जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 52/2011 दाखल तारीख :23/02/2011
निकाल तारीख :23/02/2015
कालावधी : 04 वर्षे 0 म.0 दिवस
श्रीमती विमलबाई व्यंकटराव बरुरे,
वय 45 वर्षे, धंदा शेती,
रा. मोहगाव, ता. रेणापुर, जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) व्यवस्थापक,
रिलायंन्स जनरल इंशुरन्स कंपनी लि;
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट मुंबई 38.
2) व्यवस्थापक,
विनीत आठल्ये भास्करायण,
कबाल इन्शुरन्स प्रा.लि.
एच.डी.एफ.सी. लोन बिल्डींग, प्लॉट नं. 7,
सेक्टर ई, सिडको औरंगाबाद.
3) तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती रेणापुर,
रा. रेणापुर, ता. रेणापुर जिल्हा लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.अनिल के.जवळकर.
गै.अ.क्र.1 तर्फे : अॅड. एस.जी.दिवाण.
गै.अ.क्र.2 : स्वत:
गै.अ.क्र.3 : कोणीही नाही.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार ही मोहगाव येथील रहिवावशी असून, तिच्या कुटूंबात मौजे मोहगाव येथे गट क्र. 99/2, 99/1 येथे अनुक्रमे 3 हेक्टर 54 आर व 81 आर एवढी शेतजमीन आहे. अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्याकडे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विम्या अंतर्गत विमा पॉलिसी काढली आहे. दि. 24.07.2009 रोजी अर्जदाराचे पती व्यंकटराव विठोबा बरुरे व त्यांचे सोबत त्यांच्या गावातील एक व्यक्ती नामे देविदास पांडुरंग दिवटे रा. मोहगाव हे दोघेजन अर्जदाराच्या पतीच्या दुचाकी क्र. एम.एच.24/9295 या मोटार सायकलीवर बसुन गावाकडे जात असतांना संध्याकाही 7.30 ते 7.45 च्या दरम्यान रेणापुर ते खरोळा या रोडवरील रेणा नदीच्या पुलाजवळ पोहोचले असता समोरुन एक टेम्पो एम.एच.24/ए 3814 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन जोरदार व हयगयीने भरधाव वेगात चालवुन अर्जदाराच्या पतीच्या वाहनास जोरदार धडक दिली. सदरच्या धडकेमुळे अर्जदाराचे पती व देविदास दिवटे हे दोघेही खाली पडले. सदरच्या घटनेमुळे अर्जदाराच्या पतीस दोन्ही पायास व उजव्या खांदयास मार लागुन रक्त निघत होते, अर्जदाराच्या पतीच्या पोटास मुक्का मार लागला होता. अर्जदारास व देविदास दिवटे यांना टेम्पो चालकाने लातूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आणले, लातूर येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी अर्जदाराच्या पतीस तपासुन मयत झाल्याचे सांगीतले . त्यानंतर रेणापुर पोलिस स्टेशन येथे दिनांक 26.07.2009 रोजी त्यांच्या सोबतचे देविदास दिवटे यांनी चालकाच्या विरुध्द फिर्याद नोंदविली. अर्जदाराने आपल्या पतीच्या अपघाती मृत्यू नंतर प्रस्ताव तयार करुन गैरअर्जदार क्र 1 कडे दि. 31.08.2009 रोजी पाठवला. त्यानंतर 15 महिने झाले तरी त्यात गैरअर्जदार यांनी काहीच उत्तर दिले नाही. म्हणुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली असल्यामुळे, अर्जदारास गैरअर्जदार ने रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन 15 टक्के व्याजाने दयावेत तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 20,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु. 10,000/- देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार कबाल इंशुरन्स कंपनीच्या म्हणण्या प्रमाणे श्री व्यंकटराव विठोबा बरुरे रा. मोहगांव ता.निलंगा जिल्हा लातूर येथील राहणारा असून, त्याचा अपघात दि. 24.07.2009 रोजी झाला, दावा दि. 29.09.2009 रोजी प्रस्ताव प्राप्त झाला , त्यात अपुरे कागदपत्र असल्यामुळे तो प्रस्ताव पुर्ण करुन पाठवण्यास सांगितले दि. 03.02.2010, 03.03.2010 रोजी तसेच 31.06.2010 रोजी स्मरणपत्रे अर्जदारास देण्यात आली व दि. 23.06.2010 ला प्रस्ताव विमा कंपनीस पाठवण्यात आला. दि. 24.11.2010 रोजी रिलायन्स जनरल इंशुरन्स कंपनीने सदरचा प्रस्ताव बंद केला.
रिलायन्स जनरल इंशुरन्स कंपनीच्या म्हणण्या प्रमाणे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघाती दि. 24.07.2009 रोजी झालेला आहे. त्याचा प्रस्ताव कबाल इंशुरन्स कंपनीकडे गेलेला आहे. व त्यात कागदपत्रांच्या त्रूटी मध्ये शेतक-याजवळ वाहन परवाना मिळुन आलेला नाही. म्हणुन त्यांनी कायदयाचा भंग केलेला आहे. तसेच शेतकरी जनता अपघात योजने नुसार अर्जदार हा शेतकरी होता व त्याच्या गाडीचा अपघात झाला, म्हणजे त्याच्या जवळ गाडीचा वाहन परवाना असणे गरजेचे आहे व ते अर्जदाराने दिलेले नसल्यामुळे त्यांचा तक्रार प्रस्ताव हा बंद करण्यात आला आहे. म्हणुन याला गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत त्रूटी केलेली नाही.
तालुका कृषी अधिका-यास नोटिस प्राप्त दि. 12.03.2013 रोजी झाली वत्याची पु ता. 01.09.2014 होती. परंतु तालुका कृषी अधिका-याकडून कोणीही हजर झालेले नाही.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदाराचा पती हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब गैरअर्जदारानी आपल्या म्हणण्यात मान्य केलेली आहे. तसेच मृत्यू पुर्वी त्याच्या नावावर मौजे मोहगाव येथे गट क्र. 99/2 व 99/1 येथे अनुक्रमे 3 हेग्र 54 आर व 81 आर एवढी शेतजमीन आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे. अर्जदाराचे पती व्यंकटराव बरुरे हे दि. 24.07.2009 रोजी आपल्या गाडीवर बसुन जात असतांना, रेणा नदीच्या पुर्वेस अंतरावर गेले असता, समोरुन टेम्पो क्र. एम.एच.24/3814 चे चालकाने हयगयी व निष्काळजीपणाने भरधाव वेगाने चालवुन आम्हास समोरुन जोराची धडक दिली, त्यामुळे मी व व्यंकट बरुरे दोघेही मोटार सायकल वरुन खाली पडले. त्यामुळे अर्जदाराच्या पतीस खुब्यास मार लागला. पोटास मार लागला, शवविच्छेदन अहवाला नुसार अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा Blunt Abdominal injury e fracture (L) humerous यात अर्जदाराच्या पतीजवळ वैध वाहन चालक परवाना , अर्जदाराने प्रस्तावा सोबत दिला नाही, म्हणुन सदरचा प्रस्ताव बंद केलेला आहे. यात विमा कंपनीने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केल्याचे दिसून येते. सदर केसमध्ये अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झालेला असून तो स्वत:च्या मोटार सायकल क्र. 9245 वर बसुन जात असतांना रेणा नदी जवळ समोरुन टेम्पोने सदर मोटार सायकलला धडक दिली आहे, त्यामुळे यात अर्जदाराच्या पतीचा काही दोष नाही व सदर केसमये तो आरोपी नाही. तसाच तो व्यथीत व्यक्ती असल्यामुळे व्यथीत व्यक्तीच्या नातेवाईकास सदर विम्याचा लाभ मिळावयास हवा असे, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात लिहीले आहे, केवळ अर्जदाराने वाहन परवाना दिलेले नाही, म्हणुन त्याचा क्लेम नामंजुर करणे हे गैरसोयीचे होणार आहे. कारण मयताचे वारस हे अपघाती मृत्यूमुळे त्यांचे कुंटुब सर्व निराधार होवुन जाते व त्याची पत्नी विधवा ती ही सर्व कागदपत्रे आवश्यक असली तरी एकत्रीत करावयास तिला त्रासाचे होते, तेंव्हा या सर्व गोष्टीचा विचार करुन, हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे. म्हणुन रु. 1,00,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 3000/- व दाव्याचा खर्च रु. 3000/- असे देण्यात यावे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशता मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र.1 यांनी, तक्रारदारास शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- आदेशा प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र.1 यांनी, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.