Maharashtra

Ahmednagar

CC/17/222

Prakash Radhesham Tiwari - Complainant(s)

Versus

Manager , Bank of Baroda - Opp.Party(s)

Najan J. R.

07 Apr 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/222
( Date of Filing : 16 Aug 2017 )
 
1. Prakash Radhesham Tiwari
Shevgaon, Tal-Shevgaon
Ahmadnager
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager , Bank of Baroda
Branch-Shevgaon, Tal-Shevgaon,
Ahmadnager
Maharashtra
2. Sunil Sarjerao Vitnor
Bank of Baroda, Branch- Shevgaon, Tal- Shevgaon
Ahmadnager
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:Najan J. R. , Advocate for the Complainant 1
 Adv.A.A.Zarkar, Advocate for the Opp. Party 1
Dated : 07 Apr 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०७/०४/२०२१

(द्वारा मा.अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी सामनेवालेकडुन कर्ज खातेमध्‍ये जास्‍तीची गेलेली रक्‍कम व्‍याजासह मिळावी व नुकसान भरपाईची रक्‍कम मिळावी, याकरीता सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडुन दिनांक १४-१०-२०१३ रोजी कर्ज मंजुरी पत्रान्‍वये रूपये ६,५०,०००/- चे कर्ज व्‍यवसाय वृध्‍दीसाठी घेतलेले होते. त्‍यामुळे कर्ज प्रकरणामध्‍ये व्‍याजाचे दराबाबत बेस रेट + ३ % (सध्‍याचा दर १०.२५ + ३% = १३.२५ %) असा देण्‍यात आलेला होता. सदर कर्जाची परत फेड दिनांक ३१-०१-२०१४ पासुन रूपये १४,८७३/- चे समान ६० मासिक हप्‍त्‍यात करावयाची होती. तक्रारदार यांनी मासिक हप्‍त्‍याची रक्‍कम न चुकता भरलेली आहे, ती भरून वेळोवेळी खाते नियमीत करण्‍याचा वेळोवेळी प्रयत्‍न करत होते. साधारण १ वर्षाने तक्रारदारास व्‍याज दर आकारणी बाबत शंका आल्‍याने तक्रारदाराने तत्‍कालीन शाखाधिकारी तथा मॅनेजर श्री.जाधव साहेब यांनी तक्रारदाराचे खाते अनियमीत असल्‍याबाबत चर्चा केली असता त्‍यांना हिशोब जुळवून देता आलेला नाही. याबाबत लेखी मागितले असता श्री. जाधव यांनी सांगितले की, “ आमचे बॅंकेकडे तुम्‍ही प्‍लॉट तारण दिलेले आहे, त्‍या प्‍लॉटचा आम्‍ही केव्‍हाही लिलाव करू शकतो. ’’ दिनांक २८-०३-२०१६ रोजी संध्‍याकाळी ५.३० वाजता Planning.aurangabad@ bankofbaroda.com या वेबसाईटवरून सांगण्‍यात आले की, आपका खाता LA001 मे खुला है. जो की, EMI ना होकर Monthly Repayment है. आपका खाता दिनांक २८-०३-२०१६ को STANDERD है. अन्‍यथा खाता एन.पी.ए. हो जायेगा. बॅंकेने दिलेले व्‍याज दैनंदिन व्‍याज रिपोर्ट व सदरील ईमेलमधील रकमेमध्‍ये  तफावत आहे, याबाबत मॅनेजर श्री. जाधव यांना विचारले असता त्‍यांना हिशोब जुळवून देता आला नाही व सदरील बाबीवरून तुझ्या तारण प्‍लॉटचा लिलाव करील असे उत्‍तर दिले. दिनांक २४-०३-२०१६ रोजी तक्रारदाराचे जामीनदार श्री. व्‍ही.बी. साबळे यांना सकाळी ८.०० वा. फोन करून तुम्‍ही ज्‍यांना जामीन आहात त्‍यांचे तारण प्‍लॉटचा लिलाव होणार असल्‍याचे सांगितले. याबाबत तक्रारदार यांनी ई-मेलद्वारे

३.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदाराची सामेवालेकडे जास्‍तीची गेलेली रक्‍कम रूपये १,२४,४७४/- ही सरकारी नियम व व्‍याजाप्रमाणे तक्रारदारास परत करण्‍याचा आदेश व्‍हावा. तक्रारदारास सामनेवालेकडुन व्‍यवसायीक, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास व नुकसान भरपाई म्‍हणुन रक्‍कम रूपये १७,००,०००/- मिळावे, तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये ३७,०००/- मिळावा.

४.   तक्रारदार यांनी तक्रारीचे पुष्‍ट्यर्थ नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी १० वरील अर्जासोबत बॅंकेचे डे टुडे व्‍याजदर पत्रक, व्‍याजदर जास्‍त लावलेबाबत ईमेलची प्रत, माहिती अधिकारात बॅंकेकडुन मिळालेल्‍या Base Rate ची माहिती, बॅंकेने दिलेले कागदपत्र दाखल केले आहे. निशाणी १७ वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी १९ वर दस्‍तऐवज यादीसोबत श्री. विष्‍णू  भागुजी साबळे यांचे शपथपत्र, मासिक हप्‍त्‍यांचे कोष्‍टक, सामनेवाले यांच्‍याकडुन नोटीसीचे आलेले उत्‍तर, माहिती अधिकार अर्ज व त्‍याचे आलेले उत्‍तर, तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेली नोटीस, तक्रारदाराचे कर्ज खातेचा उतारा, सामनेवाले यांनी दिलेला निल दाखला, सामनेवाले यांनी दिलेल्‍या चेकची भरणा पावती, सामनेवाले यांचेशी केलेल्‍या पत्रव्‍यवहारांचे प्रती, सामनेवाले यांचे वरीष्‍ठांकडे केलेली तक्रार, सामनेवाले व तक्रारदार यांच्‍यात झालेला करार (गहाणखत), सी.ए. चा रिपोर्ट दाखल आहे. निशाणी २१ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  

५.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सदर नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाले क्र.१ व २ मंचात हजर होऊन नि.१३ वर म्‍हणणे दाखल केले. त्‍यामध्‍ये तक्रारदाराचे तक्रारीतील मजकुर अंशतः मान्‍य करून बराचसा मजकुर खोटा व बनावट आहे, असे नमुद केले आहे. पुढे वास्‍तविक सत्‍य परिस्थिती मध्‍ये असे नमुद केले आहे की, तक्रारदार यांनी केलेली सर्व कथने धुर्त व चलाख हेतुने केलेली आहे. यापाठीमागे निव्‍वळ सामनेवाले बॅंकेचे शाखाधिकारी यांना शारीरिक, मानसिक त्रास दिलेला आहे. सामनेवाले बॅंकेने योग्‍य पध्‍दतीने काम केलेले आहे. त्‍यास आडकाठी निर्माण करून बॅंकेची बदनामी तक्रारदार करीत आहे. बॅंकेला खर्चात पाडण्‍याच्‍या हेतुने सदरचा तक्रार अर्ज तक्रारदाराने दाखल केलेला आहे. फक्‍त सामनेवाला बॅंकेकडुन काही मिळविता आले तर मिळवावे हा एकच दृष्‍टीकोन तक्रारदाराचा आहे. सदर तक्रार अर्जात कुठल्‍याही प्रकारे काय अभिप्रेत आहे याचा स्‍पष्‍ट खुलासा होत नाही. मोघम स्‍वरूपात निव्‍वळ बॅंकेचे दैनंदिन कामामध्‍ये व्‍यत्‍यय आणून त्रास देण्‍यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सदर तक्रार अर्जा सामनेवाले बॅंकेविरूध्‍द असुन त्‍यामध्‍ये वैयक्तिकरित्‍या सामनेवाला बॅंकेचे शाखाधिकारी सुनिल विटनोर यांना पार्टी केलेले आहे. जे वैयक्तिक रित्‍या सामील होणे हे मिस जॉईन्‍डर ऑफ पार्टी प्रमाणे सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यास पात्र आहे. सामनेवले बॅंकेने तक्रारदाराच्‍या प्रत्‍येक तक्रारीचे निरसन केल्‍याचे संपूर्ण रेकॉर्ड ठेवलेले आहे. सदरचा तक्रार अर्ज हा संपूर्ण खोटा व बनावट असुन त्‍यामध्‍ये कोणतेच तथ्‍य नाही. त्‍यामुळे सदरचा तक्रार अर्ज रद्द करण्‍यात यावा, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.

     सामनेवाले यांनी नि.१४ वर दस्‍तऐवज यादीसोबत बॅंक ऑफ बडोदा यांनी प्रकाश राधेशाम तिवारी याच्‍या त्‍याने बॅंकेस पाठविलेल्‍या माहिती अधिकाराच्‍या  अंतर्गत दिलेल्‍या अर्जास बॅंकेने दिलेला तपशिलाची प्रत दाखल केली आहे, तक्रारदाराने सामनेवाले बॅंकेस ई-मेलद्वारे दिलेला तक्रार अर्जाची प्रत दाखल केली आहे. निशाणी २० वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी २२ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. निशाणी २३ वर अतिरीक्‍त लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  

६.   तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्तिवाद, पुराव्‍याचे शपथपत्र व सामनेवाले यांचा खुलासा, लेखी युक्तिवाद, पुराव्‍याचे शपथपत्र पाहता आयोगासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

अ.क्र.

मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवालेने तक्रारदारास न्‍युनतम सेवा दर्शवीली आहे काय ?

होय

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

८. मुद्दा क्र. (२) : तक्रारदाराने दाखल केलेले  निशाणी १७,१९ आणि दस्‍त  क्रमांक ३४ ची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, श्री. अनील मार्डीकर अॅण्‍ड कंपनी, चार्टर्ड अकाऊंटंट पार्टनर यांनी तक्रारदाराचे कर्जा संदर्भात सामनेवाले बॅंकेने आकारलेले व्‍याज व त्‍यावर घेतलेल्‍या व्‍याजाचा तपशील तयार करून तसेच प्रमाणपत्र तयार करून सादर करण्‍यात आलेले आहे. सदर प्रमाणपत्राचे अनुषंगाने तक्रारदाराला कर्ज मंजुर पत्राप्रमाणे १०.२५% + ३% म्‍हणजे १३.२५ % Interest असा तक्रारदाराला सामनेवालेचा व्‍याज दर द्यावयाचा होता. बॅंकेचे वेळोवेळी निघालेल्‍या परिपत्रकाप्रमाणे व्‍याज दर हा खालीलप्रमाणे आहे.

  1. 09.02.2013 to 05.05.2015-13.25% p.a.
  2. 06.05.2015 to 12.07.2015-13% p.a.
  3. 13.07.2015 to 04.10.2015-12.90% p.a.
  4. 05.10.2015 to 30.06.2016-12.65% p.a.
  5. W.E.F.-Date-01-07-2016-12.60% p.a.   

       वरील व्‍याजदराचे अनुषंगाने तक्रारदाराला रक्‍कम रूपये २,११,८४१/- रूपये व्‍याज सामनेवालेकडे द्यायाचे होते. परंतु बॅंकेचे तपशीलाप्रमाणे रक्‍कम  रूपये २,२०,९८९/- व्‍याज अधिक दंड तक्रारदाराकडुन घेण्‍यात आलेला आहे. त्‍या दराचे तपशीलाप्रमाणे तक्रारदाराकडुन व्‍याज व दंडाजी रक्‍कम मिळुन रक्‍कम रूपये ८,६१,८४१/- रूपये तक्रारदाराला सामनेवालेकडे द्यावयाचे होते. परंतु तक्रारदाराने एकुण रक्‍कम रूपये ९,३१,७५०/- भरलेले आहे. सबब त्‍यांनी रक्‍कम रूपये ६९,९०९/- रूपये अतिरीक्‍त सामनेवालेकडे भरलेले आहे. सदर तपशील व प्रमाणपत्राची पडताळणी केली असता असे दिसुन आले की, चार्टर्ड अकाऊंटंट यांनी नियमीत व्‍याजाची आकारणी रक्‍कम रूपये २,११,८४१/ इतकी केली आहे. बॅंकेने लावण्‍यात आलेला व्‍याज अधिक दंडाची रक्‍कम रूपये २,२०,९८९/- रूपये होती. परंतु चार्टर्ड अकाऊंटंट ने सदर बाबीचा हिशोब करतांना पाहिले नाही, असे दिसुन येते. त्‍यात रक्‍कम रूपये ९,१४८/- रूपये चार्टर्ड अकाऊंटंटने कमी दर्शवीली आहे. तक्रारदारची मुळ कर्जाची रक्‍कम रूपये ६,५०,०००/- अधिक रूपये २,२०,९८९/- (नियमीत व्‍याज व पेन इंटरेस्‍ट) अशी एकुण रक्‍कम रूपये ८,७०,९८९/- तक्रारदाराला सामनेवालेकडे भरावयाचे होते. तक्रारदाराने सामनेवालेकडे रक्‍कम रूपये ९,३१,७५०/- भरले, म्‍हणजेच तक्रारदाराने सामनेवाले बॅंकेकडे रक्‍कम रूपये ६०,७६१/- अतिरीक्‍त भरलेले आहे, असे सिध्‍द होते. सामनेवालेने त्‍याचे बचाव पक्षात असे कथन मान्‍य केलेले आहे की, सामनेवाले क्रमांक २ यांना व्‍यक्तिगतपणे पक्षकार करण्‍यात आलेले आहे, ते बॅंकेचे मॅनेजर असुन त्‍यांची व्‍यक्तिगत याविषयी काही जबाबदारी नाही. सामनेवाले क्रमांक १ ही बॅंक असुन त्‍याचे कारभाराची जबाबदारी निश्चितच बॅंकेची आहे, असे सिध्‍द होते. सामनेवाले क्रमांक १ बॅंकेने तक्रारदाराकडुन रक्‍कम रूपये ६०,७६१/- अतिरीक्‍त रक्‍कम घेतलेली असल्‍याने सामनेवाले क्रमांक १ यांनी निश्चितच तक्रारदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शविली आहे, असे सिध्‍द होते.  सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

९. मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ चे विवेचनावरून तसेच सामनेवाले क्रमांक २ हे बॅंकेचे व्‍यवहारामध्‍ये व्‍यक्तिगतरित्‍या जबाबदार नाही, ही बाब ग्राह्य धरुन खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

१.  तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२. सामनेवाले क्रमांक १ बॅंक यांनी रक्‍कम रूपये ६०,७६१/- तक्रारदाराला द.सा.द.शे. ८ टक्‍के व्‍याजासह दिनांक १४-०८-२०१७ पासुन द्यावे.

३. सामनेवाले क्रमांक १ बॅंक यांनी तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रूपये १०,०००/- (अक्षरी रूपये दहा हजार) व तक्रारीचा खर्च  रूपये ५,०००/- (अक्षरी रूपये पाच हजार) द्यावे.

४. वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

५.  वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

६. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

७.  सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.