जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.371/2008. प्रकरण दाखल दिनांक – 28/11/2008. प्रकरण निकाल दिनांक –24/03/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. पुंडलिक निवृत्तीराव इंगळे वय वर्षे 41, व्यवसाय व्यापार, रा. विष्णू कॉम्प्लेक्स, व्ही.आय.पी.रोड, नांदेड जि. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. मा. व्यवस्थापक, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. दुसरा मजला, कोठारी कॉम्प्लेक्स, शिवाजी नगर, नांदेड. 2. मा. व्यवस्थापक, गैरअर्जदार बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. दुसरा मजला, राजेंद्र भवन, अदालत रोड, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे. - अड.एस.डी.भोसले. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.डी.सी.औंठे. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी लि. यांच्या ञूटीच्या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. अर्जदार यांनी आपले दूचाकी वाहन नंबर एम.एच.-26-यु-3901 या वाहनासाठी गैरअर्जदार यांचेकडून विमा घेतला. ज्यांचा पॉलिसी नंबर ओजी-08-2007-1802-00000497 असा आहे. अर्जदाराने दि.02.12.2008 रोजी आपले वाहन त्यांचे एक जवळच्या मिञाला त्यांचे स्वतःचे कामासाठी दिले होते परंतु त्यांच वेळेस दूर्देवाने सदर वाहनास अपघात होऊन वाहनाचे रु.25,000/- चे नूकसान झाले. त्याबददल पोलिस स्टेशन. भाग्यनगर येथे गून्हा नंबर 53/08 नोंदविला गेला. गैरअर्जदार यांनी अपघाताची सूचनार दिल्यावर त्यांचे मागणीप्रमाणे त्यांनी पाठविलेला सर्व्हेअर कडे सर्व आवश्यक ते कागदपञ दिली. परंतु अर्जदाराने पॉलिसी नियमाचे उल्लंघन केले असे कारण पूढे देऊन व वाहन चालवीणा-या व्यक्ती जवळ नूतनीकरण केलेले लायसन्स नाही म्हणजे परवाना वैध नाही असे कारण देऊन दावा नाकारला. गैरअर्जदार यांचेकडून वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च रु.25,000/- व मानसिक व शारिरीक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मिळावेत म्हणून विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खोटी असून त्यांना मान्य नाही असे म्हटले आहे. तक्रार अर्जातील परिच्छेद नंबर 2,3,4 हे गैरअर्जदारांनी अमान्य केले आहेत. अर्जदाराने आपले वाहन कोणत्या मिञाला दिले त्यांचे नांवाचा उल्लेख नाही व नंतर ज्या मिञाचे नांव आहे त्यांचे कडे वाहन परवाना वैध नव्हता म्हणजे नूतनीकरण केलेले नव्हते. गैरअर्जदाराने सर्व्हेअरची नियूक्ती केल्यानंतर सर्व्हेअरनी सर्व पोलिस पेपर, वाहन परवाना, बिल अर्जदाराकडून घेतले व ज्या व्यक्तीला वाहन चालविण्यास दिले होते त्या व्यक्तीला वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता असा उल्लेख केलेला आहे. यांचा अर्थ ब्रीच ऑफ पॉलिसी होईल म्हणून नूकसान भरपाईचा क्लेम देय राहणार नाही असे म्हटले आहे. कदम नांवाचा जो व्यक्ती अपघातचे वेळेस वाहन चालवित होता. त्यांचा वाहन परवाना 2003 पर्यतच होता. अपघात हा दि.21.02.2008 रोजी झाला त्या दिवशी परवाना वैध नव्हता. अर्जदाराने गैरअर्जदारास फसविले आहे. त्यांने कागदपञावर खाडाखोड करुन दि.17.03.1994 ते 04.12.2013 असा दाखवलेला आहे. परंतु प्रत्यक्ष आर.टी.ओ. ऑफिसमधून माहीती घेतली त्यात 2003 ही तारीख दर्शवलेली आहे. म्हणून पॉलिसीच्या नियमाप्रमाणे अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. म्हणून खर्चासह अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द होय. करतात काय ? 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी स्वतःच्या मालकीच्या दूचाकी वाहनाची बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी या गैरअर्जदार कंपनीकडून पॉलिसी नंबर ओजी-08-2007-1802-00000497 पॉलिसी काढली आहे. त्यांचा कालावधी दि.31.08.2007 ते 30.08.2008 असा आहे व हे गैरअर्जदार यांनाही मान्य आहे. वाहनाचा अपघात हा दि.21.02.2008 रोजी झाला त्याबददल एफ.आय.आर. दाखल केलेला आहे. यात ट्रकने मागच्या बाजूने धडक दिल्यामूळे मोटारसायकलचे नूकसान झाले आहे असे म्हटले आहे. दावा नाकारण्याचे कारण वाहन चालवीणारा व्यक्ती गोंविद कदम यांचेकडे वाहन चालविण्यासाठी आवश्यक असा वाहन परवाना वैध नव्हता म्हणजे नूतनीकरण केलेले नव्हते. म्हणून पॉलिसीतील क्लॉज प्रमाणे व रुल नंबर बी सेंट्रल मोटार व्हेइकल अक्ट,1989 प्रमाणे वाहन परवाना वैध नसल्याकारणाने अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. त्यासाठी पूरावा म्हणून प्रमाणपञ-कम-पॉलिसी शेडयूल गैरअर्जदाराने दाखल केलेले आहे व दूचाकी पॅकेज पॉलिसी नियम दाखल केलेले आहेत. अर्जदाराने जे गोविंद कदम यांचे ड्रायव्हींग लायसन्स दाखल केलेले आहे यावरुन अर्जदाराच्या मते दि.17.03.1994 ते दि.04.12.2013 असा त्यांना परवाना दिलेला होता जो की वैध आहे. त्यांनी वकिलामार्फत यूक्तीवाद केला जन्म तारीख बघून ज्यादिवशी परवाना मिळण्यासाठी अर्ज केला, परवाना दिलेल्या तारखेपासून वयाच्या 50 वर्षापर्यत किंवा एकदम 20 वर्ष जे काही जास्त असेल तोपर्यत परवाना दिला पाहिजे. 14.(2) (b) :- In the Case of any other licence:- i) if the person obtaining the licence, either originally or on renewal thereof, has not attained the age of fifty years on the date of issue, or as the case may be, renewal thereof, A) be effective for a period of twenty years from the date of such issue or renewal ; or B) until the date on which such person attains the age of fifty years whichever is earlier, त्यांचा जन्म दि.05.12.1965 असल्याकारणाने वर्ष,2013 ही दिनांक बरोबर आहे परंतु गैरअर्जदारांनी आर.टी.ओ. कार्यालयामधून जी माहीती मागितली त्याप्रमाणे वाहन परवान्याची वैधताही वर्ष,2003 पर्यतच आहे. तारखेमध्ये शंका निर्माण होण्यासारखे आहे परंतु परत एक नूतनीकरण केलेले गोविंद कदम यांचे लायसन्स दाखल केले असता त्यावर असे दिसून येते की, दि.22.08.2008 रोजी इंडोसमेंट करुन परवाना दि.22.08.2008 ते दि.21.08.2013 पर्यत नूतनीकरण करुन दिलेले आहे. यासर्व पूराव्यावरुन अर्जदार यांचे म्हणणेला म्हणजे लायसन्स 2013 वैध आहे या म्हणण्याला पुष्ठी मिळणार नाही. त्यामूळे लायसन्स वरची दिनांक ही 2003 च आहे हे स्पष्ट होते परंतु परवाना मिळण्यासाठी केलेल्या अर्जापासून व परवाना दिल्याच्या दिनांकापासून त्यांना 20 वर्ष पर्यत त्यांना नियमाप्रमाणे लायसन्स देता येते, ते का दिले गेले नाही ? म्हणजे नियमाचा भंग झालेला आहे. एकदा चालकास वाहन चालविण्याचा परवाना दिल्यानंतर मध्यंतरी काही कारणास्तव त्यांनी लायसन्सचे नूतनीकरण केले नाही. यांचा अर्थ तो वाहन चालविण्याचे विसरला असे होणार नाही व आर.टी.ओ. ने अपघाताचे नंतर तोच परवाना कूठलेही कारण न देता नूतनीकरण करुन दिलेले आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये वाहन चालकाचे लायसन्स वैध नव्हते असे असले तरी कूठल्याही कारणाने वैध नव्हते, का लायसन्स रदद केलेले होते किंवा वाहन चालकावर कूठेही गून्हा होता हे सिध्द होणे आवश्यक आहे असा कोणताही पूरावा समोर आलेला नाही. म्हणजे विलंबाने जरी लायसन्स् नूतनीकरण केलेले असले तरी वैधच ग्राहय धरावे लागेल. Driving Licence Validity :- Genuine licence if expired on the date of accident, renewed later, would be deemed valid and effective on date of accidence---Driver not disqualified from holding licence---Insurer liable New India Assurance Com. Ltd. Vs. Geetadevi I 2009 CPJ 325 Jharkhand SCDRC यांचा आधार घेता येईल. या प्रकरणात देखील अपघाताचे वेळी वाहन चालकाचा परवाना नूतनीकरण केलेला नसला तरी तो नूतनीकरण केलेला आहे असे समजून त्यांला क्लेम मिळाला पाहिजे. अपघातानंतर त्यांने परवाना नूतनीकरण केलेले आहे त्यामूळे गैरअर्जदार हे आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. या प्रकरणात सर्व्हे रिपोर्ट दाखल आहे. या सर्व्हे रिपोर्टप्रमाणे सर्व्हेअर श्री.डि.एस.नलबलवार यांनी जायमोक्यावर जाऊन नूकसानीचे परिक्षण केल्याप्रमाणे रु.30,146/- चा लॉस असेंस केलेला आहे. यातून रु.1646/- साल्व्हेज व पॉलिसी एक्सेस रु.50/- कमी केलेले आहेत. असे जरी असले तरी अर्जदाराची मागणी ही रु.25,000/- चीच आहे. वाहनाचे फोटो बघीतल्यावर सर्व्हेअरनी केलेले नूकसानीचे अवलोकन हे वाहनाचे फोटोवरुन एवढे असेल असे वाटत नाही. म्हणून सर्व्हेअरनी केलेलया असेंसमेंट प्रमाणे नूकसान भरपाई न देता अर्जदाराच्या मागणीप्रमाणे रु.25,000/- नूकसान भरपाई अर्जदारास देणे योग्य राहील. गैरअर्जदार यांनी केलेली कारवाई त्यांचे पॉलिसीतील नियमाप्रमाणे आहे. शिवाय गोविंद कदम यांचे वाहन परवाना पाहिले असता त्यात तारखेबददल संदेह निर्माण होतो व अर्जदाराने अपघाताच्यानंतर लायसन्स नूतनीकरण करुन घेतलेले आहे. गैरअर्जदार यांनी केलेली कारवाई पॉलिसीच्या नियमाप्रमाणे असल्याकारणाने अर्जदारास मानसिक ञास देण्यात येत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत रु.25,000/- नूकसान भरपाई बददल अर्जदार यांना दयावेत. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |