Maharashtra

Thane

CC/09/770

Miss Sahana BHATTACHARYA - Complainant(s)

Versus

Manager,A1 ADAVANCE PACKERS AND MOVERS - Opp.Party(s)

Adv.Waghule

25 Apr 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/770
 
1. Miss Sahana BHATTACHARYA
105/106, Casablanca C.H.S. Yamuna Nagar,Off.Link Road,Oshiwara Andheri (W),Mumbai
Mumbai
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,A1 ADAVANCE PACKERS AND MOVERS
Off.No.2, AMI Building Willows CHS Opp.Ashok Nagar,Dadlani Park,Balkum, Thane (W)
Thane
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated The 25 Apr 2016

                      न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

  1.         सामनेवाले ही ठाणे येथील वाहतुक व्‍यवसाय कंपनी आहे.  तक्रारदार हे सध्या कोलकत्‍ता येथे वास्‍तव्‍यास आहेत. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या मुंबई येथील निवासस्‍थानापासून काही घरगुती वस्‍तु कोलकत्‍ता येथील त्‍यांच्‍या घरी पोहचविण्‍यासाठी सामनेवाले यांना दिल्‍या. तथापि, वाहतुकीदरम्‍यान तक्रारदारांच्‍या अनेक वस्‍तुंचे नुकसान झाले. त्‍याबाबत तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍याकडून मागितलेल्‍या नुकसान भरपाईच्‍या बाबीतून प्रस्‍तुत वाद निर्माण झाला आहे.
  2.       तक्रारदारांच्‍या कथनानुसार त्‍यांनी त्‍यांच्‍या अंधेरी येथील निवासस्‍थानापासून ते कोलकत्‍ता येथील त्‍यांच्‍या निवासस्थानापर्यंत काही घरगुती वस्‍तू पोहोचविण्‍याकरीता गुडस् कन्‍साइनमेंट नं. 303 अन्‍वये दि. 02/06/2009 रोजी सामनेवाले यांच्‍याकडे सुपूर्द केल्‍या. त्‍यावेळी सदर वस्‍तु 7-8 दिवसांत कोलकत्‍ता येथे तक्रारदारांच्‍या घरी पोच करण्‍यात येतील असे सामनेवाले यांनी तक्रारदारांना आश्‍वासित केले. सदर कालावधीमध्‍ये वस्‍तुंची डिलीव्‍हरी न मिळाल्‍याने तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍याशी संपर्क साधला असता संबंधित ट्रकचालक छत्‍तीसगड येथे त्‍यांच्‍या नातेवाईकाच्‍या लग्‍नामध्‍ये असल्‍याने त्‍यांच्‍याशी संपर्क साधावा असे सांगण्‍यात आले. सदर वाहन चालकास संपर्क साधला असता त्‍यांने तक्रारदाराकडून उसनवार पैशांची मागणी केली. यानंतर 11 व्‍या दिवशी सामनेवाले यांचेकडे चौकशी केली असता वाहन बनारसमध्‍ये अटकले आहे असे सांगण्‍यात आले. यानतर संबंधित वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्‍याच्‍याकडे पैसे नसल्‍याने त्‍याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. यानंतर सामनेवाले यांनी संपर्क नाकारला व बराच काळ गेल्‍यानंतर दि. 22/06/2009 रोजी तक्रारदाराच्‍या घरी सर्व वस्‍तू आणल्‍या. तथापि, सदर वस्‍तुची पाहणी केली असता त्‍यातल्‍या महत्‍वाच्‍या वस्‍तू उदा. संगणक, सी.पी.यु., यु.पी.एस., टी.व्‍ही., ए.सी. तसेच फ्रिज व अन्‍य ब-याच वस्‍तूंचे नुकसान झाल्‍याचे आढळून आले. सदर बाब त्‍याक्षणीच वाहन चालकाच्‍या निदर्शनास आणून दिली व नुकसानीबाबतची नोटीस दि. 11/08/2009 रोजी सामनेवाले यांना दिली. तथापि त्‍यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्‍याचवेळी युनायटेड इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कंपनीस प्रतिपूर्ती दावा मागणी केली. परंतु विमा कंपनीने सर्व्‍हेअरमार्फत सर्व्‍हे करुन तक्रारदारांचे झालेले नुकसान अपघातमधून झाले नसून वस्‍तुच्‍या निष्‍काळजीपूर्ण हाताळणीतून झाल्‍यामुळे दावा नाकारला. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाईची मागणी करुनही त्‍यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन वस्‍तू नुकसानीची रक्‍कम रु. 2,16,336/- प्रोफेशनल लॉस रु. 8 लाख विलंबामुळे झालेल्‍या गैरासोयीबद्दल 1 लाख, वाईट वागणूक तसेच छळाबद्दल पांच लाख अशी एकूण रु. 16,16,836/- एवढया रकमेची मागणी केली आहे.
  3.         सामनेवाले यांनी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदारांची मागणी फेटाळतांना असे नमूद केले आहे की, तक्रारदारांनी वाहनासाठी दिलेल्‍या वस्‍तू या जुन्‍या व वापरलेल्‍या होत्‍या व त्‍याची किंमत रु. 2 लाख असतांना त्‍यांनी चुकीची अवास्‍तव मागणी केली आहे. तक्रारदारांच्‍या वस्‍तुची वाहतुक “At Owner’s risk” या शर्तीखाली केली असल्‍याने तक्रारदारांस नुकसानीची मागणी करण्‍याचा अधिकार नाही. नुकसानग्रस्‍त वस्‍तूचा फोटोसुध्‍दा तक्रारदारांनी सादर केला नाही. वस्‍तुचा विमा असतांनाही  त्‍यांनी प्रतिपूर्ती दावा दाखल केला नाही. विमा कंपनीने केलेला सर्व्‍हे माल डिलीव्‍हरी झाल्‍यानंतर 3 महिने गेल्‍यावर केला असल्‍याने व नुकसानग्रस्‍त वस्‍तूंचे फोटो नसल्‍याने नुकसानीचा दावा बोगस आहे. तक्रारदारांनी दाखविलेल्‍या नुकसानग्रस्‍त वस्‍तू या 2002 मध्‍ये खरेदी केल्‍या असल्‍याने त्‍यांचे मुल्‍य रु. 1 लाखापेक्षा कमी आहे. सदर वस्‍तू योग्‍य स्थितीतच तक्रारदारांना दिल्‍या असल्‍याने तक्रारदारांचा दावा चुकीचा आहे. तसेच वाहतुक दरम्‍यान कोणतेही नुकसान झाले नाही. सामनेवाले यांनी लेखी युक्‍तीवादामध्‍ये यांनी कायदेशीर मुद्दा उपस्थित करतांना असे नमूद केले आहे की, तक्रारदारांनी नुकसानीबाबत सामनेवाले यांना नोटीस दिली नसल्‍याचे व तक्रारदारांनी विमा प्रतिपूर्ती दावा सादर न केल्‍याने तक्रार फेटाळण्‍यात यावी.
  4.           तक्रारदार व सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला. उभय पक्षांचा वाद प्रतिवाद, लेखी युक्‍तीवाद व  कागदपत्रांचे वाचन मंचाने तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐण्‍कयात आला. त्‍यावरुन प्रकरणात खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः

 

  1.         तक्रारदारांनी त्‍यांच्‍या अंधेरी येथील निवासस्‍थानापासून त्‍यांच्‍या घरगुती वस्‍तू कोलकत्‍ता येथील तक्रारदाराच्‍या घरी पोहोचविण्‍याकरीता सामनेवाले यांना दि. 02/06/2009 रोजी जी.सी. नोट क्र. 303 अन्‍वये दिल्‍याची बाब व त्‍या वस्‍तु वहनाकरीता स्विकारल्‍याची बाब सामनेवाले यांनी मान्‍य केली आहे. तसेच सदर वस्‍तू दि. 22/06/2009 रोजी कोलकत्‍ता येथील तक्रारदाराच्‍या घरी पोहोच केल्‍याची बाब उभय पक्षी मान्‍य केली आहे. तथापि, वाहतुकीदरम्‍यान सदर वस्‍तूची हानी झाल्‍याबाबत, वस्‍तू वहनाच्‍या कालावधीदरम्‍यान सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेली वाईट वागणूक, तसेच, वाहतुकीदरम्‍यान वस्‍तूंना झालेल्‍या हानीसाठी नुकसानीबाबत तक्रारदारांनी केलेल्‍या नुकसान भरपाईसंदर्भात प्रस्‍तुत वाद निर्माण झाला असल्‍याचे उपलब्‍ध कागदपत्रांवरुन दिसून येते.
    1.           तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या जी.सी. नोट क्र. 303 दि. 02/06/2009 नुसार दि. 02/06/2009 रोजी तक्रारदारांनी आपल्‍या घरगुती वापराच्‍या वस्‍तूंचा समावेश असलेली 23 पॅकींग्‍ज सामनेवाले यांना सुपुर्द केली. सदर वाहतुकीच्‍या भाडयापैकी रक्‍कम            रु. 600/- तक्रारदारांनी अदा करणे बाकी होते. तक्रारदारांनी सदर संपूर्ण वस्‍तूंचे विमा संरक्षण  युनायटेड इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कं. या विमा कंपनीकडून मरीन कारगो स्‍पेसीफिक व्‍हायेज पॉलिसी क्र. 020400/21/09/01/0000/1542 घेतले होते. सदर पॉलिसीनुसार पॉलिसीधारक तक्रारदार यांनी वाहतुक करावयाच्‍या घरगुती वस्‍तूची किंमत रु. 2 लाख जाहिर केली होती  ही किंमत विमा कंपनीने मान्‍य करुन तक्रारदारांकडून विमा प्रिमियमची रक्‍कम स्विकारली होती.

 (क)          तक्रारदारांना दि. 22/06/2009 रोजी  कोलकत्‍ता येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी सामनेवाले यांचे वाहनचालकाकडून वस्‍तू प्राप्‍त झाल्‍याचे दिसून येते. तथापि, तक्रारदारांना प्राप्‍त झालेल्‍या सर्व वस्‍तूंना हानी झाल्‍याचे तक्रारदारांनी सदर पोच स्विकारतांना नमूद केले आहे व ही बाब सामनेवाले यांचे वाहन चालक व डिलीव्‍हरी मॅन यांचे उपस्थित केल्‍याचे दिसून येते. म्हणजेच दि. 22/06/2009 रोजी तक्रारदारांना प्राप्‍त झालेल्‍या वस्‍तूंमध्‍ये वहनादरम्‍यान नुकसान झाल्‍याची बाब सामनेवाले यांचे प्रतिनिधीसमोर तक्रारदारांनीनमूद केली होती व त्‍या प्रतिनिधीने तक्रारदारांच्‍या या आक्षेपाबद्दल कोणतीही हरकत घेतली नव्‍हती ही बाब स्‍पष्‍ट होते.  

 

  1.         प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये तक्रारदारांनी सामनेवाले यांना वहनासाठी दिलेल्‍या वस्‍तुस हानी झाली होती का? व सामनेवाले या हानीबाबतच्‍या नुकसान भरपाईस जबाबदार आहेत का? हा प्रश्‍न उपस्थित होतो. यासंदर्भात असे नमूद करावेसे वाटते की, तक्रारदारांनी अंधेरी ते कोलकत्‍ता दरम्‍यानच्‍या वहनासाठी दिलेल्‍या वस्‍तूची प्राप्‍ती झाल्‍याबाबत व त्यासाठीच्‍या भाडयासाठीची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याबाबत/प्राप्‍त होण्‍याबाबत कोणताही आक्षेप सामनेवाले यांनी नोंदविला नाही. म्‍हणजेच कॅरियरस् अॅक्‍ट 1865 मधील तरतुदीनुसार सामनेवाले यांनी सदर वस्‍तूची सुरक्षिततपणे वाहतुक करुन त्‍यांना वाहतुकीच्‍या प्रारंभापूर्वी प्राप्‍त झालेल्‍या वस्‍तू त्‍याच स्थितीमध्‍ये नेमून दिलेल्‍या ठिकाणी डिलीव्‍हरी करणे कायदेशीररित्‍या बंधनकारक आहे. सामनेवाले यांनी दि. 02/06/2009 रोजी जी.सी. नोट क्र. 303 अन्‍वये व त्‍यासोबतच्‍या तपशिलानुसार तक्रारदाराकडून घरगुती वस्‍तूचे 23 पॅकींग्‍ज स्विकारले ते खराब अवस्‍थेत होते किंवा कसे याबाबत कोणताही शेरा सामनेवाले यांनी जी.सी. नोट क्र. 303 वर अथवा त्‍यासोबतच्‍या तपशिलावर नोंदविला नाही. म्‍हणजेच सामनेवाले यांना तक्रारदाराकडून प्राप्‍त झालेल्‍या वस्‍तू त्‍याच अवस्‍थेत संपूर्ण सुर‍क्षेसह तक्रारदारांना पोहोचविणे हे त्‍यांचे कायदेशीर कर्तव्‍य होते.

 (इ)        कॅरियर्स अॅक्‍ट 1865 मधील कलम 9 मधील तरतुदीनुसार ग्राहकाने वाहतुकदारास वहनासाठी दिलेल्‍या वस्‍तूस वहनादरम्‍यान नुकसान झाले किंवा कसे ही बाब सिध्‍द करण्‍याची जबाबदारी ग्राहकावर नाही अशी स्‍पष्‍ट तरतूद आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून वहनासाठी स्विकालेल्‍या घरगुती वस्‍तू दोषपूर्ण असल्‍याबाबत कुठेही नमूद केले नाही. तथापि, सदर वस्‍तू तक्रारदारांस दि. 22/06/2009 रोजी प्राप्त झाल्‍यानंतर त्‍या वस्‍तूंना हानी झाल्‍याची नोंद तक्रारदारांनी सामनेवाले यांचे चालक व डिलीव्‍हरी मॅन यांचे उपस्थितीत केली असल्‍याचे उपलब्‍ध कागदपत्रांवरुन दिसून येते. त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या वहन केलेल्‍या घरगुती वस्‍तूस वाहतुकीदरम्‍यान नुकसान झाले नसल्‍याची बाब सामनेवाले यांनी कलम 9 प्रमाणे सिध्‍द करणे त्‍यांचे कायदेशीर कर्तव्‍य आहे. तथापि, सामनेवाले यांनी याबाबत कोणताही पुरावा दाखल न करता केवळ शाब्दिक कथनाद्वारे तक्रारदारांचा नुकसान भरपाईचा दावा फेटाळला आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांची प्रस्‍तुत प्रकरणातील जबाबदारी कमी होत नाही.   

(ई)         तक्रारदार व सामनेवाले यांचे वाद प्रतिवाद विचारात घेऊन प्रस्‍तुत प्रकरणाशी साधर्म्‍य दर्शविणा-या अनेक न्‍यायनिर्णयाचा विचार प्रस्‍तुत मंचाने केला. त्‍यापैकी काही प्रमुख न्‍यायनिर्णय खाली नमूद केले आहेतः

 

   (i)   Nath Brothers Vs. Best Roadways Ltd. 2000 CTJ 335 SC

                 या प्रकरणामध्‍ये मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने खालीलप्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहेः

Liability of a carrier to whom goods are entrusted for carriage is that of an “Insurer” and is “Absolute” in terms, which means that the courier has to deliver the goods safely, undamaged and without  loss at the distination.”

          Court also observed that  “At Owner Risk” does not exempt a carrier from his own negligence or negligence of servant or Agent.

   (ii)   Patel Roadways Vs. Birla Yamah Ltd. 2000 CTJ 241 SC

            या प्रकरणामध्‍ये मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने खालीलप्रमाणे न्‍यायिक तत्‍व नमूद केले आहेः

            “It is not  plaintiff to establish negligence. The term “At owner’s risk” or “At the Sole responsibility of the owner” are of no significance and cannot absolve the carrier’s responsibility to ensure safe delivery of goods.”

 (उ)          मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाची उपरोक्‍त न्‍यायतत्‍वे विचारात घेतल्‍यास तक्रारदारांचा नुकसान मागणीसंदर्भातील दावा खोडून काढण्‍याची जबाबदारी तसेच त्‍याप्रित्‍यर्थ पुरावा दाखल करण्‍याची जबाबदारी सामनेवाले यांची आहे. तथापि सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या नुकसान भरपाईच्‍या मागणीसंदर्भात कोणत्‍याही स्‍वरुपातील पुरावा सादर न केल्‍याने तक्रारदाराच्‍या काही मागण्‍या विचार करण्‍यायोग्‍य असल्‍याचे मंचाचे मत आहे. त्‍यानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

             आ दे श

  1. तक्रार क्रमांक 770/2009 अंशतः मंजूर करण्‍यात येते 
  2. तक्रारदारांनी सामनेवाले यांना वाहतुकीसाठी दिलेल्‍या घरगुती वस्‍तुसंदर्भात सामनेवाले यांनी त्रुटीची सेवा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.
  3. तक्रारदारांनी सामनेवाले यांना अंधेरी ते कोलकत्‍ता या दरम्‍यान वहनासाठी दिलेल्‍या वस्‍तुपैकी तक्रारदारांच्‍या विमा कंपनीने त्‍यांच्‍या सर्व्‍हेक्षणाअंती हानी झालेल्‍या सोबत जोडलेल्‍या वस्‍तूचे नमूद केलेले एकत्रित मुल्‍य रु. 1,07,000/- सामनेवाले यांनी    दि. 01/07/2009 पासून 6% व्‍याजासहीत तक्रारदारांना दि. 30/06/2016 पूर्वी अदा करावे. आदेशपूर्ती विहीत मुदतीमध्‍ये न केल्‍यास दि. 01/07/2016 पासून आदेशपूर्ती होईपर्यंत 9%  व्‍याजास‍ह संपूर्ण रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावी.
  4.  तक्रार खर्चाबद्दल  रु. 10,000/-  सामनेवाले यांनी तक्रारदार संस्‍थेला दि. 30/06/2016  पूर्वी अदा करावेत.
  5. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्‍क देण्‍यात        याव्‍यात.
  6. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती असल्‍यास तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.           
 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.