::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 19.06.2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्ते हे सेवानिवृत्त कर्मचारी असून, सेवानिवृत्तीनंतर मिळाणरे पैसे विरुध्दपक्षाच्या सोसायटी मध्ये खालील प्रमाणे ठेव रकमेच्या स्वरुपात ठेवले आहेत.
अ.क. | पावती क्र. | खाते क्र. | नांव | ठेव रक्कम रु. | ठेव दिनांक | देय दिनांक | कालावधी | व्याज दर % | देय रक्कम रु. |
1 | 0733537 | 018513000321 | सुभाष रुपचंद अग्रवाल | 60000 | 12.12.13 | 12.12.14 | 365 दिवस | 13 | 678000 |
2 | 0733555 | 018513000333 | सुभाष रुपचंद अग्रवाल | 35000 | 16.12.13 | 16.12.14 | 365 दिवस | 13 | 39550 |
3 | 0785097 | 018513000679 | सुभाष रुपचंद अग्रवाल | 20000 | 22.04.14 | 22.04.15 | 365 दिवस | 13 | 22600 |
4 | 0785283 | 018513000818 | मोहीत उमाशंकर अग्रवाल एम/जी सुभाष रुपचंद अग्रवाल | 100000 | 29.05.14 | 29.05.15 | 365 दिवस | 13 | 113000 |
5 | 0733230 | 018513000120 | संगीता उमाशाकर अग्रवाल | 64000 | 04.09.13 | 04.09.14 | | | 72320 |
6 | 0733132 | 018513000060 | लिला सुभाष अग्रवाल | 100000 | 19.07.13 | 19.07.14 | | | 113000 |
7 | 0733178 | 018513000031 | सुभाष रुपचंद अग्रवाल | 35000 | 07.06.13 | 07.06.14 | | | 39550 |
8 | 0733256 | 018513000137 | संगीता उमाशंकर अग्रवाल | 104000 | 17.09.13 | 17.09.14 | | | 131152 |
| | | | 514400 | | | | | 598972 |
वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेली ठेव विरुध्दपक्षाकडे तक्रारकर्त्याने स्वत:चे, पत्नीचे, नातीचे व विवाहीत मुलीच्या नावाने केलेली असून, वेळोवेळी नुतनीकरण करण्यात आलेले आहे. सदरची ठेव रकमची मागणी दि. 14/01/2015 रोजी केली असून विरुध्दपक्षाने मुदत संपल्यानंतरही तसेच मुदतीपुर्व तक्रार करतांना मागीतलेली रक्कम दिली नाही. विरुध्दपक्षाने नियमबाह्य कर्ज वितरण केल्यामुळे संस्थेची वसुली होत नाही व ठेवीदाराचे पैसे देण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. तक्रारकर्ता हा सेवानिवृत्त असून त्याला संस्थेकडून मिळणा-या उत्पन्नाशिवाय इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली व म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करुन विरुध्दपक्ष क्र. 1 ते 17 यांना संयुक्त व व्यक्तीगतरित्या ठेवीची रक्कम देण्याचे आदेश द्यावे.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
1. सदर प्रकरणात सर्व विरुध्दपक्षांना नोटीस मंचातर्फे बजावल्यानंतर सर्व नोटीसी शे-यासहीत परत आल्यात. त्यामुळे सर्व विरुध्दपक्षांविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश दि. 03/06/2015 रोजी मंचाने पारीत केले. सबब तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारकर्त्याच्या पत्नीने व मुलीने तक्रारकर्त्याला सदर प्रकरण चालविण्याचे दिलेले अधिकारपत्र, तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त व केलेला युक्तीवाद ऐकून सदर प्रकरणात अंतिम आदेश पारीत करण्यात आला.
2. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांतील ठेव पावतीवरुन तक्रारकर्त्याने व उर्वरित अधिकारपत्र धारकांनी, विरुध्दपक्षाकडे रक्कम गुंतविल्याचे व त्यावर विरुध्दपक्षाने व्याज देण्याचे मान्य केल्याचे दिसून येते. विरुध्दपक्ष हे गुंतवणुकदार व तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ठेवीदार असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे पैसे गुंतविले होते, परंतु सदर ठेवी परिपक्व झाल्यावरही व तक्रारकर्त्याने मागणी केल्यावरही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला त्याची रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सदर ठेव रक्कम परत करा, अशी मागणी केल्यानंतरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या मागणीची पुर्तता न केल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली.
4. तक्रारकर्त्याने मंचात गुंतवणुक केलेल्या पावत्यांच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत व तक्रारीत सदर पावत्यातील रक्कम, त्यावर मिळणारे व्याज व ठेव परिपक्व झाल्यानंतर मिळणारी रक्कम, याचा सविस्तर तक्ता दाखल केला आहे, तो खालील प्रमाणे…
अ.क. | पावती क्र. | खाते क्र. | नांव | ठेव रक्कम रु. | ठेव दिनांक | देय दिनांक | कालावधी | व्याज दर % | देय रक्कम रु. |
1 | 0733537 | 018513000321 | सुभाष रुपचंद अग्रवाल | 60000 | 12.12.13 | 12.12.14 | 365 दिवस | 13 | 678000 |
2 | 0733555 | 018513000333 | सुभाष रुपचंद अग्रवाल | 35000 | 16.12.13 | 16.12.14 | 365 दिवस | 13 | 39550 |
3 | 0785097 | 018513000679 | सुभाष रुपचंद अग्रवाल | 20000 | 22.04.14 | 22.04.15 | 365 दिवस | 13 | 22600 |
4 | 0785283 | 018513000818 | मोहीत उमाशंकर अग्रवाल एम/जी सुभाष रुपचंद अग्रवाल | 100000 | 29.05.14 | 29.05.15 | 365 दिवस | 13 | 113000 |
5 | 0733230 | 018513000120 | संगीता उमाशाकर अग्रवाल | 64000 | 04.09.13 | 04.09.14 | | | 72320 |
6 | 0733132 | 018513000060 | लिला सुभाष अग्रवाल | 100000 | 19.07.13 | 19.07.14 | | | 113000 |
7 | 0733178 | 018513000031 | सुभाष रुपचंद अग्रवाल | 35000 | 07.06.13 | 07.06.14 | | | 39550 |
8 | 0733256 | 018513000137 | संगीता उमाशंकर अग्रवाल | 104000 | 17.09.13 | 17.09.14 | | | 131152 |
| | | | 514400 | | | | | 598972 |
या मंचाने निर्देश दिल्यानंतर तक्रारकर्त्याने सर्व ठेव पावत्यांच्या मुळ अस्सल पावत्या मंचासमोर हजर केल्या. त्या पावत्यांवरुन मंचाने तक्त्यातील रकमेचे विवरण व छायांकित प्रतींची पडताळणी करुन, तक्रारकर्त्याने मागणी केलेली रक्कम योग्य आहे, अशी खात्रीकरुन घेतली. दाखल दस्तांवरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रु. 5,14,400/- ( पाच लाख चवदा हजार चारशे ) गुंतविलेले दिसून येतात व सदर ठेवी परिपक्व झाल्या असून, तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून रु. 5,98,972/- ( पाच लाख अठ्ठयाण्णव हजार नऊशे बहात्तर ) मिळण्यास पात्र असल्याचे मंचाच्या निदर्शनास आलेले आहे. तसेच सदर ठेव परिपक्व झाल्यावरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याची रक्कम व्याजासह परत न दिल्याने सेवा देण्यात त्रुटी केल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाकडून शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व सदर प्रकरणाचा खर्च रु. 3000/- मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत सदर मंच आलेले आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
1) गैरअर्जदार क्र. 1 व 17 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे तक्रारकर्त्यास रु. 5,98,972/- ( रुपये पाच लाख अठ्ठयाण्णव हजार नऊशे बहात्तर ) द्यावे.
2) तक्रारकर्त्याला सहन कराव्या लागलेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3,000/- ( रुपये तिन हजार ) विरुध्दपक्ष क्र. 1 ते 17 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे तक्रारकर्त्याला द्यावे.
3) सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी.
4) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.
(श्रीमती भारती केतकर ) ( कैलास वानखडे ) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,अकोला