निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 28/09/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 04/10/2010 तक्रार निकाल दिनांकः- 27/01/2011 कालावधी 03 महिने23 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्रीमती राजामती भ्र.बाबुराव शेवाळे अर्जदार वय 30 वर्षे धंदा घरकाम, अड.एस.एस.चव्हाण रा.उखळदवाडी ता.जि.परभणी. विरुध्द 1 मे.कबाल इन्शुरन्स सर्व्हीस प्रा.लि. गैरअर्जदार. व्दारा.मॅनेजर. स्वतः भास्करायन एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग. सिडको.औरंगाबाद 431 003. 2 व्यवस्थापक अड.जी.एच.दोडीया. रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. 570 नायगम क्रॉस रोड नेस्ट टू, रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट लिमीटेड वडाळा, वेस्ट मुंबई. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विम्याची देय नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत विमा कंपनीकडून झालेल्या सेवात्रुटीची दाद मिळणेसाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे उखळदवाडी ता.जि. परभणी येथील रहिवासी शेतकरी आहे. तारीख 18/10/2010 रोजी अर्जदाराचा पती मयत बाबुराव धोंडीबा शेवाळे शेतातून घरी येत असताना सांयकाळी 6.00 वाजता उजव्या पायाच्या घोटयाला सर्पदंश झाला. सरकारी हॉसिपटल परभणी येथे उपचारासाठी दाखल केले परंतू उपचारा दरम्यान दिनांक 19.10.2008 रोजी त्याचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशन ताडकळस येथे अकस्मात अपघात मृत्यू रजि. नं. 38/08 प्रमाणे नोंद मयताच्या आईने खबर दिल्यावरुन करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-याचा गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता.त्या पॉलीसीचा अर्जदाराचा मयत पती बाबुराव शेवाळे लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने त्यानंतर तहशीलदार परभणी यांचेकडे शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह विमा क्लेम दाखल केला. त्यानंतर तहशीलदार यानी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे कागदपत्रे वर्ग केली. परंतु गैरअर्जदारानी आजतागायत त्यांना नुकसान भरपाई दिली नाही अशा रितीने गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत सेवात्रुटी करुन मानसिकत्रास दिला.म्हणून ग्राहक मंचात त्याची दाद मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. आणि गैरअर्जदाराकडून पॉलीसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई रु.1,00,000/- गैरअर्जदाराकडून मिळावी अशी तक्रार अर्जातून मागणी केलेली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदार हिचे शपथपत्र ( नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रा नि.6 लगत एकूण 18 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर गैरअर्जदार नं 1 यांनी दिनांक 03.11.2010 रोजी मंचाकडे लेखी जबाब पोष्टाव्दारे पाठविला होता तो प्रकरणात नि. 9 ला समाविष्ठ करुन घेतला. गैरअर्जदार नं 2 यांनी तारीख 09/12/2010 रोजी आपले लेखी म्हणणे सादर केले ते प्रकरणात नि.12 वर आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.9) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्यक ती सल्लागार म्हणून नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्याचेकडून विमा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत बाबुराव धोंडीबा शेवाळे रा. उखळदवाडी यांच्या डेथे क्लेम ची कोणतीही कागदपत्रे त्याना आजअखेर मिळालेली नाहीत त्यामुळे त्या क्लेम संबंधी काय झाले त्याच्या खुलासा देता येत नाही सबब गैरअर्जदारास या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबा सोबत शेतकरी विम्या संबधीचे महाराष्ट्र शासनाने 6 संप्टेबर 2008 चे परीपत्रक तथा मार्गदर्शक सुचना दाखल केलेले आहे. गैरअर्जदार नं 2 यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.12) अर्जदाराची तक्रार कायदेशिर रित्या गैरअर्जदारां विरुध्द चालणेस पात्र नसल्यामुळे ती फेटाळण्यात यावी,कारण कबाल इंन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांच्याकडून त्यांना अर्जदाराच्या शेतकरी अपघात विमा क्लेम संबंधीची कसलीही कागदपत्रे त्याना आजतागायत मिळालेली नाहीत,त्यामुळे अर्जदारांस विमा क्लेमची नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.तक्रार अर्जातील इतर सर्व विधाने त्यांनी साफ नाकारलेली असून गैरअर्जदारां विरुध्द विनाकारण तक्रार दाखल करुन खर्चात पाडलेले आहे.तसेच तक्रार अर्जात कायदेशीर मुदतीत ही नाही. गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई क्लेम संदर्भात कोणत्याही प्रकारे सेवा त्रूटील झालेली नाही वरील सर्व बाबी विचारात घेऊन तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केलेली आहे. लेखी निवेदनाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार नं 2 चे शपथपत्र ( नि.13) दाखल केलेले आहे. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदार तर्फे अड एस.एस.चव्हाण आणि गैरअर्जदार नं 2 तर्फे अड दोडिया यांनी युक्तीवाद केला. निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार नं. 2 यांचेकडून अर्जदाराचा विमा क्लेम मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? नाही. 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- प्रस्तुत प्रकरणातील अर्जदाराचापती मयत बाबुराव धोंडीबा शेवाळे याला दिनांक 18.10.2010 रोजी उजव्या पायाच्या घोटयाजवळ सर्पदंश झाल्याने झाला होता. सरकारी दवाखान्यात परभणी येथे उपचार चालू असताना दिनांक 19.10.2010 रोंजी त्याचा मृत्यू झाला होता. मयत बाबुराव शेवाळे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने तहसिलदार पालम याच्याकडे विम्याची नुकसान भरपाई मिळणेसाठी अर्जदाराने आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती हे शाबीत करण्यासाठी पुराव्यात नि. 6 लगत संबधीत कागदपत्राच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत त्याचे अवलोकन केले असता नि. 6/1 व नि. 6/2 वरील क्लेम फॉर्मची छायाप्रत तसेच नि. 6/3 ते नि.6/7 वरील पोलीस पेपर्स, नि.6/8 वरील पी.एम.रिपोर्ट नि.6/9 ते नि.6/11 वरील महसूल नोंदीच्या छायाप्रती नि.6/10 रहिवाशी प्रमाणपत्र नि.6/11 वरील वारस प्रमाणपत्र या कागदपत्रातून शाबीत झाले आहे. शासनाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्या संबंधी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात (नि.10) नमूद केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे प्रकरणात दाखल केलेली असल्याने क्लेम फॉर्मसह सर्व कागदपत्रे तहशीलदार परभणी याचेकडे अर्जदाराने संपूर्त केली होती हे सिध्द होते. तहशीलदार यानी कागदपत्रे मिळाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज याचेकडे ती कागदपत्रे तहशीलदार यानी पाठविली होती त्यानंतर दिनांक 31.01.2009 रोजी. गैरअर्जदार क्रमांक 1 ने विमा कंपनीमध्ये प्रस्तवाव मंजूरीसाठी पाठविला होता असे अर्जदाराने तक्रार अर्जात नमूद केलेले आहे आणि ही गोष्ट पुराव्यातून शाबीत करण्यासाठी तहशीलदार कार्यालयाकडे दिनांक 10.02.2009 ते 24.02.2009 या कालावधीचे जावक टपाल रजिष्टरच्व्या नोंदीच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत. परंतू पुराव्यातील नि. 17/1 अ.नं.क्र. 14 ची एन्ट्री कबाल इन्शुरन्स याना दिनांक 06.03.2009 रोजी टपाल पाठविल्याची दिसत असली तरी ते टपाल अर्जदाराच्या च डेथ क्लेमचे होते अशी त्यावर नोंद नाही त्यामुळे ते ग्राहय धरता येणे कठीण आहे. त्यामुळे विमा क्लेमची कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे तहसिलदाराने पाठविलेली होती हे ठोस पुराव्यातून शाबीत झालेले नाही शिवाय अर्जदाराने प्रस्तूत प्रकरणात तहशिलदार याना पार्टी केलेले नसल्यामुळे त्याच्या कार्यालयाचे स्वतंत्र पत्र ही सादर केलेले नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात म्हटलेप्रमाणे तहशिलदाराकडून त्याना मयत बाबुराव शेवाळे याच्या डेथ क्लेम ची कागदपत्रे मिळालीच नाहीत या म्हणण्यात तथ्य वाटते. तहशीलदार परभणी मधून कागदपत्राची अद्यापी पूर्तता झालेली नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनी याचेकडून क्लेम मंजूर करण्याच्या बाबतीत सेवा त्रूटी झाली असे मुळीच म्हणता येणार नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी व कुटूंबातील त्या लाभार्थी शेतक-याला त्याच्या अपघाती मृत्यू पश्चात काही प्रमाणात का होईना आर्थिक मदतीचा लाभ कुटूंबाला मिळावा या उदात्त हेतूने शासनाने सर्व शेतक-याचे विमा हप्त्याची रक्कम शासनाच्या तिजोरीतून भरुन ही कल्याणकारी विमा पॉलीसी घेतलेली आहे. मयत बाबुराव शेवाळे याचा अपघाती मृत्यू पॉलीसी हमी मुदतीत झालेला असल्याने व तो पॉलीसीचा लाभार्थी असल्यामुळे त्याचे पश्चात अर्जदाराला नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळालीच पाहीजे व ती पात्र आहे. क्लेम उशीरा आला या तांत्रीक कारणास्तव विमा कंपनीने क्लेमची कागदपत्रे स्विकारण्याचे नाकारता कामा नये या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने रिपोर्टेड केस 2008 (2) All MR ( Journal) page 13 ( महाराष्ट्र ) मध्येही हेच मत व्यक्त केलेले आहे त्याचा आधार घेवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 गैरअर्जदार नं.2 याने अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथ क्लेमची नुकसान भरपाई रुपये 100000/- मजूर करण्यासाठी गेरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज मार्फत तहशीलदार परभणी यांचेकडून कागदपत्रे आदेश तारखेपासून 30 दिवसात मागावून घेवून नुकसान भरपाई क्लेम त्यापुढील एक महिन्यात सेटल करावा. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |