जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/200. प्रकरण दाखल तारीख - 11/09/2009 प्रकरण निकाल तारीख – 27/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य श्रीकांत पि.केशवराव लाठकर वय,52 वर्षे, धंदा नौकरी रा. 49-अ, यशवंत नगर, नांदेड अर्जदार विरुध्द. 1. व्यवस्थापक, डेव्हलपमेंट क्रेडीट बँक,बरारा टॉवर, नांदेड. 2. शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, शाखा नायगांव ता.नायगांव,जि. नांदेड. गैरअर्जदार 3. रिजनल मॅनेजर, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, इंडस्ट्रीयल इस्टेट, शिवाजी नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. अ.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.व्ही.डी.पाटनूरकर. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील - अड.जे.एस.गूहीलोत. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार बॅक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा नांदेड येथील रहीवासी असून त्यांचे गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे बचत खाते नंबर 62007018114 आहे. तसेच अर्जदार हे गैरअर्जदार क्र.2 यांचे ए.टी.एम. धारक ग्राहक आहेत. अर्जदार हे दि.24.10.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे खात्यातील रक्कम ए.टी.एम. कार्डच्या माध्यमातून काढण्यासाठी गेले असता सुरुवातीला त्यांनी रु.10000/- काढले, त्यानंतर रु.15,000/- काढण्यासाठी कंमाड दिली असता गैरअर्जदार क्र.1 यांच्या एटीएम मधून रु.2500/- आले, पण रु.12,500/-अर्जदारास मिळाले नाही. सदर व्यवहाराबददल एटीएम मशीन मधून मिळालेल्या ट्रांजेक्शन पावती वरुन स्वच्छपणे दिसून येतो. त्यांना रक्कम न मिळाल्यामूळे त्यांनी एटीएम कार्ड द्वारे शिल्लक बॅलेंस चेक केले असता त्यांना खात्यामधून रक्कम रु.15000/- वजा झाल्याचे दिसून आले पण अर्जदारास रु.2500/- मिळाले उर्वरित रक्कम रु.12500/- त्यांना मिळाले नाही. त्यामूळे त्यांना धक्का बसून खूप मानसिक ञास झाला. अर्जदार यांनी लगेचच एटीएम मधील बूथ तक्रार रजिस्ट्रर मध्ये झालेल्या व्यवहाराची तक्रार नोंदविली. त्यानंतर दि.25.10.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 तसेच गैरअर्जदार क्र.1 यांना झालेल्या व्यवहारा बाबत रितसर तक्रार दिली. सदरची रक्कम त्यांचे खात्यात जमा करावी अशी विनंती केली परंतु त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अर्जदाराने दि.289.01.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना लेखी तक्रार दिली व अर्जदाराला रक्कम रु.12500/- कमी मिळाले असून तेवढी रक्कम त्यांचे जमा करावी अशी मागणी केली. गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडून अर्जदारास झालेल्या व्यवहाराबाबत स्लीप दयावी व त्यांची पडताळणी करुन योग्य ती स्टेप घेऊन असे कळविले. परंतु त्यापूर्वीच अर्जदाराने सर्व कागदपञे त्यांना दिलेली आहेत. दि.27.08.2009 रोजी अर्जदाराने मुंबईला प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांचा कूठलाच प्रतिसाद किंवा उत्त्र मिळाले नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांच्या चूकीच्या सेवेमूळे व निष्काळजीपणामूळे अर्जदार यांना प्रचंड मानसिक, शारीरिक व आर्थिक ञास झाला आहे. म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, कमी मिळालेली रक्कम रु.12500/- 18 टक्के व्याजासह मिळावी, मानसिक, शारीरिक ञासाबददल रु.25000/- व आरबीआयच्या नवीन अध्यादेशमूळे दि.24.10.2008 रोजी पासून प्रत्येक दिवशी रक्कम मिळेपर्यत रु.100/- दंड आकारुन गैरअर्जदार यांचेकडून रक्कम मिळावी. गैरअर्जदार क्र.1 हे वकीमार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 यांचा ग्राहक नाही. दि.24.10.2008 रोजी अर्जदाराचा झालेला व्यवहार त्यांना माहीती नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांचे प्रत्यक्ष नांवाने कूठलेही पञ अथवा तक्रार दाखल केलेली नाही. फक्त गैरअर्जदार क्र.2 यांच्या संबंधात जो त्यांनी पञव्यवहार केला त्यांच्या फक्त प्रति त्यांना प्राप्त झाल्या आहेत. आरबीआय यांच्या तत्वानुसार ज्या बँकेचे एटीएम आहे त्या बँके सोबत पञ व्यवहार करावा. कारण या संदर्भात एम.एस.एफ.डिस्पूट मॅनेजमेंट सॉफटवेअर द्वारे गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून कूठलीही माहीती उपलब्ध झाली नाही. ज्या बँकेचे ग्राहक आहेत किंवा एटीएम आहे त्यांच्याकडे तक्रार करावी लागते. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांच्या सेवेत कूठलीही ञूटी नाही म्हणून सदर तक्रार नांमजूर करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे वकीमार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचे खाते त्यांचेकडे असून त्यांना पैसे उचलण्यास सवलत व्हावी म्हणून त्यांना एटीएम कार्ड दिलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्या एटीएम मधून रक्कम कमी आली या बाबत त्यांना काहीही माहीती नाही. अर्जदारास किती रक्कम कमी मिळाली किंवा किती मिळाली या बाबत काहीही माहीती नाही. त्यामूळे त्यांचे कथन खोटे आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्या रजिस्ट्रर मध्ये नोंदी बददल त्यांना माहीती नाही. तसा व्यवहार गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून झाला असेल तर त्यांनी जेवढी रक्कम कमी दिली तेवढया रक्कमेचा डि. डि. करुन गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे पाठवावा म्हणजे तेवढी रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा करता येईल. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी अद्यापपर्यत रक्कम पाठविलेली नाही. दि.30.1.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना पञ पाठवून त्यांचेकडे जर रक्कम नीघत असेल तर त्यांनी त्वरीत दयावी जेणेकरुन अर्जदाराच्या खात्यात जमा करता येतील. एटीएम ही संकल्पना ही ग्रामीण वीभाग जसे की नायगांव येथे नव्याने कार्यान्वीत करण्यात येत आहे जे की अजून पूर्णपणे रुळली नाही. गैरअर्जदार क्र.1 यांच्या एटीएम मधून जर कमी रक्कम मिळाली असेल तर व अजून काही रक्कम शिल्लक असेल तर अर्जदाराने तशी पावती दिल्यास त्यांची सहानीशा करुन गैरअर्जदार क्र.1 कडून रक्कम मागवून ती रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा करता येईल. एटीएम सेवा ही शूल्क मुक्त असल्यामूळे व ती विनामूल्य असल्यामूळे सेवेत ञूटी ही ग्राहक संरक्षण कायदयाच्या कक्षेत येत नाही त्यामूळे सदरची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार क्र.1 ते 3 चे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांचे गैरअर्जदार क्र.2 या बँकेत बचत खाते आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडील एटीएम मधून पैसे काढण्या साठी गेले असता अर्जदार यांच्या मागणीप्रमाणे अर्जदार यांना पैसे मिळालेले नाही माञ त्यांच्या बचत खात्यावरील शिल्लक कमी झाल्याचे अर्जदार यांना निदर्शनास आलेवरुन प्रस्तूतची तक्रार अर्जदार यांनी दाखल केलेली आहे. सदरचे व्यवहारा बाबत अर्जदार यांनी कागदपञ दाखल केलेले आहेत. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेले एटीएम चे कागदपञ व गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांना दिलेले पञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मते आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार हे दि.24.10.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले होते. सूरुवातीला त्यांनी रक्कम रु.10,000/- काढले त्यानंतर रु.15,000/- काढण्यासाठी कंमाड दिली असता फक्त रु.2500/- बाहेर आले व उर्वरित रक्कम रु.12500/- अर्जदार यांना मिळाली नाही. त्याबाबत अर्जदार यांनी एटीएम बूथ वरील तक्रार रजिस्ट्रर मध्ये झालेल्या व्यवहारा बाबत तक्रार नोंदविली आहे. त्यानंतर लगेचच दि.25.10.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना रितसर तक्रार दिली व एटीएम मधून न आलेली रक्कम अर्जदार यांचे खात्यात जमा करणेविषयी विनंती केली परंतु गैरअर्जदार यांनी कोणतीही पूर्तता केली नाही. दि.28.01.2009 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना एटीएम मधून पैसे न मिळाल्या बाबत लेखी तक्रार दिलेली आहे. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांच्या पैशा बाबत कोणतीही पूर्तता केलेली नाही. त्यामूळे अर्जदार यांनी रक्कम रु.12500/- मिळण्यासाठी अर्ज करावा लागलेला आहे. सदर मंचाची नोटीस गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना तामील झालेली आहे. गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे अर्जदार यांचे बचत खाते आहे. प्रत्यक्षात अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे एटीएम मधून पैसे काढताना त्यांना पैसे कंमाड दिल्याप्रमाणे मिळालेले नाहीत. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र.3 ः- अर्जदार यांचे बचत खाते गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे असल्याने अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना सदर अर्जाचे कामी आवश्यक पार्टी म्हणून दाखल केलेले आहे प्रत्यक्षात गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडून अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता झालेली नाही. त्यामूळे त्यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाही. दि.16.11.2009 रोजी सदर तक्रार अर्जावर अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांचा यूक्तीवाद झाल्यानंतर सदरचे प्रकरण निकालासाठी नेमले असताना दि.24.11.2009 रोजी अर्जदार व त्यांचे वकील मंचा समक्ष हजर झाले व त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचे बचत खात्यामध्ये रक्कम रु.15020/- एवढी रक्कम जमा केल्याचे तोंडी सांगितले व सदर रक्कम जमा झाले बाबतचे कागदपञ दाखल करण्यास तोंडी परवानगी मागितली. दि.26.11.2009 रोजी अर्जदार यांनी सदरचे प्रकरण बोर्डावर घेण्या बाबतचा अर्ज देऊन सदर अर्जासोबत दि.16.11.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचे बचत खात्यामध्ये रु.15020/- जमा केले बाबतची पावती अर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेली आहे. त्याच दिवशी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.16.11.2009 रोजी रक्कम रु.15020/- जमा केले असली तरी जवळ जवळ एक वर्ष एक महिना अर्जदार यांची रक्कम अडकून राहीलेली आहे. त्या बाबत पाठपूरावा करुनही अर्जदारास समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामूळे अर्जदार यांना झालेल्या मानसिक ञासापोटी व आर्थिक ञासापोटी जास्तीत जास्त दंड लावून दावा खर्चासह मंजूर करावा अशी मागणी अर्जाद्वारे केलेली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्या एटीएम मधून दि.24.10.2008 रोजी रक्कम रु.15000/- काढणेसाठी कंमाड दिली असता प्रत्यक्षात त्यांना पूर्ण रक्कम मिळाली नाही या बाबतचा लेखी तक्रार अर्ज गैरअर्जदार क्र.1 यांना देऊनही त्यांनी दि.16..11.2009 अखेर अर्जदार यांना सदरची रक्कम देणे बाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. दि.16.11.2009 रोजी सदर तक्रार अर्जाचे कामी यूक्तीवाद झाल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचे बचत खात्यामध्ये रक्कम जमा केलेली आहे. कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांची रक्कम दि.16.11.2009 अखेर स्वतःकडेच ठेवलेली आहे. यांचा विचार होता अर्जदार हे मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी गैरअर्जदार क्र.1 कडून रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी (261) ATM; ICICI Bank Card not processed in HSBC Bank ATM Consumer Protection Act, 1986—Sections 2(1)(g) and 21 (b)—Case of indirect deficiency in service—ICICI Bank card used in HSBC Bank ATM not processed—HSBC Bank sent incorrect advice—ICICI Bank debited—When mistake discovered, credited—District Forum granted compensation of Rs.8,000/- and cost of Rs.12,000/---State Commission substituted compensation with interest @ 9 % p.a. and reduced cost to 10,000/---Revision—Whether any interference is called ? (No)—Revision dismissed. National Commission 2007 (1) CPR page no. 336 J.P.Sharma Vs. ICICI Bank Ltd. या निकाल पञानुसार अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये गैरअर्जदार क्र.1 यांनी कमतरता केली आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपञ, व त्यांनी दाखल केलेले कागदपञ व त्यांचे तर्फे वकिलांनी केलेला यूक्तीवाद व वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ तसेच गैरअर्जदार क्र.1 यांचे लेखी म्हणणे, शपथपञ व त्यांचे तर्फे वकिलांनी केलेला यूक्तीवाद, गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे लेखी म्हणणे, शपथपञ व त्यांचा लेखी यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. सदर निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात. 3. मानसिक ञासापोटी रु.4000/- व अर्जाचा खर्च रु.1000/-दयावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |