जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 337/2011 तक्रार दाखल तारीख – 30/12/2011
निकाल तारीख - 23/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 01 म. 23 दिवस.
श्री. राजेश्वर वसंतराव पाटील,
वय – 38 वर्षे, धंदा – नौकरी,
रा. बँक कॉलनी, दापका रोड,
निलंगा ता. निलंगा, जि; लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) मा. व्यवस्थापक,
महिन्द्रा टु व्हिलर्स लि.
पुणे ऑफीस :- डी.आय.ब्लॉक,
प्लॉट नं. 18/2 (पार्ट),
एम.आय.डी.सी.चिंचवड, पुणे – 411 019.
2) विवेका मोटार्स,
अधिकृत डिलर्स, महिंद्रा टु व्हिलर्स,
अंबाजोगाई रोड, एस.पी.ऑफीस जवळ,
लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. लक्ष्मण डी.पवार.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड.के.बी.जाधव.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- अॅड.जी.एस.पाटील.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे नौकरदार असून आपल्या दैनंदिन कामकाजासाठी महिंद्रा टु व्हीलर कंपनीचे मॉडेल स्टॅलीओ घेण्याचे दि. 13-11-2010 रोजी गैरअर्जदार क्र. 2 कडे रु. 1000/- भरुन लाल कलरची गाडी बुक केली. ज्याचा पावती क्र. 328 आहे. तसेच 22,500/- दि 24/01/11 रोजी पावती क्र. 481 नुसार नगदी व रोख भरले. उर्वरीत रु. 21,199/- दि. 04/02/11 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांना पावती क्र. 507 नुसार भरले. दि. 04/02/11 रोजी गैरअर्जदार क्र. 2 कडे लाल कलरची गाडी उपलब्ध नसल्यामुळे दि. 07/02/11 रोजी येण्यास सांगितले. तक्रारदाराने दि. 07/02/11 रोजी लाल कलरची गाडी खरेदी केली. ज्याचा इंजीन नं. ए.एच. 870012 असून रजि नं एम. एच. 24/डब्ल्यू - 7380 असा आहे. सदरची गाडी घेतल्यानंतर एका महिन्यातच Suspension problem, Average problem, gear setting problem, pickup problem, petrol problem, oil lickage problem गाडी चालविण्यास त्यामुळे अडचणी येऊ लागल्या वरील सर्व समस्या दि. 08/03/11 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांना सांगितले असता त्यांनी दुरुस्त करुन देण्याची हमी दिली. व गैरअर्जदार क्र. 2 यांनी गाडी दुरुस्त करुन दिली. त्यानंतर परत एका महिन्यात तसाच समस्या सुरु झाल्या. गैरअर्जदार क्र. 2 यांनी परत गाडी दुरुस्त करुन दिली. गाडी मधला दोष काही जातच नव्हता. त्यामुळे सदरच्या गाडीमध्ये गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे गाडीमध्ये निर्मिती दोष असल्यामुळे माझी गाडी घेवून मला नवीन गाडी देण्यात यावी अथवा गाडीची रक्कम परत करण्यात यावी असे गैरअर्जदार क्र. 2 याना असे सांगितले. परंतु गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपण या गाडी बद्दल वरिष्ठाना व कंपनीला बोललेलो आहोत व त्यांनी एक्सपर्ट मेकॅनिक दि; 20/05/11 रोजी पाठवणार आहेत असे सांगितले. व दि. 20/05/11 रोजी तक्रारदारानी सर्व दोषयुक्त गैरअर्जदार क्र. 2 कडे तपशील लिहून जॉब कार्ड क्र. 827 वर नोंदवून घेतला पुन्हा आठवडा भरात तीच समस्या गाडी चालवताना जाणवू लागली. म्हणून तक्रारदाराने दि 29/07/11 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविली. परंतु गैरअर्जदारानी सदरची नोटीस मिळूनही त्या नोटीसचे उत्तर ही दिले नाही. व रक्कम अदा केली नाही. म्हणून गैरअर्जदाराने निर्मीती दोष असलेली गाडी विकून तक्रारदाराच्या सेवेत त्रुटी केली असल्यामुळे, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु. 50,000/- दुचाकी वाहन खरेदी केलेल्या तारखेपासुन 12 टक्के व्याज दराने देण्यात यावे. अथवा नवीन त्याच कंपनीचे दुसरे वाहन देण्यात यावे. तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 10,000/- तक्रारीचा खर्च रु. 5,000/- देण्याचा आदेश व्हावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठविलेली नोटीसची प्रत, तक्रारदार यांनी पैसे भरलेली पावती, तक्रारदार यांनी पैसे भरलेली पावती, नोटीस पाठविल्या बाबतची पावती, तक्रारदार यांनी पैसे भरलेली पावती, जॉब कार्डची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना दि. 12/09/12 रोजी आर.पी.ए.डी ने नोटीस प्राप्त होवूनही ते हजर झाले नाहीत. गैरअर्जदार क्र. 1 कडुन अॅड के.बी.जाधव यांनी दि. 06/09/12 रोजी वकील पत्र दिले. व गैरअर्जदार क्र. 2 कडून 12/09/12 रोजी अॅड जी.एस. पाटील यांनी वकील पत्र दिले. परंतु त्यांचे म्हणणे आजपर्यंत आले नाही.
अर्जदाराची सर्व कागदपत्रे पाहता अर्जदाराने न्यायमंचा मध्ये विवेका मोटार्सचे पावती क्र. 481 रु. 22,500/- पावती क्र. 507 रु. 21,199/- व पावती क्र. 328 रु. 1000/- न्यायमंचात दाखल असून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी याबद्दल कसलाही उजर घेतलेला नाही. तसेच सदरची गाडी ही दि. 07/02/11 रोजी घेतलेली असून सदर गाडीमध्ये Suspension problem, Average problem, gear setting problem, pickup problem, petrol problem, oil lickage problem हे असल्यामुळे अर्जदारास शारीरीक व मानसिक त्रास झाला आहे. गैरअर्जदाराने सदर केस दाखल करण्यापुर्वी दि. 29/07/11 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना रितसर नोटीसही पाठविली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी कसलाही उजर न घेतल्यामुळे हे न्यायमंच या मतास आले. तक्रार योग्य असून ती गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी गाडी क्र. एम. एच. 24/डब्ल्यू - 7380 अर्जदारास जो मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला त्याला त्या गाडीपासुन सुविधा मिळू शकली नाही म्हणून हे न्यायमंच खालील प्रमणे आदेश पारीत करीत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास नवीन स्टॅलिओ
कंपनीची गाडी किंवा रु. 50,000/-(अक्षरी पन्नास हजार रुपये फक्त ) आदेशाची प्रत
प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास
जबाबदार राहतील.
4) अर्जदाराने त्याच्याकडील गाडी क्र. एम. एच. 24/डब्ल्यू - 7380 ती गैरअर्जदार
क्र. 2 ला परत करावी.
5) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 2,000/-(अक्षरी दोन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या
खर्चापोटी रु. 1,000/-(अक्षरी एक हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन
30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.