जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 255/2011 तक्रार दाखल तारीख – 01/10/2011
निकाल तारीख - 26/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 04 म. 25 दिवस.
श्रीमती लक्ष्मी भ्र. बालासाहेब माने,
वय – 40 वर्षे, धंदा – घरकाम, शेती,
रा. तळणी, ता. रेणापुर, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी,
टिळक नगर, मेन रोड, लातुर.
ता.जि.लातुर.
- व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,
मंडळ कार्यालय क्र. 2 अंबिका हाऊस, शंकर नगर चौक,
नागपुर – 440010.
- कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि,
राज अपार्टमेंट, प्लॉट नं. 29 जी सेंटर,
रिलायंन्स फ्रेशच्या पाठीमागे, चिस्तीया पोलीस चौकीजवळ,
एम.जी.एम.रोड, सिडको टाऊन सेंटर,
औरंगाबाद.
- तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय रेणापुर,
ता. रेणापुर जि. लातुर.
- जिल्हा कृषी अधिकारी,
जिल्हा परिषद, लातुर,
ता. जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए. के. जवळकर.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे :- अॅड. एस.व्ही.तापडीया. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- स्वत:
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार ही मौजे तळणी ता. रेणापुर जि. लातुर येथील रहिवाशी आहे. ती मयत बाळासाहेब माने यांची धर्मपत्नी आहे. अर्जदाराच्या पतीस मौजे तळणी येथे गट क्र. 66 मध्ये 81 आर एवढी जमीन आहे. तो गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांचा शेतकरी विमा अंतर्गत त्याचा विमा काढलेला आहे. सदर विम्याचा कालावधी दि. 15/08/2009 ते 14/08/2010 असा आहे. दि. 08/05/10 रोजी सकाळी 11 वाजता बच्चेसाहेब मुकुंदराव माने यांचे शेतात विहीरीतील खडक फोडण्याचे काम चालू असताना स्फोटक वापरुन स्फोट घडवून आणला होता. त्यावेळेस मयत बाळासाहेब माने यांना स्वत:च्या शेतात बसले असताना दगड उडुन येवून डोक्यास गंभीर मार लागला. त्यानंतर अर्जदाराच्या पतीस लोकमान्य अतिदक्षता विभाग लातूर येथे उपचार करण्यासाठी ठेवण्यात आले. उपचारा दरम्यान दि.08/05/10 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अर्जदाराचे पती अपघातामुळे मयत झाल्यामुळे अर्जदार ही शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळण-या लाभास पात्र आहे. म्हणून तिने सर्व क्लेम फॉर्म भरुन गैरअर्जदाराकडे पाठवला. गैरअर्जदार क्र. 1 ने दि 01/07/11 रोजी कळवले की, 90 दिवसानंतर क्लेम फॉर्म मिळाला असल्यामुळे, त्यांचा क्लेम नाकारला आहे. ही गैरर्अदार क्र. 1 ते 5 यांनी अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. म्हणून गैरअर्जदाराने रु. 1,00,000/- 12 टकके व्याजाने अपघात तारखेपासुन दयावेत. शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु. 20,000/-, दाव्याचा खर्च रु. 5,000/- दयावेत अशी मागणी केली आहे.
तक्रारदाराने तक्रारी सोबत पत्र, कागदपत्रांची यादी, क्लेम फॉर्म, क्लेम फॉर्म – भाग 1 चे सहपत्र, शपथपत्र, 7/12, फेरफार नक्कल, गाव नमूना ‘क’, फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टम, मृत्यू प्रमाणपत्र, पासबुक, मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 3 च्या म्हणण्यानुसार अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दि. 06/05/10 रोजी झाला व अर्जदाराचा क्लेम दि. 21/05/11 रोजी मिळाला. त्याच्या विमा पॉलीसीचा कालावधी दि.15/08/09 ते 14/08/10 असा होता. व त्यानंतर 90 दिवस म्हणजे 14/11/10 पर्यंत सदरचा क्लेम मिळावयास हवा होता. परंतु दि. 21/05/11 रोजी म्हणजे तब्बल 1 वर्षाने गैरअर्जदार विमा कंपनीस यास मिळाला आहे. म्हणून सदरचा क्लेम युनायटेड इंडिया कंपनीस पाठवण्यात आला. व विमा कंपनीने 90 दिवसात क्लेम न मिळाल्यामुळे अर्जदाराचा प्रस्ताव नाकारला आहे.
गैरअर्जदार क्र. 4 च्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा प्रस्ताव दि. 03/05/11 रोजी दाखल केला होता. व तो दि. 08/05/11 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा क्लेम 90 दिवसाच्या आत पॉलीसी कालावधी संपण्याच्या आत मिळाला नाही. म्हणून अर्जदाराचा प्रस्ताव हा फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदारास मौजे तळणी येथे गट क्र. 66 मध्ये 81 आर एवढी जमीन आहे व मृत्यूसमयी तो शेतकरी होता.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराला गेरअर्जदार क्र. 1 युनायटेड इंडिया कंपनी यांचे पत्र दि. 20/08/10 रोजी मिळाले व त्यानुसार विमा कंपनीने अर्जदारास मृत्यू प्रमाणपत्र, एफ. आय. आर, चार्ज शीट, तहसील कार्यालयाचा आदेश, जाहीर प्रगटन, पी.एम. रिपोर्ट, सोसायटीचे सभासदत्व, व दावा फॉर्म पुर्णपणे भरुन परत दाखल करावा असे पत्र दिलेले आहे. त्यामुळे अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे विमा पॉलीसी ही दि. 21/05/11 रोजी प्राप्त झाली हे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार दाखल केलेल्या कागदपत्रानुसार अर्जदाराने विविध कार्यकारी सोसायटी यांच्याकडुन देखील क्लेम पाठवला होता. व तो गैरअर्जदार विमा कंपनीस दि 26/06/10 रोजी मिळालेला आहे. ज्याचा जावक क्र. 1604 असुन अर्जदारास पुन्हा तीच कागदपत्रे व दावा फॉर्म पुर्णपणे भरुन देण्यास विमा कंपनीने दि. 20/08/10 रोजी सांगितलेले आहे. याचा अर्थ गैरअर्जदारास अर्जदाराचा एक प्रस्ताव विदित काळात मिळालेला आहे. तीच कागदपत्रे सदर केसमध्ये देखील आवश्यक होती. तसेच सदर केसमध्ये अर्जदारास कोणतेही कागदपत्र मागितलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीस या अर्जदाराच्या प्रस्तावाबाबत पुर्ण कल्पना होती. म्हणून गैरअर्जदाराने सदरचा प्रस्ताव 90 दिवसात न मिळाल्यामुळे त्यास दि. 01/07/2011 रोजी कळविले आहे. त्या पत्रावर त्यांना सदर प्रस्तावाची माहिती दि. 26/06/10 रोजी माहिती झालेली आहे. अर्जदाराच्याच्या पतीचा मृत्यू हा त्याच्या डोक्यात विहीरीतील खडक दि. 08/05/10 सकाळी 11 वाजता पडल्यामुळे शवविच्छेदन अहवालानुसार Head injury झालेला म्हणजेच पतीचा मृत्यू हा अपघाताने झालेला आहे. माहीती ही 90 दिवसाच्या आतच मिळालेली असल्यामुळे अर्जदाराचा हा प्रस्ताव उशिरा मिळाला म्हणून अर्जदाराचा क्लेम नामंजुर करु शकत नाही. म्हणजेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केलेली स्पष्ट दिसुन येते. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा क्लेम मंजुर करत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु. 1,00,000/- दयावेत व मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास
जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
2,000/-(अक्षरी दोन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.