जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/144 प्रकरण दाखल तारीख - 06/05/2010 प्रकरण निकाल तारीख – 21/09/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. प्रितपलासिंघ पि. तिरथसिंघ मेजर वय 27 वर्षे, धंदा प्रोप्रा.सेतू सुवीधा केंद्र अर्जदार रा.चीखलवाडी कॉर्नर, नांदेड विरुध्द. 1. बजाज अलायंन्स मार्फत शाखाधिकारी गैरअर्जदार शाखा कार्यालय, नांदेड. 2. बजाज अलायंन्स जनरल इन्शूरन्स कंपनी लि. मूख्य कार्यालय, जिई प्लॉटजी, एअरपोर्ट रोड, येरवडा, पूणे. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.एच.नंदगिरी गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.जी.एस. औढेंकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार यांने गैरअर्जदार यांचेकडे दि.27.04.2009 रोजी त्यांची मोटार सायकल क्र.एम.एच.-26/6609 चा विमा काढला होता. अर्जदाराने गाडीसाठी आयसीआयसीआय या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. अर्जदार हा दि.19.07.2009 रोजी त्यांचे एका मिञा सोबत कौठा नांदेड येथील अंगेठी बार अन्ड रेस्टारंन्ट मध्ये जेवण करावयास अंदाजे 9.30 वाजता गेला त्यावेळेस त्यांने सदर मोटारसायकल अंगेठी बारच्या पार्कीग लाईनमध्ये लावली. जेव्हा अर्जदाराचे जेवण संपले त्यावेळेस अर्जदार हा बाहेर आला त्यांस मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. यांची कल्पना लगेच ग्रामीण पोलिस स्टेशन नांदेड येथे दिली त्याप्रमाणे त्यांनी गून्हा क्र.213/2009 कलम 379 भा.द.वि. अन्वये नोंद केली.पोलिस स्टेशनने सदर घटनेचा पंचनामा केला. सदर बाबीची कल्पना गैरअर्जदार यांना दिली परंतु त्यांनी या बाबीकडे गांभीर्याने घेतले नाही. त्यामूळे अर्जदाराने गैरअर्जदारयांना त्यांचे वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु आजपर्यत अर्जदार यांना नूकसान भरपाई मिळाली नाही. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, अर्जदार यांचे मोटार सायकलची किंमत रु.86,000/- व त्यावर दि.25.7.2009 पासून 18 टक्के व्याज तसेच शारीरिक आर्थिक व मानसिक ञासापोटी नूकसान भरपाई म्हणून रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराची तक्रार ही पूर्णत खोटी आहे. हे त्यांना मान्य आहे की अर्जदाराचे मोटार सायकल क्र.एम.एच.-26/एस-6609 चा विमा दि.27.4.2009 ते 26.4.2010 या कालावधीचा होता. अर्जदार यांनी गाडीची योग्य काळजी घेतलेली नाही.अर्जदार यांची गाडी दि.19.7.2009 रोजी चोरी झाली व तक्रार ही अर्जदार यांनी पोलिस स्टेशनमध्ये दि.25.7.2009 रोजी तक्रार केली. तक्रार उशिरा दाखल केली या बाबत अर्जदार यांनी काहीही सांगितलेले नाही.गैरअर्जदार यांनी दि.21.8.2009 रोजी अर्जदार यांना पञ लिहून त्यांनी गाडीची चावी हरवल्याबददल त्यांना काहीही सांगितलेले नाही व त्यामूळे हरवलेल्या चावीचा कोणीतरी गैरवापर केला असणार.अर्जदार हा मूळ चावी शिवाय वाहन वापरीत होता.गैरअर्जदार यांनी अर्जदारास दूसरे पञ पाठवून क्लेम फॉर्म, मूळ आर.सी बूक, टॅक्स बॉल, पावती, सर्व्हीस बूकलेट, वॉरंटी कार्ड हे कागदपञ देण्यास सांगितले परंतु त्यांनी कागदपञ दिले नाहीत.त्यामूळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 व 2 ःः- अर्जदार हे दि.19.07.2009 रोजी त्यांचे दूचाकी वाहन एम.एच.-26-एस-6609 रॉयल इन्फील्ड बूलेट हया क्रमांकाची गाडी राञी 9,30 वाजता चोरीस गेली. यासंबंधी पोलिस स्टेशन नांदेड येथे गून्हा नंबर213/2009 कलम 379 भा.द.वि. याप्रमाणे तक्रार दिली असून, पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलेला आहे. अर्जदाराने बराच शोध घेतला, जेव्हा वाहन सापडतच नाही यांची खाञी पटल्यावर गैरअर्जदारांना चोरी गेल्याचे कळविले. गाडी चोरीला गेल्याबददल एफ.आय.आर. दि.25.07.2009 रोजीचे म्हणजे तक्रार ही नऊ दिवसांनी करण्यात आली.यासंबंधी Standard Operating Procedure for Settlement of Motor Theft Claims and sale of Theft recovered vehicles याखाली दि.02.08.2009 रोजीला पोलिस स्टेशन ग्रामीणला वाहनाच्या पूर्ण तपशीलासह व पॉलिसी नंबरसह पञ देण्यात आले आहे. यासंबंधी हे वाहन Non use करावे म्हणून आर.टी.ओ. नांदेड यांना पञ देण्यात आले आहे. ते सर्व रेकार्ड या प्रकरणात दाखल आहे. यानंतर चार दिवसांनी आयसीआयसीआय बँकेत दि.29.06.2009 ला पञ देऊन फायनान्सचे चेक स्टॉप करण्या बाबत अर्जदाराने अर्ज दिलेला आहे. अर्जदारांनी पॉलिसी दाखल केलेली असून त्या पॉलिसी कव्हर नोट नंबर OG-10-2007-1802-00000356 असा आहे. यात वाहनाचे मूल्य हे रु.59,118/- असे दाखविण्यात आलेले असून वाहन हे आयसीआयसीआय बँकेकडून कर्जावर घेतल्याची नोंद यावर करण्यात आलेली आहे. आर.टी.ओ.चे आर.सी.बूक आहे यावर देखील Hypothication म्हणून आयसीआयसीआय बँकेची नोंद आहे. वाहन हे दि.5.5.2008 रोजी रजिस्ट्रर झालेले आहे. यांचा अर्थ ते दिड वर्ष जूने आहे. पॉलिसी प्रमाणे विमा सूरक्षेची मूदत ही दि.26.04.2010 पर्यत होती. वाहन हे दि.19.07.2009 रोजी चोरीला गेले. गैरअर्जदाराच्या मते त्यांना क्लेम दि.21.08.2009 ला मिळाला व त्यावेळी त्यांनी अर्जदार यांना पञ पाठवून वाहनाचे ओरिजनल की, देण्यास सांगितली होती. परंतु त्यांनी ते दिली नाही. यानंतर वाहनाचे आर.सी. बूक, टॅक्स बूक, सर्व्हीस बूकलेट, वॉरंटी कार्ड इत्यादी वापस करण्यास सांगितले होते परंतु ते अर्जदाराने केले नाही असे म्हटले आहे. एखादे वाहन चोरीस गेल्यानंतर त्या वाहनाची मूळ चावी,आर.सी.बूक, टॅक्स बूक इत्यादी कागदपञ मागणे तसेच त्यासंबंधी एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, पोलिसीचा ए फायनल रिपोर्ट ज्यात या वाहनाचा शोध घेतला असता ते सापडू शकले नाही व यापूढे सापडण्याची शक्यता कमी आहे असा रिपोर्ट असणे आवश्यक आहे. गाडीचे सर्व्हीस बूकलेट, वॉरंटी कार्ड इत्यादी गोष्टी मागण्याची गरज नाही. गैरअर्जदार हे अवाजवी कागदपञ मागत आहेत असे दिसते. दूसरा आक्षेप गैरअर्जदारयांनी वाहनाची किंमत ही रु.35,000/- दाखवलेली आहे, पण अर्जदार म्हणतात त्याप्रमाणे लॉस हा रु.86,000/- चा झाला. याप्रमाणे गैरअर्जदारांनी पॉलिसी देताना त्यावर्षी वाहनाची किमत काय गृहीत धरुन पॉलिसी दिली व किती रक्कमेवर प्रिमियम घेतला हे बघणे जरुरी आहे. याप्रमाणे गैरअर्जदारांनी पॉलिसी प्रमाणे वाहनाची किंमत ही रु.59,118/-दाखवलेली आहे व त्यावर प्रिमियम घेतला आहे. तेव्हा आता वाहन चोरीस गेले असेल व ते सापडत नसेल तर एवढी किंमत देणे न्यायाच्या दृष्टीने योग्य राहील. पोलिसाकडून 3 ते 6 महिने वाहनाचा शोध लावण्यासंबंधी ए फायनल रिपोर्ट येणे महत्वाचे आहे. आज गाडी चोरीला जाऊन एक वर्षाचे वर होऊन गेलेले आहे. त्यामूळे आता सहा महिन्यापेक्षा जास्त काळ गेल्यामूळे त्यांची वाट न पाहता अर्जदाराला विम्याची रक्कम दिली पाहिजे. पोलिसांनी कलम 173 (2) सीआरपीसी दि.5.2.2010 रोजी बूलेट मोटार सायकल एम.एच.-26-एस-6609 यांचा तपास लागत नाही म्हणून गून्हा कायम स्वरुपात तपासासाठी ए वर्ग अखेर रिपोर्ट न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात पाठविला आहे. तेव्हा हे पञ विमा कंपनीस विम्याचा क्लेम सेंटल करण्यास पूरेसे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पूणे कार्यालय यांना पञव्यवहार एफ.आय.आर. जवाब दाखल केलेला आहे व त्यानंतर अर्जदाराने पोलिस रिपोर्ट, आयसीआयसीआय बँकेच्या पावत्या 2008 ची पॉलिसी दाखल केलेली आहे.ज्यांचा इथे काही संबंध नाही हे कागदपञ दाखल केलेले आहेत. एकंदर सर्व प्रकरण कागदपञासह तपासले असता गैरअर्जदार यांनी वाहन चोरी गेले म्हणून पॉलिसीतील भरलेली रक्कम देणे बंधनकारक आहे. अर्जदार यांनी कर्ज आयसीआयसीआय बँकेकडून घेतलेले आहे त्यामूळे आर.सी.बूक, टॅक्स बूक व गाडीचे चावी हे आयसीआयसीआय बँकेकडे असते, त्यामूळे ते अर्जदार देऊ शकणार नाही व अर्जदार यांनी विमा कंपनीकडून जो चेक मिळाला तो अर्जदार व आयसीआयसीआय बँकेच्या जॉईट नांवाने मिळेल व तो चेक आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा होईल, कारण कर्ज दिल्यामूळे बँकेचा हप्ता देखील त्यावर कायम राहील. किती कर्ज शिल्लक आहे किंवा तो किती अर्जदाराने वापस केले हे पाहणे विमा कंपनीचे काम नाही. विमा कंपनीने दिलेली रक्कम कर्जाच्या रक्कमेपेक्षा जास्त असेल तर उरलेली रक्कम कर्ज देणारी बँक ही अर्जदारास वापस करेल व समजा अशी रक्कम कमी असेल व कर्जाची रक्कम जास्त असेल तर अर्जदारांना ती दयावी लागेल. अशा परिस्थितीत अर्जदारांना फायनान्स कंपनीला पञ देऊन चेकचे पेमेंट स्टॉप करता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना पॉलिसी कव्हर नोट B20801806559 व पॉलिसी नंबर OG-10-2007-1802-00000356 यासाठी व मोटार सायकल क्रमांक एम.एच.-26-एस-6609 ही चोरीस गेली म्हणून हिच्या नूकसान भरपाईपोटी कव्हर नोट मध्हये दर्शवलेली किंमत रु.59,118/- व त्यावर पोलिस ए फायनल रिपोर्ट दि.05.02.2010 रोजी पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.3,000/-व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य. |