍वी त्‍यांची आहे हे म्‍हणणे त्‍यांना मान्‍य नाही.
गैरअर्जदारांनीच तक्रारदारांना “पांडुरंग टायर्स” यांच्‍या नावाने पत्र दिले आहे त्‍यावरुन त्‍यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत काहीही कमतरता केली नाही ही गोष्‍ट सिध्‍द होते. वादग्रस्‍त टायर्स टायर कंपनीने बनवलेले आहेत व टायर उत्‍पादक कंपनी प्रस्‍तुत तक्रारीत प्रतिपक्ष नाही. त्‍यामु ळे प्रस्‍तुत तक्रार फेटाळण्‍यात यावी.
तक्रारदार दिनांक 02.03.2013 पासून सातत्‍याने मंचासमोर गैरहजर आहेत. सबब तक्रार गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍यात येत आहे.
तक्रारदारांची तक्रार, गैरअर्जदार यांचा जबाब व दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला असता खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात.
1. तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दुचाकीचे टायर बदलून देण्‍यासाठी केली आहे.
2. वादग्रस्‍त टायर एम.आर.एफ या कंपनीने उत्‍पादित केलेले आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या “वॉरंटी पॉलिसी” त टायर, टयूब, बॅटरी इत्‍यादि गोष्‍टी त्‍यांच्‍या निर्मात्‍यांनी प्रमाणित केलेल्‍या आहेत व ग्राहक सरळ त्‍यांचेकडेच दावा करु शकतात असे नमूद केलेले आहे.
3. गैरअर्जदारांनी तक्रारदारांना मदत करण्‍यासाठी दिनांक 04.08.2012 रोजी पांडुरंग टायर्स, जालना यांचे नावे पत्र देखील दिले आहे. यावरुन गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत काहीही कमतरता केलेली नाही असे दिसते.
4. टायरची वॉरंटी एम.आर.एफ कंपनीने दिलेली आहे व प्रस्‍तुत कंपनी या तक्रारीत पक्षकार नाही. टायर बदलून देण्‍यासाठी गैरअर्जदार यांना जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे. म्‍हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.

आदेश

1. तक्रारदारांची तक्रर नामंजूर करण्‍यात येत आहे.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
 

 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.