:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगिळ (वैद्य), मा.सदस्या)
(पारीत दिनांक :20/08/2013)
1. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
संक्षेपाने तक्रारदाराचे म्हणणे असे की, ते बल्लारपुर येथिल रहिवासी असून ते बल्लरपूर येथे ‘’बवेजा इलेक्ट्रॉनिक्स’’ या नावाने स्वंयरोजगार करतात. त्यांनी गैरअर्जदार यांच्या मार्फतीने कोरिअर व्दारा इलेक्ट्रॉनिक्स वस्तु नागपूर पाठविल्याने ते गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत.
2. अर्जदार यांनी दि.12/09/2011 रोजी ब्रॉड बॅन्ड कनेक्शन किंमत रु.4,000/- ही त्यांच्या मुलीच्या शिक्षणाकरीता नागपूर येथे पाठविण्यासाठी गैरअर्जदार क्रं.1 कडे बुक केली. ही वस्तु बुक करतांना लिफाफ्यावर सुवाच्छ अक्षरात नागपूर येथिल पत्ता ही लिहीलेला होता परंतु उपरोक्त वस्तु गैरअर्जदार क्रं. 1 यांचे कोरीअर व्दारे बुक केल्यावर दि.30/09/2011 पर्यंत नागपूर येथे त्याच्या मुलीस पोहचलिच नाही त्याबद्दल अर्जदार हयांनी गैरअर्जदार क्रं 1 हयांना विचारपूस केली तेव्हा गैरअर्जदार क्रं. 1 हयांनी गैरअर्जदार क्रं. 2 हयांना संपर्क करुन माहीती काढून सांगतो असे सांगितले. परंतु काहीच समाधानकारक उत्तर अर्जदारास गैरअर्जदाराकडून मिळाले नाही. म्हणून अर्जदार हयांनी दि.08/10/2011 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांना पञ पाठविले ते पञ अर्जदार हयांनी दाखल केलेल्या यादी नि. क्रं. 5 सोबत दस्त क्रं. अ-2 व अ-3 वर आहेत. तसेच अर्जदार हयांनी नागपूर येथे पाठविण्याकरीता बुक केलेल्या ब्रॉडबॅंड कनेक्शनची किंमत रु.4,000/- आहे हे दर्शविण्याकरीता नि.क्रं. 5 सोबतचे दस्त क्रं. अ-1 वर त्याचे बिल दि.10/09/2011 दाखल केलेले असून सोबत गैरअर्जदार क्रं. 1 ने दिलेली वस्तु बुक केल्याबद्दलची पावती जोडलेली आहे.
3. अर्जादाराने त्यांच्या मुलीच्या शिक्षणाकरीता नागपूर येथे पाठविलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तुची किंमत 4,000/- होती, ती तीला गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांनी सेवेत कसुर केल्यामुळे न मिळाल्याने अर्जदाराला सदर तक्रार दाखल करावी लागली. अर्जदाराने त्याच्या तक्रारीत त्यानी पाठविलेल्या वस्तुची किंमत रु.4,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह आणि अर्जदाराला झालेला शारिरीक - मानसिक ञासाबद्दल नुकसान भरपाई रु.6,000/- तसेच तक्रार खर्च रु.3,000/- गैरअर्जदार क्रं.1 व 2 हयांनी संयुक्तपणे किंवा वेगवेगळी दयावी अशी मागणी केली आहे.
4. विरुध्द पक्ष गैरअर्जदार क्रं.1 हयांनी हजर होवून त्याचे लेखी उत्तर नि.क्रं. 14 प्रमाणे दाखल केले. तसेच नि. 15 प्रमाणे दस्त क्रं. ब-1 व ब-2 प्रमाणे दाखल केले.
5. गैरअर्जदार क्रं.1 हयांनी कथन केले की, अर्जदार हयांनी दिलेले पार्सल त्यांनी स्विकारले व त्यांनी अर्जदाराला नियंमाप्रमाणे पावती देखील दिली. ती नि.क्रं15 वरील दस्त क्रं. ब वर आहे. परंतु अर्जदार हयांनी पार्सल देतांना पार्सल मध्ये ब्रॉड बॅडची इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आहे ही गोष्ट गैरअर्जदार क्रं.1 पासुन लपवून ठेवली. त्यांचे म्हणणे असे की, जेंव्हा ग्राहकास महागाची वस्तु पाठवायची झाल्यास त्यासंबंधीची माहीती कुरीअर संचालकास दयावी लागते व तसे घोषणापञही लिहून दयावे लागते. परंतु अर्जदाराने गैरअर्जदार क्रं.1 हयांच्यापासुन सदर बाब लपवून ठेवली. गैरअर्जदार क्रं.1 हयांनी अर्जदारास पावती क्रं. 6880 दिली आणि उपरोक्त पार्सल दि. 12/09/2011 रोजी नेहमीच्या कामकाजानुसार जावक बुक मधील बिल क्रं. 47 नुसार नागपूर येथे पाठविली. सदरचे बिल दस्तऐवजाची यादी नि. 15 सोबत दस्त क्रं 1 व 2 वर दाखल केलेली आहे.
6. गैरअर्जदार क्रं.1 च्या महणण्यानुसार दि.12/09/2011 रोजी त्यांनी पाठविलेली सगळी पार्सल नागपूर येथे पोहचली हे त्यांनी त्याच दिवशी फोन करुन विचारले होते.परंतु अर्जदार हयांच्या मुलीला पार्सल मिळाले नाही असे अर्जदाराकडुन समजताच गैरअर्जदार क्रं.1 हयांनी पुन्हा नागपूर येथील कार्यालयात फोन करुन विचारले असता पार्सल प्राप्त झाले व ते पार्सल पोहचविण्यासाठी माणूस गेलेला आहे असे समजले परंतु तरीही दुस-या दिवशीही ते पार्सल अर्जदाराच्या मुलीपर्यंत न पोहचल्याने गैरअर्जदार क्रं.1 हयांनी गैरअर्जदार क्रं.2 हयांच्याशी संपर्क साधल्यावर समजले की, पार्सल गहाळ झालेले आहे व शोध घेणे चालु आहे. पार्सल गहाळ होण्यास गैरअर्जदार क्रं 1 कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.
7. गैरअर्जदार क्रं.2 हयांच्या निष्काळजी पणामुळे अर्जदारास नाहक ञास झालेला आहे त्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदार क्रं.1 च्या विरुध्द फेटाळण्यात यावी.
8. गैरअर्जदार क्रं.2 हयांना मंचाकडुन नोटीस प्राप्त होवूनही ते सदर प्रकरणात पुरेसा वेळ देवूनही हजर न झाल्यामुळे गैरअर्जदार क्रं.2 हयाचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
9. अर्जदार हयांनी सदर प्रकरणात पुराव्याचे शपथपञ दाखल केले ते नि. 16 वर आहे. तसेच गैरअर्जदार क्रं.1 हयांनी त्याचे लेखी बयाण हेच हाच त्याचा पुरावा समजण्यात यावे अशी पुरसीस नि. 17 वर आहे.
10. अर्जदार व गैरअर्जदार क्रं.1 हयांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : उत्तर
1) गैरअर्जदार क्रं.1 व 2 हयांनी सेवेत न्युनता
दिली आहे काय ? होय
2) अर्जदार मागणीनुसार दाद मिळण्यास
पाञ आहे काय ? अशंतः पाञ
3) या तक्रारीचा अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 बाबत :
11. या प्रकरणात अर्जदार हयांनी गैरअर्जदार क्रं.1 सीटी लॅन्ड कोरिअरची त्यांच्या मुलीला नागपूर येथे पाठविण्याकरीता रु.4,000/- ब्रॉडबॅंड कनेक्शन ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तु बुक केली त्याबाबत पावती यादी नि.5 सोबत दस्त अ-1 वर आहे. अर्जदार हयांनी सदर वस्तु बुक करतांना गैरअर्जदार क्रं. 1 हयांना पार्सल मध्ये कोणती वस्तु आहे व तिची किंमत किती हे न सांगितल्यामुळे गैरअर्जदार क्रं.1 हयांनी ते पार्सल ते नेहमी च्या पध्दतीने नागपूर येथे पाठवून दिले. जर गैरअर्जदार हयांना त्या वस्तुच्या किंमतीबद्दल माहीती दिली असती तर गैरअर्जदार हयांनी अर्जदाराकडून तसे घोषणापञ लिहून घेतले असते. आणि वस्तुची किंमत 100/- रु. पेक्षा अधिक असल्याने त्याबाबतचा विमा काढावयास सांगितले असते.
12. अर्जदार हयांनी त्याचे पार्सल बुक करतांना गैरअर्जदार क्रं.1 हयांना पाठविण्यात येणा-या वस्तुची किंमत जाहीर करणे आवश्यक होते किंवा तसेच कोरिअर करतांना अटी व शर्ती नुसार जर एखादी वस्तु कोरिअर करावयाची असल्यास त्या वस्तुची किंमत 100/- वर असल्यास त्या वस्तूचा अर्जदारास विमा काढणेही तेवढेच आवश्यक आहे. अर्जदार यांनी त्यांचे पार्सल बुक करताना वरील कोणत्याही अटी व शर्तीचे पालन केले नाही आहे.
13. गैरअर्जदार हयांनी त्यांचे म्हणणे कसे न्यायसंगत आहे हे सांगण्यासाठी खालील मा.राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे. तो न्यायानिवाडा खालील प्रमाणे आहे.
“ Desk to Desk courier Vs. Kerala State Etc. Dev. Corpn . LTD. II (2009) CPJ (NC)
या प्रकरणात मा.राष्ट्रीय आयोगाने असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने कोरिअर सर्व्हिस मार्फत पाठविलेली वस्तु रु.अडीच लाख किंमतीची असूनही वस्तु बुक करते वेळी वस्तू काय आहे व तिची किंमत किती हे जाहीर न करता वस्तुस्थिती लपवून ठेवली आणि मुल्यवान व्स्तुच्या किमती प्रमाणे विमा देखिल काढला नव्हता. 100/- रु. पेक्षा अधिक किंमतीची वस्तू कोरिअर मार्फत पाठवायची असल्यास वस्तूची किंमत जाहीर करुन तिचा विमा काढण्याची अट छापील पावतीवर लिहीलेली होती.
14. तक्रारकर्त्याने वस्तू बुक केली तेव्हा पावतीवर सही केली असल्याने त्यांस पावतीवर लिहीलेल्या अटी मान्य आहेत असा अर्थ होतो. म्हणून अर्जदाराने 100/- रु. पेक्षा अधिक किमतीच्या वस्तूबाबत कुरिअर सेवादात्यास माहिती दिली नसेल आणि अटी प्रमाणे गाहाळ झालेली वस्तू कितीही किंमतीची असली तरी विमा काढला नसेल तर, वस्तू गहाळ झाल्यास कुरिअर सेवा दाता 100/- रु. पेक्षा जास्त नुकसान भरपार्इ देण्यास जबाबदार नाही असा निर्णय दिला आहे.
15. मा. राष्ट्रीय आयोगाच्या वरील न्यायनिर्णयास अनुसरुन सदर प्रकरणात खालील निर्णय देणे न्यायोचित ठरेल. अर्जदाराच्या गहाळ झालेल्या वस्तुबद्दल नुकसान भरपाई रु.100/- आणि त्यावर अर्जदाराने पार्सल बुक करण्याच्या दि.12/09/2011 पासूनचे द.सा.द.शे.18 टक्के व्याजाप्रमाणे गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हयांनी दयावा तसेच अर्जदाराला झालेल्या मानसीक व शारिरीक ञासापोटी खर्च रु.500/- मंजूर करणे न्यायोचित ठरेल. म्हणून मुद्दा क्रं. 1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहे.
अंतिम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) अर्जदाराला गैरअर्जदार क्रं.1 व 2 हयांनी पार्सल बुक
करण्याच्या दिनांक म्हणजे दि.12/09/2011 पासून
रु.100/- व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याजा प्रमाणे
वैयक्तिक रित्या किंवा संयुक्तिकपणे रक्कम अर्जदाराला द्यावी.
(3) या कारवाईचा खर्च रु. 500/- गैरअर्जदारांनी अर्जदारास
1 महिण्याच्या आत दयावा.
(4) आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पाठवावी.
चंद्रपूर,
दिनांक : 20/08/2013.